मित्राचे कोणते पाच शब्द आपले कॉलजचे
अक्खे वर्ष वाया घालवु शकते ?
.
.
.
.
.
.
.
.
- शप्पथ ! ती तुझ्याकडेच बघत होती

माझी माय सरसोती

माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपीतं पेरली !

माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत
पावसात समावतं, माटीमधी उगवतं !

अरे देवाचं दर्सन झालं झालं आपससूक
हिरिदांत सूर्याबापा दाये अरूपाचं रूप

तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझं येणं-जाणं वारा सांगे कानांमधी


गीत       -     बहिणाबाई चौधरी
संगीत    -     यशवंत देव
स्वर       -     उत्तरा केळकर  

स्वप्‍न

मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्‍न होते स्वप्‍नात पाहिलेले !

स्वप्‍नातल्या करांनी, स्वप्‍नातल्या तुला मी
होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ?

स्वप्‍नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले

स्वप्‍नातल्या परीला स्वप्‍नात फक्‍त पंख
दिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले

स्वप्‍नात परीला स्वप्‍नात ठेवुनी जा
हे नेत्र घेऊनि जा स्वप्‍नात नाहलेले

जा नेत्र घेऊनि जा स्वप्‍नांध पांगळीचे
आता पहावयाचे काही न राहिलेले


गीतकार    -     विंदा करंदीकर
संगीत       -     यशवंत देव
स्वर          -     पद्मजा फेणाणी-जोगळेकर
गीतसंग्रह  -    ही शुभ्र फुलांची ज्वाला
ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परकं घर आपलं मानायचं?
तिच्याकडून का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची?
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे,
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून...
तो येतो का कधीतरी तिच्याकडे
आपली वाट मोडून,
तीचं पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती 
त्याचीच बनून जाते...
एकदा सागर विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते,
पण म्हणून नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं...
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं...!!

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा


कवी - सुधीर मोघे 

सुभाषिताचा अर्थ

शिक्षक : मुलांनो सुभाषिताचा अर्थ सांगा -
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा

विद्यार्थी : सोपा आहे गुरुजी.
दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला वा जनका तुझी मजा आहे.

"रोज-गार"

भयंकर पी जे :

१ बे रोजगार मुलगा होता,
त्याने गुलाबाचे फूल फ्रीजर मध्ये
ठेवले,
..
.
.
.
.
.
आणि मग दुसर्या दिवशी ...
त्याला "रोज-गार" मिळाला !!!