रंगि रंगला श्रीरंग

अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥

मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥

नाही भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध काम ॥३॥

देही असुनि तूं विदेही ।
सदा समाधिस्त पाही ॥४॥

पाहते पाहणें गेले दुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥



रचना    -     संत सोयराबाई
संगीत   -     किशोरी आमोणकर
स्वर     -     किशोरी आमोणकर
राग      -    भैरवी

कांदा-मुळा-भाजी

कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी ।
अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥

सावता म्हणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥



रचना     -     संत सावता माळी
संगीत    -     स्‍नेहल भाटकर
स्वर      -     स्‍नेहल भाटकर

अगा वैकुंठीच्या राया

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥



रचना    -     संत कान्होपात्रा
संगीत   -     मा. कृष्णराव,  विनायकबुवा पटवर्धन
स्वर      -     पं. राम मराठे
नाटक   -    संत कान्होपात्रा (१९३१)
राग      -    भैरवी
ताल     -    केरवा

नको देवराया अंत आता पाहू

नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा

तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई

मोकलूनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात




रचना     -    संत कान्होपात्रा
संगीत    -    आनंदघन
स्वर       -    पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट   -    साधी माणसं (१९६३)

कोणी गेलं म्हणून

कोणी गेलं म्हणून,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

जगायचं असतं प्रत्येक क्षण,
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं...

आठवणींच्या वाटांवरून
आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं...

आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं...

कसं ही असलं आयुष्य आपलं,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

दिवस तुझा नसेलही, रात्र तुझीच आहे.
त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं असतं...

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं...

कोणी गेलं म्हणून..

दळिता कांडिता

दळिता कांडिता ।    तुज गाईन अनंता ॥१॥

न विसंबे क्षणभरी ।    तुझे नाम ग मुरारी ॥२॥

नित्य हाचि कारभार ।    मुखी हरि निरंतर ॥३॥

मायबाप बंधुबहिणी ।    तू बा सखा चक्रपाणी ॥४॥

लक्ष लागले चरणासी ।    म्हणे नामयाची दासी ॥५॥


रचना     -    संत जनाबाई
संगीत    -    सुधीर फडके
स्वर       -    आशा भोसले
चित्रपट   -    संत जनाबाई (१९४९)
एक T.C पाच बायकांना पकडतो...
त्यातल्या पहिल्या बाईने साडी घातलेली असेत म्हणुनतो T.C.तीच्याकडुन 400 रु घेतो...
.
दुसर्या बाईन जीन्स घातलेली असतेतो TC. तीच्याकडुन 300 रु घेतो..
.
तीसर्या बाईने हाफ टॉप आणी स्कर्ट घातलेली असते तो T.C. तीच्या कडुन 200रु घेतो..
.
चौथ्या बाईने त्यापेक्षाही हाफ स्कर्ट घातलेला असतो तो T.C. तीच्याकडुन 100रु घेतो....
.
तर तो T.C. त्या पाचव्या बाईकडुन पैसे नाही घेत.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण त्या बाईकडे तिकीट असते..
.
विचार बदला...
देश बदला..