कुटुंब झाले माझे देव

अवघे कुटुंब झाले माझे देव !

माझे मातृदेव, पितृदेव

भार्या माझी देव, स्वर्गसुखठेव

चिमुकले देव बाळे माझी


स्वसा माझ्या देव, बंधु माझे देव

गुरु माझे देव, शिष्य देव

सोयरेधायरे सर्व माझे देव

मित्र माझे देव, शत्रु देव

देवांच्या मेळ्यात मीही एक देव

करी देवघेव आनंदाची !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

वाटसरू

वाटसरू आहे वाट मी शोधित

वाटाड्या, सोबत करी मला

'अंधार मनोरा' ज्याला म्हणतात

तिकडे ही वाट जात का रे ?

कितीक प्रवासी मार्गाने या गेले

पुन्हा नाही आले परतून

पदोपदी येते आडवे संकट

सर्वत्र कंटक पसरले

शेवट व्हायचा काय तो मी जाणे

तरी आहे जाणे मला प्राप्त !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

शुद्ध निरामय

शुद्ध निरामय, निर्व्याज आनंदा,

कोठे तू सुह्रदा गेलास रे?

जीवनामार्गात पसरे अंधार

तुटता आधार तुझ्या सख्या,

तुझिया सांगाती गेला तो उल्हास

उदास उदास भासे मला !

भविष्यकाळीच्या अंधुक साउल्या

मजल्या वाकुल्या दावितात

ये रे जिवलगा, धरी माझा हात

हासत सोबत करी मला


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

सहज

सहज मी मागे वळून पाहिले

चरकून गेले मन माझे !

विसरून गेले चेहरे कितीक

कितीक अंधुक ओळखीचे

होते मजकडे आशेने पाहात

मजला बाहत मूकपणे

सांगायाचे होते राहिले ह्रद्गत

नव्हते ते येत बोलायाला

वाईट वाईट वाटले मनाला

आणि ढळढळा रडलो मी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

स्वप्न

स्वप्ने रचणारा मीच कारागीर

आहे जादूगार कलावन्त

'उगाच रची हा पत्त्यांचे बंगले,

वेड या लागले,' म्हणा तुम्ही

'उगा फुगवीतो रबराचे फुगे

फुटोनि अवघे वाया जाती!'

खूळ म्हणा तुम्ही, ही तो माझी कला

देत विरंगुळा जीवा माझ्या

होईल साकार स्वप्न एक तरी

आस ही अंतरी आहे माझ्या


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

एकतारी

एकला छेडीत आलो एकतारी

नाही रागदारी ठावी मला

कुणी न भेटला साथी मार्गामधी

सूर न संवादी मिळे मला

पिचलेला पावा काढी बदसूर

तसा मी बेसूर गात आहे

बीन छेडी 'आशा' बांधून लोचन

तसा मी जिवन कंठिताहे

केव्हातरी माझी तुटणार तार

एकला जाणार आलो तसा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

झेंडूचीं फुलें

कवी आणि चोर
कादरखां
फूल, कवी, बाला आणि मासिक
पाहुणे
आम्ही कोण ?
मोहरममधली मदुर्मकी
सखे, बोल-बोल-
रस्त्यावर पडलेलें विडीचें थोटुक !
सांग कसे बसले?
कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत
त्याचें काव्यलेखन
कुठें  जासी ?
अहा, तिजला चुंबिलें असें यानें !
सिनेमा नटाप्रत -
प्रेमाचें अव्दैत
परीटास
पाय घसरला तर -?
श्यामले

नवरसमंजरी
      शृंगाररस
      वीररस    
      करुणरस
      हास्यरस
      वत्सलरस
      बीभत्यसरस
     रौद्ररस
     अद्भूतरस  
      शांतरस

कवी आणि कारकून
चाफा 
अरुण
प्रेमाचा गुलकंद
कानगुजला
पत्रें लिहिलीं पण….?
मनाचे श्लोक
कवी आणि कवडा
कवीची 'विरामचिन्हे'
वधूवरांना काव्यमय अहेर
एका पावासाठी
बायको सासरी आल्यानंतर-
मोडीसाठी  धांव
रसिकांस चेतवणी
प्रश्न - पत्रिका