माझ्या लालू बैलाय्ची जोडी रे
कशी गडगड चाले गाडी
एक रंगी एकज शिंगी रे
एकज चन्का त्यांचे अंगीं
जसे डौलदार ते खांदे रे
तसे सरीलाचे बांधे
माझ्या बैलायची चालनी रे
जशी चप्पय हरनावानी
माझ्या बैलायची ताकद रे
साखयदंडाले माहित
दमदार बैलाची जोडी रे
तिले सजे गुंढयगाडी
कशि गडगड चाले गाडी रे
माझी लालू बैलायची जोडी
कसे टन् टन् करती चाकं रे
त्याले पोलादाचा आंख
सोभे वरती रंगित खादी रे
मधीं मसूर्याची गादी
वर्हे रेसमाचे गोंडे रे
तिचे तीवसाचें दांडे
बैल हुर्पाटले दोन्ही रे
चाकं फिरती भिंगरीवानी
मोर लल्कारी धुर्करी ना -
लागे पुर्हानं ना आरी
अशी माझी गुंढयगाडी रे
तिले लालू बैलायची जोडी
कवयित्री – बहिणाबाई चौधरी
कशी गडगड चाले गाडी
एक रंगी एकज शिंगी रे
एकज चन्का त्यांचे अंगीं
जसे डौलदार ते खांदे रे
तसे सरीलाचे बांधे
माझ्या बैलायची चालनी रे
जशी चप्पय हरनावानी
माझ्या बैलायची ताकद रे
साखयदंडाले माहित
दमदार बैलाची जोडी रे
तिले सजे गुंढयगाडी
कशि गडगड चाले गाडी रे
माझी लालू बैलायची जोडी
कसे टन् टन् करती चाकं रे
त्याले पोलादाचा आंख
सोभे वरती रंगित खादी रे
मधीं मसूर्याची गादी
वर्हे रेसमाचे गोंडे रे
तिचे तीवसाचें दांडे
बैल हुर्पाटले दोन्ही रे
चाकं फिरती भिंगरीवानी
मोर लल्कारी धुर्करी ना -
लागे पुर्हानं ना आरी
अशी माझी गुंढयगाडी रे
तिले लालू बैलायची जोडी
कवयित्री – बहिणाबाई चौधरी