( चाल-उद्धवा शांतवन कर जा. )
जिनें मला वेडा केलें तिच्यावरी ही फिर्याद ! ॥ध्रु०॥
ऋतु वसन्त येउनि कुसुमीं उपवनास शोभा आली;
कुंजीं मीं बसलों एका हर्षित मम वृत्ती झाली;
आली तों कोणी युवती त्या स्थळीं रूपगुणखाणी;
चुम्बुनि मज गुणगुणली ती मधुर गीत माझे कानीं !
तल्लीन सवें झालों,
विकलगात्र होउनि गेलों,
निर्वाणीं पूर्ण बुडालों ---
नुरलीच जगाची याद !
जिनें मला वेडा केलें तिच्यावरी ही फिर्याद !
अन्तर्हित झाली रामा भानावरि येतां कळलें;
विरही मी पीडित झालों ह्रदयीं उत्कण्ठा---अनलें;
ध्यास तिचा घेउनि फिरलो शून्य दिशा रानोमाळ,
तिचेवरी गाणीं वेडीं गाइलीं क्रमाया काळ !
“ पुरतां न अनुग्रह करितां,
गेलीस कशी सुखसरिता ?
धांव ! करीं न दयाब्धि रिता !”---
ही तिला घातली साद !

स्वप्नांतचि केव्हां भेटे नेते तों स्वर्गद्वारीं,
लोटिते मागुती खालीं भूतलावरी अन्वारीं !
तेणें मी विव्हल भारी संसारीं परि करमेना;
धन न करीं; वणवण करितों जम कोठ नीट जमेना !
तरि तिलाच चित्त ध्यातें,
निद्रेविण रजनी जाते !
आप्तवर्ग म्हणती ” यातें ---
कुठली ही जटली ब्याद !”
जिनें मल वेडा केलें तिच्यावरी ही फिर्याद !
हीन दीन झालों छंदी फंदी मी तुझिया नादीं,
त्यामुळें परी न मनाला घालितों कधींहि विषादीं;
बूज तुवां या दासाची केली गे नाहीं अजुनी,
दुःख हेंचि वाटे म्हणुनी गातसें अशीं गार्हाणीं
तूंच चित्त आधीं हरिलें,
मज आतां कां दुरी धरिलें;
चिर चरण तुझे मीं स्मरले !---
हो प्रसन्न नुरवीं खेद !
जिनें मला वेडा केलें तिच्यावरी ही फिर्दाद !
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
- १९०२