सूचना...

जर आपण सहकुटुंब कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक ;
व्हाट्सप वर टाकू नये...!

त्यामुळे...

जे कधी कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडणं होतात...!!

मिसळ - एक रसग्रहण एक अमृतानुभव ( आणि काही उपयोगी टीप्स )

मिसळ खाणे हा एक आनंद सोहळा असतो.

मिसळ हा खरं तर गरीबापासून श्रीमंतांपर्यन्तचा राजमान्य राजश्री बेत. अश्या या मिसळीचा स्वाद घेण्याचे एक शास्त्र आहे.

म्हणजे बघा, उत्तमात-उत्तम मिसळ कुठे मिळेल याची आधी माहिती काढावी. मनात आलं म्हणून कुठेही जावून मिसळ हादडली याला काहीच अर्थ नाही.

मिसळ खायला जाण्याच्या आधी त्या मिसळीचा इतिहास, बनवण्याचं  तंत्र, मिसळीतले घटक पदार्थ, यांचा अभ्यास करावा.

उगाच चिचूंद्रया वाटीत, पातळ बेचव रस्सा देणाऱ्या मिसळीच्या दुकानात पाऊलही ठेवू नये.

अश्या निवडलेल्या मिसळीच्या ठिकाणी शक्यतो कमी गर्दीच्या वेळी पोहोचावे.

चांगली उजेडाची आणि हवेशीर जागा बघुन आपली बैठक मारावी आणि मिसळ ऑर्डर करावी.

काही ठिकाणी मिसळ ऑर्डर केली की आधी कांदा आणि लिंबू याची प्लेट आणून देतात.

काही मुर्ख लगेच त्यातील कांदा तोंडात टाकतात, लिंबु चाखुन बघतात. असं कधीही करु नये.

हे म्हणजे वाग्दत पत्नीला भेटण्यासाठी गेलेलं असतांना, तिच्याच धाकट्या बहिणीवर नजर टाकण्याइतकं आचरटपणाचं आहे.

हे असले पदार्थ मिसळ खाण्याआधी तोंडात टाकून तुम्ही जिभेचा स्वाद ही बिघडवून टाकता.

तर, मिसळ समोर येवु द्यावी. मिसळ शक्यतो आडव्या मोठ्या डिश मध्ये असावी. उगाच छटाकभर गोलाकार डिश मध्ये अजिबात असू नये.

समोर उजव्या बाजूला कमीत कमी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा असावा. त्यात कोथिंबीर असणं क्रमप्राप्त आहे. नसेल, तर सरळ निषेध नोंदवा. कांद्या बरोबर लिंबाच्या फोडी असाव्यात.

डाव्या बाजूला गरमागरम, चमचमित रश्याचं भांडं असावं.

त्यातील लाल-पिवळा, काळसर तर्रीबाज रश्याचा वास नाकाच्या रंध्रा रंध्रात सामावून घेत जीभेला आवाहन करावे. नुसत्या त्या वासाने जिभेत उत्साह सळसळला पाहिजे.

सर्व मांडामांडी झाली की लगेच भसकन मिसळ खायला सुरुवात करू नये.

प्रथम मिसळी मध्ये काय काय आहे याचा अंदाज घ्यावा. ती व्यवस्थित मिसळून घ्यावी. मस्त मिसळून झाली कि त्यातील रस्सा शेव, पापडी, शेंगदाणे इत्यादी पदार्थात शोषला जातो. मिसळ थोडी घट्टही होते.

मग रस्सा चमच्याने व्यवस्थित घुसळून त्यातील उसळीचा भाग या मिश्रणावर नीट पसरवावा. मिसळ भिजली की त्यावर रस्श्यातील तर्री चवी पुरती टाकावी. आता पुन्हा हे सर्व चमच्याने छानपैकी मिसळून घ्यावे.

त्यावर बारीक कांदयाची पेरणी करावी.

सर्वात शेवटी, चवी पुरते लिंबू पिळावे. उगाच समोर आहे म्हणून भरमसाठ लिंबू पिळून मिसळीचा स्वाद बिघडू नये.

आता पाव. तो मऊ, लुसलूशित ताजातवाना असावा. कडक झालेला, सुरकुतलेला, काळे ठिपके असलेला पाव लगेच धुत्कारुन लावावा.

पावाची डिश डाव्या बाजूला ठेवावी. आणी परमेश्वराचे आभार मानून मिसळीचा स्वाद घ्यायला सुरुवात करावी.

पावचा छोटा टुकड़ा तोडून तो मिसळ मध्ये बुडवून तोंडात टाकावा, आणि लगोलग एक चमचा रस्श्याचा जिभेवर अभिषेक करावा. पहिला घास तोंडात जाताच रस्सा आणि मिसळ यांचा झटका जिभेवरुन थेट मेंदूच्या शेवटच्या टोकावर पोचतो. सगळ्या शरीरावर रोमांच उभे राहातात!

हळूहळू, स्वाद घेत घेत खावे. मधुनच कच्चा कांदा चवी पुरता खावा.

खातांना घाई करु नये. तसंच खात असतांना ऑफिसचं काम, साहेबाचा विक्षिप्त स्वभाव, राजकारण असल्या क्षुद्र गोष्टींची चर्चाही करु नये.

मिसळ खाणं हे एक योगसाधन आहे.

प्रत्येक घासात पाव कमी आणि मिसळ जास्त असे प्रमाण असू द्यावे. उगाच पोळी भाजी खाल्लासारखं पाव मिसळीला लावून लावून खाऊ नये. तो मिसळीचा विनयभंग असतो.

पावामुळे डिश मधले रस्स्याचे प्रमाण कमी होते. मग थोडे खाणे थांबवावे. पुन्हा रस्साचे भांडे समोर आणावे. ते गरम नसेल तर दूसरे आणायला सांगावे. मग पुन्हा तो गरमागरम रस्सा आपल्या मिसळीत टाकून, मिसळून घ्यावा.

हा रस्सा भांडयातून मिसळीवर टाकतांना त्याचे दोन चार थेंब तुमच्या कपड्यावर उडालेच पाहिजेत. नाहीतर तुम्ही मिसळीशी एकरूप झालाच नाही असा अर्थ होतो.

पुन्हा कांदा, लिंबू याचे सोपस्कर करावे. आणि पुन्हा खायला सुरुवात करावी.

आणि असे कमीत कमी दोन ते तीन वेळा करावे.

जास्तीत जास्त दोन पावात मिसळ खावी. आपला उद्देश मिसळ खाणे हा आहे, पाव खाणे नाही. त्यामुळे पाव कमी, मिसळ जास्त असू द्यावी. तरच मिसळीचा मान राखला जातो.

नुसतंच पोट भरेपर्यंत खाऊ नये. आत्मा संतुष्ट होईपर्यंत खावं.

खातांना डाएटींग, ब्लड शुगर, कोलेसटेरॉल असले चिंताजनक विचार डोक्यात आणू नयेत.

खाऊन झालं कि रिकाम्या डिश मध्ये एक मोठा चमचाभर रस्सा ओतून घ्यावा. चमच्या चमच्याने तो रस्सा ग्रहण करावा.

तुमच्या नाकातून, डोळ्यातून पाणी आलं आणि कपाळावर घामाचे दवबिंदु जमले कि मिसळ सुखरूप पोहोचली हे ओळखावं!

आता तुम्ही हात धुवायला मोकळे!

ज्या कोणा अन्नपुर्णेने ही मिसळ बनवली तिचे आभार मानावे, तिला दीर्घायुष्य चिंतावं.

समोरचा चहा घेण्याआधी जरा हाताचा वास घ्यावा.

मिसळ अजूनही आपल्या बोटांवर रेंगाळत असते, पुन्हा येण्याचं वचन मागत असते!

भयसापळा, मोहसापळा

पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो.
याला भयसापळा असे म्हणता येईल.

जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही..!

माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्‍यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.

आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?

पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं,
हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.

भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

                                                    🐚☀🐚
बालपण कुठे मिळाले तर पाठवा
पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत

झोप कुठे मिळाली तर पाठवा
पुष्कळशी स्वप्ने अपुरी राहिली आहेत

आराम कुठे मिळाला तर पाठवा
खुपशी सुखे उपभोगायची आहेत

नाती कुठे मिळाली तर पाठवा
माणसुकीला शोधायचे राहिले आहे

"मी" कुठे मिळालो तर मला पाठवा
माझ्या"मी" पणांत मीच हरवलो आहे.
एका ७५ वर्षीय वृद्ध गृहस्थाला एका आर्थिक गुंतवणूक तज्ञाने सांगितलं कि, काका, तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा 7 वर्षानंतर भाव दुप्पट होणार आहे.

ते गृहस्थ म्हणाले, ' मुला, मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोहोचलो आहे की, जिथे मी केळीसुद्धा कच्ची विकत घेत नाही.
एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे

कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार
होते
तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला
म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला
त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद
झाला
लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले
अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे
निश्चित होते
त्या माणसाला काही सुचेनासं झालं

पण तासा भरात एक चमत्कार झाला
आणि कोणी तरी दरवाजा उघडला
तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन
उभा होता

त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला
प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले
की तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय

सुरक्षा रक्षक म्हणाला
या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे
आहात की
जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता
आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण
संध्याकाळी गेला नाहीत
म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो

त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे
एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे
एक दिवस त्याचा जिव वाचवेल

म्हणून नेहमी लक्षात ठेवा

जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.

माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल...
म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा...🙏💐🙏👏
नातू : आजोबा.. तुम्ही लाईफ इन्शुरन्स का नाही केलं ?

पुणेरी आजोबा : मी गेल्यावर.. तुम्हाला खरोखरचं दुःख व्हावं म्हणुन !!