शहरातल्या मुलीचे खेड्यात लग्न झालं

सकाळी सकाळी सासू म्हणाली
म्हशीला खायला घाल

सून गोठ्यात गेली
म्हशीच्या तोंडाला फेस पाहून परत आली

सासूने विचारलं
म्हशीला चारा टाकला का

सून म्हणाली

ती आजुन ब्रश करतेय...
मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?
विद्यार्थी: दहा.
मास्तर : ते कसे ?
विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील.
त्यांचा काय फणस होणार ?
एक भिखारी देवाला
हे देवा....
मला खाण्यासाठी अस काय तरी दे..
जे खाल्यावर सुधा संपायला नको...😜😜
.
.
देव-
हे घे पोरा...
.
.
.
'चिगंम'
मास्तर : सांग.. ५ – ५ = कीती??

सगळी मुले शांत..
🙄🙄

मास्तर : सांग बंड्या.. जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि
मी ५ इडल्या खाल्ल्या..
तर

तुझ्याकडे काय उरले??

बंड्या : सांबर अणि चटणी..!!!
Physics च्या नियमानूसार ....

 कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते....

उदाहरणार्थ


जबाबदारी!!!!
शाळेत आपल्या आदरणीय शिक्षकांनी केलेल्या काही शिक्षा आठवल्या कि, पुन्हा एकदा त्यांचे आभार मानावेसे वाटतात. कारण, त्यांतून त्यांनी काय शिकवले ते बघा..!

👇
👇

१) बाकावर उभे राहा :-
😳😳 आपली पातळी उंचवा. मोठे स्वप्न बघा. ☺

२) हात वर करून उभे रहा :-
😨😨 उच्च धेय्य ठेवा, उंची गाठा. 😊😊

३) भिंतीकडे तोंड करून उभे रहा :-
😱😱 आत्मपरीक्षण करा. 😀😀

४) वर्गाबाहेर उभे रहा :-
😁😁 चार भिंतीतून बाहेर या, जग बघा. 😄😄

५) गुढगे टेका :-
😔😒 विनम्र व्हा. 😀😄

६) कोंबडा व्हा :-
😁😳😟 शारीरिक सहनशक्ती वाढवा. 😀😄😃

७) फळा पुसा :-
😒😤😖 झाले गेले विसरा आणि नव्याने सुरुवात करा.😄😄😃

८) तोंडावर बोट ठेवा :-
😷🙊🙊 (स्वत:च्या) बाता कमी मारा. 😉😄😃

९) कान धरा :-
😁😁😳 लक्षपूर्वक ऐका.😀😄😄

१०) वाका, अंगठे धरून उभे रहा :-
😟😦😧 लवचिक बना.😉☺😃

११) हा धडा दहा वेळा लिहा :-
😁😁😳 अचूकतेसाठी सराव करा. 😀😄😃

१२) शाळा सुटल्यावर थांबा :-
😣😩😫 जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका, विशेष व्यक्ती बना! 😃😃😃
नवस करून, 9 महीने जीवापाड जपून, दिवस रात्र स्वप्न बघून जन्माला आलेल्या मुलाचे नाव आई वडिल "विनोद" कसे काय ठेवतात मला आजवर नाही समजलय -
पु. ल. देशपांडे
😁😜😄

प्रताप नावाबद्दल पण तेच....
"हा आमचा प्रताप" अशी ओळख आई—वडीलांनी करुन दिली तर कसे वाटेल??
—पु. ल. देशपांडे
😂😂

पणशीकरांना मुलगा झाला...
मुलाचे नाव "श्रीपाद" ठेवले...
त्याचे पूर्ण नाव:

श्री पाद पण शी कर..!!!

💐पु. ल. देशपांडे 💐