संध्याकाळी मामा फिरायला बाहेर गेले असता दुकानावरील सर्व फलक पाहिले.


 त्यामध्ये लिहिलेल्या सर्व फलकामध्ये


 अर्धा शब्द निश्चितपणे *इंग्रजी*" होता


 जसे: -


 संजय *सर्व्हिस* स्टेशन


 अजय *मेडिकल* स्टोअर


 विजय *फोटो कॉपी सेंटर*


 बबलू *हेअर कटिंग*


 शिवा *बार एन्ड हॉटेल*


 गणेश *लॉज*


 ज्योती *हॉस्पिटल* ... इ.


मामाचे मन खूप अस्वस्थ झाले,

 मातृभाषेची ही अवस्था पाहून !!


 पण मग एक बोर्ड आला आणि फक्त एकच बोर्ड जो नेहमीच मातृभाषेत लिहिलेला असतो ..


 ज्यामुळे आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो -


 *देशी दारूचे दुकान*


 मामाचे हृदय प्रसन्न झाले


 देशभक्ती शरीरात जागृत झाली आणि मामाने त्या दुकानातूनच वस्तू विकत घेतल्या .....😁😁🤪🤪


 *महाभारताचे "नऊ सार सूत्र".*


 *१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"  - कौरव.*


*२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील." - कर्ण.*


 *३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल." - अश्वत्थामा.*


 *४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह.*


 *५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन.*


 *६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते." - धृतराष्ट्र.*


 *७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी* *घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे."*  - *अर्जुन......¦*


 *८) ...."प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही"...- शकुनी......*


 *९) "नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही"....- युधिष्ठिर....*


 *....या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा पुढे महाभारत होणे निश्चित आहे.....*


*....जो इतरांना संपविण्याची तयारी करतो..... तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो....आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.....तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.....*


*.....दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा....अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे सुद्धा कळणार नाही......*


*..."माणसाचा दर्जा हा जात... धर्म व मिळकती वरून ठरत नसतो... तर तो विचारांवरून ठरत असतो . .....धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो....धर्माचा नाही".......*

 आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक  शोधाची गोष्ट सांगतो..


‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता..


अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं..


पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले..

दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या..

सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती..


समस्या फार मोठी होती असं नव्हे पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती..

जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली तिला जखम झालीच समजा..


टोमॅटो कापला लागला चाकू-दार बंद करायला गेली लागला खिळा-दुध गरम करायला गेली बसला चटका..

जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती..


नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा धुणं-कापसानं पुसणं-कापडी पट्टी बांधून ड्रेसिंग करणं हे बिनपगारी काम रोजचंच लागलं होतं..


प्रेमापोटी सगळं निभावलं जात असलं तरी ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ आपण घरी असलो तर ठिके पण नसलो तर??काय करावं बुवा???

डिक्सन मोठ्या बुचकळ्यात पडला..


“वेंधळेपणा कमी होईल न होईल पण किमान जोसेफिनला तिला झालेल्या जखमेची काळजी घेणं यायला हवं”

डिक्सनला प्रकर्षानं जाणवलं..


‘एवढं काय त्यात?छोट्यामोठ्या जखमा तर असतात एवढं काय सिरियस त्यात?’असे विचार आपल्या किंचित निगरगट्ट भारतीय मानसिकतेमुळं येऊ शकतात पण इथं दोन मुद्दे येतात..


पहिला मु्द्दा म्हणजे पाश्चात्य देशात ढोबळ प्रेम-हक्क या पलिकडे वैयक्तिक पातळीवर एकमेकांची ‘परस्पर जबाबदारी’ म्हणून काळजी घेतात..

नाहीच जमलं तर एकवेळ नात्याला तिलांजली देतात पण नुसतीच चौकट पाळण्याच्या अट्टाहासात मेलेली नाती ओढत नाहीत..


आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा औषधांची उपलब्धता मर्यादित होती-प्रतिजैविकांचा फारसा विकास झालेला नव्हता त्यामुळं जखमा लांबायच्या-सेप्टिक व्हायच्या-अनेकदा मृत्यूही व्हायचे..


शेवटी डिक्सननं चौकोनी कापडाचे तुकडे,त्यांच्यावर एक चिकटपट्टी अन् वरनं क्रिनोलिन लावत जोसेफिनसाठी थोडी रेडिमेड तयारी करून दिली..

जुगाड यशस्वी झाला..

आता डिक्सन घरी नसला तरी जोसेफिन एकटी लिलया जखमेची देखभाल करू लागली..  


डिक्सन काम करत असलेल्या कंपनीत त्याच्या या घरगुती उद्योगाची चर्चा झाली..

अश्या प्रकारचं काॅम्बिनेशन असलेली कापडी पट्टी जखम विक्रमी वेळेत बरी करते हे ऐकून खुद्द कंपनीचा मालक नुसता चकित झाला नाही तर येडा व्हायचा बाकी राहिला..


या भन्नाट जुगाडची कल्पना सगळ्यांनाच जाम आवडली..

कंपनीनं याच पट्टीच्या धर्तीवर ‘बॅंड एड’ या नावानं बल्क प्राॅडक्शन करण्याचा निर्णय घेतला..

कल्पना नवी असल्यानं पहिली बॅच थोडी सावकाश पण विकली गेली..


हातानं बनवण्यात वाया जाणारा वेळ आणि घरोघरी असणारी मागणी यांचं व्यस्त समीकरण बघता कंपनीनं यासाठी मास प्राॅडक्शन व्हावं म्हणून यथोचित यंत्रसामग्री बसवली आणि बस्सऽऽ


‘बॅंड एड’ म्हणून तयार झालेल्या डिक्सनच्या या ब्रॅंडनं नंतर बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला..

कंपनीनं डिक्सनला थेट व्हाॅईस प्रेसिंडेटपदी नेऊन बसवलं..


जोसेफिनच्या स्वयंपाकघरात सुरू झालेला हा ‘बॅंड एड’ चा प्रवास आज आख्ख्या जगभर पसरलाय..

क्वचित अशी व्यक्ती असेल ज्यानं कधी आयुष्यात बॅंड एड बघितलं किंवा वापरलेलं नाही..

दोनेक रुपयाला मिळणाऱ्या बॅंड एडची आज मिलियन डाॅलर्संची उलाढाल होते..


अनेक ब्रॅंड्स आले-गेले पण आजही लोकं दुसऱ्या ब्रॅंडचं बॅंडेज मागतांनाही ‘अमुकतमुक बॅंड एड’ द्या असं म्हणतात हेच या प्राॅडक्टचं यश.


🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

 📒 *शरीरात रक्ताचे काम काय असते ?* 📒 

*************************************


शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते.  रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था.


 रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते.


 सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते.


 मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही.


 जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते.


 रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.


रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.

एका रेल्वे स्टेशन वर एक रेल्वे येऊन थांबते, जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता, तेवढ्यात एका शेठ ने त्याला आवाज दिला ये मुला, शेठ ने विचारल कितीला पाणी? मुलगा म्हटला २५ पैसे तर शेठ म्हंटला १५ पैशात दे, मुलगा गालात हसला व पाणी त्याने ज्या ग्लास मध्ये काढले होते ते जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले, हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिल, ते रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले तू #हसला का? 


मुलगा म्हंटला शेठला #तहान नव्हती लागली फक्त #किम्मत विचारायची होती, त्यावर त्या महाराजाने विचारल तुला कस माहीत शेठला तहान नव्हती लागली? त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले,

"जेंव्हा माणसाला खरच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे?"


 *एका घरात पाच दिवे लावले होते.*


*एके दिवशी एक दिवा म्हणाला,मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही.त्यामुळे मी विझुन जाणेच चांगले.. आणि तो विझून गेला.*


*तो दिवा होता उत्साहाचे प्रतिक...*

 

*हे पाहून  दुसरा दिवा होता, जो शांतीचे प्रतिक होता , त्यानंही हाच विचार करून तो सुद्धा विझून गेला!!!*



*उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्या नंतर तिसरा दिवा -जो हिंमतीचा होता, तो ही आपली हिम्मत हरला आणि विझून गेला!!!*


*उत्साह, शांती, हिम्मत हे विझल्या मुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझुन गेला!!*


*सगळे दिवे विझल्या नंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहीला.पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता.*


*जेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहिलं.. घरात एकच दिवा जळतोय. तो खूप खूश झाला. चार दिवे विझून सुद्धा तो खूश होता की, कमीत कमी एक दिवा तरी चालू आहे.!!!*


*त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले.*


*तो पाचवा दिवा कोण होता ?*

*तो होता उमेद.! तो उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा. इतर दिवे आपोआप प्रकाशित होतील.*

 *जेव्हा एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्याने पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते; वाचा पुर्ण किस्सा*



ही गोष्ट आहे साल १९७९ ची. संध्याकाळचे सहा वाजले होते. एक शेतकरी ईटावा जिल्ह्याच्या उसराहार पोलीस स्टेशनमध्ये मळलेला कुर्ता आणि चुरगळलेले धोतर घालून आला होता. त्याला त्याच्या हरवलेल्या बैलाची तक्रार नोंदवायची होती.

त्याने इन्स्पेक्टरला हरवलेल्या बैलाची तक्रार लिहून घेण्यासाठी विनंती केली. इन्स्पेक्टरने शेतकऱ्याला तीन-चार इकडचे तिकडचे प्रश्न विचारले आणि रिपोर्ट न लिहिताच जायला सांगितले. शेतकरी काहीच बोलला नाही तो खुर्चीवरून उठला आणि स्टेशनच्या बाहेर निघाला.

इतक्यात त्यातील एक हवालदार शेतकऱ्याला म्हणाला, बाबा रिपोर्ट लिहून घेतो पण काही पैसे द्यावे लागतील. शेवटी ३५ रुपयांमध्ये इन्स्पेक्टर तक्रार नोंदवायला तयार झाला. त्याकाळी ३५ रुपयांची किंमतही खूप होती. लेखापालने तक्रार लिहून घेतली आणि शेतकऱ्याला विचारले की, बाबा सही करणार की अंगठा लावणार?

शेतकरी म्हणाला सही करणार. मग लेखापालने शेतकऱ्याला रिपोर्टचा कागद दिला. रिपोर्टचा कागद घेतल्यानंतर शेतकऱ्याने पेनसोबत स्टॅम्प पॅडपण उचलले. हे पाहिल्यानंतर लेखापाल विचारात पडला की, ह्याला जर सही करायची आहे मग स्टॅम्प पॅडची याला काय गरज आहे?

शेतकऱ्याने सही करताना नाव लिहिले ‘चौधरी चरण सिंह’ आणि मळलेल्या कुर्त्याच्या खिशातून एक स्टॅम्प काढला आणि त्या निकालाच्या कागदावर मारला. स्टॅम्पवर लिहिले होते की, ‘प्रधानमंत्री भारत सरकार’. हा सगळा प्रकार पाहून पूर्ण पोलीस स्टेशन हादरले होते.

कारण जो माणूस मळलेला कुर्ता घालून पोलीस स्टेशनमध्ये बैल हरवल्याची तक्रार नोंदवायला आला होता ते दुसरे तिसरे कोणी नसून शेतकरी नेते आणि त्याकाळचे भारताचे प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह होते. त्यावेळी ते पोलीस स्टेशनमध्ये पाहणी करायला आले होते. आपल्या गाड्यांचा ताफा त्यांनी पोलीस स्टेशनपासून लांब उभा केला होता.

त्यांनी येताना आपल्या कुर्त्यावर माती लावली होती. जेणेकरून त्यांना कोणी ओळखू शकले नाही. त्यांनी त्या वेळेस उसराहारचे पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते. 

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिह यांच्या जन्मदिवस 23 डिसेंम्बर हा *राष्टीय किसान दिन* म्हणुन साजरा केला जातो.