*एका घरात पाच दिवे लावले होते.*
*एके दिवशी एक दिवा म्हणाला,मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही.त्यामुळे मी विझुन जाणेच चांगले.. आणि तो विझून गेला.*
*तो दिवा होता उत्साहाचे प्रतिक...*
*हे पाहून दुसरा दिवा होता, जो शांतीचे प्रतिक होता , त्यानंही हाच विचार करून तो सुद्धा विझून गेला!!!*
*उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्या नंतर तिसरा दिवा -जो हिंमतीचा होता, तो ही आपली हिम्मत हरला आणि विझून गेला!!!*
*उत्साह, शांती, हिम्मत हे विझल्या मुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझुन गेला!!*
*सगळे दिवे विझल्या नंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहीला.पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता.*
*जेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहिलं.. घरात एकच दिवा जळतोय. तो खूप खूश झाला. चार दिवे विझून सुद्धा तो खूश होता की, कमीत कमी एक दिवा तरी चालू आहे.!!!*
*त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले.*
*तो पाचवा दिवा कोण होता ?*
*तो होता उमेद.! तो उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा. इतर दिवे आपोआप प्रकाशित होतील.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा