झडत्या

 विदर्भात पोळ्याच्या दिवशी सार्वजनिक झडत्या घेण्याची प्रथा असते।

झडत्या म्हणजे विरोधकांवर शेलक्या शब्दात टिका


 १) घुटी रे घुटी, आंब्याची घुटी !!

मुख्यमंत्र्यान देल्ली हो, कर्ज माफीची ‘‘जडीबुटी’!!

त्या जडी बुटीले, आरा ना धुरा !!

मुख्यमंत्री साहेब, ‘भिक नको हो, कुत्र आवरा !!

एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!


२) पोई रे पोई,, पुरणाची पोई !!

मुख्यमंत्र्यान देल्ली हो,

कर्ज माफीची गोई !!

त्या गोईले चव ना धव, 

कास्तकाराचं आस्वासनात,मराच भेव!!

रकुन आला कागुद, तीकुन आला कागुद,

आश्वासनावर,कास्तकार बसला

जिवमुठीत दाबून !!

एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!


३) वसरी रे वसरी, शम्याची वसरी,

पयलीले लेकरू, नाई झाल, 

मनुन श्यान ‘केली होदुसरी’ !!१!!

दुसरीच्या लग्नात वाजवला बीन,

जनता डोल्ली, म्हणे हो ‘आयेगे अच्छे दिन’ !!२!!

इकास जन्माले याची ‘वाट पाहून रायली जनता’

सरकारण देल्ला हो, ‘नोट बंदीचा दनका’ !!३!!

एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!


४) पोया रे पोया, यवत्याचा पोया

आत्महत्ये पाई लागला हो.. काया टिया !! १!!

काया मातीत टोब तो बीया, 

तूर घेणारे घालतात हो.. आम्हाले शिव्या !! २!!

शिव्या घालणारे, खातेत आमच काय बिघडवल हो..

आम्ही तुमच !! ३!!

घामाचा पैसा, मागतो आम्ही 

थंड हवेत बसता हो.. तुम्ही !! ४ !!

घाम गाऊन पिकवतो शेती

नांदी लागाल तर होईल माती !! ५!!

एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!


सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा।💐

 *🙏विचार धन🙏*


एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता.


कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. 


त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालवणारा नावाडी ही हैराण झाला.


 होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.स्वतः तर बूडेल बरोबर सगळ्यानाच घेऊन बूडेल.


सावकाराच्या लक्षात ही गोष्ट आली, तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षाही जास्त गडबड करू लागला.


हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि नम्रपणे सावकाराला म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."


सावकाराने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.


कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांताने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. आता त्याला नावेची गरज लक्षात आली.


थोड्या वेळाने त्याला ओढून पुन्हा नावेवर घेतले,मग मात्र तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.


त्याचे हे वर्तन पाहून सावकार चकीत झाला व म्हणाला "पाहिलं आधी किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."


प्रवाशी हसून म्हणाला  "महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.जेव्हा त्याला पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी आणि नावेची गरज,लक्षात आली.


*तात्पर्य*


*जो  पर्यंत अंगात रग आहे तो पर्यंत माणूस असाच वागतो. देवाचे अस्तित्वच विसरतो.देव किंवा सद्गुरू त्याला वारंवार जाणीव करुन देत असतात पण अंगातील मस्ती .. मायेत गुरफटून गेल्या मुळे देवाच्या किंवा गुरूच्या बोलण्या कडे त्यांच्या संकेताकडे तो दुर्लक्ष करतो ....* 


*पण मग जेंव्हा फटके बसतात तेंव्हा तोच देवा शिवाय गुरु शिवाय  पर्याय नाही हे जाणून शरण येतो ...*

 _*दोन चोरांची गोष्ट*_


_लेखक-अनामिक._


_*चोर १ –*_


     अमेरीकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरीकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता. 

      एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता.

      तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं होतं.

     चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.

     त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला! 

      वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साधं जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.

     लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले. आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली.

मुलाखत खुप रंगली,

     मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”

      “तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.

     “हो, हो!” एकच गलका झाला.

       “मी सर्वात मोठी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’. हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.” 

    सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.

     “मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”


_*चोर २ –*_


     १८८७ चा एक पावसाळा. एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला. 

      कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली. तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता. दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!

      नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली. तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला,

      शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले. 

     ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले.

      पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले. 

      कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसान भरपाईचे आदेश दिले.

      तो जेलमध्ये असतांनाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला. त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले. 

      विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा. 

*तात्पर्य*

    - आपली अंगभुत कला न

ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे.

     - तो प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.

     - तो व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.

     - तो प्रत्येक रिकामटेकडा व्यक्ती चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही.

     - आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

_*लेखक-अनामिक..*_

 कोणी कोणतेही धर्मशास्त्र वाचले नाहि तरी चालेल पण एकदा "शरिरशास्त्र" चा अभ्यास करावा.

( वैज्ञानिक मानवी शरिराचं अभ्यास करुन थक्क झाले आहेत )

*मानव शरिर अदभुत आहे.*


*मजबुत फुफ्फुस*

आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाहि येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केल तर तो टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल.


*अशी कोणतीही फॅक्टरी नाही*

आपले शरिर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जा पेक्षा जास्त रक्त कोषीकांचे उत्पादन होते. सतत शरिरात २५०० अब्ज रक्त कोषीका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषीका असतात.


*लाखो किलोमीटर चा प्रवास*

मानवाचे रक्त शरिरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरिरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरिराचे भ्रमण करतो.


*धडधड*

तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयंच पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो कीरक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकतो.


*सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ*


मानवाचे डोळे एक करोड रंगाना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुन पर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल. 


*नाकात एअर कंडीशनर*

आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.


*ताशी ४०० कि.मी. ची गती*

चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी. गतीने तडक उपयुक्त सुचनाचं प्रसारण करतं. मानवाच्या मेंदुत १०० अब्ज पेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत.


*जबरदस्त मिश्रण*

शरिरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकल आणि सिलिकोन आहे.


*अजब शिंक*

शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी. पर्यंत असु शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.


*बेक्टेरियाचे गोदाम*

मानवाच्या शरिराच्या १० %  वजन हे त्याच्या शरिरात असलेल्या बेक्टेरियाचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरीया असतात.


*विचित्र विश्व*

डोळ्याचा विकास लहान पणीच पुर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपुर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणु शकतो. कान १००० ते ५०००० हर्टज आवाजाना ओळखु शकतो.


*दातांची काळजी घ्या*

मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात, पण शरिराचे अन्य भाग स्वःताची काळजी स्वःताच घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वःताची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.


*तोंडांतली लाळ*

मानवाच्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेली १०००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथीना ओली ठेवते.


*पापण्या झपकणे*

वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापण्या झपकल्यास कचरा निघतो यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच  फरक जाणवतो.


*नखांची कमाल*


अंगठ्याचे नख सर्वात हळु वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.


*दाढीचे केस*

पुरुर्षाच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपुर्ण जीवन दाढी नाही करत तर ती ३० फुट लांब होवु शकते.


*जेवणाचे गणित*

व्यक्ती सामान्य रीत्या जेवणासाठी ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७००० पट जेवण खालेलं असते.


*केस गळण्याचा त्रास*

एका तंदुरस्त माणसाच्या डोक्यातले 80 केस दररोज गळतात.


*स्वप्नाची दुनिया*

बाळ जगात येण्या आधी पासुनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करतो. वसंत रुतुमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो.


*झोपेचे महत्व*

झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपुर्ण माहिती गोळा करतो. शरिराला आराम मिळतो आणी डागडुजीचे ( रिपेरिंग) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे गरजु होर्मोन्स मुक्त होतात.


*तेव्हा तुमच्या किमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका.*

 बंड्या हॉस्पिटलमध्ये जातो


नर्स: आता एक दीर्घ श्वास घ्या


बंड्या: ....(श्वास घेतो)


नर्स: आता कसं वाटते?


बंड्या: मस्त वाटतंय एकदम 😍

कोणता परफ्युम आहे ? 🥰

*मास्कवर कविता लिहून आणा*


एका ढिगात होती, वस्त्रे बहु सुरेख

होती पडून छोटी, चिंधी तयांत एक


शिंपी तिला न घेई, शिवण्यास पाटलोणी

चिंधीस का कधीही, समजेल वस्त्र कोणी?

कधी चोर त्या दुकानी, चोरून माल नेती

तेही न त्रास देती, चिंधीस काही एक


चिंधीस खंत वाटे, का मी निरूपयोगी?

हेटाळणी एवढी का, माझ्याच फक्त भोगी?

फडके म्हणून का, माझी नसे महत्ता?

मज गोधडीत घ्या ना, तुकडा म्हणून एक!


एके दिनी परंतु, चिंधीस त्या कळाले

साथीमधे तियेचे, उजळून भाग्य आले

भारी विशेष वस्त्रे, असुयेत होती खाक

मिरवे बनून चिंधी, कोविड मास्क एक


😄 

 संध्याकाळी मामा फिरायला बाहेर गेले असता दुकानावरील सर्व फलक पाहिले.


 त्यामध्ये लिहिलेल्या सर्व फलकामध्ये


 अर्धा शब्द निश्चितपणे *इंग्रजी*" होता


 जसे: -


 संजय *सर्व्हिस* स्टेशन


 अजय *मेडिकल* स्टोअर


 विजय *फोटो कॉपी सेंटर*


 बबलू *हेअर कटिंग*


 शिवा *बार एन्ड हॉटेल*


 गणेश *लॉज*


 ज्योती *हॉस्पिटल* ... इ.


मामाचे मन खूप अस्वस्थ झाले,

 मातृभाषेची ही अवस्था पाहून !!


 पण मग एक बोर्ड आला आणि फक्त एकच बोर्ड जो नेहमीच मातृभाषेत लिहिलेला असतो ..


 ज्यामुळे आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो -


 *देशी दारूचे दुकान*


 मामाचे हृदय प्रसन्न झाले


 देशभक्ती शरीरात जागृत झाली आणि मामाने त्या दुकानातूनच वस्तू विकत घेतल्या .....😁😁🤪🤪