विदर्भात पोळ्याच्या दिवशी सार्वजनिक झडत्या घेण्याची प्रथा असते।
झडत्या म्हणजे विरोधकांवर शेलक्या शब्दात टिका
१) घुटी रे घुटी, आंब्याची घुटी !!
मुख्यमंत्र्यान देल्ली हो, कर्ज माफीची ‘‘जडीबुटी’!!
त्या जडी बुटीले, आरा ना धुरा !!
मुख्यमंत्री साहेब, ‘भिक नको हो, कुत्र आवरा !!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
२) पोई रे पोई,, पुरणाची पोई !!
मुख्यमंत्र्यान देल्ली हो,
कर्ज माफीची गोई !!
त्या गोईले चव ना धव,
कास्तकाराचं आस्वासनात,मराच भेव!!
रकुन आला कागुद, तीकुन आला कागुद,
आश्वासनावर,कास्तकार बसला
जिवमुठीत दाबून !!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
३) वसरी रे वसरी, शम्याची वसरी,
पयलीले लेकरू, नाई झाल,
मनुन श्यान ‘केली होदुसरी’ !!१!!
दुसरीच्या लग्नात वाजवला बीन,
जनता डोल्ली, म्हणे हो ‘आयेगे अच्छे दिन’ !!२!!
इकास जन्माले याची ‘वाट पाहून रायली जनता’
सरकारण देल्ला हो, ‘नोट बंदीचा दनका’ !!३!!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
४) पोया रे पोया, यवत्याचा पोया
आत्महत्ये पाई लागला हो.. काया टिया !! १!!
काया मातीत टोब तो बीया,
तूर घेणारे घालतात हो.. आम्हाले शिव्या !! २!!
शिव्या घालणारे, खातेत आमच काय बिघडवल हो..
आम्ही तुमच !! ३!!
घामाचा पैसा, मागतो आम्ही
थंड हवेत बसता हो.. तुम्ही !! ४ !!
घाम गाऊन पिकवतो शेती
नांदी लागाल तर होईल माती !! ५!!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा।💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा