*मास्कवर कविता लिहून आणा*


एका ढिगात होती, वस्त्रे बहु सुरेख

होती पडून छोटी, चिंधी तयांत एक


शिंपी तिला न घेई, शिवण्यास पाटलोणी

चिंधीस का कधीही, समजेल वस्त्र कोणी?

कधी चोर त्या दुकानी, चोरून माल नेती

तेही न त्रास देती, चिंधीस काही एक


चिंधीस खंत वाटे, का मी निरूपयोगी?

हेटाळणी एवढी का, माझ्याच फक्त भोगी?

फडके म्हणून का, माझी नसे महत्ता?

मज गोधडीत घ्या ना, तुकडा म्हणून एक!


एके दिनी परंतु, चिंधीस त्या कळाले

साथीमधे तियेचे, उजळून भाग्य आले

भारी विशेष वस्त्रे, असुयेत होती खाक

मिरवे बनून चिंधी, कोविड मास्क एक


😄 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा