कॉलेजमंदी

माह्या कॉलेजमंदी दोस्ता.............
एक पोरगी आली
तिच्या एक स्माईलवर
सारी पोरं फिदा झाली ||धृ||

तिचं तोंड पायण्यासाठी
सगळी तोंडं धुवून आली
हळूच पायलं तिनं मले
वाटलं,आपली लाईन clear झाली ||१||

मंग मीही रोज सकाळ दुपार संध्याकाळ
तिच्या मागं धाऊ लागलो
हळूच "Good Morning" म्हणून
सारे पैसे सारू लागलो ||२||

एक दिवस मोका पाहून
जवा मनातली गोष्ट केली
हळूच पायातली सँड़ल
तिच्या हातामंदी आली ||३||

माह्या ध्यानात आलं तेव्हा
मोठा उदघाटन होणार हाय
हळूच रस्ता काटू लागलो
घेतलं कायमचं Good Bye ||४||

एक क्वार्टर कमी पडते...

एक क्वार्टर कमी पडते
दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही
सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते
मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्या पेक्षा मोठा असतो
स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा कार्यक्रम पीणार्याऐला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा
क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत
एकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात
शेवटी काय दारु दारु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पीणार्या मध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
P.H.D. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी
त्यालाच यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...

यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते
याच्यामुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...
नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे


आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.


कवी - स्वप्निल

पाने आमुच्या इतिहासाची

वाघाच्या जबड्यात घालुनी हात
मोजिते दात जात ही आमुची
पहा चाळुनी पाने पाने
आमुच्या इतिहासाची

पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमुची
तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची
दाभाड्याची उमा ती लढली चन्नमा चित्तुरची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

जिवंत वीर तर लढले लढले नवल ते काय घडले
धडवेगळे शिर झाल्यावर धड ते अवघे लढले
मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

वंशज आम्ही रामकृष्ण अन् गुरु गोविंदसिंगाचे
तसेच आमुच्या शिवबाचे अन् प्रताप रणा याचे
आम्हा बरोबर लढण्या नसेल व्यली माय कुणाची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

दुष्ट हेतुने आल जरी तू गिळण्या हिंदुस्थान
तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्थान
दुष्ट शत्रुचे मढे गाडण्या जमीन पुरते आमुची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

कोणी गेलं म्हणुन

कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,
जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.

आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,
आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायचं असतं.

कसं ही असलं आयुष्यं आपलं
मनापासुन जगायचं असतं,
कोणी गेलं म्हणुन उगाच
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.

दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.

झेपाऊन तरी बघ

मित्रा जरा आभाळात, झेपाऊन तरी बघ
तुझ्या पंखातले बळ, आजमाऊन तरी बघ

कवेत तुला घ्यायला, आतुर आहे आकाश
चारी दिशांना पसरलाय, छान सोनेरी प्रकाश

धुक्यात हरवलेल्या तुला, आज हे दिसत नाही
धीर धर थोडा काळ, धुके कायमचे असत नाही.

टिकुन रहा धिरोदात्तपणे, घेत यशाची चाहुल
पचऊन सारे नकार, उचल एक-एक पाऊल

माझी कन्या

गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?

का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
का ग आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला ’लंकेच्या पार्वती’ समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारिरत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

नेत्रगोलातुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,
’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुन वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदता, अनुभवि जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा
प्राप्त होता परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्‌गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !


कवी - बी