गब्बरचे चरित्र

भारतातील महान व्यक्तीपैकी एक म्हणजे गब्बर सिंग होय. पण चरित्रकरांनी त्यांच्यावर नेहमीच अन्याय केला आहे.
गब्बर यांचे प्रेरणादायी जीवन लोकांना कळावे म्हणून गब्बरचे हे चरित्र लिहिले आहे.

►साधे जीवन व उच्च विचार : गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम,विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला. आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय सांगावे, 'जो डर गया, सो मर गया' या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.

►गब्बरची दयाळू प्रवृत्ती : ठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते. यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू दिले नाही.

►नृत्य आणि संगीताचा चाहता : 'मेहबूबा ओ मेहबूबा' यां गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय मिळतो. अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते. तो जीवनात नृत्य-संगीत यां कलेंच महत्व जाणून होता. बसंतीला पकडल्या नंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून जागा झाला होता. त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखल होत. तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे कोणतेही कारण सोडत नसे.

►अनुशासन प्रिय गब्बर : जेव्हा कालिया आणि त्याचे मित्र आपल्यावर सोपविलेली कामगिरी पार न पडताच वापस आले होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेस वर्तन त्याने केल. आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.

►हास्य प्रेमी : त्याच्याकडे कमालीचा 'सेन्स ऑफ ह्युमर' होता. कालिया आणि त्याचे दोन मित्र यांना मारण्याच्या पहिले त्याने त्यांना खूप हसविले होते. कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे त्याला मना पासून वाटत होते. तो आधुनिक युगातला 'लाफिंग बुध्द' होता.

►नारीच्या प्रती संम्मान : बसंती सारख्या सुंदर मुलीला पकडल्या नंतर त्याने तिच्याकडे फक्त एका नृत्याची विनंती केली. आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच काही तरी मागितल असत.

►भिक्षुकी जीवन : त्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द यांनी दाखविलेला भिक्षुकी मार्ग स्वीकारला होता. रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत त्यानेच तो आपले भगवत होता. सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर टिक्का इ. भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.

►सामाजिक कार्य : एकीकडे आपला डाकू पेशा संभाळत असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे काम हि करत होता. शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत असत. सरकारने त्याच्यावर ५०,००० रुयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या काळात 'कोन बनेगा करोडपती' नसल्याने लोकांना रातोरात श्रीमंत बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता.

एकदा झम्प्याने पिंकीला प्रपोज
केलं...

ती भडकली,
तीने त्याला धू धू धुतला..

अगदी लोळवला..

कपडे झटकत
तो उठला आणि म्हणाला..
. .
.
.
. .
.
. .
तर मग मी नाही समजू का..???

उपवास

एकदा साठेंकडे एक दूरचा पाहुणा अचानक येतो. महाशय येतात, बसतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होते. तेवढ्यात चहा येतो.

पाहुणा गरम गरम चहाचा एक मस्त फुरका मारतो.

तेवढ्यात साठे पाहुण्याला विचारतात, “काय हो उपवास वगैरे धरता की नाही?”


पाहुणा : नाही हो. आपल्याला पोटभर दाबून जेवण लागतं. दिवसातून तीन वेळा.
साठे : बरं, बरं. आपण मांसाहारी की शाकाहारी?

पाहुणा मनातल्या मनात खुश होतो. त्याला वाटतं, आज मस्त मेजवानी मिळणार.

पटकन म्हणतो, “म्हणजे काय? चिकन-कोंबडी हा तर आपला न धरलेल्या उपवासाचा फराळ आहे फराळ.”

साठे : नाही. त्याचं काय आहे. हिने बनवलेल्या चहात माशी पडली होती. उगाच तुमचा उपवास मोडायला नको म्हणून विचारलं.

काचेची बरणी आणि २ कप चहा

(आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.)

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कही वस्तू बरोबर आणाल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँगचे बॊल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॊक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणुन विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले,"आता ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा.

पिंगपाँगचे बॊल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी." "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॊल किंवा दगड खडे ह्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी म्हत्वचं काय आहे त्याकडे लक्श द्या." "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल." "पिंगपाँगचे बॊलची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे."

सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात चहा म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले,"बरं झाले तु विचारलेस. तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते

भूमिपूजन

लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात?
?
?
?
?
...
कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीयत्याच भूमिपूजन आधीच झालंय

श्रीगणेशास 'मंगलमूर्ती' का म्हणतात ?


पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा वेदशास्त्रनिपुण ऋषी रहात होता. एके दिवशी क्षिप्रा नदीवर तो स्नानासाठी गेला असता जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सरेस पाहून तो कामातूर झाला आणि त्यांचे वीर्य पृथ्वीवर पडले. पृथ्वीने ते आपल्या उदरात धारण केले.
यथावकाश त्या रेतापासून पृथ्वीने एका जास्वंदी फुलाप्रमाणे तांबड्या त्याच्या पुत्रास जन्म दिला आणि त्याचे पालनपोषण केले. हा पुत्र कुमारवयात येताच त्याने आपल्या मातेस प्रश्न केला “माते, माझे शरीर इतर मानवांप्रमाणे असूनही माझ्या अंगाचा रंग इतका तांबडा कसा?” तेव्हा पृथ्वीने त्याला त्याचे जन्मवृत्त कथन केले. ते ऐकून त्याने पृथ्वीकडे पित्याजवळ राहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा पृथ्वी त्याला भारद्वाजऋषीकडे घेऊन गेली. भारद्वाजऋषीने आपल्या या पुत्राचा (भूमीपुत्र) स्वीकार केला आणि त्याचे नाव, ‘भीम’ ठेवले. पुढे शुभदिवस पाहून त्याचे उपनयन करुन त्याला वेदशास्त्र शिकविले. तसेच श्रीगणेशाच्या मंत्राचा उपदेश करून जप करण्याची आज्ञा केली पित्याच्या आज्ञेवरून भीमाने नर्मदा नदीच्या काठी जाऊन तपश्चर्या सुरू केली.
नर्मदा नदीकाठी एक हजार वर्षे श्रीगणेशाच्या मंत्राचा जप केल्यावर गजानन माघ शुद्ध चतुर्थी दिवशी त्याला प्रसन्न झाला आणि भीमास गजाननाने साक्षात दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा भीमाने ‘मला स्वर्गामध्ये राहून अमृतप्राशन करण्याची इच्छा अहे. तसेच माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध व्हावे आणि ज्या माघ शुद्ध चतुर्थीदिवशी तुम्ही मला प्रसन्न झालात. ती चतुर्थी सर्वांना कल्याणकारी होवो.’ असा वर मागितला.
भीमाचे हे बोलणे ऐकून गजाननाने ‘तुला देवांसह अमृतपान कराव्यास मिळेल. तुझे ‘मंगल’ असे नाव प्रसिद्ध होईल. तुझ्या नावावरूनच मला लोक ‘मंगलमूर्ती’ म्हणून ओळखतील. तुझा रंग अंगाराप्रमाणे लाल असल्याने चतुर्थीस ‘अंगारकी चतुर्थी’ असे म्हणतील. या चतुर्थीचे व्रत करणाऱ्यास एकवीस संकष्टीचे व्रत केल्याचे पुण्य मिळेल.’ असा वर भीमास दिला. अशा प्रकारचा वर देऊन गजानन गुप्त झाला असता मंगलाने त्या ठिकाणी उत्तम प्रकारचे देवालय बांधिले आणि त्यात सोंड व दहा हातांनी युक्त अशी गणपतीची सुंदर मूर्ती स्थापिली. त्या मूर्तीचे नाव मंगलमूर्ती असे ठेविले.
तेव्हापासून श्रीगणेशास लोक‘मंगलमूर्ती’ म्हणू लागले आणि मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी गणपती अंगारकास प्रसन्न झाले. म्हणून मंगळवारी येणाऱ्या ‘अंगारकी म्हणतात. 

सांग कधी कळणार तुला

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणाऱ्या सुरातला?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला


जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला

गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर 
चित्रपट - अपराध