आता भोवतात तुमचे ते शाप

मीच गुन्हेगार आहे दलितांनो,

अहो मजुरांनो, कुणब्यांनो

मीच तुम्हा नित्य उपाशी ठेविले

आणि निजवीले धुळीमध्ये

मीच माझ्यासाठी तुम्हा राबवीले

तुम्हा नागवीले सर्वस्वी मी

तुमचे संसार उध्वस्त मी केले

तुम्हाला लावीले देशोधडी

आता भोवतात तुमचे ते शाप

असे घोर पाप माझे आहे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

यंत्रयुगात या आमुचे जीवित

यंत्रयुगात या आमुचे जीवित

कळसूत्री यंत्र झाले आहे

सृष्टीचे सुंदर पाहाया स्वरूप

राहिला हुरूप आम्हा नाही

रम्य अस्तोदय, इंद्रचाप- शोभा

पाहावया मुभा आम्ही नाही

पाखरांची गाणी, निर्झराची शीळ

ऐकावया वेळ आम्हा नाही

निसर्गाशी गोष्टी बोलाया निवांत

क्षणाची उसंत आम्हा नाही


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी

अपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी

तुझी कारागिरी काय वानू !

हवेत पांगल्या गायनलहरी

घेतोस अंतरी आकळूनी

कळ फिरविता पुन्हा ऐकवीसी

संतुष्ट करिसी चित्त माझे

मानव-मतीचा अद्‍भुत विलास

विश्व आसपास बोले, भासे

निगूढ संगीत गाती ग्रहलोक

येईल का बोल ऐकू मला?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

असे आम्ही झालो आमुचे गुलाम

इथे गवतात उमलले फूल

परी कोणा भूल पडे त्याची !

इथे झुडपात खग गाई गान

कोणे एके कान देईनीया !

इथे-डोंगरात थुईथुई ओढा-

वाहे, त्याची क्रीडा कोण पाहे !

इथे माळावर सुटते झुळूक

कोण तिचे सुख अनुभवी !

असे आम्ही झालो आमुचे गुलाम

राहिला न राम जीवनी या !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मार्ग हा निघाला अनंतामधून

मार्ग हा निघाला अनंतामधून

होतसे विलीन अनंतात !

अनंतकाळ या अखंड तेवती

पहा दीपज्योति ठायी ठायी

युगायुगातून एक एक ज्योत

पाजळली जात आहे मार्गी

कितीदा घातली काळाने फुंकर

अधिक प्रखर झाल्या पण

चला प्रवाश्यांनो, पुढे पुढे आता

करू नका चिंता, भिऊ नका


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

राष्ट्रगीत

आपण फक्त एक कडवे गातो पण खरे तर जन गण मन आहे ५ कडव्यांचे

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे

अहरह तव आह्वान प्रचारित
शुनि तव उदार वाणी
हिन्दु बौद्ध शिख जैन
पारसिक मुसलमान खृष्टानी
पूरब पश्चिम आशे
तव सिंहासन पाशे
प्रेमहार हय गाँथा
जन गण ऐक्य विधायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे

पतन-अभ्युदय-बन्धुर-पंथा
युगयुग धावित यात्री,
हे चिर-सारथी,
तव रथचक्रे मुखरित पथ दिन-रात्रि
दारुण विप्लव-माझे
तव शंखध्वनि बाजे,
संकट-दुख-त्राता,
जन-गण-पथ-परिचायक जय हे
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे

घोर-तिमिर-घन-निविड़-निशीथे
पीड़ित मुर्च्छित-देशे
जाग्रत छिल तव अविचल मंगल
नत-नयने अनिमेष
दुःस्वप्ने आतंके
रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमि माता,
जन-गण-दुखत्रायक जय हे
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे

रात्रि प्रभातिल उदिल रविछवि
पूर्व-उदय-गिरि-भाले,
गाहे विहन्गम, पुण्य समीरण
नव-जीवन-रस ढाले,
तव करुणारुण-रागे
निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा,
जय जय जय हे, जय राजेश्वर,
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे
 

कवी -  रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर)

कोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र

अगे धूलि, तुझे करितो लेपन

होऊ दे पावन भाळ माझे

असंख्य बीजांचे करिसी धारण

वृक्षलता तृण वाढवीसी

गरीब, अनाथ, दीन, निराधार

त्यांना मांडीवर झोपवीसी

तुझ्यातून घेते जन्म जीवसृष्टी

तुझ्यात शेवटी अंत पावे

कोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र

तुझे गाऊ स्तोत्र कसे किती ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या