हवंय

एक रिकामा कान हवाय, बरंच काही भरवायला
कुजबुजनारं मन हवंय, सारं काही ठरवायला

एक उशाशी पान हवंय, रात्री साऱ्या झुरवायला
अश्वासारखी जान हवीय, दिवस माझा मिरवायला

एक असा दिलदार हवाय, दिल सारं जिरवायला
चिपचिप सारी माती हवीय, घर माझं सारवायला

एक हिरवं रान हवंय, वाऱ्यावरती डोलवायला
झुळझुळणारं पाणी त्याला, भरभरून जगवायला

सळसळनारा बाण हवाय, राहिलं सारं भेदायला
एक निधडी छाती हवीय, सारं काही झेलायला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा