एका स्त्रीचा स्वर्ग

बाळ माझं बघ कसं.....दुधासाठी रडतंय,
बोबड्या त्याचा शब्दात....माझ्यासाठी हंबरडा फोडतंय,

दारातली तुळस बघ माझ्या....कशी माझ्याविन सुकलीय,
तिला पाणी नाही घातलं....तिची फांदिही झुकलीय,

लेक माझी बघ....दारात माझी वाट बघत बसलीय,
गुणाची आहे रे पोर माझी....दारात एकटीच रुसलीय.

बछडा माझा......आता शाळेतून येईल,
"आई कुठे गेली??"..विचारत....घर डोक्यावर घेईल...

नवरा माझा भोळा आता दमून भागून येणार,
दमला असेल रे तो.....त्याला पाणी कोण देणार?

गाय माझी बघ कशी....गोठ्यात चाऱ्याविन उभी,
माज्यावीन ती चारा खात नाही रे कधी....

संसार माझा मी थोडा सावरून....आवरून येते,
भेटणार नाहीत पुन्हा....माझ्या लेकरांचा मुका घेऊन येते.
नवऱ्याचे माझ्या....माझ्यावर खुप खूप प्रेम रे....
माझंही त्याच्यावरचे प्रेम त्यांना सांगून येते.....

सोड रे देवा मला ....थोडा वेळ जाउ दे,
कांदाभाकर माझ्या माणसांसोबत खाऊ दे,
तुझा स्वर्ग नको......मला माझ्या स्वर्गात राहू दे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा