जसा रंग श्रीरंग खेळले वृंदावनि द्वापारात ।
तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगात अति आदरात ॥ध्रु०॥
धन्य धन्य धनि सवाई माधवराव प्रतापी अवतरले ।
किर्त दिगंतरी करुन कुळातिल सर्व पुरुष पहा उद्धरले ॥
एकापरिस एक मंत्रि धुरंधर बुद्धिबळे शहाणे ठरले ।
दौलतिचा उत्कर्ष दिसंदिस नाही दरिद्री कुणी उरले ।
शालिवाहन शक नर्मदेपावत जाऊन जळी घोडे विरले ।
श्रीमंतास करभार देउन आले शरण रिपु पृथ्वीवरले ॥
चा० महावीर महादजीबाबा हुजरातीचे॥
आणुनि मरातब बाच्छाई वजिरातीचे ॥
केले महोच्छाव खुब मोथ्या गजरातीचे ॥चा०॥
तर्हे तर्हेचे ख्याल तमाशे बहुत होती दळभारात ।
श्रीमंतांचा संकल्प हाच की रंग करावा शहरात ॥१॥
कल पाहुन मर्जिचा बरोबर रुकार पडला सार्यांचा ।
सिद्ध झाले संपूर्ण पुण्यामधे बेत अधिक कारभार्यांचा ॥
मधे मुख्य अंबारि झळाळित मागे थाट अंबार्यांचा ।
चंद्रबिंब श्रीमंत सभोवता प्रकाश पडला तार्यांचा ॥
हौद हांडे पुढे पायदळांतरी पाउस पडे पिचकार्यांचा ।
धुमाधार अनिवार मार भर बंबांच्या फटकार्यांचा ।
चा० नरवीर श्रेष्ठ कुणी केवळ कृष्णार्जुन ॥
वर्णिती भाट यश कीर्ति सकल गर्जुन ॥
चालली स्वारी शनवार पेठ वर्जुन ॥
चा० घरोघरी नारी झुरझरुक्यांतुन सजुन उभ्या श्रृंगारत ।
गुलाल गर्दा पेल दुतर्फा रंग रिचविती बहारांत ॥२॥
सलाम मुजरे सर्व राहिले राव रंगाच्या छेदात ।
हास्यवदन मन सदय सोबले शूर शिपाईवृंदात ॥
दोहो दाहो हाती भरमुठी दिल्हे चत लाल दिसे खुब बुंदात ।
तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदात ॥
सुदिन दिवस तो प्रथम दिसाहुन शके सत्राशे चवदात ।
परिधावि संवत्सरात फाल्गुन वद्य चतुर्दशी धादांत ॥
चा० बाळाजि जनार्दन रंगामधे रंगले ॥
रंगाचे पाट रस्त्यात वाहु लागले ॥
किती भरले गुलाले चौक ओटे बंगले ॥
चा० कुलदीपक जन्मले सगुणी गुणी महादजीबाबा सुगरात ।
पराक्रमी तलवारबहाद्दर मुगुटमणी सरदारात ॥३॥
भोतगाडे रणगाडे गुलाले भरून चालती स्वारीत ।
गुलाल गोटे शिवाय ठिवले निरनिराळे अंबारीत ॥
आपाबळवंतराव खवाशित चौरि मिजाजित वारीत ।
लाल कुसुंबि रुमाल उडती घडोघडी मैरफगारीत ॥
कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किल करित ।
बल्लम बाण बोथाट्या इटे लगी वाद्यघोष डिमदारीत ।
चा० भले भले एकांडे मधे घोए घालती ।
बारगीर बिनीवर ध्वज रक्षित चालती ॥
संपूर्ण भिजिवले जन रंगाखालती ॥चा०॥
वत्रपाणिवारिती तरी झालि गर्दी मोठि बुधवारात ।
झुकत झुकत समुदाय सहित निट स्वारि आली रविवारात ॥४॥
आधिच पुणे गुलजार तशामधे अपूर्व वसला आदितवार ।
त्यात कृष्ण श्रीमंत आवंतर समस्त यादव परिवार ॥
हरिपंत तात्यांनी उडविला रंग केशरी अनिवार ।
हर्ष होउन राजेंद्र झांकिती शरिरानन वारंवार ॥
पाटिल बावानी नेउन शिबीरा रंग केला जोरावार ।
वस्त्रे देउन किनखाब वाटिले ठाण कुणाला गजवार ॥चा०॥
उलटली स्वारी मग महिताबा लाउनी ॥ कुरनिसा करित जन वाड्यामधे जाउनी ॥
दाखवी पवाडा गंगु हैबती गाउनी ॥चा० महादेव गुणिराज फेकिती तान तननन दरबारात ।
प्रभाकराचे कवन पसरले सहज सहज शतावधि नगरात ॥५॥
कवी - अनंत फंदी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा