मज्जेचीं निज जो फुलें पसरितो आयुष्यमार्गावरी,
आहे अद्भुत रम्य का अधिक तें त्याहूनि कांही तरी ?
चाले तो धरणीवरी, तर पहा ! जेथूनि तो चालिला,
धूली तेथिल होतसे कनकिता ! – घेऊं नका भ्रान्तिला. १
तो गम्भीर वदे रवा, तर, मुक्या पृथ्वीस या वाटतें.
कीं “मातें श्रुति लक्षसंख्य फुटल्या,” आणीक ती ऐकते !
दृष्टी ती फिरवी वरी, तर लवे आकाश तें खालती,
तारांचे गण गावयास वरुनी स्तोत्रें अहा ! लागती ! २
लीलेनें स्वकरांत तो धरितसे कांडी बरुची जधीं
सा-या सुन्दर वस्तु त्या झडकरी येती समाधीमधीं –
त्याच्या, येउनि त्या तयास वदती “आम्हांस दे भूषणें
दिव्यें, आणि शिकीव लौकरि अम्हा तीं अप्सरोगायनें !” ३
श्वासोच्छ्वास करी, परी नवल हें :- जीवित्वसंहारक
वायू घेउनि आंत, तो त्यजितसे वायूस त्या पोषक !
राही तो, तर देव भूमीवरतीं येतात हिंडावया,
जातां, स्वर्ग सवें धरेस उतरे त्यालागिं धुडांवया ! ४
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
वृत्त - शार्दूंलविक्रीडित
- दादर १४ मार्च १८९१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा