' कां रडतों ! ' रावसाहेब, मी आपल्या जन्माकरतां रडतों आहें !
हीच ती जागा !
आणखी, याच दिवशीं सकाळीं - नुकतें अकरावें वर्ष लागलें होतें मला - कोंवळ्या उन्हामध्यें, वार्यानें भुरभुर उडणार्या या भट्टीतल्या विस्तवाच्या कुरळ केसांवर हात फिरवीत, मोठ्या मजेमध्यें बसलों होतों मी !
इतक्यांत दोन गोळ्या माझ्या पाठींत शिरल्या !
बाबा अन आई रडायला लागलीं !
पण मी मात्र येथें, मृत्युलोक व परलोक यांच्यामध्यें झोके घेत खुशाल निजलों होतों !
पुढें, अंधारांत वाट चुकलेल्या कालाचा चुकून माझ्या जखमेवर हात पडला मात्र, तोंच सगळ्याच शिरा झणाणून ' नको ! ' म्हणून ओरडल्या !
डोळे उघडून जों पाहतों तोंच, एक मोठी थोरली बंदूक घेतलेला धिप्पाड पुरुष - त्याच्या अंगाभोंवतीं किती तरी लहानमोठे तारे इकडून तिकडे फिरत होते !
- माझ्या हदयावरुन आपला हात उचलतांना दृष्टीस पडला !
- व हंसत हंसत तो काय म्हणाला, ' नको ! तर राहिलें !
असाच रडत बैस, पुनः मात्र मी लवकर येणार नाहीं ! '
- पुढें काय ? अंधार !
रावसाहेब, या गोष्टीला आज पन्नास वर्षे झाली.
आई मेली, बाप मेला !
पण मी मात्र दुर्दैवामध्यें तडफडत आहें !
मधून मधून काय सुखाचे झुळझुळ वारे वाहतील तेवढेच !
- ऐका, सातांचे ठोके पडत आहेत.
रावसाहेब, हा शहराच्या मध्यावर असलेला घड्याळाचा उंच मनोरा या माझ्या भट्टींतून तयार झालेल्या विटांनीं बांधलेला आहे !
हा मनोराच काय, पण गांवांत दिसणार्या मोठमोठ्या इमारतींनाही मींच विटा पुरविल्या आहेत !
- हा मनोरा बांधल्याला जवळजवळ आठ वर्षे झालीं; पण आकाशांत मोठमोठ्या वावटळी सुटून जरी सारखा धो धो पाऊस पडत होता, वर आणखी विजाही कडकडत होत्या, तरी हा आपला छाती काढून त्यांच्याकडे टक लावून पाहत उभाच !
कितीही कडक ऊन पडो, पण एक वेळसुद्धां यानें हुश्श म्हणून केलें नाहीं !
माझ्या हातच्या विटांचा मनोरा हा !
- नरकामध्यें माझ्या पापकर्माची मनोरा उभारलेला आहे !
नाहीं असें नाहीं !
- पण हाय !
माझीं ही व्यसनी मुलें व त्यांचे फाजील लाड करणारी माझी बायको, या प्राण्यांच्या दुर्दैवाला मदतीला घेऊन सर्व जण, रोज सकाळपासून रात्री दिसेनासें होईपर्यत मी रावून तयार केलेला
- या हदयांतील प्रचंड असा आशेचा मनोरा रोजच्या रोज भांडणांची वादळे उत्पन्न करुन ढासळून कीं हो टाकतात !
काय सांगूं !
रात्रीं झोपेकरतां डोकें टेकायचा अवकाश, की ' नको ! नको ! म्हणून भेसूर गळा काढून माझी उशी रडायला कीं हो लागते !
- अरे पांडुरंगा ! हाय रे पांडुरंगा !! ....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा