मुलगी : 'देवा, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी करून कमावत आहे. मला हवं असलेलं सगळं मिळविण्याची माझ्यात ताकद आहे. मी जगातल्या सगळ्या गोष्टीत यशस्वी होऊ शकते.

पण, माझे आई-बाबा म्हणताहेत की लग्न कर. देवा मला नवरा नकोय.'

देव : 'मुली, तू हुशार आहेस, कर्ती आहेस, यशस्वी आहेस. यापुढेही तुला यश मिळतच राहील.

पण काही ठिकाणी तुझ्या हातून चूक होऊ शकते, तुझा पराभव होऊ शकतो, तुझ्या वाट्याला अपयश येऊ शकते.

अशा वेळी तू कोणाला दोष देशील? कुणावर खापर फोडशील?'
*...त्यासाठी तुला 'नवरा' असलाच पाहिजे.*
😜😜😀😀😀😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा