एके दिवशी वेदनांनी बेजार झालेला बंड्या डॉक्टरांच्याकडे कसाबसा गेला ....


बंड्या  : डॉक्टर.... साहेब.. ..आह ..पोटात ...... अग आई ग...खूप... दुखतय...आह ....

डॉ : अच्छा !! हे सांग शेवटचे जेवण कधी आणी काय जेवला होतास..?

बंड्या  : जेवण नेहेमीचेच हो.. रोजच्या सारखे ....

डॉ : अच्छा अच्छा!! (२ बोटांची खूण करत ) इकडे शेवटचं कधी गेला होतास ...?

बंड्या : रोजच प्रयत्न करतो पण....पण.... होतच असे नाही... गेले तीन दिवस......


डॉ समजले याला ... constipation आहे...


डॉक्टर आत गेले आतून एक औषधाची बाटली ...आणि सोबत एक कँल्क्युलेटर  पण घेऊन आले ...


बंड्याला विचारले - घर किती दूर आहे तुझे ?

बंड्या  : 1 km

डॉक्टरांनी कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व चार चमचे औषध काढून एका वाटीत ओतलं.

डॉ : वाहनाने आलास की चालत ?

बंड्या  : चालत ..

डॉ : हं... जाताना धावत जा...


डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : घर कितव्या मजल्यावर आहे ?

बंड्या : तिसऱ्या मजल्यावर.

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : लिफ्ट आहे की जिना चढून जाणार ?

बंड्या  : जिन्याने ...

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : आता शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दे...

घराच्या मुख्य दरवाज्यापासून टॉयलेट किती दूर आहे ?

बंड्या : जवळजवळ २० फुट..

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले........

व म्हणाले

आता माझी फी आधी दे..मग औषधाचा हा डोस घे...मग कुठेही न थांबता फटाफट घर गाठ...नंतर मला फोन कर....!

बंड्या ने तसंच केलं.......

अर्ध्या तासाने डॉक्टरांना बंड्याचा फोन आला ...

एकदम बारीक थकलेल्याआवाजात.........

डॉक्टर साहेब औषध तर उत्तम, जालिम होत हो तुमचं. पण तो कँल्क्युलेटर ठीक करुन घ्या हो...

.

.

.

फक्त 10 फुटांनी हारलो ना मी......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा