पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगड खात TV पाहत असतात.

पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो.

पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो.

एवढ्यात किचनमधून smsचा टोन ऐकू येतो, म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो.


बायकोचा मेसेज असतो---


"किचनमधून परत येताना मीठ घेऊन या!"
जंगल रोज उध्वस्त केलं जात होतं तरीपण सगळी झाडे कुऱ्हाडीलाच मतदान करत होते......

मी त्यांना विचारलं असं का रे बाबांनो तर ते म्हणाले
कुऱ्हाडीचा जो दांडा आहे तो आमच्याच जातीचा आहे म्हणून!!!

फास्ट-फुड

दोन वाघ झाडाखाली आरामात बसलेले.
समोरून एक ससा जोरात पळून गेला..
.
.
.
.
.

पहिला वाघ (दचकून):,काय गेलं रे..?
दुसरा वाघ: काही नाही, फास्ट-फुड होतं..!
एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती .
आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .

एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .
ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले .
अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.
म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला.
प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.

शेवटी म्हतारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.

प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.
असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.

आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना
तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.

तात्पर्य :-

एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. 
पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.

म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा.
ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार.
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?

👦बंड्या : बायकोने भाकरी खूप कडक
बनवली होती😃😃

💉डॉक्टर : मग खाण्यास नकार द्यायचा ना?

👦बंड्या : तेच तर केले साहेब!
नवरा बायकोच भांडण होत

बायको : मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच रहा

नवरा : मी चाललो देवळात

बायको : मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केले तरी

नवरा  : अग वेडे मी नवस फेडायला चाललो
कंडक्टर : सुट्टे पैसे नसणार्‍यांनी खाली उतरा....
.
गण्या  : १०० रुपये कंडक्टरला देऊन म्हणतो "डेक्क्न पर्यंत एक फुल द्या".
.
कंडक्टर (वैतागून) : अरे  तिकट ६ रूपये आहे. तुम्हाला परत द्यायला ९४ रूपये सुट्टे नाहीत माझ्याकडे.
.
गण्या : मग  उतर खाली ...
बाळू मांजराला जंगलात सोडून आला.

संध्याकाळी पुन्हा मांजर घरी आले.

त्यानंतर पुन्हा बाळूने  त्याला जंगलात आणखी लांब सोडले.

तरी ते पुन्हा घरी हजर.


पुन्हा एकदा बाळूने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला जंगलात खुपच लांब सोडलं

आणि घरी फोन करून आईला विचारलं," मांजर घरी आलं का?"


आई: हो आलं.



बाळू: त्याला आधी जंगलात पाठव.मी घरचा  रस्ता विसरलोय!

माणसांची पारख

थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो,

"माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये."

*

जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !!

राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत."

तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे."

आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय"

*

राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे"

*

सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले?

यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही"

*

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !!

**

Moral-- : जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !!
आयुष्यभर साथ देणारीच
माणसे जोडा नाही तर..

तास भर साथ देणारी माणसं
बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा
आणि सुखाचा बाजार मांडू नका..

कारण इथे प्रत्येक जण मतलबी
झालाय अगरबत्ती देवासाठी हवी
असते म्हणून विकत आणतात..

पण सुगंध आपल्या
आवडीचा पाहतात..
पहिला:- तुम्हाला कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते ...
आपण फेसबुक फ्रेंड आहोत की व्हाट्सअप ग्रुपला ?
.

.

.


.

दुसरा:- ( शांतपणे) मी तुमच्या शेजारी राहतो.
बायको रात्री दोन वाजता उठून नवऱ्याला प्रश्न करते.

बायको -: त्रिदेव मधे तीन हिरोईन कोणत्या होत्या?

नवरा -: माधुरी दीक्षित, संगीता बीजलानी आणि सोनम

बायको -: 2003 वर्ल्डकप मधे पाकिस्तान विरुद्ध सचिनने किती रन्स केले?

नवरा -: 98 रन्स

बायको -: आपल्या बाजूची कविता आपल्या बिल्डिंग मध्ये कधी राहायला आली?

नवरा -: बुधवारी दोन महिने पूर्ण होतील....
पण तू असे प्रश्न का विचारतेस?

बायको -: काल माझा वाढदिवस होता!!!!!!

भयाण शांतता..........

बिच्चारा सकाळी उपाशी कामाला गेला….
हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात मुलीची आई त्या दोघांना तिथे पाहते आणि आपल्या मुलीला फोन करते

आई : कुठे आहेस ... ...

मुलगी : परीक्षा देत आहे

आई : या परीक्षेचा जर रिझल्ट आला ना तर तुझं तंगडच तोडून टाकीन.,.
मॅडम : गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा, गोदावरी, भिमा..
ह्या भारताच्या नद्या आहेत..
तर
पाकिस्तानाच्या नद्यांची नावे सांगा..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
बंड्या : रुक्साना , फ़र्झाना , रिझवाना , हसीना..!!!

मॅडमने नदीत उडी मारून जीव दिला..!!!
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक काट्याने खातात,







भारतीय....
मुकाट्याने.
पुण्यातील एक नामवंत डॉक्टर: "तुमच्या आजाराच नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय...
 कदाचित जास्त दारू प्यायल्यामुळे  हे होत असावं.......!!"


पेशंट: "हरकत नाही...  तुमची उतरल्यानंतर येतो  मी परत"
चार दोस्त एकदा हाॅटेलात जेवायला गेले.
जेवण झाल्यावर बिल द्यायला भांडण करू लागले.
सगळे म्हणत होते, मी बिल देणार.
कोणी ऐकायला तयार होईना.
शेवटी त्यांच्यात ठरलं.
हाॅटेलला एक चक्कर मारायची आणि जो पहिला येईल त्याने बिल भरायचं.
त्यांचं प्रेम पाहून मॅनेजर पण तयार झाला.
मॅननेजरने शिट्टी मारली.....
ते सगळे चक्कर मारायला पळाले...

ते अजून नाही आले...
मॅनेजर त्यांची आजपर्यंत वाट पाहतोय...
याला म्हणतात दोस्ती

मेडिटेशन का महत्वाचे ? 😌😌

बायका आपल्या नव-याच्या
छातीवर डोकं ठेऊन हळुच विचारतात
डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे ?         

.
.
.
.
तुमचे ऊत्तर इथे महत्वाचे नसते

तर महत्वाचे असते, तुमच्या  हृदयाचे वाढणारे ठोके.
😳😳
.
.
.
तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका. मेडिटेशन करा. 😜

👍फक्त तू खचू नकोस 👍

एक डाव हरला तरी
त्यात काय  एवढं?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड,
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस..
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

सूर्य रोजच उगवतो,
 त्याच  नव्या तेजाने
रोज मावळतीला जातो
रोजच्याच् नेमाने
येणे जाणे रितच् इथली
 हे तू विसरु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

प्रेम तुझ्यावर करणारे
 कितीतरी लोक आहेत
तुझ्यासाठी जोडणारे
खुप सारे हात आहेत,
अरे अशाच आपल्यांसाठी
तू ही थोड हसुन बघ
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

वाट तुझी बघत असतं
रोजच  कुणीतरी
तुझ्यासाठी जगत असतं
आस लावून प्रत्येक क्षणी,
त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
अश्रु तू गाळु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

उठ आणि उघडून डोळे
पहा जरा  जगाकडे
प्रत्येकाच्या आयुष्यात
काहीतरी असतेच् थोडे,
नाही नाही म्हणून
उगाच कुढत तू बसु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

सामर्थ्य आहे हातात जर, 
स्वप्ने डोळ्यात घेऊन चल
परिस्थितीशी भिडवून छाती,
दोन हात करत चल,
विजय तुझाच असेल
 तेव्हा मागे वळून बघु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

👉 फुल्ल पुणेरी : - 😳

५00 ची  नोट दुकानदार वेगवेगळ्या अँगलमधुन  पाहात चेकिंग करत होता *
.
.
.
.
जोशी :  तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला गांधीजीच्या जागेवर कॅटरीना नाही दिसणार.चला, राहिलेले पैसे द्या लवकर
बंड्या अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता.
तिथं त्यानं एक पोपट विकत घेतला.
तो रोज सकाळी बंड्या उठेस्तोवर म्हणायचा,

" सर, प्लीज वेक-अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस!"

बंड्याची बदली पुण्याला झाली.
त्यानं सदाशिव पेठेत भाड्यानं घर घेतलं.
आता पोपट म्हणतो,

" बाजीराव, उठा आता... लोळत पडायला तुमच्या तीर्थरूपांनी इस्टेट नाही कमवून ठेवलेली!"

👉 बापाचं मन 👈

घरामधला कर्ता बाप,
जेंव्हा येतो बाहेरून |
पाळलेली मांजर सूद्धा,
आनंदाने जाते शहारून |
मॅव मॅव करत बिचारी,
फिरते सा-या घराला |
पण ते प्रेम कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

मालकाला बघून कूत्रा,
झेपाऊन घेतो ओढ |
साखळी दाटे मानेला,
कमी होत नाही वेड |
शेपटाचा गोंडा घोळून,
घूटमळते ते दाराला |
पण ती ओढ कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

दूर बघून मालकाला,
हंबरते गोठ्यात गाय |
वळवळ करते जागीच,
तान्ह्या वासराची माय |
वासराच्या आधी चाटे,
ती मालकाच्या ऊराला |
पण ती माया कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

बांधा वरचा बैल सूद्धा,
हाक ऐकून परत वळतो |
रागाची हाक असुनही,
गप गुमान रानात पळतो |
आपुलकीचा राग सुद्धा,
कळतो मुक्या ढोराला |
पण तो राग कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

जीव लावला जनावराला,
लेकरावानी वागत आली |
पोटची लेकरं मात्र कशी,
परक्यावानी जगत आली |
बाप लेकाचा सुर कधीच,
जुळला नाही सुराला |
जीव लावनं कळंलं नाही,
पोटच्या त्या पोराला |

बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालंय मोराला |
तसाच बाप कळत नाही,
जीवंत पणी पोराला |

त्रासाचे झाड

दादांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. दादांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत दादा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. दादांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा दादांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने दादांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी दादा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून दादा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले. घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. दादांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले. त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. दादांसाठी मस्त चहा आण पाहू. समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले. दादांना हे सर्व पाहून प्रचंड आश्‍चर्य झाले. ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला? गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद? दादांना प्रश्‍नच पडला. चहा घेऊन दादा निघाले. भाचा दादांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला. गाडीत बसता बसता दादांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा. त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’ त्यावर भाचा म्हणाला, ‘‘दादा, मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्‍या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो. पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत. हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे. घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.
‘तुमच्या घराबाहेर आहे का ‘‘त्रासाचे झाड?’

आपण ह्यातून कोणाला निवडाल?……

मोठ्यांच्या रात्रीच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ खेळण्यास सांगतात.

सर्वजन उत्सुकतेने विचारतात
"कोणता खेळ सर?"

शिक्षक एका विध्यार्थ्याला
मदत करायला विनंती करतो.

 संगीता नावाची एक
स्त्री पुढे येते. .

शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात
महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात.

संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची,  मित्र-मैत्रिणींची
आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते.

शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून
टाकण्यास सांगितली कि जी तिच्या
दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत.
संगीताने
आपल्या मित्रांची नावें पुसली.

आता शिक्षकाने
तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि
ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें
पुसावायास लागली.

हा सिलसिला असाच पुढे
चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें
पुसायची बाकी राहिली होती.

जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची
ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलगा.

संपूर्ण वर्ग आता निस्तब्ध झाला होता कारण
त्यांना कळून चुकले होते कि ह्यापुढचा खेळ
संगीताला फार कठीण जाणार आहे.

 तिला आता
सर्वात कठीण असा निर्णय घेणे भाग पडणार आहे.

शिक्षकाने आता तिला तिच्यापुढील दोन नावें
पुसण्यास सांगितली.

मोठ्या नाईलाजाने आणि जड अंतःकरणाने तिने
आपल्या आई वडिलांची नावें पुसून टाकली. "

अजून एक
नांव पुसून टाक" शिक्षकाने फर्मावले.

 संगीता आता
पूर्णपणे हवालदिल, निराश झाली होती.

थरथरत्या हाताने तिने मुलाचे नाव पुसले
आणि
ओक्साबोक्शी रडायला लागली.


शिक्षकाने संगीताला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगितले.

थोड्या वेळाने जेव्हा तिचे दु:ख
आवरले तेव्हा तिला विचारले कि आई, वडील वा
मुलगा ह्यापैकी एकाचे नाव तिने का नाही ठेवले

तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती
म्हणून नवऱ्याऐवजी, ती आई किंवा वडिलांचे नाव ठेवू
शकली असती

कारण त्यांनी तिला जन्म देऊन
लहानाचे मोठे केले होते किंवा ज्याला तिने जन्म
दिला अशा तिच्या मुलाचे नाव ती शेवटी ठेवू
शकली असती.

मग नवराच का तिच्या जीवनातील
सर्वात महत्वाची व्यक्ती तिला वाटली?


टाचणी पडली तरी आवाज येईल अशी स्मशान
शांतता वर्गात पसरली होती आणि सर्वजण आता
संगीता काय उत्तर देते ह्याकडे कान टवकारून वाट बघत
होते.

संगीता तिच्या जागेवरून उठून उभी राहिली
आणि सावकाश म्हणाली

"एक दिवस माझे आई-वडील
मला सोडून जातील. माझा मुलगा सुद्धा मला सोडून
जाईल त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी,  लग्ना नंतर वा
तत्सम काही कारणांमुळे.

तेव्हा शेवटी माझ्याबरोबर
राहील तो माझा नवरा ज्याच्या बरोबर मी माझे
उभे आयुष्य व्यतीत केले आहे.

" सर्वानी उभे राहून
टाळ्यांच्या गडगडातात तिच्या उत्तराचे स्वागत केले.

आपण आपल्या जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, ते
आपल्या आयुष्यात येतात आणि जातात.

काहीजण थोड्या वेळापुरते आपल्या बरोबर असतात तर
काहीजण शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात.

तेव्हा आपल्या सर्व नात्यांचा आदर राखणे हे आपले
आद्य कर्तव्य आहे पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या
कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धा
समजले पाहिजे.....    
एक बेवडा रात्रीची सायकल🚴 घेऊन कब्रीस्तान मधी घूसला
.
अन दूसर्या साईड ने बाहेर निघाला अन घाम पुसत बोलला…😰😰
.
.
च्यामायला कोनता रोड होता
काय माहीत…
येवढे स्पिड़ ब्रेकर असत्यात व्हय…
एक माणूस रात्री 2:00 ला डॉक्टरच्या घरी जातो आणि डॉक्टरला उठवून विचारतो...

"डॉक्टर साहेब, घरी यायची तुम्ही किती फी घेता..? "

डॉक्टर : फक्त 250 रुपये..!
   
माणुस : तर चला मग.

डॉक्टर गाडी काढतात आणि दोघेजण घराकडे निघतात.

माणूस: डॉक्टर साहेब..... इथे थांबा. माझे घर आले...!
             
डॉक्टर : OK, चला लवकर, मला पेशंट दाखवा..!

माणूस : हे घ्या 250 रूपये. रात्री रिक्षावाले घरी जायला 500 रुपये मागत होते  म्हणून तुम्हाला विचारले. ...!!
.
.
.



कोण म्हणतं दारू घेतल्यावर डोकं चालत नाही....!!

"पोटात दुखते"

एक दिवस पार्थ कामावरून घरी येतो राधिका झोपलेली असते तिच्या पोटात दुखत असते ती पार्थला सांगायचा प्रयत्न करते पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते.

त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते "मलाच स्वयंपाक करायचा होता तर बायको कशाला केली,तिला कसला कंटाला येतो बाकीच्या बायका नौकरीवरून आल्यावर काम करतच नाही का ?"

आईचे बोलणे ऐकून पार्थ रागात राधिकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो ,"पोट दुखल्याने माणूस मरत नाही".

त्याची आई आऩंदी असते,"याला म्हणतात खरा पुरूष".
राधिका ढसाढसा रडते पण स्वयंपाक करते ७-८ लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते जेवन न करता,पार्थच्या मनात राग असतो म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही ,ती हुंदके देऊन रडत असतेआणि

पार्थ कानात बोळे टाकून झोपी जातो व म्हणतो ,"काय सारख छोट्या छोट्या गोष्टीला रडू येत तू जा बाई एकदाचीच निघून जा माझ्या जिवनातून "

राधिका रडता रडता एक जोराचा हुंदका देते आणि शांत होते ," बर झाल एकदाची झोपली आता मला शांत झोप येईल.
सकाळी बराच वेळ झालेला असतो पण ती काही ऊठत नाही पार्थ रूम मधून बाहेर येतो त्याच्या आईची बडबड सुरूच असते,पण आता पार्थ आईला समजवायचा प्रयत्न करतो ,"अग आई तिला खरच बर नसेल,रोज सगळ करून जाते ना ती."

"शेवटी बायकोचाच झालास ना आiता आमच कशाला ऐकशील," आईकडे दुर्लक्ष करून पार्थ रूम मधे जातो राधिकाला प्रेमाने हाक मारतो ३-४ दा पण ती काही ऊठत नाही तो तिला हलवतो तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला response देत नाहीये.

तो लगेच तिला दवाखान्यात नेतो,डॉक्टर तिला मृत सांगतात पार्थला हादरा बसतो.
reports आल्यावर डॉक्टर सांगतात की ulcer फुटल्यामुळे तिचा मृत्यु झाला तुम्ही जर लगेच काल आनलं असत तर ती वाचली असती ,body मध्ये poision पसरल्यामुळे रात्री ११.३० ला तिचा मृत्यु झाला.

पार्थला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो.

" राधिका सगळे नाते सोडून माझ्या सोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता तिच काहीही न ऐकता तिच्याशी असा वागलो,माझ्यामुळे ती गेली" पण आता तो काही करू शकत नव्हता ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती आता तीनेही त्याच्याशी अबोला धरला होता आणि तोही कायमचा.

मित्रहो:-
व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्या त्याला समजून घ्या ,त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही कारण मरणानंतर शत्रूही रडतात.

आपल्या घरातील व्यक्तिवर खुप प्रेम करा...
आज तुम्ही त्यांना जवळ केले तर उद्या ते तुम्हाला जवळ घेतील..
राग आल्यास शांततेने समाजवा..प्रेमात

आज ती सुन आहे..तुमची

उद्या तुमची मुलगीही कोणाची तरी सुन होणार आहे...हे विसरु नका....

सुखी व्हायचय ?

एका शहरातला एक तरुण मुलगा खूप मेहनती खूप विचारी खूप अभ्यासू त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नंतर लग्न झाले. नवीन नवीन संसार. सुरुवातीचे दिवस छान गेले. पण हळूहळू घरात बारीक सारीक कुरबुर सुरू झाली. जेवणावरून बाहेर फिरायला जाण्यावरून. काहीवेळा कारणे खूप क्षुल्लक असायची पण वाद पेटायचा. मग घरात अबोला. एकूण वातावरण बिनसू लागलेले..
असाच एकदा तो वैतागून घरून ऑफिसात निघालेला होता. तर गाडी काढताना पार्किंग मध्ये एक तेजस्वी पुरुष समोर उभा दिसला. त्या पुरुषाने स्वतःहून या तरुणाला विचारले बेटा दुःखी दिसतोय. काय झालं ? मी काही मदत करू का ?
हळव्या स्वभावाच्या त्या तरुणाला एकदम गहिवरून आलं  त्याने कबुली दिली की होय महाराज मी दुःखी आहे. पण मला सुखी व्हायचं आहे. एक तरी क्षण एक तरी मिनिट मला सुख पाहायचे आहे काय करू?
तो तेजस्वी पुरुष म्हणाला नक्की सुखी होशील. मात्र त्यासाठी माझ्यासोबत आत्ता अर्धा  तास यावं लागेल जमेल का ?
तरुण म्हणाला हो चालेल
मग ते दोघे एकत्र पायी पायी निघाले जवळच एक बाग होती तिथे तेजस्वी पुरुष आत गेला मागोमाग तो तरुणही गेला गेट जवळच एक जडसा  दगड पडला होता तेजस्वी पुरुषाने तो दगड उचलून तरुणाच्या हाती देऊन मागोमाग चालत यायला सांगितले तरुण तो दगड हातात घेऊन निघाला. पाच मिनिटांनी त्याच्या हाताला रग लागली म्हणून त्याने दगड दुसऱ्या हातात घेतला अशीच पंधरा मिनिटे गेली आता तरुणाचे दोन्ही हात दुखू लागले तरी चालणे सुरू होतेच. शेवटी अर्ध्या तासाने तरुणाची सहन शक्ती संपली दगड दोन्ही हातानी पकडून  तो त्या तेजस्वी पुरुषाला म्हणाला आता सहन होत नाहीये.
यावर तो पुरुष म्हणाला आता तो दगड खाली ठेव..
त्याबरोबर तरुणाने दगड लगेच टाकला. हुश्श केले. घामाघूम झालेला चेहरा पुसला.ओझे कमी झाल्याने तो थोडा ताजातवाना झाला त्याच क्षणी तेजस्वी पुरुष म्हणाला हाच तो सुखाचा क्षण आहे. ओझे कमी झाल्याने तू आत्ता स्वःताला खूप सुखी समजतोय ना ?
तरुण म्हणाला होय महाराज
मग तो पुरुष म्हणाला जीवनाचे देखील असेच आहे तो दगड म्हणजे दुःख / निराशा आहे तो दगड एक मिनिट हातात ठेवला थोडे दुखले पाच मिनिटे अजून ठेवला अजून जास्त दुखले. अर्धा तास ठेवल्यावर सहन करण्या पलीकडचे दुखले.आता हे आपल्यावर आहे की आपण तो दगड कितीवेळ हातात ठेवणार ? तुम्ही तो दगड जितक्या लवकर खाली ठेवाल तितक्या लवकर सुखी व्हाल  आणि जमलेच तर असले दगड उचलूच नको आयुष्यात कधीच तू दुःखी होणार नाहीस..
जगात आपल्याला दुखवू शकेल अशी एकच व्यक्ती असते ती म्हणजे आपण स्वतः  दुसरे कुणीही कितीही ठरवले तरी दुःखी करू शकत नाही..

गरूडभरारी म्हणजे काय ?

गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.

ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
🎭
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .
नेहमी छोट्या छोट्या
चुका सुधरायचा प्रयत्न करा,
कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते.
ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते.
पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.
"बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना" आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले.
एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.
"ओ आजोबा नीट घेऊन खा की?" मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे.

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला.
"काळजी करू नकोस, बाबा सापडले!!" कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!
त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली.

"काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???"
त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले.
"हे आजोबा कोण आहेत तुमचे?" मी विचारले.
"वडील आहेत माझे." त्याचे उत्तर.
"त्यांना काही त्रास आहे का?" माझा पुढचा प्रश्न.
"हो त्यांना अल्झायमर आहे."
अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता.
" मग हे आजोबा असे कुठेही जातात का?"
" हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत."
मी शॉकच झालो.
"मग तुम्ही यांना शोधता कसे?"मी विचारले.
"आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी."
"असे वारंवार होत असेल" मी आश्चर्याने विचारले.
तो स्मितहास्य करून म्हणाला "महिन्याला एक दोन वेळेस"
"काळजी घ्याआजोबांची! बाप रे काय हा वैताग" मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, "बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं."

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.             

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.
उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो...               

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!

माझी निवड चुकली तर नाही ना ?

एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.

प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.

प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना? तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.

नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे.

The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.

स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.
कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे
सदाशिव पेठेमधला एक ह्रदय हलवून टाकणारा प्रसंग

 गुरुजी ओळखलंत का मला  ?

हो ओळखलं ना 1987 ची बॅच ना ?

३ महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी ..
बायको :- (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?
नवरा :- खुप खुप खुप आवडते ग...
बायको :- असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज..
.
.
.
.
.
.
.
नवरा :- म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात...

बायकोने डोक फुटुुस्तर हाणला..
प्रेरणा कशास म्हणतात ??

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!

आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!

बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!

यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!

मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?

तुकोबा ज्ञानोबा तर कधी शाळेतच गेले नव्हते!!

शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती ?

तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या ?

डॉ. आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?

हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते !!

मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!

सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!

आणी आज आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!

आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!

भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!

पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!

पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!

माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?

कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?

वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?

लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?

आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?

निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!

शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!

आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!

*शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो.
एका मुलाची आई...मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल..

चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फीरायला गेले, असताना वडीलानी सहज प्रश्न केला....

वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत आणी नविन आईत काही फरक वाटतो का..?

मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीचन्र्दाची नातेवाईक...

वडीलाना नवल वाटल..त्यानी विचारल

वडील: कस...काय !                             

मुलगा:  माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फीरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....

"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...
महाराज दरबारात प्रवेशताना जी ललकारी दिली जायची तिला मराठीत ''गारद'' म्हणतात. ऊर्दूमध्ये ह्या ललकारीला ''अल्काब'' तर संस्कृतमध्ये ''बिरुद'' किंवा ''बिरुदावली'' म्हणले जाते...
छत्रपती शिवरायांची गारद व तिचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात....

🚩#दुर्गपती → गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य ( राज्य ) आहे असे.

🚩#गज-अश्वपती → असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे त्यावेळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं तर हा शब्द आपण वैभवसंपन्न असही म्हणू शकतो.

🚩#भूपती प्रजापती → वास्तविक राजाभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमिशी झालेला विवाह आहे, म्हणजेच त्या शासनकर्त्याने त्या भुमिचे व प्रजेचे वर हे पद स्विकारले आहे व तो यांचे सर्वथा रक्षण करणार हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.

🚩#सुवर्णरत्नश्रीपती → नानाविध हिरे माणिक मोती व सुवर्ण ( सोने ) ह्याच्यावर ज्याचे आधिपत्य ( मालकी ) आहे,, शिवरायांच्या बाबतीत ३२ मणी सिंहासनाचे १ क्रोड होनांचे अधिपती.

🚩#अष्टावधानजागृत → आठ प्रहर आठ दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल ( राजा ).

🚩#अष्टप्रधानवेष्टीत → ज्यांचा पदरी प्रत्येक शास्त्रात निपूण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात त्यांचा सल्लाही घेणारे राजे.

🚩#न्यायालंकारमंडीत → कर्तव्यकठोर, न्यायकठोर सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज.

🚩#शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत → प्रत्येक शस्त्रविद्येत व शास्त्रात पारंगत ( निपूण ) असलेले राजे.

🚩#राजनितीधुरंधर → राजकारणात ( राजनितीमध्ये ) तरबेज असलेले राजे.

🚩#प्रौढप्रतापपुरंधर → पराक्रम करून ज्यांनी आपला ठसा उमटवला असे परमप्रतापी राजे.

🚩#क्षत्रियकुलावतंस → क्षत्रिय कुलात जन्म घेतलेले व त्यात सर्वात ऊंच प्रतीचा ( अवतंस ) पराक्रम गाजवलेले राजे.

🚩#सिंहासनाधिश्वर→ जसा देव्हा-यात देव शोभून दिसतो तसेच सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिपती.

🚩#महाराजाधिराज→ सर्व भूपालांमध्ये उठून दिसतो व सा-या राजांनी ज्यांचे मांडलिकत्व स्विकारावं असे राजे.

🚩#राजाशिवछत्रपती →ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत अथवा ज्यांच्यावर प्रजेने छत्र धरून आपला अधिपती स्विकारले आहे किंवा ज्यांच्या नभाने छत्र धरले आहे असे छत्रपती शिवराय.
मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"🙁

मी "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"☹

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मी "अहिल्या देवींवर" कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का?"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही....

शेवटी तर आपणच दोघं असु

पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचे ठरत नाही.
 ठरू देखील नये.
त्याने तिची भावना जपावी, तिने त्याचे मन ओळखावे. सुंदर जगण्याला अजून काय हवे ???

शेवटी तर आपणच दोघं असु

जरी भांडलो, रागाराग केला,
एकमेकांवर तुटून पडलो,
एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

जे बोलायचं ते बोल,
जे करायचं ते कर,
एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

मी रूसलो तर तु मला मनव,
तु रुसलीस तर मी तुला मनवीन,
एकमेकांचे लाड करण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा नजर कमी होईल,
स्मरणशक्ती पण कमी होईल,
तेव्हा एकमेकांना,
एकमेकांमध्ये शोधण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

गुडघेदुखी जेव्हा वाढेल,
कुठे बाहेर फिरणं ही थांबेल,
तेव्हा एकमेकांच्या,
पायाची नख कापण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

"माझे रिपोर्ट्स अगदी नाॅर्मल आहेत,
I am Alright",
असं बोलुन एकमेकांना छेडण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा आपली साथ सुटेल,
अंतिम निरोपाची वेळ येईल,
तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु,

अति लाड म्हणजे प्रेम का?

माझा  एक वकिलमित्र सांगत होता की, त्याच्यांकडे एक घटस्फोटाची केस आली. केस अशी होती की, नवीन लग्न झाले होते. नवरा पगार झाला की , बायकोच्या हाती द्यायचा. बायको पहिल्या चार-पाच दिवसातच सर्व पगार शॉंपिंगवर खर्च करुन मोकळी व्हायची. असे दर महिन्याला होत गेले. त्यामुळे नवर्‍याचे आर्थिक गणित चुकले. तो तीला म्हणाला की, ‘‘पैसे जपुन खर्च करत जा!".
बस त्यावरुन भांडण करुन बायको माहेरी गेली. तिच्या आईने जावायांना बोलावून सांगितली की, ‘‘तिची हौस-मौज करा, पैसे कमी पडले तर माझ्या कडून घ्या!’’ हे सासूबाईंचे वाक्य ऐकून मुलगा तडक उठला आणि त्याने घटस्फोटाची मागणी केली. पुढे त्यांचा घटस्फोट पण झाला. आता यात नक्की काय घडले?.. नक्की चुक कोणाची होती?.. मुलगा अत्यंत स्वाभिमानी होता. त्याने त्याचे करीयर स्वत:च्या हिमंतीवर बनवले होते. तर मुलगी अत्यंत लाडात वाढलेली होती. पुढे समुपदेशनात लक्षात आले की, मुलगी एकुलती एक..
लहानपणी ही मुलगी ज्या दुकानाच्या बाहेर उभी राहील त्या दुकानातल्या वस्तू गरज नसतांना पालक विकत घेत असायचे. ‘‘काय हवे माझ्या शोनुलिला?.. बार्बी गर्ल?’’ ओके..! लगेच तिला ती बाहुली मिळत गेली. तोंडामधुन एखादी मागणी आली की लगेच हट्ट म्हणून ती पुरवली जायाची.. या पध्दतीने ती लहानाची मोठी झाली. आणि लग्नझाल्यावर वर्षभराच्या आत माहेरी आली.
पालकांनो लहान मुलांचे मानसिक स्वास्थ आणि भावनिक स्वास्थ हे तुम्ही त्याच्यांशी लहानपणी कसे वागतात त्यावर अवलंबुन असते. पालक मुलांचे लाड करणच्या नादात कुठे थांबायचे हे सुध्दा विसरतात.
‘‘मागीतले की मिळतं’’ ही सवय जर मुलांना लागली की, पुढे हे जड जाते. अशा मुलांना वाईट सवयी लवकर लागतात आणि तर मुली लवकर बिघडतात. नकाराची सवय राहिली नाही तर मोठ्यापणी साधा प्रेमभंग सुध्दा पचवता येत नाही,  ना ऑफिसमध्ये वरिष्ठांशी जुळवून घेता येते. याचे कारण पालक मुलांमुलीचे प्रत्येक प्रश्‍न स्वत: सोडवण्याच्या भानगडीत पडतात. कॉलनीत मुला-मुलांचे भांडण झाले तर आई लगेच शेजारच्यांशी भांडायला जाते. शाळेत थोडं टिचर रागावली की बाबा लगेच मुख्याध्यापकांना भेटतात. मुलाला एका डान्समधुन काढून दुसर्‍या डान्समध्ये अथवा दुसर्‍या परफॉर्मन्स मध्ये टाकले की लगेच टिचर्सला फोन करुन जवाब विचारतात.. या सर्वामधुन मुलांना आयती उत्तरे मिळतात. नकार पचवून घ्यायची सवय लागत नाही.
पालक जेव्हा गरज नसतांना पाल्याचा हट्ट पुरवतात. पैसे नसतांना सुध्दा मुलांचे फाजील लाड पूर्ण करतात आणि त्याला गोंडस शब्दांची झालर देतात आणि ती झालर म्हणजे ‘‘आमचे लहानपणी असे लाड झाले नाही, मला जे मिळाले नाही ते मी माझ्या मुलां-मुलीला देईल’’ आणि या कृतीलाच पालक प्रेम करणे असे म्हणतात.
खरं तर प्रेम आणि काळजी यांचा समतोल साधायचा असतो, कारण दोघं जास्त झाले की, वाढ खुटण्याची भीती असते. मागणी आणि पुरवढा यांचा योग्य समतोल पालक आणि पाल्यामध्ये होणे गरजेचे असते.
आपण मुलांशी लहानपणी कसे वागतो त्यावर भविष्यातील त्यांची वर्तवणुक ठरत असते. म्हणून मागीतले ते मिळते ही सवय मुलांना लावु नका. मोठ्या माणसांनी, शिक्षकांनी किंवा क्लास टीचर ने त्याच्या भल्यासाठी काही ऍक्शन घेतली असेल तर त्यावेळेस टिचर्सला सहकार्य करा. कारण शेवटी मुलं मोठ्यापणी सर्वांनमध्ये मिळून मिसळून राहणं, उत्तम संवाद साधणे हे महत्वाच असते आणि याला अडथळा असतो अति लाड! अति प्रेम!! शिस्त ही प्रेमाची पहिलि कृति आहे.
गुरुजी : पुढील दोन वाक्यातील फरक सांगा ☝
१) त्याने भांडी घासली
२) त्याला भांडी घासावी लागली
गण्या : सर पहिल्या वाक्यातील तो अविवाहित आहे
आणि
दुसर्या वाक्यातील तो विवाहित आहे 

सेल

1.जीवशास्त्राचे चे शिक्षक : सेल म्हणजे शरीरातील पेशी.

2. भौतिकशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे बेटरी (battery)

3. अर्थशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे 'विक्रि'.

4.ईतिहासाचे शिक्षक : सेल म्हणजे तुरूंग.

5. इंग्रजीचे शिक्षक : सेल म्हणजे मोबाईल फोन.

मी तर शिक्षणच सोडून दिले हे समजून की ज्या शाळेत पांच शिक्षकांचे एकमत होत नाही त्या शाळेत शिकून काय होणार..

आणी आत्ता खर ज्ञान मिळालं जेव्हा...

बायकोने सांगितलं की 'सेल' म्हणजे 'डिस्काऊंट'
चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो.

शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला...

मी हिला म्हणालो...  "तुझे गुढघे दुखत असतील ना ?"

तेवढ्यात...

शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला...


स्थळ : पुणे...

‘अडगळीत गेलेले शब्द

‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे.पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची.सगळ्या नको असलेल्या,परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तेच योग्य आहे असे म्हणतात. काय योग्य,काय अयोग्य, हा प्रश्न वेगळाच; पण काळानुसार खूपच शब्द अडगळीत गेले आहेत हे खरे.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, पडवी, परसू, माजघर, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा. घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.

 ‘फडताळ’ ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.घरात माळा असायचा.  त्याला ‘आटळा’ म्हणायचे.जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली.सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल,वैल,निखारे हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला. पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. ‘काथवट’हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन में चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

कपड्यांचा विचार करताना तठव,जाजम,सुताडे सगळे हरवून गेलेले.सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,  पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली. सोवळ्यात नेसण्याची‘ धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.

कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या,ढोल्या-ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे-त्या गडप झाल्या.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले.काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकाच्या पूर्वी विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेचः।।
जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका
   🏻🏻🏻🏻🏻🏻
     जेव्हा मागत होते फुगा
     लहानपणी आई जवळ
    आता आई चष्मा मागते
    तर तिला नाही म्हणु नका तुम्ही
🏻🏻🏻🏻🏻🏻
जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही
     
🏻🏻🏻🏻🏻🏻
     आई रागवत होती तुम्हाला
     जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
     आता तिला ऐकु येत नाही
     तर तिला रागावु नका तुम्ही

🏻🏻🏻🏻🏻🏻
जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही
  🏻🏻🏻🏻🏻🏻   

         जेव्हा रडत होते तुम्ही
         आई छातीला लावत होती
         आता सहन करा दु:ख तुम्ही
          तिला रडु देवु नका तुम्ही

🏻🏻🏻🏻🏻🏻
जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....

🏻🏻🏻🏻🏻🏻
* आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा...  जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात... *

माझ ही तुझ्यावर खूप प्रेम आहे

जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...
मी म्हणलो..." माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे..."
तू विचारलस "ते काय असत ..?"
आठवतंय..?
💕
मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो
"मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस..."मला एकटी तर नाही ना सोडणार..?"
आणि अलगद माझ्या मिठीत विरघळलीस...!!
💕
३५ व्या वर्षी ...
जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो.. तू आणि मी सोबतच डिनर घेतलं... मी तुला जवळ ओढून म्हणालो..."I love you...!!"
तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस.." I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर आहे...
उशीर नको व्हायला आता जास्त...आता झोपू यात लवकर...!!
💕
माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे पार्टी मध्ये गुंग असताना,
मी हळूच म्हणालो..."I love you very much"
तू हसत हसत म्हणालीस ..."माहित आहे, २० वर्ष आधी पासून माहित आहे.."
आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!!
💕
तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो. "छान दिसतेस आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो, तू मला खूप आवडतेस...आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस..."ते ठीक आहे हो...!! पण सगळ वेवस्थित अरेंज झालाय ना..?"
💕
मी आता ७५ वर्षाचा..,
आराम खुर्चीवर बसून, आपला जुना अल्बम बघत होतो...,
तू स्वेटर वीणत होतीस नातवांसाठी मी म्हणालो "माझं तुझ्यावर अजून ही तितकचं प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस,
"माझं पण तुझ्यावर आजही तितकचं प्रेम आहे जितक तुला होकार देताना
होत.."
माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला... डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते कारण आज इतक्या वर्षांनी तू स्वतः म्हणाली होती तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!
💕
फक्त प्रेम पुरेसे नसते. कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असत... त्याला ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात.. "हो माझ पण तितकाच प्रेम आहे तुझ्यावर जितकं तुझ माझ्यावर आहे, म्हणून जेव्हा पण संधी मिळेल तेव्हा सांगायला चुकू नका.” नवरा तो नवराच असतो .
.
कितीही रागवला
तरी मायेन तोच जवळ घेतो…
कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात ..
मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात ..
किती दुःखी असला तरी सार गिळून घेतो कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो …
नवरातो नवराच असतो….
.
काळजी का करतेस मी आहे न तुला
म्हणून किती धीर देतो
सा-या अडचणी आपल्या मनात ठेऊन बायकोकडे
हास-या नजरेन पाहतो…
.
जस घरावर छत असत तसच आपल्या डोक्यावर नव-याच झाकण असत
किती सुरक्षित असतो आपण त्यांच्या
सावलीत …
ऊन्हाचे चटके तो खातो
पण सावली आपल्या डोक्यावर देतो..
नवरा तो नवराच असतो….
.
आपन चार अलंकार घालून म्हणतो
मान माझी मंगळसुत्र तुझ
कपाळ माझी बिंदी तुझ्या नावाची ..
.तो कधी म्हणतो का ?
कष्ट माझे पगार तुझा…
शरीर माझ आयुष्य तुझ …..
जन्म आईच्या उदरात पडलो तुझ्या पदरात ..
तू जिवन संगिनी म्हणून गोड मानत असतो ….
नवरा शेवटी नवराच असतो…
.
संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो….
एक चाक डगमगल तर एका चाकावर रथ हाकणं फार अवघड होतं

.
बायको शिवाय घराला घरपण नाही तसच नव-या शिवाय बायको पूर्ण नाही
तो कळस आहे घराचा छत आहे
परिवाराचा…
चटके तो खातो आपण मात्र सावलीत राहतो
नवरा तो नवराच असतो ..
.
आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही…..
म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या
प्रेमाची साथ द्या जिवन क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या….

शासन निर्णय

शासन :- मांजराला तिखट खायला लावायचे आहे.....

तात्काळ प्रस्ताव सादर करावा
.
.
.
सब डिवहीजन :- मांजराची मानगुट पकडुन त्याचे तोंड उघडुन त्यात तिखट कोंबायचे, कि झाले.😈..
.
.
.
शासन :- याला म्हणतात " जबरदस्ती
.
.
.

डिव्हीजन :- माशाच्या पोटात तिखट घालून तो मासा मांजराला खायला लावायचा, हे उचित होईल असे वाटते. 😈   

.
.
.
शासन :- याला म्हणतात " फसवणूक

.
.
.
सर्कल :- प्रथम विहीत निविदा प्रक्रियेद्वारे उत्तम गुणवत्तेचे तिखट उपलब्ध करून घ्यावे. नंतर ते भरपुर प्रमाणात मांजराच्या शेपटीला चोळावे. काही कालावधी नंतर त्याच्या शेपटीची आग होउ लागेल व मांजर स्वेच्छेने शेपटी चाटण्याचा विकल्प सादर करिल...... 

.
.
.
शासन :- याला म्हणतात " शासन निर्णय ".
नवरा बायकोचा खून करतो. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गाढ झोपेत असतो.

चार दिवस उलटल्यानंतरही मूल आई कुठे आहे विचारत नाही. बापाच्या हृदयात चर्र होतं.

बाप- तुला काही विचारायचं का?








मुलगा- आई सतत तुमच्यामागे का उभी असते?

*********************************************************************************

बायकोने रात्री उठवलं. कोणीतरी घरात शिरलंय हे सांगताना ती पांढरीफटक पडली होती.











दोन वर्षांपूर्वी रात्री एका दरोडेखोराने तिचा खून केला होता.

*********************************************************************************

मुलाला उठवायला त्याच्या बेडरूममध्ये गेलो. त्याला हलवलं तर तो म्हणाला, पापा या कॉटखाली एक राक्षस आहे तो मला टोचून, टोचून बेजार करतोय.

मुलाच्या समाधानासाठी मी कॉटखाली पाह्यलं.








 तिथे माझाच मुलगा होता. चेहरा पांढरा फटक, थरथर कापत त्याने विचारलं,






पापा कॉटवर कोण झोपलंय?

गाव नमुना

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
ग्रामपंचायत
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता.

"तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा.  "

सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटलं.

पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????

यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला.
शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.

कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.

शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता,

"या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः"

कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता.

तुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.

ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.
दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?

तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.

पुर्वी लोक   घराच्या   दारावर   एक   माणूस   ठेवायचे.
कारण   कुणी   कुत्रं   घरात   घुसू   नये.
आजकाल   घराच्या   दारावर        कुत्रं   उभं   ठेवतात.   कारण
कुणी   माणूस   घरात    येऊ  नये.
---------------------------------------
पुवीॅ   माणूस   जेवण   घरी 
करीत   होता.  आणि    शौचालय   बाहेर    होत.
आता   जेवण   बाहेर   करतो
आणि   शौचालय   घरात  आहे. _________
पुवीॅ   लग्नात   घरच्या    स्रिया   जेवण   बनवायच्या.
आणि   नाचणार्‍या   बाहेरून यायच्या.  आता   जेवण   बनवणाऱ्या    बाहेरून   येतात. आणि   घरातल्या   स्रिया   नाचतात.
_________
पुवीॅ   माणूस   सायकल   चालवायचा    तो    गरीब   समजला   जायचा.
आता    माणूस   कारने 
जिममध्ये  जातो  अन् सायकल
चालवतो !
---------------------------------------------
पुर्वी माणुस चुलीवर स्वैपाक करायचा  मग LPG वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरच जेवण खायला ढाबा शोधायला जातो !
---------------------------------------------
पुर्वी वायरीच्या फोनने लांबची माणसे ही जोडली जायची.
आता बिनवायरीच्या मोबाईलने जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत!
--------------------------------------------
पुर्वी माणसं कशी शहाणी होती.
आता माणसं येडी अन् हातातले फोन स्मार्ट झालेत !
-----------यालाच -----------म्हणत्यात --------------------परिवर्तन--------
दृष्टीकोन

एक (तरुणी) आई डायनिंग टेबलाजवळ चिंतीत होऊन बसुन होती. कारण नेहमीचेच!
मार्च एंड असल्यामुळे इनकम टॅक्स भरणे भाग होते.
घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमित्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते.
या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती.

जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपल्या वहीत काहीतरी लिहीत होती.
तिने मुलीला विचारले, "काय करतेयस?"
मुलगी म्हणाली,
"आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे 'negative thanks giving आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात"

आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली! बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय!
मुलीने लिहीलं होतं;

- मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते ..

-मी त्या सर्व कडू आणि खराब चवीच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घेतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.

- मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .

वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की "अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की; ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते"
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या

"income tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे"

"घरी भरपूर काम करावं लागतं, म्हणजेच माझ्याकडे एक घर, एक हक्काचे आश्रयस्थान आहे .."

" सणासुदिला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते म्हणजेच माझ्या कडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत."

गोष्टीचे तात्पर्य -
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ..

चला आपणही असाच positive attitude ठेऊन आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.
👳🏼‍♀ पुणेकर: ही शाई पाण्याने जाईल?
👴🏼 मतदान केंद्र अधीकारी : नाही

👳🏼‍♀ पुणेकर: तेलाने?
👴🏼 अधीकारी : नाही

👳🏼‍♀ पुणेकर: साबणाने?
👴🏼 अधिकारी : नाही

👳🏼‍♀ पुणेकर: किती दिवस अशीच राहणार?
👴🏼 अधिकारी : साधारण वर्षभर..

👳🏼‍♀ पुणेकर: मग माझ्या केसांनाही लावाल? दर पंधरा दिवसांनी केस काळे करायचा जाम कंटाळा आलाय.
दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो. तेवढ्यात, माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु, धष्टपुष्ट कुत्रा शिरला.

त्याच्या गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहुन वाटते होते की, हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा आहे.

मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

तो शेपुट हालवत तिथेच बसून राहीला.

मी उठून घरात निघालो, तसा तोही मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून, पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.

पाहता पाहता झोपीही गेला.

मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसून राहिलो.

तासाभराने तो उठून दाराकडे निघाला. मी ही उठून दार उघडले.

तो सरळ कंपाउंड बाहेर गेला. बहुधा, त्याच्या घरी गेला असावा!

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला.

तसाच हाॅलच्या कोपऱ्यात झोपला. तासाभराने उठून निघून गेला.

मग हे रोजचेच झाले.

तो यायचा, झोप काढायचा अाणि निघून जायचा. असे कित्येक आठवडे झाले.

मला उत्सुकता लागुन राहिली, हा नेमका कुणाचा आहे ?

मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहुन अडकवली,
"तुमचा कुत्रा माझ्याकडे रोज येऊन झोप काढतो, हे तुम्हाला माहीत आहे का?"

दुसऱ्या दिवशी पुन्हा रोजच्याच वेळेला तो कुत्रा आला. पण, यावेळी त्याच्या पट्ट्याला एक चिठ्ठी दिसत होती. मी ती काढून वाचू लागलो.....

"टॉमी एक चांगल्या घरचा कुत्रा आहे. इथे माझ्या सोबतच राहातो. पण, माझ्या बायकोच्या अखंड वायफळ बडबडीला कंटाळून, थोडीशी तरी झोप मिळावी म्हणून रोज तुमच्याकडे येतो....उद्यापासुन मी पण त्याच्या सोबत येत जाऊ का ?
चिठ्ठी लावून कळवणे!"
सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.

आंबेवाला बंधू : खराब ???

सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके !

बंधू: (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या...

सौ. पुणेकर : हं .ठेवा बाजूला... आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !

आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला
एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे.

तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे.

तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते....

हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ  वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.....

आता तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "सर, किती किंमत आहे या बाहुलीची?"

दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने  विचारतो " बोल तू काय देशील ?"

मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?"
दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत.  ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो.
मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो.

हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता व त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?"

दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला,
"आपल्यासाठी हि केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हि शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.
सगळ्या बायकांना हात जोडून नमस्कार.

आजही बायका वडाच्या झाडाच्या फांद्या तोडताना दिसतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून त्याला दोरे बांधणाऱ्या या निरागस बायका बघितल्या की सांगावं वाटतं, बाई त्या फांदीच आयुष्य का संपवलं? वड जास्त कामाचा आहे. औषधी आहे. हजारो लोकांना सावली देतो. तुझा नवरा पगार तरी घरी देतो का? पण मी असं बोलत नाही. आणि मला माहित आहे असं बरच काही डोक्यात येऊन पण बायका सुद्धा शांत बसतात.

खरतर जगात कुठलाच अर्थशास्त्रज्ञ देशाची अर्थव्यवस्था सांभाळायला सल्ला देण्यापलीकडे काही करू शकत नाही. घराची आर्थिक घडी बसवण्यात मात्र स्त्रीचं योगदान शंभर टक्के असत. तरी अर्धे नवरे बायकोला म्हणतात. तू गप्प बस. तुला व्यवहारातल काही कळत नाही. बायकांना गाडी चालवता येत नाही हे दहा वेळी गाडी ठोकलेले पुरुषसुद्धा तोंड वर करून बोलतात. तरी कशा ऐकून घेतात बायका?

हे सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी मनापासून प्रार्थना करणाऱ्या बायकांनो, सात पिढ्यात एकदाही तुमच्या नवऱ्याच्या खानदानात कुणाचंही नाव पेपर मध्ये आलं नसलं तरी तो न चुकता रोज पेपर घेऊन अर्धा तास toilet ला जातो. तेंव्हा बाहेरून कडी लावून त्याला दिवसभर कोंडून ठेवावं वाटतं तुम्हाला. पण तुम्ही एवढ्या दयाळू की तसं कधी करत नाही. तुम्हाला बघायची असते मालिका. पण नवरा खुशाल क्रिकेट बघत बसलेला असतो पाय पसरून. रागात रिमोट घालावा नवऱ्याच्या डोक्यात असं डोक्यात येतं. पण तसं तुम्ही करत नाही.

कधी छान आभाळ आलेलं असत, बाहेर पडावं, नवऱ्यासोबत पावसाचे थेंब झेलावेत अंगावर असं तुमच्या डोक्यात येतं. आणि नवरा सोफ्यावर पडल्या पडल्या म्हणतो ‘ मस्त कांदा भजी कर गं जरा.’ तेंव्हा आज कांद्या ऐवजी नवऱ्यालाच बेसनाच पीठ लावून कढईत टाकावं असं वाटून जातं. पण तरी तुम्ही भजी तळता. खमंग. उभ्या राहता खिडकीतल्या पावसाचे थेंब झेलत. तुमच्या मनातलं आभाळ मात्र डोळ्यात येतं. नवऱ्याला पत्ता नसतो त्या भरून आलेल्या आभाळाचा. नवरा मग आठवेल तेंव्हा भजी छान झालीत म्हणतो. आणि तुम्ही पण सुखात न्हावून निघाल्याचा अभिनय करता. नाहीतरी तुमच्या पैकी कित्येक जणींना पिझ्झाचे डोहाळे वडा पाववर भागवावे लागलेले असतात.

हे देशातल्या तमाम सोशिक बायकांनो,

कधी तुम्ही खूप राबून मोठ्या कौतुकाने सुरमई बनवलेली असते. वाटत असतं वासानेच वेडा होऊन मिठी मारेल नवरा. आणि दार उघडत तेंव्हा फक्त दारुचाच वास पसरलेला असतो घरभर. तेंव्हा सुरमईचा काटा काढावा त्या सहजतेने या नालायकाचा काटा काढावा असं वाटून जातं. पण असं काहीच तुम्ही करत नाही म्हणून आभारच मानले पाहिजेत. नवरे खुशाल म्हणतात ‘आजकालच्या बायका साधा फराळ पण करत नाहीत दिवाळीत. माझी आई काय काय बनवायची फराळाला.’ तेंव्हा तुम्ही ‘ तुमची आई फराळ बनवायची कारण तुमचे वडील रोज बिअर बार मध्ये चखन्याला शेव आणि चकली खाऊन येत नव्हते.’ असं का म्हणत नाही? तुम्ही रविवारी आराम करायचा ठरवलेलं असत. पण चार मित्र जमल्यावर पत्ते खेळता खेळता नवरा मोठ्या थाटात ‘ चहा टाक गं चार पाच कप आणि खायला दे काहीतरी..’ असं सांगतो. ओठावर येतं ‘नौकर आहे का मी?’ पण ते तुम्ही ओठातच ठेवता. का? आणि तरी सगळं जग म्हणत बायकांच्या पोटात काही रहात नाही. खरंतर ही पुरुषांनी सोयीस्करपणे स्वतःची समजूत घातलेली आहे. बायकांनी आपले काय काय अपराध पोटात घातलेत, बायकांचं नवऱ्या बद्दल खरं खरं मत काय आहे? हे जर त्या स्पष्ट बोलल्या तर कित्येक पुरुषांना पुन्हा आईच्या पोटात परत जावं वाटेल. या जगाला पुन्हा कधीही तोंड न दाखवण्यासाठी. तरीही हे सहिष्णू बायकांनो, मला खात्री आहे एक दिवस तुम्ही हे मनात साचलेलं नक्की बोलणार. पण आज एक पुरुष म्हणून मनापासून माफी मागतो तुम्हा सगळ्यांची. सगळ्या पुरुषांच्या वतीने.

ता.क. काही बायका म्हणतील मी असली बाई नाही. मी नाही ऐकून घेत. सरळ शिव्या देते नवऱ्याला. एकदा तर थोबाडीत पण ठेवून दिली. तर कृपया गैरसमज नसावा. हे पत्र तुमच्यासारख्या रणरागिणी साठी नाही. तमाम सोशिक, सहनशील आणि चोवीस तास घरात बिन पगारी राबणाऱ्या गृहिणींसाठी.

- अरविंद जगताप.
एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो.

शेजारचे काका : काय बेटा, पुढे काय करायचे ठरवले आहे?

मुलगा  : काही नाही काका, टाकि भरली की मोटार बंद करीन.

जमलेच नाही

एकटे राहणे जमलेच नाही
माणसांना टाळणे जमलेच नाही.

कष्टाची भाकरी गोड लागली
लुटावे कुणाला कधी जमलेच नाही .

चेहरा आरशासारखा स्वच्छ होता
मुखवटा लावणे जमलेच नाही .

जे लाभले ते  आनंदाने स्वीकारले
कष्ट नाकारणे जमलेच नाही .

जिंदगी साधी सरळ होती
भूल थापा मारणे जमलेच नाही
अंदमान  वर जाताना दोनरांगा  लागले होते. ..

वीणा वर्ल्ड वाले senior citizens. .आणि make-my-trip वाले  हनिमून  couples. ..

त्या वेळेचा एक उत्स्फूर्त विनोद . ..

" केसांना मेंदी लावलेले या बाजूला या. .. हाताला मेंदी लावलेले..त्या बाजूला जा... "

फक्त हिमतीने लढ👊

घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही 🐅

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?🎭

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?🕴

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
🐕
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂

कष्टकर्याची  जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे🤕

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧

🐝मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग😎

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?🌊💦

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊
मुंबईहून पुण्याला येताना नेमकं काय  होत❓













तापमानात घट होते...

आणी

अपमानात वाढ होते.
मुलीने आपल्या माहेरी तिच्या आईला फाेन केला:- 
            " आई यांनी माझ्यासाेबत भांडण केले, मि ३-४ महिन्यासाठी माहेरी येत आहे रहायला..

यावर आईने अगदी हदयस्पर्शी उत्तर दिले.


आई म्हणाली: - 
                 "भांडण तुझ्या नवर्याने केले आहे मग शिक्षा पण त्यालाच मिळायला हवी, तु तिथेच थांब मिच ५-६ महिन्यासाठी तिकडे येते...!
...बायको: तुम्ही मला कधी सोनं, हिरे किवा मोती का नाहीं देत हो?
.
नवरा तिला जमिनीवर ची माती उचलुन देतो
.
बायको (रागात): हे काय..?
.
नवरा : मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती।।
.
नवरा गेल्या तीन दिवसांपासुन उपाशी आहे
अश्विनी मॅडम: बोला मुलांनो, गंगा नदीचा उगम
चिंचवड येथे आहे.

विद्यार्थी: पण मॅडम, गंगा नदीचा उगम तर
चिंचवड येथे नाही. 

प्राचार्य: अश्विनी मॅडम, हे आपण मुलांना काय
शिकवत आहात? गंगा नदी चिंचवड वरून
नाही तर गंगोत्रीतून निघते.

अश्विनी मॅडम: प्राचार्य महोदय, गंगा नदी
चिंचवड वरूनच निघते आणि जोपर्यंत माझा
सात महिन्यांचा पगार मला मिळत नाही
तोपर्यंत चिंचवड वरूनच निघत राहणार !!!
आजचा विचार:-

दररोज एंजॉय करण्याचा ग्राफ  वाढवा...

म्हणजे एंजियोग्राफी करायची गरजच नाही पडणार ..
आई : उठ बेटा तूझी शाळेची वेळ झालीय ...
लक्ष्मण ( झोपेतच ) : माझे मन नाहीये शाळेत जायचे ...

आई : मला तू अशी दोन तरी कारणे सांग की ज्यामुळे तुला शाळेत जायचे मन नाही होत आहे ...

लक्ष्मण : एक तर कोणाही मुलांना मी आवडत नाही आणि दुसरं कुठल्याही मास्तरांना मी आवडत नाही ...

आई : ही काही कारणं नाही झाली शाळेला बुट्टी मारायला , चल उठ , शाळेत तर जावेच लागेल तूला ...

लक्ष्मण : बरं आई तू मला कोणतीही दोन कारणे सांग की मी शाळेत का जायला हवं ?...

आई : एक तर तू 45 वर्षांचा झाला आहेस तुला तूझी जबाबदारीची जाणीव असायला हवी..
आणि...
 दुसरे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस .....
शेजारीण : तुमचा 'बंडू' खूप वाईट शिव्या देतो


बंडूची आई :असू द्या हो? अजून तो 'लहान' आहे मोठा झाला की, देईल चांगल्या..
राम्या : परवा दिवशि माझी बायको हिरीत पडली ....,,,
लय लागल बग लय ओरडत होति ,,,..लय दुकत होत वाटत ,..,

शाम्या : मग आता कशि हायर ति ...,,,,,,

राम्या : आता बरि हाय वाटत काल पासन हिरीतुन आवाजच आला नाय.
आज परत एकदा नकळत
मुंगी तळ्यात पडली
स्वतःला वाचविण्यासाठी
झाडाचं पान आणि कबुतराची
वाट पाहू लागली

मीच का सतत हिला वाचवावे
हा कबुतराचा अहंकार आड आला
झाडावरच बसून
असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

कबुतराने मदत करावी म्हणून
मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला नीशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी नीशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला.

कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपनाने गेले. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच .....
पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.

अहंकार नाशाकडे नेतो तर
सेवा ही आनंदी जिवनाचे सार्थक ठरते,
गुरूजी : हाॅस्पिटल म्हणजे काय सांग...!
:
:
:
:
:
:
:
:
:
:
विद्यार्थी : पृथ्वी आणि स्वर्गामधला टोलनाका आहे...!
पुण्यात कित्येकदा इतकी चांगली माणस भेटतात कि विचारावस वाटत ....






तुम्ही मुळचे कुठले.
पुढच्या पिढीतली आई आपल्या तरुण मुलाला रागावताना म्हणेल,

"गधड्या, अरे तुझं सगळं व्यवस्थित करण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ चार-चार तास व्हॉट्सअप बंद ठेवलंय मी… कितीतरी लाईक करायचे राहून गेले… ग्रुपवर असूनही नसल्यासारखं आयुष्य जगले… दिवस-दिवस फेसबुक न बघण्याच्या खस्ता खाल्ल्या… पण तुला आहे का काही त्याचं?"
आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली....''
.
.
आता मी कोणा दुसऱ्याची आहे '', हे सांगून रडली....
.
.
पहीले खूप बोलायची...''
नाही जगू शकत मी तुझ्याविना ''आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली....
.
.
.
कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...???
आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन रडली....! आज तिचा फोन आला.....
...
.
..
.
.
.
.शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ...
.
.
.
स्वतःला सावरून ती म्हणाली -" अरे माझे लग्न ठरले
"....
.
.
ती सावरली ,
पण तो ढासळला ,
आणि मग दोघांच्या असावांपुढे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ....
.
.
.
.
.
शब्द सर्व हवेत विरले.
ती म्हणाली " माफ करशील ना मला "...
.
.
.
तो म्हणाला
" माफी कसली मागतेसअपराध्यासारखी कर्तव्यपूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू ......"
.
.
.
या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी होशील नक्की माझी ".
..
.
.
ऐकून ती म्हणाली "आठवणीतआणि हृदयाच्या कोपर्यात असशील नेहमी".
.
.
.
.
.
धीर धरून त्याने फोन ठेवला"
कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला
".
.
.
.
आणि म्हणाला






दुसरी शोधली पाहिजे..
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.

तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'

     तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.

माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..
" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, 
पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात."

तात्पर्य :-
      लोक सन्मान तुमचा नाही तर,  तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.

!! कडू आहे पण सत्य आहे !!
कधी कधी वाटतं हे नाव , पैसा , प्रसिद्धी सगळं सोडून संन्यास घ्यावा...
:
:
:
:
मग वाटतं आधी हे सगळं मिळू तर दे ..
गाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, तर गाढव खुंटी उखडून खुंटीसकट पळून जाऊ शकतं.

असे होऊ नये म्हणून फार पुर्वी शहाणी माणसे गाढवांना जोडीजोडीने बांधत. म्हणजे त्यांना एकमेकांशी बांधत. गाढवं जागची हलत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात.

असे म्हणतात की या वरूनच आपल्या पुर्वजांना लग्नाची कल्पना सुचली..

बिछडा प्यार...

त्याचं आणि तिचं लग्नं होणार होतं. खूप प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर पण तिच्या घरचे आड आले. त्याच्या घरी जाऊन लग्नाची प्राथमिक बोलणी वगैरे करायची नाटकं केली तिच्या वडिलांनी आणि थोडा काळ जाऊ दिला. मग एके दिवशी खानदान की इज्जत, नहीं तो मैं मर जाऊंगा वगैरे ब्लॅकमेल करून तिचं लग्नं लावून दिलं दुस-याच मुलाशी. त्यानंतर ते जवळपास वीसेक वर्ष भेटलेच नव्हते एकमेकाला.

आणि आज इतक्या वर्षांनी ते रस्त्यात भेटले. जुन्या जखमा परत चिघळल्या. 'घरी येतोस? इथेच रहाते मी पुढच्या चौकात'. दोघेजण तिच्या घरी गेले. दोघांनी खूप गप्पा मारल्या. शेवटी निघायची वेळ आली. 'थांब रे, जेऊनच जा आता'. तिनी त्याला आग्रहाने वाढलं अगदी. परत भेटू असं म्हणत त्यांनी निरोप घेतला एकमेकांचा. जिना उतरता उतरता तो मनाशी म्हणाला,

'थँक गॉड, हिच्याशी लग्नं नाही झालं, काय  बेकार करते ही स्वयंपाक, हॉरीबल'.😝
आसे चालु आहे सध्या


डोनाल्ड ट्रम्प ला व्हाइट हाऊस पेंट करायचे होत.. त्याने निविदा मागवल्या...
चीन च्या कारागिराने 3 कोटि सांगितले,
यूरोप च्या कारागिराने 7 कोटी  सांगितले आणी भारताच्या करागिराने 10 कोटी सांगितले...
त्यावर ट्रम्प ने चीनच्या माणसाला विचारले तू 3 कोटी का मागितले...तो म्हणाला 1कोटींचा कलर,1 कोटींचा कामगार खर्च,आणी 1 कोटी नफा....
मग यूरोप च्याची वेळ तो म्हणाला 3 कोटी चा कलर,2 कोटी कामगार खर्च,आणी 2 कोटी प्रॉफ़िट...
आणी मग भारतीय व्यक्तीला विचारले तर तो म्हणाला 4 कोटी तुम्हाला,3 कोटी मला, आणी 3 कोटी त्या चीनच्या व्यक्ति ला जो कलर करणार आहे....

भारतीय व्यक्तीला ते कॉन्ट्रैक्ट मिळाले ना!!!!
पुणे -: "काय घ्याल आपण??

बासुंदी आणू की खीर?"


कोल्हापूरकर - "घरात एकच वाटी आहे का?
एका क्लार्कने आपल्या बाॅसला दम दिला " तुमचे पुढचे दात पाडतोच "
सगळ्यानी त्याला वेड्यात काढले.
तो अधिकारी रिटायर होताना ह्या कारकूनाने त्याच्या सर्व्हिसबुक मद्धे नोंद केली " ओळखीची शाररिक खूण -- पुढचे दोन दात पडले आहेत ".

त्या अधिका-याला पुढचे दोन दात काढावे लागले. मगच त्याची पेन्शन सुरू झाली.
माझा एक मित्र आहे
तो
इतके दर्द भरे
स्टेटस् टाकतो की,
.
.
.
.
.
.
कधी-कधी मी पण
त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो!!!
बायकोनें नवऱ्याला विचारले.."अहो आजकाल जिकडेतिकडे लोक जीएसटी ची चर्चा करत आहेत, हे जीएसटी म्हणजे काय ?"                       

नवरा : अगं जीएसटी म्हणजे काय हे झटकन समजणे थोडे अवघडच आहे. पण तरीपण तुला मी माझा अनुभव सांगून थोडक्यात समजावतो.

जेव्हा माझे लग्न झाले नव्हते तेव्हा घरी यायला उशीर झाला तर प्रथम अंगणात बहिणीला मग दारावर आईला अन् नंतर घरात  वडिलांना सर्व उशीर होण्याचे कारण समजावे लागे पण आता लग्न झाल्यावर मला तिघांना समजावं लागत नाही तुला समजवून सांगितले की पूरे !!!

तो आणि ती

तो आणि ती दोघेही मनोरुग्ण …. एकाच इस्पितळात ……

इस्पितळात ज्या दिवसा पासून भेटले होते तेव्हा पासूनच

त्यांच्यात एक बंध निर्माण झाला होता…. सार्‍यांना त्याचे अप्रूप वाटे…

सारा दिवस ते सोबतच असायचे… एकमेकांशी कधीचं बोलत नसत…

नि:शब्द….. जणू त्यांचे मन एकचं होते म्हणून त्यांना शब्दांची गरज नसावी….

असेच रोज सारखे आजही ते इस्पितळाच्या आवारात मूकपणे फिरत होते…

चालता चालता ते स्विमींग पुल पाशी आले… काय झाले कुणास ठाऊक …

त्याने तिचा हात झटकला आणि पळत जाऊन पाण्यात उडी मारली…

ना तो बाहेर येण्यासाठी धडपडला….. ना तरंगण्यासाठी त्याने हात पाय मारले

त्या पाण्याच्या तळाशी जाऊन स्थिरावला …. आत्महत्या करत असावा तो बहुतेक…

हे पाहून क्षणातच तीने सुध्दा पाण्यात उडी मारली….

त्याची मान पकडून त्याला लागलीच बाहेर घेवून आली… त्याचा जीव वाचवला…

दूसर्‍या दिवशी डॉक्टर आले…हे सगळे पाहून…ऐकून….

त्यांनी तिला त्वरीत इस्पितळातून सुटी देण्याचे फर्मावले….

कारण आता ती बरी झाली होती…. तिचे मन स्थिर झाले होते.  ती विचार करु शकत होती…

डॉक्टरांनी तिला बोलावले आणि म्हणाले

"तुझ्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे”

तिच्या चेहर्‍यावर तसेचं शांत भाव होते… डॉक्टर पुढे म्हणाले

"चांगली बातमी ही की तुला Discharge देण्यात येत आहे कारण

काल तू जे केलेस त्यावरुन तू आता जबाबदार झाली आहेस आणि

तू आपल्या प्रेमाच्या व्यक्तींची काळजी घेवू शकतेस. तुझी कालची कृती

वेड्या माणसाची असूच शकत नाही. म्हणून तू आता बाहेरच्या जगात जाण्यासाठी मुक्त आहेस…

वाईट बातमी अशी की…. तो काल तू ज्याला वाचवलेस… तो मेला

त्याने रात्री काल रात्री स्वतःला पंख्याला टांगून घेतले….."

हे सांगताना डॉक्टरांचे डोळे पाणावले ….. त्यांनी तिच्या कडे पाहीले…

ती अजूनही तशीच शांत होती……मग म्हणाली

" त्याने स्वतःला नाही टांगून घेतले…

तो ओला झाला होता ना म्हणून लवकर वाळावा यासाठी मीच त्याला पंख्याला टांगले………
.
.
.
मी घरी केव्हा जाऊ शकते ???? 

आज सगळ्याच आल्यात ना

काही बायका रोज संध्याकाळी पार्कात बसून गप्पा मारायच्या आणि खूप हसायच्या.
कुलकर्णी काका नेहमी पार्कात फे-या मारायला जात असत, या बायकांची मैत्री, त्यातला आनंद पाहुन कुलकर्णी काकांनाही फार छान वाटे.
पण, एक दिवस त्या सगळ्या बायका शांत बसल्या होत्या. सगळ्यांचे चेहरे पडले होते. कुलकर्णी काकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांना राहवेना. काका त्या बायकापाशी गेले आणि म्हणाले, " रोज तुम्ही इतक्या छान हसत असता. आज काही घडलयं का?"
त्यातली एक जण म्हणाली, "
.

.
.

..

.
.

.

आज सगळ्याच आल्यात ना. "

घराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा...

मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने फक्त म्हैसकर कुटुंबच सुन्न झालेले नाही. ज्या कुणाला एक मुलगा किंवा एक मुलगी आहे असे प्रत्येक घर या घटनेने हादरले आहे. मलाही एकच मुलगी आहे, कालपासून काळजीने झोप उडालीय, एकुलत्या एक मुलाशी वागायचे कसे हेच कळेनासे झाले आहे कालपासून, जर एवढ्या आनंदी कुटुंबात हे असे घडू शकते तर आम्हा मध्यमवर्गीयांचे काय?, आम्ही दोघे नोकरी करतो, दिवसभर मुलगा एकटा आणि रात्री घरात गेलो की आमचेच प्रश्न संपत नाहीत, तर त्याचे प्रश्न आणि विषय कसे हाताळणार, काय करावे कळतच नाहीय... अशा एक ना दोन शेकडो प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहेत.

घराघरात असे अस्वस्थ मन्मथ आहेत आणि त्यांच्या काळजीने त्याच्याही पेक्षा अस्वस्थ झालेले आईबाप. कुठेही जा, ज्यांचा म्हैसकर परिवाराशी संबंध नाही, त्यांची ओळखही नाही पण वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि आम्हाला आमचा मुलगा समोर दिसतोय हीच चर्चा सर्वत्र आहे.

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘मस्त मजेचे आईबाबा’ या नावाने मुलाखत घेण्याचा कार्यक्रम मी करायचो. मुलांना कसे वाढवायचे, त्यांच्यात भावनिक गुंतवणूक कशी करायची हा त्याचा विषय असायचा. मध्यंतरात पालकांनी प्रश्न विचारा असे आवाहन डॉ. नाडकर्णी करायचे. त्यावेळी आम्ही आमच्या मुलीसोबत तिच्या मासिक पाळीविषयी कसे बोलायचे, किंवा मुलगा वयात येतोय, त्याला सगळ्या गोष्टी कशा समजावून सांगायच्या, असे शेकडो प्रश्न त्यावेळी यायचे. एवढा नाजूक विषय, पण आईबापाशी मुलं मुली तो बोलू शकत नाहीत. यातून एक सूत्र समोर आले, की आम्ही आमच्या मुलांचे आईबाप आहोत पण मित्र होऊ शकलेलो नाही. मित्र होण्यासाठी त्याच्याशी एक सहज संवाद व्हायला हवा तोच कधी आमचा झालेला नाही.

आठवून पाहा, तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी आली की तुम्ही त्यांना काय विचारता... डबा खाल्ला का? सगळा का संपवला नाही? रोज कशी तुझ्या आवडीची भाजी मिळणार? होमवर्क दिले का? अभ्यास कसा चालूय? सर काय म्हणाले? आता जायचे असेल हुंदडायला? या आणि अशा तत्सम मोजक्या प्रश्नाशिवाय आम्ही त्याच्याशी बोलतच नाही कधी...! एखादा सिनेमा आवडला का? त्याची स्टोरी काय होती? त्यात तुला काय आवडले? मला आज एक छान पुस्तक वाचायला मिळाले. तूही वाच, तुला ते नक्की आवडेल. चल आज नाटकाला जाऊ, चांगलं नाटक आहे. आजचा पेपर वाचलास का? अमूक लेख खूप छान आहे. नक्की वाच... हे असे संवाद किती घरांमध्ये घडतात? किती पालक अशा अवांतर गोष्टी महत्त्वाच्या मानतात?



आम्ही आमच्या अपेक्षांचे ओझे आमच्या मुलांच्या पाठीवर लादून मोकळे होतो. दप्तरांच्या ओझ्यापेक्षा आई बापाच्या अपेक्षांचे न दिसणारे ओझे मुलांना अनेकदा असह्य होते. ते बोलून दाखवत नाहीत पण आतल्या आत घुसमटायला लागतात. आम्ही मात्र; त्याला खूप अभ्यास आहे त्यामुळे तो असा शांत शांत झालाय... असा त्या घुसमटण्याचा आमच्या सोयीचा अर्थ काढून मोकळे होतो. आम्हाला डॉक्टर, इंजिनियर व्हायचे होते, आम्हाला मोठा अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीने आम्ही होऊ शकलो नाही म्हणून आमच्या मुलाने आमचे स्वप्न पूर्ण करावे असा दुराग्रही अट्टाहास आम्ही धरतो.

त्यातून मग माझ्या मुलाने किंवा मुलीने काय व्हावे हे मी माझ्या मित्रांशी बोलतो आणि आपले आई बाबा कसे आहेत किंवा कसे असायला हवेत या विषयीची मतं आमची मुलं त्यांच्या मित्रांना सांगतात. पण आम्ही आमच्या मुलांशी किंवा मुलं आई बाबांशी या अशा विषयांवर एकमेकांशी कधी बोलतच नाहीत.

औरंगाबादचे एक दाम्पत्य. डॉक्टर हार्ट स्पेशालिस्ट पत्नी स्त्री रोगतज्ज्ञ. त्यांचे स्वत:चे मोठे हॉस्पिटल. एकुलता एक मुलगा. पण त्याला डॉक्टरकीत रस नाही. त्याला इंग्रजी विषय घेऊन साहित्यिक व्हायचे होते. घरात काही काळ भूकंपाची स्थिती. पण ते दोघे समंजस होते. मुलाला जे शिकायचे ते शिक अशी भूमिका त्यांनी घेतली. आज तो मुलगा पुण्यात इंग्रजी साहित्यात पीएच.डी. करतोय. किती मुलांच्या वाट्याला हे येते?

मुंबईचे एक वडील. कॉर्पोरेट आॅफिसात नोकरी करणारे. त्यांचा मुलगा १८ वर्षांचा झाला त्या रात्री त्यांनी त्याला एक कविता लिहून भेट दिली. आता तू स्वतंत्र आहेस, काहीही करू शकतोस पण हे करताना आमच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करता आल्या तर बघ आणि रात्री १२ वाजता एक केक आणि ती कविता त्यांनी त्या मुलाला भेट दिली. नात्यांमधला हा हळुवारपणा आज किती पालकांच्या वागण्यात दिसतो?

पालक आणि मुलांमधला संवादच दिवसेंदिवस कमी होत जातोय. दोघांनी नोकरी केल्याशिवाय घर चालवणे आजच्या काळात कठीण होऊन बसले आहे. त्यात सरकारी असो की खासगी, नोकरीतले ताणतणाव आई बाप दोघेही घरी घेऊन येतात. त्यातून होणारी चिडचिड, पियर प्रेशरमुळे मुलांमध्ये वाढत जाणारी मानसिक दरी आणि या सगळ्यात त्याच्याशी बोलणारेच कोणी नसल्याने त्याची होणारी घुसमट. मग अशी मुलं मोबाईल, फेसबुच्या नादी लागतात. सोशल मीडियातून मिळणारे लाईक्स आणि हिटस् त्यांना त्यांची ओळख वाटू लागते. मग ते त्यांच्या मनातलं फेसबुकला सांगायला लागतात... अगदी मी आज आत्महत्या करणार आहे, जीवन संपवणार आहे हे देखील फेसबुकच्या निर्जीव वॉलवर लिहून जीवन संपवणारी मुलं आजूबाजूला अनेक आहेत...! हे थांबायला हवे.

मुलांना पतंग उडवण्यासाठी गच्चीवर घेऊन जाणारे आईबाबा बारकाईने पाहिले तर पतंग पालकांच्या हाती असतो आणि मांजाची चक्री मुलांच्या हातात असते. पतंग उंच गेला की काही वेळ तो आम्ही मुलाच्या हाती देतो आणि पुन्हा तो आमच्या हातात घेतो आणि मुलाला मांजा गोळा करायला सांगतो. वास्तविक पतंगाची दोरी त्याच्या हाती हवी आणि मांजाची चक्री पालकांच्या हाती. किती ढिल द्यायची हे पालकांनी ठरवावे पण आम्ही उलटेच करतो... साधे साधे छंदही त्याला जोपासू देत नाही. छंदासारखे खळाळते झरे देखील आम्ही बांध घालून थोपवतो. अभ्यास, मार्क आणि आणखी मार्क यांच्या जीवघेण्या स्पर्धेत त्याला झोकून देतो. ९० टक्के मार्क मिळाल्यानंतरही आम्ही आणखी थोडे मिळायला हवे होते असे म्हणतो. या स्पर्धेच्याही पलीकडे एक सुंदर जग आहे, संवादाचे पूल आहेत, नात्यांचे घट्ट पदर आहेत हेच मुळी विसरून जाणाऱ्या पालकांना मन्मथच्या जाण्याने हादरवून टाकले आहे. काही तरी चुकते आहे हे कळतेय, पण वळायचे कसे याचा शोध मन्मथच्या जाण्याने सुरू झालाय हे मात्र खरे...

- अतुल कुलकर्णी

हरवलेला आत्मविश्वास

एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. Creditors (धनको) त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते.

असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.

व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.

बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून. ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले.

गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.
पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो.

लेखक:
कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत ?

जोशी काका :
नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते त्या ऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.

लेखक : का ?

जोशी काका : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.
बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती


"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

 तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..



पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

 कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??


तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

 पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई रोज रानात दिवस भर कष्ट करून पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.


आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो


आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,


ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔



हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....