अलाण्याच्या ब्रशावरती

अलाण्याच्या ब्रशावरती फलाण्याचे दंतमंजन
अलबत्याचे अंडरवेअर गलबत्याचे थोबाडरंजन
लिलीसारख्या त्वचेसाठी लिलीब्रॅंड साबणजेली
चरबी हटवा, वजन घटवा हजारोंनी खात्री केली
केंटुकीच्या कोंबडीवरती फेंटुकीचे मोहरीचाटण
डबलडेकर सॅंडविचमध्ये बबलछाप मटणघाटण
पिझ्झाहटचा पिझ्झा खा मेपलज्यूस ऍपलपाय
अमूक डोनट तमूक पीनट अजून खाल्ले नाहीत काय?
अ ब क ड ई फ ग ... तयार घरे सात टाईप्स
रेडिमेड खिडक्या दारे भिंती छपरे गटरपाईप्स
होटेल मोटेल खेटर मोटर देशभर करा प्रवास
एकच रूप एकच रंग एकच रुचि एकच वास
आकाशवाणी घटवत असते दूरदर्शन पटवत असते
जहांबाज जाहिरातबाजी गिऱ्हाईकांना गटवत असते
अजब देश! गजब तऱ्हा! व्यक्तिवरती सक्तीनाही
सहस्रशीर्ष पुरुषा!! तुझी गणवेषातून मुक्ती नाही!


कवी - वसंत बापट

शारदेचे आमंत्रण

ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातुन फुटला असेल,
ज्यांचा शब्द राघवाच्या बाणासारखा सुटला असेल,
ज्यांच्या जित्या फुफ्फ्सांना छिद्र नसेल अवसानघातकी,
जन्मोजन्म ज्यांचा आत्मा राखेमधुन उठला असेल.

ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहखंडाप्रमाणे,
ज्यांच्या जिवात पोलादाचे उभे आडवे ताणेबाणे,
ज्यांच्या धीम्या धीरोदात्त पावलांच्या तालावरती,
धरतीला स्फुरत असेल शाश्वताचे नवे गाणे.

सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नसेल,
त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी देह विकला नसेल,
मुर्तिमंत मृत्युचीही आमने-सामने भेट होता,
ज्यांच्या थडथड नाडीमधला एक ठोका चुकला नसेल.

ज्यांच्या अस्थी वज्र-बीजे.....नसांत उकळणारे रक्त,
शारदेचे आमंत्रण आज, त्यांनाच आहे फक्त...


कवी - वसंत बापट

विजयाचे रहस्य

उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्यावर समाजवादी व कॉंग्रेसचे उमेदवार असलेले दोन राजकारणी भेटतात व समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचे रहस्य काय असावे यावर चर्चा करित असतात.

कॉंग्रेसचा उमेदवार : मी माझ्या पक्षाचा विजय होईल याची कायम काळजी घेत होतो. समजा मी टॅक्सीने प्रवास केला तर त्या टॅक्सी ड्रायव्हरला १०० रुपयाची टीप देउन कॉंग्रेसला मतदान करायला सांगायचो.

समाजवादी पक्षाचा उमेदवार : मी पण तसच करायचॊ. मी टॅक्सी ड्रायव्हरला मीटर प्रमाणेच भाडॆ द्यायचो व कॉंग्रसला मतदान करायला सांगायचो.

छंद घोटाळती ओठी

छंद घोटाळती ओठी
नाचणभिंगरी
त्याच्या साध्या ओळीसुध्दा
झपाटती भारी
डोक्यावर हिंदळता
देह झाला गाणी
एका कवीच्या डोळ्यांची
डोळ्यांना माळणी
असे कसे डोळे त्याचे
मीही नवेपणी
मेंदीओले हात दिले
त्याला खुळ्यावाणी
तेव्हापासूनचे मन
असेच छांदिष्ट
सये तुला सांगू नये
अशी एक गोष्ट:
त्याच्या ओळी माझ्या ओठी
रुंजी घालू आल्या
रानपाखरासारश्या
तळ्यात बुडाल्या.


कवी - ना. धों. महानोर

पक्षांचे थवे

विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी

पाण्यात एक सावली, हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून
बहकते रान

झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट
बावरा पक्षी


कवी - ना. धों. महानोर

झकास शाळा !

स्थळ : शाळा

वर्ग : एकदम गप्प

कारण : इन्स्पेक्शन

अधिकारी : बोल अफ़ज़लखानाचा खून कोनी केला ?

बन्डु : माफ़ करा सर, मला काही माहित नाही.मी काल शाळेतच आलो नव्हतो . मला तर हा अफ़ज़लखान कोन आहे हे सुद्धा माहित नाही .

अधिकारी : काय सर ! हे काय चाल्ले आहे. मुल्लान्ना काहिच माहित नाहिये.

सर : नाही साहेब, बन्डु तसा खोड्कर आहे पण कोनाचा खून काही तो करणार्‍या मधला नाहीये.
अधिकारी : काय ! मुख्याध्यापकाना बोलवा.

अधिकारी : महाशय ! आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना काहीच माहित नाही.

मुख्याध्यापक : माझ्या शाळेतील विद्यार्थी असे कधी करणारच नाही.मी ह्याची खात्री देतो.

अधिकारी : तुम्ही खरोखरच मुख्याध्यापक आहात काय ? सर तुम्ही रोज विद्यार्थ्यान्ची हजेरी घेता काय ? काय रे बन्डु! तू रोज शाळेत येतोस काय?

बन्डु : माफ़ करा सर, मी शाळेच्या बाहेर केळी विकतो. ह्या वर्गातला एक विद्यार्थी आज भारत- औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे जबरदस्तीने पाठविले आहे.

सर : माफ़ करा सर, मी समोर पान टपरी चालवितो. ह्या वर्गाचे सर आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेले आहेत. त्यान्नीच मला इथे पाठविले आहे.

मुख्याध्यापक : माफ़ करा सर, मी मुख्यध्यापकान्चा भाऊ आहे. तो आज भारत औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे पाठविले आहे.

अधिकारी(हताश होवुन) : अरे बापरे ! मी आलोय तर ही अवस्था आहे.खरे साहेब आले असतेतर काय झाले असते देव जाणे??

गरीब मुली

पप्याचे बाबा FTV बघत असतात..
अचानक पप्या येतो
तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात...
"अरे गरीब मुली आहेत या....कपडे घेण्यासाठी पैसे नसतात यांच्याकडे... "
तर पप्या म्हणतो...
"यांच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा..."