आपलं माणूस

आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

दिसत नाही फुल
तरी वास येतो!
तुम्ही म्हणाल भास होतो!
भास नव्हे:अगदी खरा
गालांवर श्वास येतो!

मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येवून बसतं;
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

किलबिल करीत जाग्या होतात
त्याच्या सगळ्या हालचाली,
कधी शब्द तर कधी
शब्दावाचून त्याची बोली
धूपासारखी भरून टाकते सगळी खोली!

ज्याचं त्याला कळत असतं
त्याच्याशिवाय,तिच्याशिवाय
जीवाला इतकं बिलगून कुणीच नसतं!
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

आपण आपलं काहीवाही करत असतो,
सगळ्यांसाठी हे करीत ते करीत
वेळ आपला भरीत असतो!
जरा थांबा
आठवून बघा:

एकटेच आपण आपल्याशी हळूच हसतो,
खरतर आजूबाजू कुणीच नसतो!

हसता हसता कोण आपले डोळे पुसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

संध्याकाळच्या गूढ सावल्या,
रात्र होते खिन्न काळी
पाखरं गाणी मिटून घेतात,मुकी होते रानजाळी!

घराच्या पायरीवर कोण तेव्हा एकट बसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

खिडकीतून दिसणारा
निळा तुकडा कुणाचा?
फांदिमागे चंद्र आहे
हसरा मुखडा कुणाचा?

एकांतात उगवणारा
एक तर कुणाचा?
निरोप घेवून येणारा
ओला वारा कुणाचा?

डोळे मिटून घेतल्यावर आपल्याला कोण दिसत?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!

तरीसुद्धा

समूहात बसून हि गाणी
ऐकावीशी वाटली तर
त्यात काय चूक आहे?
शब्दांचं नादरूप
असं मिळून भोगणं ही
प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे!

तरीसुद्धा डोळे मिटून
मनोमय तालावर
आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे;
एकट बसून एकट्याने
प्रत्येक गाणं
आपल्याच मनात वाचता आलं पाहिजे!

माझे तुझे

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तुझे होती भास

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी !

तुझी माझी पटे खुण
तुझी  माझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन, तुझे मन 

कोल्ड ड्रिंक

एक म्हतारी बाई सिनेमा बघायला गेली, सिनेमा बघताना ती दर १०-१० मिनिटांनी
सारखी सारखी कोल्ड ड्रिंक चा कँन तोंडाला लावून खाली ठेवत असते.
तिच्या शेजारीच आपला गण्या बसलेला असतो तो तीच हे स्लो मोशन बघून वैतागलेला असतो.
तेवढ्यात गण्या तिचा तो कोल्ड ड्रिंक चा कँन घेतो आणि घटा घटा पियुन टाकतो

गण्या (भलत्याच जोश्यात) : हे अस प्यायचं असत कोल्ड ड्रिंक समजल का म्हातारे ?
तेवढ्यात ती म्हातारी बाई बोलते,"अस्स? पण तुला कोणी सांगितलं मी कोल्ड ड्रिंक पीत होते?
मी तर माझ पान खावून त्यात थुंकत होते".

पहिलं त्या कुत्र्याला शोधा

एकदा एक बाई पोलिस स्टेशन मध्ये कम्प्लेट करायला जाते.

बाई : अहो साहेब माझा नवरा हरवला आहे हो..
(एवढ बोलून बाई रडायला लागते)

पोलिस : त्यांची उंची काय आहे ?

बाई : नाही हो माहिती नाही कधी मोजली नाही.

पोलिस : बर.. काटकुळे आहेत कि जाडे आहेत ?

बाई : जाडे ? काटकुळे ? नाही हो ते सुद्धा माहिती नाही ...

पोलिस : बर डोळ्यांचा कलर काय आहे ?

बाई : नाही हो खरच नाही माहिती ..

पोलिस : बर डोक्याच्या केसांचा कलर ?

बाई : कलर नेहेमी बदलत असतो हो आत्ताचा नाही माहिती ..

पोलिस : त्यांनी कोणती कपडे घातली आहेत हे ?

बाई : काही माहिती नाही हो... पण कृपा करून शोधा त्यांना

पोलिस : अहो बाई बर मला सांगा त्यांच्या बरोबर अजून कोणी होत का ?

बाई : हो आहे ना माझा कुत्रा आहे त्यांच्या सोबत. कलर पांढरा त्यावर काळे
ठिपके आहेत. डोळे अगदी काळे काळे आहेत. डोळ्यांच्या माध्येभागी कि
नाही एक लाल असा ठिपका आहे हो, गळ्यात चोकलेटी पट्टा आह.
आणि एक कि नाही तो भुंकत नाही हो कोणावर.
त्याची उंची कि नाही जेमतेम उभी मोजली तर १ फुट आणि अडवा ३फुट आहे.
त्याला नॉन वेज खूप आवडत, तस आम्ही सोबतच जेवत असतो हो.
एवढ बोलून ती बाई अजून रडायला लागते.

पोलिस (डोळ्यात आसव आणून ) : हवालदार तोंडे पहिलं त्या कुत्र्याला शोधा

.टारझची चड्डी

एकदा टारझन जंगलातून
जाताना त्याला मेलेला वाघ
दिसतो....
टारझन जाम खुश होतो...
का?
..
...
...
...
...
...
...
..
...
...
...
...
...
...
...
आयला नवीन चड्डी..!!
४ सरदारांनी मिळून एकदा एक पेट्रोल पंप चालवायला घेतला.
पण एकही ग्राहक फिरकला नाही. का बरे?
.
.
.
... ... .
.
.
.
.
.
कारण पेट्रोलपंप १ल्या मजल्यावर होता!
.
चला, एक अजून...
.
मग त्या चारही जणांनी त्याच मजल्यावर एक रेस्टॉरंट चालवायला घेतलं...
एकही ग्राहक नाही..! का, बरे?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पेट्रोलपंपाची पाटीच हटवली नाही ना!
.
चला, अजून एक...
.
मग त्या चारही जणांनी एक टॅक्सी विकत घेतली. पण एकही प्रवासी मिळाला नाही..!
.
.
का बरे..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण २ सरदार पुढे व २ सरदार मागे बसून प्रवासी मिळतोय का हुडकत होते...
.
चला, अजून एक...
.
टॅक्सीमध्ये काहीतरी बिघाड झाला. चौघांनी खूप धक्का मारला. पण टॅक्सी काही जागची हालेना! असे का बरे?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण २ सरदार पुढून मागे व २ सरदार मागून पुढे धक्का मारत होते...