आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
दिसत नाही फुल
तरी वास येतो!
तुम्ही म्हणाल भास होतो!
भास नव्हे:अगदी खरा
गालांवर श्वास येतो!
मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येवून बसतं;
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
किलबिल करीत जाग्या होतात
त्याच्या सगळ्या हालचाली,
कधी शब्द तर कधी
शब्दावाचून त्याची बोली
धूपासारखी भरून टाकते सगळी खोली!
ज्याचं त्याला कळत असतं
त्याच्याशिवाय,तिच्याशिवाय
जीवाला इतकं बिलगून कुणीच नसतं!
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
आपण आपलं काहीवाही करत असतो,
सगळ्यांसाठी हे करीत ते करीत
वेळ आपला भरीत असतो!
जरा थांबा
आठवून बघा:
एकटेच आपण आपल्याशी हळूच हसतो,
खरतर आजूबाजू कुणीच नसतो!
हसता हसता कोण आपले डोळे पुसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
संध्याकाळच्या गूढ सावल्या,
रात्र होते खिन्न काळी
पाखरं गाणी मिटून घेतात,मुकी होते रानजाळी!
घराच्या पायरीवर कोण तेव्हा एकट बसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
खिडकीतून दिसणारा
निळा तुकडा कुणाचा?
फांदिमागे चंद्र आहे
हसरा मुखडा कुणाचा?
एकांतात उगवणारा
एक तर कुणाचा?
निरोप घेवून येणारा
ओला वारा कुणाचा?
डोळे मिटून घेतल्यावर आपल्याला कोण दिसत?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
आपल्या अगदी जवळ असतं!
दिसत नाही फुल
तरी वास येतो!
तुम्ही म्हणाल भास होतो!
भास नव्हे:अगदी खरा
गालांवर श्वास येतो!
मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येवून बसतं;
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
किलबिल करीत जाग्या होतात
त्याच्या सगळ्या हालचाली,
कधी शब्द तर कधी
शब्दावाचून त्याची बोली
धूपासारखी भरून टाकते सगळी खोली!
ज्याचं त्याला कळत असतं
त्याच्याशिवाय,तिच्याशिवाय
जीवाला इतकं बिलगून कुणीच नसतं!
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
आपण आपलं काहीवाही करत असतो,
सगळ्यांसाठी हे करीत ते करीत
वेळ आपला भरीत असतो!
जरा थांबा
आठवून बघा:
एकटेच आपण आपल्याशी हळूच हसतो,
खरतर आजूबाजू कुणीच नसतो!
हसता हसता कोण आपले डोळे पुसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
संध्याकाळच्या गूढ सावल्या,
रात्र होते खिन्न काळी
पाखरं गाणी मिटून घेतात,मुकी होते रानजाळी!
घराच्या पायरीवर कोण तेव्हा एकट बसतं?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
खिडकीतून दिसणारा
निळा तुकडा कुणाचा?
फांदिमागे चंद्र आहे
हसरा मुखडा कुणाचा?
एकांतात उगवणारा
एक तर कुणाचा?
निरोप घेवून येणारा
ओला वारा कुणाचा?
डोळे मिटून घेतल्यावर आपल्याला कोण दिसत?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळ असतं!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा