दूरध्वनी क्रमांक

मराठीच्या शिक्षकांनी दादूला प्रश्न केला, "कवी यशंवताच्या जन्म-मृत्यूचे इसवी सन सांग."

"माहीत नाहीत सर."

दादू म्हणाला. "माहीत नाही? पुस्तक काढून यशवंताची कविता पाहा. परिचयात त्यांच्या नावापुढे कंसात काय लिहिलय ते वाच!" शिक्षकांनी आज्ञा दिली. दादूनं पुस्तक काढून वाचल, "यापूर्वी कधी वाचलं नव्हतं का हे?" शिक्षकांनी विचारलं. "हे तर माहीत होतं मला," "मग माहीत नाही असं का म्हणालास?" शिक्षक रागावले. "मला वाटलं हे त्यांचे दूरध्वनी क्रमांक असावेत, दादू म्हणाला!!
एक हत्ती सुईच्या भोकातून सारखा ये-जा करत असतो तर त्याला कसं थांबवायचं?
.
.
.
.
.
.
.
काही नाही, फक्त त्याच्या शेपटीची गाठ बांधायची!

माऊ माऊ

एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात
....रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार..."
तर त्या मांजरी काय म्हणतील ??
...विचार करा
...अरे विचार काय करताय?
.. सोप्पय उत्तर: " माऊ माऊ"!!

काय तुझ्या मनात होते…

जाणिले मी आज काय तुझ्या मनात होते,           
काय सत्य दडले त्या क्षणांत होते,           
उगवला सूर्य रोज याचीच वाट पाही ,           
कंटाळून मग तोही अस्ताला जाई,           
           
जाशील दूर तू मी काही बोललो नाही,           
तुझ्याही मनातल्या भावना तेव्हा मनातच राही,           
व्हावे व्यक्त कुणी हे कोडे दोघानाही होते,           
जाणिले मी आज काय तुझ्या मनात होते…           
           
मन गुंतले होते एकमेकांत खात्री कुणालाच नव्हती,           
संवाद होता दोघांत पण त्याची दिशाच वेगळी होती,           
मनातल्या गोष्टींवर मन बरेच ताबा ठेवत होते,           
जाणिले मी आज काय तुझ्या मनात होते…           
           
अजूनही वाटते या नात्याची वेगळी सुरुवात व्हावी ,           
गुलाबी नवी पहाट आपल्या जीवनात यावी ,           
तोडून टाकू आपल्या मनाभोवती जे कुंपण होते,           
जाणिले मी आज काय  तुझ्या  मनांत  होते….           
           
उत्तरे मिळालीत अनेक तरी एक प्रश्न अजूनही आहे ,           
सूर्य उगवतो तो मावलण्यासाठीच  काय जगत आहे,           
न बोललो मी तूच हे सांगायचे होते,           
नाही कळले का तुला काय माझ्या मनात होते,           
काय  सत्य  दडले  त्या  क्षणात  होते……..           
        

कवि - अविनाश

Syllabus जरा जास्तच आहे

Syllabus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllabus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllabus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो????

बाळाचे वडील

बाळांतपणाआधी डॉक्टर गर्भवती महिलेला विचारतात...

डॉक्टर - बाळांतपणाच्या वेळेस बाळाचे वडील तुमच्या जवळ हवे आहेत का ?

गर्भवती - नाही... बिल्कूल नाही...

आधीच माझे पती त्यांच्यावर खूप शंका घेतात...

नव-यावारचे प्रेम

रमबाईंचे नव-यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा नवरा वारला ...
"रमबाई आता नव-याशिवाय काही जगु शकत नाहीत",
असे सर्वजण म्हणु लागले, आणि ते खरंही झाले.


त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं ..!