जाणिले मी आज काय तुझ्या मनात होते,
काय सत्य दडले त्या क्षणांत होते,
उगवला सूर्य रोज याचीच वाट पाही ,
कंटाळून मग तोही अस्ताला जाई,
जाशील दूर तू मी काही बोललो नाही,
तुझ्याही मनातल्या भावना तेव्हा मनातच राही,
व्हावे व्यक्त कुणी हे कोडे दोघानाही होते,
जाणिले मी आज काय तुझ्या मनात होते…
मन गुंतले होते एकमेकांत खात्री कुणालाच नव्हती,
संवाद होता दोघांत पण त्याची दिशाच वेगळी होती,
मनातल्या गोष्टींवर मन बरेच ताबा ठेवत होते,
जाणिले मी आज काय तुझ्या मनात होते…
अजूनही वाटते या नात्याची वेगळी सुरुवात व्हावी ,
गुलाबी नवी पहाट आपल्या जीवनात यावी ,
तोडून टाकू आपल्या मनाभोवती जे कुंपण होते,
जाणिले मी आज काय तुझ्या मनांत होते….
उत्तरे मिळालीत अनेक तरी एक प्रश्न अजूनही आहे ,
सूर्य उगवतो तो मावलण्यासाठीच काय जगत आहे,
न बोललो मी तूच हे सांगायचे होते,
नाही कळले का तुला काय माझ्या मनात होते,
काय सत्य दडले त्या क्षणात होते……..
कवि - अविनाश

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा