एक दुधवाला रस्त्याने त्याच्या गाडीवरुन चाललेला असतो........तर तो अचानक त्याच्याजवळ असलेले सगळे दुध पिऊन टाकतो !!!!!!
का ?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण मागुन एक कार हॉर्न वाजवत असते.......(पी पी पी पी)....
खटारा गाडी
रम्या चम्यासमोर आपल्या अफाट श्रीमंतीचे गोडवे गात असतो.
रम्या : अरे, सकाळीसकाळी मी कार घेऊन बाहेर पडलो, तरी संध्याकाळपर्यंत माझी अर्धी प्रॉपटीर्ही पाहून होत नाही.
चम्या : मग त्यात काय? तशी खटारा गाडी माझ्याकडे पण आहे.

प्रेमाचे राजकारण
सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की,
कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत..
आणि, ती मुलाकडे पाहून हसली की,
त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत..
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की,
" मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत
आणि, लग्नाला एक वर्ष झाल की, मग,
" आदर्श घोटाळl " केल्यासारख वाटत !!!

कुणीतरी असलं पाहिजे…
कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…
मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…
इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू
नकोस”
असं बजावायला…
उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…
घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…
मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…
इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू
नकोस”
असं बजावायला…
उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…
घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला…
एका महानगरात
नौकरी गमावलेला एक तरुण
सिटीबस मधून उतरतो,
तेव्हा त्याच्या लक्षात येते
की त्याचे पाकीट चोराने
लांबवले. तो तरुण बुचकळ्यात पडतो.
कारण
त्याची नौकरी गेलेली असते
आणि खिशात फक्त १५० रुपये
आणि त्याने
त्याच्या आईला लिहून ठेवलेले एक पत्र असते.
ज्यात त्याने लिहिलेले असते
की ,"माझी नौकरी मी गमावून
बसलो आणि तुला आता काही दिवस
पैसे पाठवू शकत नाही."
तीन दिवसापासून ते पत्र त्याच्या खिशात असते. पोस्ट
करू
की नाही ह्या मनस्थितीतच
त्याचे १५० रुपये आणि ते पत्र
चोरी होते.
१५० रुपये काही फार मोठी रक्कम नाही, पण
त्या तरुणासाठी ते १५००
रुपयापेक्षा कमी नव्हते.
काही दिवसांनी त्याच्या आईचे
पत्र त्याला मिळाले. तो तरुण
आपल्या आईचे पत्र वाचून आश्चर्यचकित होतो.
त्याची आई ने पत्रात लिहिले
असते - "बाळ, तु पाठवलेले ५००
रुपयांचे मनीऑर्डर
मला मिळाले. काळजी घे
स्वतःची." तो तरुण जाम बुचकळ्यात पडतो.
त्याला प्रश्न पडतो,
कोणी ५०० ची मनीऑर्डर
केली असेल. काही दिवसांनी परत
त्याला एक पत्र येते,
तोडक्या मोडक्या अक्षरात
लिहिलेले, वाचण्यास अवघड पण
३ ते ४ ओळीचे -
“प्रिय भाई, 150 रुपए तुम्हारे.. और 350 रुपए
अपनी ओर से मिलाकर
मैंने तुम्हारी माँ को..
मनीआर्डर.. भेज दिया है..।
फिकर.. न करना।
माँ तो सबकी.. एक- जैसी ही होती है न..!
वह क्यों भूखी रहे...?
तुम्हारा
— जेबकतरा भाई..!!!!!...

हवंय
एक रिकामा कान हवाय, बरंच काही भरवायला
कुजबुजनारं मन हवंय, सारं काही ठरवायला
एक उशाशी पान हवंय, रात्री साऱ्या झुरवायला
अश्वासारखी जान हवीय, दिवस माझा मिरवायला
एक असा दिलदार हवाय, दिल सारं जिरवायला
चिपचिप सारी माती हवीय, घर माझं सारवायला
एक हिरवं रान हवंय, वाऱ्यावरती डोलवायला
झुळझुळणारं पाणी त्याला, भरभरून जगवायला
सळसळनारा बाण हवाय, राहिलं सारं भेदायला
एक निधडी छाती हवीय, सारं काही झेलायला

गोष्ट तीन आण्यांची.....
आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.
म्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. शेवकांडाच्या लाडवांची पुरचुंडी आणि प्लास्टिकच्या पिशवीतल खाजं तिन आवदारपणे चुंबळीच्या पदराखाली सरकवलं. तेवढ्या गडबडीतसुद्धा खाज्याच्या गुळात घातलेल्या आल्याचा दरवळ तिच्या नाकापर्यंत पोहोचला. बाय एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुल्लांन तिला हटकलंच, `म्हातारे, आज उशीरसा?' माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं बारक्यासाठी शेवंतूसाठि खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. पण दाढीचे केस पांढरे फेक झालेला मुल्ला तिला `म्हातारे' म्हणाला होता. बायला भारीच राग आला. कुणी `म्हातारे' म्हटलेलं तिच्या मुळीच कामी यायचं नाही.
म्हातारी काय म्हणून? अजून डोक्यावर पाटी घेऊन ४-४ मैल चालत होत अन् डोळ्याला दिसत होतं. ती स्वभावाप्रमानं काहीतरी फटकून बोलणार होती, पण समोरुन मोटार येताना दिसली. बायनं चकटनं विचार केला, एस्.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू!
बायनं आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदारगडी वाटला. तो बायकडं बघून हसला. `काय पायजे आजी?' त्यानं विचारलं. बायला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, `माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? यष्टी चुकली बग!'
ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकलि आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. बाय हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली,`ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात?'
`आजे' `बाय म्हणतत माका' ती टेचात उत्तरली. ड्रॉयव्हर हसत म्हणाला,`बाय, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी~' बायचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली.
बांगडीवाला मुल्ला तोंडवासून आश्चर्यानं पाहत होत. गाडी हलली तसा तो ओरडलाच, `अगे म्हातारे -' पण बायला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर बायला फार सुख वाटलं, एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. बायनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले. दिवसभराच्या उन्हान, धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. `बाय, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना? `बाय खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली. म्हाताऱ्या बायला काय वाटलं कोण जाणे. तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, `खा माझ्या पुता! ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोखं भरुन पाहिलं गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, `कुणाच्या गाडीतून इलंय?' `टुरिंग गाडीतनं.' बायच बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला. तशी बाय खणखणीत आवाजात म्हणाली `तीन आणे मोजून दिलंय त्येका,' `त्यांनी ते घेतलं? अग म्हातारेम तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. याआपल्या सावंतवाडिच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू!' दुसऱ्यानं माहिती पुरवली. `अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा' म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय' म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या, त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)