सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे

पांडू हवालदाराने चार
शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले
पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच
झाले.
त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''
'' अहो,
या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार
केला.''
...
इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्न्
पडून इ.
प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला.
पहिल्या पोराला विचारलं, ''तुझं नाव
काय
आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास
राणीच्या
बागेत?''
पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला, ''माझं नाव नन्या.
मी
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न
करत होतो.''
आता
दुसरा मुलगा. ''माझं नाव मन्या.
मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे
टाकायचा प्रयत्न
करत होतो.''
तिसरा मुलगा. ''माझं नाव विन्या. मी
पण
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत
होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला, ''माझं
नाव
शेंगदाणे!!!!''
1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो सुविचार
११. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
१२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
१३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!
१४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं!!!
१५. अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका !
१६. मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

बोलतो ते

बोलतो ते चूक आहे की बरोबर?
मी बरोबर वा खरोखर ती बरोबर?

काय डोळ्यांतून माझ्या दोष आहे ?
कोणताही रंग का नाही बरोबर?

बांध तू ताईत स्वप्नांच्या उद्याच्या
राख थोडी राहू दे माझी बरोबर

प्रश्न माझे अडचणीचे एवढे की
उत्तरे सांगू नये कोणी बरोबर

काळजी घे ! चांदण्याचा झोतसुद्धा
सौम्य कांतीला तुझ्या नाही बरोबर!

चुक तू होतीस हे शाबित होता
काय कळुनी फायदा की मी बरोबर !!

-संदीप खरे
शिक्षक : सेमिस्टर सिस्टिमचे फायदे सांग.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या : फायदे नाही माहीत.. पण
तोटा हा आहे की, वर्षातून
दोनदा अपमान होतो..

कानाने आंधळा

एका दरोडेखोराने एका घरात डाका टाकला. घरातले सगळे पैसे दागिने एकाजागी जमा केले आणि घरमालकासमोर सुरा काढत म्हणाला.

'' चल सांग अजुन कुठे आहे तुझ्या घरात माल नाहीतर या सुऱ्याने तुझे कानच कापतो''

घरमालक म्हणाला , '' साहेब रहम करा पण माझे कान कापू नका... नाहितर मी आंधळा होईन ''

'' आंधळा?'' दरोडेखोर आश्चर्याने म्हणाला, '' कान कापल्यावर जास्तीत जास्त बहिरा होशील... आंधळा कसा काय होशील?''

'' साहेब.... कान कापल्यावर मी माझा चष्मा कसा लावू?'' घरमालक म्हणाला.

जीन्स वर टिकली

सासू: किती वेळा सांगितले बाहेर जाताना टिकली
लावत जा..

सून: जीन्स वर कोणी टिकली नाही लावत अहो..

सासू: अग जीन्स वर नाही.. कपाळावर लाव..
चम्या. . . . चे लग्न होते.....
आणि एकदा तो पहाटे फिरायला जातो... खूप थंडी असते म्हणून घरी परत येतो... आणि चिंगी जवळ जाऊन झोपतो.
चम्या :- आज बाहेर खूप खूप थंडी आहे.......
चिंगी :- तरी पण आमच बावळट बाहेर फिरायला गेलंय ..