सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे

पांडू हवालदाराने चार
शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले
पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच
झाले.
त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''
'' अहो,
या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार
केला.''
...
इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्न्
पडून इ.
प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला.
पहिल्या पोराला विचारलं, ''तुझं नाव
काय
आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास
राणीच्या
बागेत?''
पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला, ''माझं नाव नन्या.
मी
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न
करत होतो.''
आता
दुसरा मुलगा. ''माझं नाव मन्या.
मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे
टाकायचा प्रयत्न
करत होतो.''
तिसरा मुलगा. ''माझं नाव विन्या. मी
पण
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत
होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला, ''माझं
नाव
शेंगदाणे!!!!''

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा