एक मतदार EVM समोर बराचवेळ उभा असतो ...
मतदान अधिकारी विचारतो, काय झाले तुम्ही इतक्या वेळ का लावत आहात ..?


मतदार म्हणतो :

"तसं न्हव ...,
ते रात्री कुणी पाजली त्याचं नावचं आठवत नाही ...!"
शिक्षक : सांग गाढवाला  इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

दिण्या : ड़ोंकी ..

शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना..

दिण्या :- नाही सर देवा शपथ… मी तुमच्याकडे बघून बोललो…!
पंगतीमधे मिठ वाढणारा
पुन्हा मिठ वाढायला येत नाही.
तसेच आयुष्यात काही लोकं
असेचं मिठासारखे असतात.
प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने
कदाचित काही फरक पडणार नाही
पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो.
त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणार्या लोकांना जपा
कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. ||       
मास्तरांनी प्रयोगशाळेत मुलांना प्रयोग दाखवताना आपल्या खिशातून १० रू चं नाणं काढलं आणि ते Acid मध्ये टाकलं व विचारलं "आता सांगा हे नाणं ह्यात विरघळणार की नाही विरघळणार ?"
.
अंकुश: "सर, नाय विरघळणार."
.
मास्तर: "शाब्बास. तू कसं ओळखलंस?"
.
अंकुश: "सर Acid मध्ये नाणं टाकून ते विरघळणार असतं तर
ते तुम्ही आमच्याकडून मागून
घेतलं असतं. तुमच्या खिशातून टाकलं नसतं."

😂😜😂😜😂😜 

पोरगं पुढे RBI चं Governor झालं.
काल माझ्या डॉक्टरांशी गप्पा मारत बसलो होतो. माझा जॉब , शिप्ट , रिपोर्टिंग , पगार , कामाचे स्वरूप  इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला पुढील सल्ले दिले :
.
.
.
१) भरपूर चाला.
२) कोल्ड्रिंक्स कमी करा.
३) दारू अजिबात नको .
४) भरपूर पाणी प्या.
५) जवळ जायचे असेल तर रिक्षा करू नका .
६) बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा.
७) घरीसुध्दा तेलकट , तुपकट खाऊ नका .
८) मांस, मासे इत्यादी  वर्ज्य करा.
९) एक दिवसाच्या सहली करा , त्यापेक्षा मोठ्या नकोत .
.
.
.
.
.
.
.मी होकार दिला व घाबरत-घाबरत विचारले :  ' डॉक्टर मला नक्की झालय तरी काय .. .???'
.
.
तेव्हा डॉक्टर म्हणाले :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झालेलं काहीच नाही.
तुझा पगारच कमी आहे ... 
बायको आपल्यावर खुपच प्रेम करते असे वाटत असेल तर,

जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून पहा...

तुमचा सगळा गैरसमज दूर होईल...!!
बायको आशावादी आहे कि निराशावादी हे पाहण्यासाठी मी अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला तर ती उचकटून म्हणाली....

"पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेवा !"

ना आशावादी ना निराशावादी, फक्त वादावादी...