एकदा दोन गुरुजी गप्पा मारत बसलेले असतात.
एक- ‘मला टाटा आणि बिर्ला या दोघांची मालमत्ता मिळाली तर मी त्यांच्यापेक्षा जास्त पैसा कमावेन.’दुसरे- कशाला उगाच फुशारक्या मारता? ते कसं शक्य आहे?
पहिले- का नाही? सकाळ-संध्याकाळ दोन शिकवण्यासुद्धा घेईन.
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू*दळण ,बायको आणि मी*
😃😂🤣😜😃😂🤣
एकदा बायकोचं आणि माझं दळण आणणे या कामावरून वाजलं..
चांगलीच खडाजंगी झाली.
आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीचं झालाय राव?.
पण शेवटी मी पडलो आपला *बिचारे नवरे संघटनेचा अध्यक्ष*
गपगुमान जावून दळण आणावे लागले....दळण घेऊन तर गेलो पण तिथे विचार करू लागलो.....
मनात म्हंटल अशी हार मानून चालणार नाही...
एवढ्या वेगवेगळ्या संघटनेचे आपण अध्यक्ष आणि असं कच खावून कसं चालेल....
दळण सुरू असताना जरा आजूबाजूला नजर गेली आणि लगेच डोक्यात भन्नाट आयडिया आली....
डोक्यात किडा वळवळायला लागला...
अन चेहराच खुलला....
प्रसन्न मनानं हसरा चेहरा घेऊन दळण घेऊन घरी गेलो...माझं हास्यवदन पाहून ती जरा गोंधळात पडली...
*मघाशी तणतणत गेलेलं शिंगरू असं हरणाच्या पाडसासारखं बागडत घरी आल्यावर* तिच्या कपाळावर साडेबावीस आठ्या पडल्या....
काही दिवस गेले आणि मी मग स्वतःहून तिला विचारले, *अरे पिठं संपलं नाही का अजून दळण कधी आणायचं?
तिला वाटलं नवरा ताळ्यावर आला....डबा घेऊन मी दळण आणायला गेलो...
यावेळी मात्र जरा उत्साहाने गेलो...
बायको बुचकळ्यात पडली...!
हाच उत्साह मी अजून एक दोन वेळा दाखवला...
पुन्हा काही दिवस गेले ....मी पुन्हा विचारलं..
*दळण कधी आणायचं ?*...
यावेळी दळणाला जाताना जरा छान ठेवणीतला शर्ट घालून गेलो...आता मात्र बायकोचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता...
नवरा खुशीत, उत्साहाने दळण आणतोय म्हणजे काय तरी भानगड असणार ....संशयाचे बी आपोआप पेरलं गेलं होतं.....त्यात आता मला दळण आणायला नेहमी पेक्षा जास्त उशीर होऊ लागला....
आणखी पुढच्या वेळी जाताना मी मस्त छान आवरून, नीटनेटका भांग पाडून, जरा बऱ्यापैकी कपडे घालून, त्यावर स्प्रे वगैरे मारून दळण आणायला निघालो.....
माझा हा तामझाम पाहून तिची विकेट पडली....!
*काय हो, दळण आणायला कशाला एवढं आवरून जायला पाहिजे...काय एवढं आवरायचं कारण?*
तसं तिला म्हणालो.. "अगं असं कसं... त्या दळणाच्या गिरणीपाशी किती किती जण येतात....
तिथं दळणाची वाट पहात उभं असताना कोण कोण भेटतं...
काही गाठीभेटी होतात...
दळण आणायला आलेल्या गेलेल्या; आता सारखं जातोय म्हंटल्यावर ओळखीच्या झाल्यात....
बिचाऱ्या दोन शब्द बोलतात...
मग असं सगळ्यांसमोर गबाळ जावून कसं चालेल...
जरा नीटनेटकं नसावं का माणसाने...!
असं म्ह्णून मी आपला मस्त शीळ वाजवत दळण आणायला गेलो....
यावेळी मुद्दाम जास्त वेळ लावला....
घरी आलो तर रागाच्या थर्मामीटर मधला पारा ग्लास तोडून थयथया नाचत होता...मी आपलं निरागसपणे दळणाचा डबा जागेवर ठेवला....
पुन्हा काही दिवस गेले...मी पुन्हा विचारले
*काय गं, ते दळण आणायला कधी जावू..?*
तसं फणकाऱ्याने माझे कान तृप्त करणारे शब्द कानी पडले !
*काही गरज नाही दळण आणायची, मी माझे बघते काय कसे आणायचे ते....तुम्ही नका पुन्हा लक्ष घालू त्यात...*
मी आपलं निरागसपणे *बरं...* म्हणून सटकलो....
पहिला विश्वचषक जिंकल्यावर जो आनंद कपिलला झाला नसेल त्याच्या दुप्पट आनंद झाला...!
बेडरूममध्ये जाऊन मी मुठी आकाशात झेपावत, चुपचाप आनंद साजरा केला....
आता कित्येक वर्षे झाली, दळण काही मागे लागले नाही...
असे अनेक सल्ले ह्या संघटनेत दिले जातात; आजच सभासद व्हा 🙏🏻
संपर्क:-
*बिचारे नवरे संघटना*
😂😂😂😂
विदर्भात पोळ्याच्या दिवशी सार्वजनिक झडत्या घेण्याची प्रथा असते।
झडत्या म्हणजे विरोधकांवर शेलक्या शब्दात टिका
१) घुटी रे घुटी, आंब्याची घुटी !!
मुख्यमंत्र्यान देल्ली हो, कर्ज माफीची ‘‘जडीबुटी’!!
त्या जडी बुटीले, आरा ना धुरा !!
मुख्यमंत्री साहेब, ‘भिक नको हो, कुत्र आवरा !!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
२) पोई रे पोई,, पुरणाची पोई !!
मुख्यमंत्र्यान देल्ली हो,
कर्ज माफीची गोई !!
त्या गोईले चव ना धव,
कास्तकाराचं आस्वासनात,मराच भेव!!
रकुन आला कागुद, तीकुन आला कागुद,
आश्वासनावर,कास्तकार बसला
जिवमुठीत दाबून !!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
३) वसरी रे वसरी, शम्याची वसरी,
पयलीले लेकरू, नाई झाल,
मनुन श्यान ‘केली होदुसरी’ !!१!!
दुसरीच्या लग्नात वाजवला बीन,
जनता डोल्ली, म्हणे हो ‘आयेगे अच्छे दिन’ !!२!!
इकास जन्माले याची ‘वाट पाहून रायली जनता’
सरकारण देल्ला हो, ‘नोट बंदीचा दनका’ !!३!!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
४) पोया रे पोया, यवत्याचा पोया
आत्महत्ये पाई लागला हो.. काया टिया !! १!!
काया मातीत टोब तो बीया,
तूर घेणारे घालतात हो.. आम्हाले शिव्या !! २!!
शिव्या घालणारे, खातेत आमच काय बिघडवल हो..
आम्ही तुमच !! ३!!
घामाचा पैसा, मागतो आम्ही
थंड हवेत बसता हो.. तुम्ही !! ४ !!
घाम गाऊन पिकवतो शेती
नांदी लागाल तर होईल माती !! ५!!
एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!
सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा।💐
*🙏विचार धन🙏*
एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता.
कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.
त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालवणारा नावाडी ही हैराण झाला.
होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.स्वतः तर बूडेल बरोबर सगळ्यानाच घेऊन बूडेल.
सावकाराच्या लक्षात ही गोष्ट आली, तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षाही जास्त गडबड करू लागला.
हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि नम्रपणे सावकाराला म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."
सावकाराने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांताने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. आता त्याला नावेची गरज लक्षात आली.
थोड्या वेळाने त्याला ओढून पुन्हा नावेवर घेतले,मग मात्र तो चुपचाप एका कोपर्यात जाऊन बसला.
त्याचे हे वर्तन पाहून सावकार चकीत झाला व म्हणाला "पाहिलं आधी किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."
प्रवाशी हसून म्हणाला "महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.जेव्हा त्याला पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी आणि नावेची गरज,लक्षात आली.
*तात्पर्य*
*जो पर्यंत अंगात रग आहे तो पर्यंत माणूस असाच वागतो. देवाचे अस्तित्वच विसरतो.देव किंवा सद्गुरू त्याला वारंवार जाणीव करुन देत असतात पण अंगातील मस्ती .. मायेत गुरफटून गेल्या मुळे देवाच्या किंवा गुरूच्या बोलण्या कडे त्यांच्या संकेताकडे तो दुर्लक्ष करतो ....*
*पण मग जेंव्हा फटके बसतात तेंव्हा तोच देवा शिवाय गुरु शिवाय पर्याय नाही हे जाणून शरण येतो ...*
_*दोन चोरांची गोष्ट*_
_लेखक-अनामिक._
_*चोर १ –*_
अमेरीकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरीकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता.
एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता.
तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं होतं.
चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.
त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला!
वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्या करणं सोडुन साधं जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.
लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले. आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली.
मुलाखत खुप रंगली,
मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”
“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.
“हो, हो!” एकच गलका झाला.
“मी सर्वात मोठी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’. हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.”
सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.
“मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”
_*चोर २ –*_
१८८७ चा एक पावसाळा. एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला.
कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली. तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता. दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!
नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली. तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला,
शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले.
ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले.
पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले.
कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसान भरपाईचे आदेश दिले.
तो जेलमध्ये असतांनाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला. त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले.
विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा.
*तात्पर्य*
- आपली अंगभुत कला न
ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे.
- तो प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.
- तो व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.
- तो प्रत्येक रिकामटेकडा व्यक्ती चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही.
- आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
_*लेखक-अनामिक..*_