नवाबी तहजीब विरुद्ध कानपुरी स्वभाव 


एक नवाब साहेब आपल्या भाच्याच्या लग्नासाठी लखनौहून कानपूरला आले.


गेल्या दोन दिवसांपासून नवाब साहेबांच्या लक्षात येत होते की रोज मेजवानीत त्यांना खायला फक्त अंडीच दिली जात होती… म्हणून तिसऱ्या दिवशी त्यांचा धीर सुटला आणि त्यांनी आपल्या मेहुण्याला विचारले –


.. साहेब, ही अंडी  त्यांच्या जागी ठीक आहेत, पण त्यांचे आई-वडील कुठे आहेत…?! … कृपया त्यांचीही ओळख करून द्या…!! ही लखनवी संस्कृती आहे.


मेहुणासुद्धा खरा कानपुरी होता. तो म्हणाला, "साहेब... तो अनाथ आहे."

 एक मुलगा आणि मुलगी बीएमडब्ल्यू गाडीतून डेटवर गेले...!


मुलगा - मी आजपर्यंत तुझ्यापासून एक गोष्ट लपवत आले आहे.


मुलगी - काय?


मुलगा - मी विवाहित आहे 


मुलगी, तू मला घाबरवलेस.मला वाटलं ही बीएमडब्ल्यू गाडी तुझी नाहीये...!!! 

 एका सुंदर मुलीचं आणि गुप्ताजींचं अफेअर होतं…!


गोष्टी लग्नाच्या दिशेने जात होत्या, पण त्याआधी…???


एके दिवशी, ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते… 🤣🤣🤣


मुलीने विचारलं:


तुमच्याकडे मारुती कार आहे का? 🤣🤣🤣


गुप्ताजी म्हणाले: नाही.


मुलगी: तुमच्याकडे फ्लॅट आहे का? 🤣🤣😃


गुप्ताजी: नाही…!


मुलगी: तुमच्याकडे नोकरी आहे का? 🤣🤣🤣


गुप्ताजी: नाही…!


_आणि मग…_


*ब्रेकअप…!!*


या काळात, गर्लफ्रेंड निघून गेल्यामुळे गुप्ताजी दुःखी झाले.


आणि मग ते विचार करू लागले…


माझ्याकडे BMW असताना… मला मारुतीची काय गरज आहे?


 जेव्हा माझ्याकडे एवढा मोठा बंगला आहे, तेव्हा मला फ्लॅटची काय गरज आहे?


आणि…


जेव्हा माझा स्वतःचा ५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय आहे आणि ४०० लोक माझ्यासाठी काम करतात,


तेव्हा मला नोकरीची काय गरज आहे?


मग माझ्या गर्लफ्रेंडने मला का सोडले?

 डॉक्टर : उत्तम स्वास्थ्यासाठी रोज व्यायाम करत जा. 

तेव्हाच तू फिट राहशील. 

मन्या : मी रोज क्रिकेट आणि फूटबॉल खेळतो. 

डॉक्टर : किती वेळ खेळतोस? 

मन्या : जोपर्यंत मोबाइलची बॅटरी संपत नाही. 

अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...

कधी कधी एखाद्या पुस्तकातलं एखादं वाक्य आपलं लक्ष वेधून घेतं. वाक्य तसं साधंच असतं पण विचार केला तर त्यात खूप अर्थ भरलेला जाणवतो. असंच एक वाक्य परवा माझ्या वाचनात आलं आणि त्या वाक्यापाशी मी थांबलो. बऱ्याच वेळा आपण वाचून पुढे पुढे जात असतो. परंतु कधी कधी एखाद्या वाक्यापाशी थांबावं आणि त्यावर विचार करावा असं ते वाक्य असतं. पुढचं काही वाचलं नाही तरी चालू शकतं.


ते वाक्य होतं टी हार्व एकर या अमेरिकन विचारवंताचं. तो म्हणतो,"Successful people have fear, doubt and worry too. They just don't let it stop them." यशस्वी लोकांना सुद्धा भीती, शंका आणि चिंता असतात. फक्त ते या भावनांना स्वतःच्या मार्गात अडथळा बनवू देत नाहीत. 


मला हे वाक्य फार आवडलं. यशस्वी माणसांचं जीवन पाहिलं की आपल्याला वाटतं की किती भाग्यवान आहेत ही मंडळी ! यांना सगळं कसं भरभरून मिळालं आहे ! आणि मग अशावेळी आपण नकळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू पाहतो. मग आपल्याला आपण किती दुर्दैवी आहोत असे वाटते. आपण म्हणतो की मला माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, माझ्याच वाट्याला संकटे आणि अडचणी येतात. कोणतीही गोष्ट माझ्यासाठी सहजपणे होतच नाही. अगदी हातातोंडाशी आलेले यश मला नेहमी हुलकावणी देते. 


दूरवरून दिसणारे पर्वत आपल्याला खूप सुंदर वाटतात. पण जवळ जाऊन पाहिलं म्हणजे लक्षात येतं की अरे, दुरून हा डोंगर दिसत होता तेवढा सुंदर खचितच नाही ! दगडधोंडे, दऱ्या, तीव्र चढ-उतार या सगळ्या गोष्टी तिथे आहेतच. फक्त आपल्याला त्या लांबून दिसल्या नव्हत्या.


असंच यशस्वी माणसांचंही असतं त्यांच्या जवळ जाऊन पाहिल्याशिवाय त्यांच्या यशाचं मर्म लक्षात येत नाही. ही माणसं सुद्धा अनेकदा अपयशाचे धनी झालेले आढळतात. त्यांच्या जीवनातही संकटे येतात. ते देखील कधी कधी निराश होतात. कारण ती देखील तुमच्या आमच्यासारखी माणसंच आहेत. या मातीतूनच त्यांचा देखील जन्म झाला आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का ? होय, नक्कीच ! या ठिकाणी पुन्हा मला एक सुंदर वाक्य आठवतं आहे. "Great men don't do different things. They do things differently." ( महान माणसे वेगळं काम करत नाही फक्त ते आपली कामं वेगळ्या पद्धतीने करतात.)


आपण मात्र संकटे आली, अडचणी आल्या की गांगरतो आणि ती गोष्ट तशीच सोडून देतो. कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांसोबतच चिकाटीची सुद्धा आवश्यकता असते. संयम आणि धैर्य या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. संकटे आपली एक प्रकारची परीक्षाच घेतात. आपण जे पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतो, त्या शिक्षणातून खरंतर हे गुण आपल्या अंगी यायला हवेत. परंतु तसं होताना फार कमी आढळतं.


काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. एका तरुण आयटी इंजिनिअरने आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. कारणही तसेच होते. त्याची अचानक नोकरी गेली. त्याच्या लॅपटॉप वर सकाळी सकाळी एक ई-मेल आला. त्यात कंपनीने म्हटले होते, " कंपनीत आता तुमच्या सेवेची आवश्यकता नसल्यामुळे तुमची नोकरी उद्यापासून संपुष्टात आली आहे. आता तुमची गरज नाही." त्या एका वाक्याने त्या तरुणाच्या डोळ्यासमोर सारा अंधार पसरला. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. घरासाठी गाडीसाठी त्याने बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते. आता काय होणार ? कर्जाचे हप्ते कसे भरणार? घर कसे चालणार ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... या प्रश्नांची काजळी त्याच्या मनावर एवढी दाटून आली की त्याला आपले जीवन संपवावे एवढा एकच मार्ग दिसला. गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले आणि आपल्या पत्नीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली. ती बिचारी सुद्धा हा धक्का सहन करू शकली नाही आणि तिने गच्चीवरून उडी मारून स्वतःला संपवले. ही घटना वाचून कोणालाही हळहळ वाटणे सहाजिकच आहे. 


कोणी एखाद्या परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या करतो तर कोणी प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारतो.


नंतर मनात एकच विचार आला की खरंच असं काही झालं म्हणजे सगळंच संपलं असे समजायचे का ? नाही. कधीही नाही. नोकरी जाणं म्हणजे एक दरवाजा बंद होणं. पण बंद दरवाजासमोर उभे राहून आत डोकावत राहणे म्हणजे मागे उघड्या असलेल्या खिडक्या न पाहणे. नोकरी गेलेल्या त्या तरुणाकडे कौशल्य होते, बुद्धी होती, अनुभव होता. त्याला फ्रीलान्सिंग करता आले असते. स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता आला असता. सरकारी योजनांचा आधार घेता आला असता. कुटुंबाने, मित्रांनी साथ दिली असती. समाजातून मदतीचे अनेक हात पुढे आले असते. पण... या सगळ्या शक्यतांचे दरवाजे त्याने स्वतःच बंद करून टाकले. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे गृहीत धरून चालायला हवे की आपली नोकरी म्हणजे अळवावरचे पाणी आहे. ती कधीही जाऊ शकते. यासाठी प्लॅन बी तयार असायला हवा.


त्या तरुणावर आलेले हे संकट खरोखरीच अवघड होते त्यातून पार पडणे सोपे नाही, हेही मान्य. संकट आले की धीर सुटतो, हेही खरे. पण खरंच अशा प्रसंगी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे का ? अशावेळी थोडे शांत राहून विचार केला तर नक्कीच मार्ग सापडतो. 


"'आली जरी कष्ट दशा किती अपार। धैर्य न टाकीती तथापि थोर।

केला जरि पोत बळेचि खाले। ज्वाळा तरी ते वरती उफाळे।।"


थोरांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला शिकायला मिळते. आजूबाजूचा निसर्गही आपल्याला शिकवत असतो. पानगळ होते परंतु झाडाला नवीन पालवी फुटते. झाडाच्या फांद्या छाटल्या जातात पण त्या ठिकाणी नवीन पालवी फुटते. प्राणी, पक्षी देखील विपरीत परिस्थितीला तोंड देतात आणि प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेतात. आपण तर माणूस आहोत. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे. आपण संकटांनी असे हाताश होऊन कसे चालेल ?


" घन तमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी..."असं एक सुंदर गाणं आहे. सर्वत्र अंधार पसरलेला असताना हा शुक्रतारा आपल्या प्रकाशाने आजूबाजूच परिसर उजळून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तो असं म्हणत नाही की माझ्या एकट्याने काय होणार आहे ? स्वतःच्या जीवनाचा दीप विझवून अंधार करण्यापेक्षा इतरांसाठी प्रकाश देणारा दीप बना. जीवन असे सुखासुखी नष्ट करू नका. आज रात्र आहे पण उद्या पहाट होणारच आहे हे निश्चित ! हे जीवन म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे हे लक्षात ठेवून वागा.


- विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

 बायको पोराची धुलाई करत होती....

पण मध्ये मध्ये.

.

.

.

माझ्याकडे बघायची काही गरज होती का?

CA ची पत्नी : काय हो?

महागाई दर म्हणजे काय असतं हो?


CA : पहिलं तुझं वय 21 वर्षे होतं,

कंबर 28 होती, आणि वजन 50 किलो होतं.


आता तुझं वय 36 वर्षे, कंबर 38

आणि वजन 80 किलो आहे !!


आता तुझ्याकडे पहिल्यापेक्षा सगळं जास्त आहे, *पण तुझी व्हॅल्यू पहिल्यापेक्षा कमी आहे... यालाच महागाई दर म्हणतात!!


Moral of The Story :


अर्थशास्त्र तेवढं कठीण नाही, पण योग्य उदाहरण देऊन समजून सांगायला पाहिजे.


_हा अर्थतज्ज्ञ नंतर महिनाभर उपाशी होता. त्याची कंबर 20 आणि वजन 45 किलो झालं!


मग त्याची बायको त्याला म्हणाली :

तुमचं पुस्तकी ज्ञान कामाचं नाही.

महागाई अशी आटोक्यात आणायला हवी!!!