मास्तर:- महिला आणि पुरुष या दोघांमध्ये तुम्हाला उत्तम कोण वाटतं ?
मन्या :- पुरुष…कारण मी आतापर्यंत कोणत्या महिलेचं नाव उत्तम ऐकलं नाही 🫣
*पत्नी~*
"चहा कसा झालाय?" 🤔
*पति~*
"छानच, मस्त.."👌
"आपला मुलगा म्हणतोय बेक्कार झालाय.." 🤨
"लहान आहे तो, *लग्न झाल्यावर* कळेल त्याला.." 🫣
🤣😂🤣😂😊
ब्रिटिश बारमध्ये, ठरवून केलेल्या लग्नाविषयी खालीलप्रमाणे एक छोटी चर्चा झाली: 😎
इंग्रज माणूस:
कसे शक्य आहे
तुम्ही एखाद्या स्त्रीला ओळखण्याआधीच तिच्याशी लग्न करता? 🤔
भारतीय माणूस:
तुम्ही एखाद्या स्त्रीला ओळखल्यानंतर तिच्याशी लग्न करता? 🫣
पुर्वी दुकानात लिहलेले असायचे
*ग्राहक देवता आहे*
*तेव्हा देव असल्याचे फिलींग यायचे.* 😇
आता लिहलेले असते
*'तुमच्यावर कँमेऱ्याची नजर आहे '* 😉
*आता चोर असल्याचे फिलींग येते.* 🫣
*रिश्ता वही, सोच नयी ...* 😃
मुलगा: तुम्ही अगदी माझ्या बायकोसारख्या दिसता!🥰
मुलगी: बरं, तुमच्या बायकोचं नाव काय आहे? 🤔
मुलगा: माझं अजून लग्न झालेलं नाही! 🫣
मॅनेजर : तू इतका टॅलेंटेड आहेस, मग माझ्या टीममध्ये काम का करत नाहीस? 🤔
तो : सर, मी तुमच्या टीममध्येच आहे. 😊
मॅनेजर : ते मलाही माहिती आहे... मी विचारतोय, काम का करत नाहीस? 🫣
मन्या मार्कशीट घेऊन घरी येतो...
मन्याचे वडील सहीच्या ठिकाणी अंगठा लावतात. 😇
मन्या : बाबा ! तुम्ही तर इंजिनीअर आहात, मग हा अंगठा कशाला? 🤔
बाबा : तुझे मार्क बघून शिक्षकांना वाटायला नको की तुझा बाप शिक्षित आहे. 🫣