तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.
तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.
तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.
तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.
तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.
तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची
कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.
तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.
तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.
तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.
तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.
तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची
कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
mala hi kavita far avadli.thanx...
उत्तर द्याहटवाआरती प्रभू प्रमाणे ईतर नामवंत मराठी कवींच्या कविता पोस्ट करावी ही विनति . तसेच आपन मराठीसाठी देत असलेल्या योगदानाबड्द्ल मन:पूर्वक आभार ..............
उत्तर द्याहटवा