पैल तो गे काऊ कोकताहे

पैल तो गे काऊ कोकताहे |
शकुन गे माये सांगताहे || १ ||

उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ |
पाहुणे पंढरीरावो घर कै येती || २ ||

दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी |
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी || ३ ||

दुधे भरुनी वाटी लावीन तुझे वोठी |
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी || ४ ||

आंबया डाहाळी फळे चुंबी रसाळी |
आजिचे रे काळी शकुन सांगे || ५ ||

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे |
भेटती पंढरीराये शकून संगे || ६ ||

-संत ज्ञानेश्वर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा