अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू |
मी म्हणू गोपाळू, आला गे माये || १ ||
चांचरती चांचरती बाहेरी निघाले |
ठकची मी ठेले काय करू || २ ||
तो सावळा सुंदरु कसे पितांबरू |
लावण्य मनोहरु देखियेला || ३ ||
बोधुनी ठेले मन तव जाले आन |
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये || ४ ||
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा |
तेणे काय माने वाचा वेधियेले || ५ ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा