परीक्षा

विज्ञानात केलेत अंधश्रद्धांवर वार
त्यांची झुंड तर भोंदूच्या दारी होती

भूगोलात केली त्यांनी जगाची सैर
परि शेजारच्यास न ओळखणारी होती

आयुष्याचे गणित कधी आलेच नाही
तरीपण बरोबर ही गुणाकारी होती (?)

मायभूचे ऋण न जाणले, झटपट शिकून
त्यांना करायची परदेशवारी होती

सदा शिकले चांगले, पण वागले उलटच
तरीही त्यांनी घेतली भरारी होती

अनुत्तीर्ण झाले परीक्षेत जीवनाच्या
परि त्यांना मिळाली टक्केवारी होती


कवी -  विश्वजीत गुडधे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा