आभाळाचा श्वास

आभाळ भरुन येताना..!

आभाळातनं मोती सांडावेत
आणि तुझा भास व्हावा
कोंडलेल्या मनाचा थोडा
श्वास मोकळा व्हावा!

मोकळ्याच ढगांची गडगड
हा ऋतु कोणता असावा?
बंध भावनांचे जपण्या
तो बहुधा सज्ज नसावा!

निळसर रंग पुन्हा एकदा,
एखादाच ढग भरुन यावा
सांडणार्‍या थेंबाला मार्ग
पापण्यांनी सुचवावा!

अशावेळी सांज होती
हा विसर का रे पडावा?
विसावलेल्या मनाचा पुन्हा
श्वास भरुन यावा!

भरुन येताना आभाळ
क्षण धुंद जरा असावा
फक्त आभास चांदण्याचा
रात्रीच्या श्वासांत उरावा!


कवियत्री - पूजा  पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा