सकाळ झाली.
गजरच्या आवाजाने रवीला जाग आली. पांघरुण बाजूला केलं. हात लांब करून जांभई देऊन त्याने आळस झटकला. शेजारच्या टीपॉय वरील घड्याळाचा गजर त्याने बटण दाबून बंद केला.

टीपॉयकड़े नजर जाताच त्याला काहीसे चुकल्या चुकल्यासरखे जाणवले. ते लक्षात आल्यावर तो ताड़दीशि उठला. त्याने टीपॉय च्या खालच्या कप्प्यातील पेपर मासिके काढली त्यांना झटकत त्याचा शोध चालु झाला.

तिथेही निराशा झाल्यावर त्याने टीपॉय भिंतीपासून पुढे ओढला त्या मागच्या फटित तर ती वस्तु नाही ना? मोबाइल ची बॅटरी on करून तो टीपॉय मागील फट,पलंगाच्या खाली  बघू लागला..

आता मात्र त्याला घाम फुटला होता, हृदयाचे ठोके वाढत चालले होते.
पांघरूण झटकलं, गादी वर खाली करून बघितली, जिथे जिथे म्हणून शोधता येईल तिथे तिथे तो शोधु लागला. आता मात्र तो असहय झाला होता, त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटु लागले होते, तो कसविस झाला होता.
दरवाजाच्या मागे असणाऱ्या hanger ला असणारी पैंट अखेर त्याने हातात  घेतली आणि तिला तो
चापसु लागला. आणि अखेर एक हर्षान्वित लहर त्याच्या चेहऱ्यावर चमकली.
त्याचा शोध आता संपला होता
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 रविला तंबाखू आणि चुना पुडी सापड़ली होती आणि आता तो समाधानाने संडासला जाणार होता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा