१. तुमचं आडनाव बदलत नाही.
२. तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही.
३. वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता.
४. वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता.
५. बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात.
६. स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही.
७. बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो.
८. गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात.
९. लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात.
१०. तुमचा एक मूड बराच काळ टिकतो.
११..तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही.
१२..पाच दिवसांच्या सुटीसाठी बाहेर जाताना फक्त एका सुटकेसमध्ये सामान मावतं.
१३ .तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता.
१४ .कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता.
१५..पादत्राणांचे तीन जोड पुरतात.
१६ .बिनधास्त शॉर्ट वापरू शकता.
१७ .तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची संपूर्ण कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता.
१८ . तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही.
मित्रानो, प्रत्येक गोष्टीत स्त्रियांना आपण कमी लेखतो, प्रत्येक गोष्टीत त्यांचाशी पुढे असण्याच भ्रमिक सुख आपल्याला खूपच प्रिय असते, त्यांची टिंगल उडवायला मुळीच काही वाटत नाही! आपल्या मते दोष म्हंटला तर नेहमी त्यांचाच असतो, होना ???
पण खरतर चुकतो आपण..
स्त्री च्या रुपात आई असो, बहिण, बायको, पुत्री किवा प्रेयसी त्यांचा आदर केलाच पाहिजे, त्यांचा भावनांची कदर समजून घ्यायला पाहिजेच...
खरच हो, त्यांचा इतपत धैर्य, सहनशक्ती आणि त्याग करण्याची शक्ती आपल्यात नाहीये हे नेहमी लक्षात ठेवून हे विचार केल पाहिजे कि आपण खूप खूप खूपच नशीबवान आहोत, पुरुष म्हणून जन्माला आलोय!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा