मला एकदा एका इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं "अरे काय त्या मराठीत टाइप करता रे तुम्ही...
किती वेळ लागतो...
बोअरिंग काम... 
इंग्रजित कसं पटापट
टाईप होतं...
तुमचं मराठी म्हणजे......"

मी त्याला सांगितलं,
"अरे बाबा श्रीमंत आणि
गरिबामध्ये तेवढा फरक असणारच".

तो खुश होऊन म्हणाला
"चला म्हणजे मराठी गरीब
हे तू मान्य केलंस तर"??

मी म्हटलं 
"मित्रा चुकतोयस तू.. 

इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती..?"

तो म्हणाला २६..

मी म्हटलं 

"मराठीत याच्या दुप्पट

५२ आहेत..

इंग्रजिच्या दुप्पट मालमत्ता
आहे आमची..

आता सांग,
कोण गरीब आणि
कोण श्रीमंत?

केवळ जीन्स घालून बाहेर
पडणारी स्त्री पटकन
तयार होऊ शकते..

पण भरजरी कपडे घालून
सर्व दागदागिने धालून
बाहेर पडणारी स्त्री
जास्त वेळ घेणारच..

आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते..

म्हणुनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही,
तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात."
गण्या रागाच्या भरात डॉक्टर कडे गेला....
.
.
.
गण्या -  माझ्या वरच्या दातात कीडा होता मग तुम्ही खालचा दात का काढला ????
.
.
डॉक्टर -  तो कीडा खालच्या दातावर उभा राहून वरचा दात कोरत होता,
.
.
आता बघू कुठे उभा राहतो
एके दिवशी वेदनांनी बेजार झालेला बंड्या डॉक्टरांच्याकडे कसाबसा गेला ....


बंड्या  : डॉक्टर.... साहेब.. ..आह ..पोटात ...... अग आई ग...खूप... दुखतय...आह ....

डॉ : अच्छा !! हे सांग शेवटचे जेवण कधी आणी काय जेवला होतास..?

बंड्या  : जेवण नेहेमीचेच हो.. रोजच्या सारखे ....

डॉ : अच्छा अच्छा!! (२ बोटांची खूण करत ) इकडे शेवटचं कधी गेला होतास ...?

बंड्या : रोजच प्रयत्न करतो पण....पण.... होतच असे नाही... गेले तीन दिवस......


डॉ समजले याला ... constipation आहे...


डॉक्टर आत गेले आतून एक औषधाची बाटली ...आणि सोबत एक कँल्क्युलेटर  पण घेऊन आले ...


बंड्याला विचारले - घर किती दूर आहे तुझे ?

बंड्या  : 1 km

डॉक्टरांनी कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व चार चमचे औषध काढून एका वाटीत ओतलं.

डॉ : वाहनाने आलास की चालत ?

बंड्या  : चालत ..

डॉ : हं... जाताना धावत जा...


डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : घर कितव्या मजल्यावर आहे ?

बंड्या : तिसऱ्या मजल्यावर.

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : लिफ्ट आहे की जिना चढून जाणार ?

बंड्या  : जिन्याने ...

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : आता शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दे...

घराच्या मुख्य दरवाज्यापासून टॉयलेट किती दूर आहे ?

बंड्या : जवळजवळ २० फुट..

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले........

व म्हणाले

आता माझी फी आधी दे..मग औषधाचा हा डोस घे...मग कुठेही न थांबता फटाफट घर गाठ...नंतर मला फोन कर....!

बंड्या ने तसंच केलं.......

अर्ध्या तासाने डॉक्टरांना बंड्याचा फोन आला ...

एकदम बारीक थकलेल्याआवाजात.........

डॉक्टर साहेब औषध तर उत्तम, जालिम होत हो तुमचं. पण तो कँल्क्युलेटर ठीक करुन घ्या हो...

.

.

.

फक्त 10 फुटांनी हारलो ना मी......
*दोन बायकांचा ऑफिस मधील संवाद :*

पहिली : अगं, माझी कालची संध्याकाळ मस्तच गेली, तुझी कशी गेली?

दुसरी : एकदम नकोशी. काल माझा नवरा घरी आला 3 मिनिटात जेवला आणि दोन मिनिटात झोपला. तुझं?
पहिली : एकदम मजेत. माझा नवरा घरी आला आणि मस्त जेवायला बाहेर घेऊन गेला. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत तासभर चालत घरी आलो. घरी आल्यावर त्याने घरभर पणत्या लावल्या. खरोखर एखाद्या परिकथेसारखंच वाटलं मला.

*त्याचवेळी कामावर नवर्यांचा संवाद*

पहिला : कशी गेली कालची संध्याकाळ?
दुसरा: उत्तम. घरी आलो जेवण तयारच होतं, मी जेवलो आणि पटकन झोपलो. तुझं?

पहिला : अरे एकदम भयानक. घरी आलो, जेवण तयार नव्हते, वीजबिल न भरल्यामुळे घरात वीज नव्हती; म्हणून बायकोला बाहेर जेवायला घेऊन गेलो ते इतके महाग होते की रिक्षाने यायला पैसेच उरले नाही. मग पायीच घरी चालत आलो, घरी वीज नसल्याने घरभर पणत्या लावल्या.

**तात्पर्य *: तुम्ही जगाला कसं भासवता हे महत्वाचे.... मग वस्तुस्थिती काही का असेना? .....*

*चाणक्य म्हणतो,*
*जर तुम्हाला नवऱ्याबरोबर आनंदात राहायचे असेल तर त्याच्यावर प्रेम कमी केलं तरी चालेल पण त्याला पूर्ण समजून घ्या.*
*आणि*
*जर तुम्हाला बायकोबरोबर आनंदात राहायचे असेल तर तिच्यावर मनापासून भरपूर प्रेम करा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करू नका.*

*सर्व विवाहित दाम्पत्यांना समर्पित**
निळू फुले बस स्टॉप वर उभ्या असलेल्या बाईला
डोळा मारतात  .

बाई : अहो. .
मि तसली बाई नाही आहे.

निळू फुले : बाई ऽ ऽ ऽ
ते ठिक आहे पण
चेक करणे आमचं काम आहे.
शिक्षक: चालढकल ह्याचा अर्थ सांग
बंड्या: सर,उद्या सांगितला तर चालेल??
सर्वात कमी दिवस काम करून वर्षभरचे पैसे कमावण्याचे कर्तुत्व भारतात फक्त दोनच गोष्टींकडे आहे:




फाल्गुनी पाठक
आणि
मोती साबण ...