1) मंथरा सारख्या शुल्लक दासीने कैकयी चे कान भरले,आणि प्रभू रामचंद्रांना वनवासात जावे लागले.
२) वनवासात असतांना मारिच नावाच्या राक्षसाने घेतलेल्या सुवर्णमृगाच्या" आकर्षणास सीता माता बळी पडतात आणि श्रीरामास त्याच्या शिकारीस पाठवतात
3) साधुच्या वेशात आलेला रावण, सीतेला लक्षमण रेषा पार करायला भाग पाडतो, आणि तिचे अपहरण करतो
४) आणि सर्वात कहर म्हणजे, एका गणू नावाच्या सामान्य नागरिकाच्या वक्तव्याने व्यथित होऊन, *"लोक काय म्हणतील"* या भावनेने श्रीराम *परत* आपल्या प्राणप्रिय सीतेचा त्याग करतात
५) अंतिमतः स्वतःचे पावित्र्य सिध्द करण्यासाठी सीतामाता धरणीभंग करून त्यात स्वतःला झोकून देते, तर पुढे तिच्या विरहाने प्रभू रामचंद्र नदी मध्ये प्राणत्याग करतात.
*लोकांच्या नादी लागून देवाची ही दशा होऊ शकते, तर आपणा सामान्यांची काय गत होत असेल. ? ? ?*
*आयुष्य एकदाच मिळते, आपल्या आयुष्यातील मंथरा मारिच रावण आणि गणू ओळखायला शिका*,
*गैरसमज पुर्वग्रह व अनठायीभिती टाळुन मोकळा संवाद साधा हीच जगण्याची खरी रीत.😊*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा