खुप दिवसांपूर्वी मी ही 

राजकीय वात्रटिका लिहिली होती 


आजही परिस्थिती 

जैसे थे आहे


ना ‘शरदा’चे चांदणे

ना ‘सोनिया’चे दिस

‘घडय़ाळा’चे ओझे ‘हाता’ला

म्हणून ‘आय’ कासावीस

 

‘कमळा’च्या पाकळ्यांची

यादवी छळते मनाला

‘धनुष्य’ केव्हाच तुटलय

पण जाणीव नाही ‘बाणा’ला


 

' विळा, हातोडा अन् कंदिलाला'

आजच्या युगात स्थान नाही

डब्यांना ओढू शकेल एवढी

‘रेल्वे इंजिना’त जान नाही

 

मन आहे ‘मुलायम’

पण ‘माया’ कुठं दिसत नाही

‘हत्ती’वरून फिरणारा

‘सायकल’वर बसत नाही

 

कितीही उघडी ठेवा ‘कवाडे’

पण ‘प्रकाश’ आत जाणार नाही

विसरलेले ‘आठवले’ तरीही

‘गवई’ गीत ‘गाणार’ नाही

 

‘बंडखोर’ ‘पक्षां’चा थवा

‘पार्टी’साठी आतूर

कुंपणच खातंय शेताला

अन् बुजगावणही फितूर


काही नव्या ओळी


' स्वाभीमाना 'चे चिन्ह दिसेना

कुणाचे करावे पारायण ?

काय थट्टा चालवली 'नमो ' नमो

' नारायण '! नारायण !!


विनंती केली ईशारे दिले

तरी अवहेलनेची गाथा

कधी पावणार ' मुक्ताई ' ?

हुंदका आवरा ' एकनाथा '


ज्यांनी आणले 'स्वराज '

त्यांची 'मुरली ''मनोहर' वाटेना

संतापाने 'लाल' झाले 'कृष्ण '

ग्रहण सुटता सुटेना


अॅड, अनंत खेळकर

बिर्ला काॅलनी

जठारपेठ 

अकोला


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा