२००६ की २००७ ची एक पत्रकार परिषद, तेव्हा गृहमंत्री म्हणून आबा लोकप्रियतेच्या शिखरावर होते व पत्रकार परिषदेत हिंदी मध्ये उत्तरे द्यायची त्यांची हौसही जोरात होती.

कुठल्या तरी अट्टल गुन्हेगारांना पकडल्या बद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले. त्यावर कुणा हिंदी वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना विचारले की अब इस मामले में आपकी सरकार क्या करेगी?

यावर आबा चटकन म्हणाले की, उन्हे शिक्षा मिले इसका हम पूरा प्रयास करेंगे. जेव्हा कुणीतेरी ही चूक आबांच्या लक्षात आणून दिली व समजावले की मराठीमधली शिक्षा म्हणजे हिंदीतले शिक्षण, आबांनी सजा असे म्हणायला हवे होते.

त्यावर आबांनी पत्रकारांना विनंती करून नव्याने बाईट दिला व यावेळी शिक्षेऐवजी सजा देंगे असं ते म्हणाले.

 लोकसभा निवडणूक १९८४. बारामती मधून शरद पवारसाहेब (स. काँग्रेस) आणि शंकरराव पाटील (काँग्रेस) असा प्रमुख सामना होता.

पवारसाहेबांची आकुर्डीच्या सभेमधील भाषणातील काही वाक्ये -
".... आजच टाईम्समधे गेल्या पाच वर्षांत ज्यांनी लोकसभेत एकही प्रश्न विचारला नाही अशा खासदारांची लिस्ट आली आहे.
त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २८ खासदारांची नावे आहेत. त्यात पहीले नाव आहे शंकरराव बाजीराव पाटील. या माणसानी लोकसभेत फक्त दोन वेळा तोंड उघडले. पहील्यांदा खासदारकीची शपथ घ्यायला. कारण त्याशिवाय खासदारकीचे बेनीफिट मिळत नाहीत. आणि दुस-यांदा जांभई दयायला..."

 लालबहादूर शास्त्रींनंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान बनविण्यात कामराज, निजलिंगप्पा, अतुल्य घोष इत्यादी सिंडिकेटचा महत्वाचा वाटा होता. १९६७ च्या निवडणुकांपर्यंत इंदिरांना पंतप्रधानपदी ठेवायचे तोपर्यंत त्यांना कठपुतलीप्रमाणे कसेही फिरवता येईल असा त्यांचा कयास होता.पण तो कयास जोरदार फसला. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदी आल्यावर स्वतःचा इंगा दाखवून द्यायला सुरवात केली. १९६६ मध्ये रूपयाचे अवमूल्यन करायचा निर्णय इंदिरा गांधींच्या सरकारने घेतला.हा निर्णय सिंडिकेटला फारसा रूचला नव्हता.त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी "Great man's daughter--small man's mistake" असे म्हटले. म्हणजे Great man's (नेहरूंच्या) daughter (इंदिरांना) पंतप्रधान बनविणे ही small man's mistake होती. इथे small man हे कामराजांनी स्वतःला उद्देशून म्हटले.

 १९९६ साली अट्लबिहारी वाजपेयीं पंतप्रधान असताना विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आणला व NDA सरकार १३ दिवसात पडलं.त्यानंतर तिस-या आघाडीला बाहेरुन पाठींबा देऊन काँग्रेसनी देवेगौडांना पंतप्रधान केलं. त्या वेळी संसदेच्या पहिल्याच सत्रात प्रमोद महाजन बोलत होते. सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात त्यांनी तुफानी आतिषबाजी केली होती. त्या वेळच्या तडजोडीच्या राजकारणावर सडकुन टिका करताना त्यांनी एक किस्सा सांगायला सुरुवात केली.एकदा भारतीय सर्व-पक्षीय संसदीय मंडळ चीनच्या दौर्यावर गेले होते,त्यावेळी एका चिनी राजकारणी माणसाने महाजनांना भारतीय लोकशाही बद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले," हम जब चीन मे गये तो बहुत सारे लोग हमारे साथ थे| तब मुझे किसीने पुछा आपकी democracy कैसे चलती है? मैने कहा की democracy समझाने से अच्छा मैं सिर्फ आपको अपने सहचारिंओंका परीचय करवां देता हूं आप खुद ही भारतीय democracy समझ जायेंगे. मैंने कहा..'I am Pramod mahajan, I am member of Loksabha, I belong to single largest party in the house.. and I am in opposition!' फिर मैंने श्रीवल्लभ पाणिग्रहींकी ओर हाथ करे बोला,'He belongs to second largest party (Congress). He is outside the Government..supporting the Government', फिर मैंने अहमद बेदी साहाब को उठाया और कहा,'He is in third largest party(Janata Dal).. he is inside the front but out side of government' और फिर मैंने कहा,'he is Mr. Ramakant Khalap,( Maharashtrawadi Gomantak Party) he is the only member of his party and he is in the government!!(Law Minister)'...

 लॉयड जॉर्ज/ लिंकन एकदा निवडणूक प्रचारासंबंधात एक "नुक्कड़ सभा" सारखी सभा घेत होते तेव्हा प्रेक्षकात बसलेला एक टारगट बाप्या ओरडला

"ह्याचा बाप एक जुना खटारा चालवत असे ज्याला घोड्या ऐवजी गाढ़वे जुंपलेली असत!"

ह्यावर अजिबात तोल न ढळू देता लॉयड जॉर्ज / लिंकन मिश्किलपणे म्हणाला की

"आज आमचे पिताजी जिवंत नाहीत किंवा त्यांचा तो खटारा ही अस्तित्वात नाहीत पण त्याला जुंपलेली गाढ़वे मात्र अजुन जिवंत आहेत"

 १९६२ सालच्या चिनी आक्रमणा नंतर पं. जवाहरलाल नेहरू , आपण गमावलेल्या १२,००० चो. मैलाच्या भुभागाचे , न पटणारे समर्थन करीत असतांना म्हणाले , " नाहीतरी त्या जमीनीवर गवताचे एक पाते उगवत नव्हते, जमीन काही कामाची नव्हतीच. " त्यावर श्री पिलू मोदी हे गुजराथ मधील खासदार , नेहरुन्च्या , तुळतुळीत टकलाकडे पाहून म्हणाले, " आपल्याही डोक्यावर असेही काही उगत नाही, तेही आपल्या काय कामाचे ? " लोकसभेत हंशा पिकला हे सांगायला नकोच.

 लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. ( कोणत्या साली ते आठवत नाही, जाणकारानी शोधुन लिहावे ) केरळमधुन काँग्रेसचे खासदार जाफर शरीफ निवडून आले होते. पहिलाच दिवस असल्याने , खासदारांचा शपथविधी सुरु होता. जाफर शरीफ यांचे नाव पुकारले गेले आणि नेमक्या त्याच वेळेला ते बाहेर निघून गेले होते. त्यावेळी नाथ पै की मधू दंडवते कोणीतरी पटकन म्हणाले , " हमारे में एक ही तो ' शरीफ ' था , वो भी बाहर गया है '! !

 अमेरीकेतील नागरी युद्धाच्या काळातला हा एक किस्सा -

दक्षिणी राज्यांविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत उत्तरी राज्यांचा मॅक्लेलान नावाचा एक सेनापती होता. हा मॅक्लेलान आपले रिपोर्ट पाठवण्याबाबत कमालीचा आळशी होता. त्याच्या एखाद्या चकमकीचा अहवाल बर्‍याचदा महिन्याभराने लिंकनच्या हाती येत असे! वैतागून लिंकनने एकदा त्याला रोजच्यारोज डिटेल रिपोर्ट पाठवण्याचा सक्तं हुकूम सोडला.

"आज आम्ही शत्रूच्या चार गाई पकडल्या आहेत!" मोजून दोन दिवसांनी मॅक्लेलानचा संदेश आला!
"ताबडतोब दूध काढून सैनिकांना पिण्यास द्या!" लिंकानने उत्तर पाठवलं!

 सर विन्स्टंट चर्चिल हे पंतप्रधान असताना, एकदा आजारी असून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यांना भेटायला विरोधी पक्षाचे काही सद्स्य हॉस्पिटलमध्ये आले होते. नेमके त्याचवेळी, एक नर्स, त्यांचा नैसर्गिक विधी उरकून, ते भांडे घेऊन चालली होती. रुममध्ये त्यावेळी उपस्थित विरोधी पक्ष सदस्याना बघून सर विन्स्टंट चर्चिल म्हणाले, "First time I am seeing my 'motion' being carried unopposed.”

 जॉर्ज बर्नाड शॉने एकदा आपल्या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाची दोन तिकीटं चर्चीलला पाठवली. सोबत एक खवचट चिठी होती.

"तुला एखादा मित्रं असलाच तर त्याच्याबरोबर नाटकाला ये!"
"तुझ्या नाटकाचा दुसरा प्रयोग झालाच, तर नक्की येईन!" चर्चीलने त्याच कागदावर खाली लिहून पाठवलं!

चर्चील आणि नॅन्सी अ‍ॅस्टर (ब्रिटनच्या पहिल्या महिला खासदार) यांच्यातला किस्सा आहे.

चर्चिल हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिध्द होते. एकदा विरोधी पक्षाच्या सदस्या चिडून त्यांना म्हणाल्या," मी जर तुमची पत्नी असते तर तुमच्या चहात विष मिसळले असते." क्षणाचाही विलंब न लावता चर्चिल उत्तरले,"मी जर तुमचा नवरा असतो तर तो चहा आनंदाने प्यायलो असतो!"

 बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तान चा न भूतो न भविष्यती असा पराभव केल्यावर फील्डमार्शल सॅम माणेकशॉ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. पंतप्रधान म्हणून इंदिराजींनि खेळलेल्या राजकीय डावपेचांबद्दल त्यांनाही यथोचित श्रेय मिळतच होते.

पंतप्रधान व सैन्यप्रमुख म्हणून दोघांचेही संबंध सलोख्याचे होते. परंतु या दिग्विजयी कामगिरीनंतर इंदिराजींच्या भोवती असलेल्या काही विघ्नसंतोषी मंडळींनी इंदिराजींचे कान भरणे सुरू केले की माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर उठाव करणार आहे.

आपल्या देशाच्या सुदैवाने इंदिराजींनी कुठलेही अविचारी पाऊल न उचलता सरळ माणेकशॉ यांना पाचारण केले व स्पष्ट शब्दांत याबाबत विचारणा केली. सॅम यांनी अगदी सहजणे उत्तर दिले.

देवाने आपल्या दोघांनाही चांगले धारदार नाक दिले आहे जे आपण दोघेही एकमेकांच्या कामात कधी खुपसत नाही व यापुढेही खुपसणार नाही.

 इंग्लंडच्या उच्च संसदीय परंपरांचे उदाहरण म्हणून सांगितला जाणारा एक किस्सा...


एकदा इंग्लंडचे अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडण्यासाठी तेथील संसदेत पोचत होते. प्रवेशद्वारापाशीच एक विरोधी सदस्याला सिगारेट ओढताना पाहून ते कुत्सितपणे म्हणाले, 'महोदय, उद्यापासून ही चैन आपल्याला परवडणार नाही'.


अर्थसंकल्प मांडून झाल्या झाल्या तो विरोधी सदस्य उभा राहून म्हणाला की अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे म्हणून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. संपूर्ण सभागृह अवाक होवून पाहत असताना त्या सदस्याने सकाळचा किस्सा समजावून सांगितला. अर्थसंकल्पात तंबाखुजन्य पदार्थांवरील कर वाढवल्यामुळे सकाळी बोललेले वाक्य म्हणजे अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा शपथेचा भंग केलेला आहे.


अन आपल्याला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे अर्थमंत्र्यांनी हा आरोप मान्य करून तडक राजीनामा दिला व तो लगेच मंजूरही करण्यात आला.

 महाराष्ट्र विधानसभेत एकदा सर्व सदस्यांच्या छापील माहितीच्या सूचीवरुन चर्चा झाली. या सूचीत अनवधानाने सर्व महिला सदस्यांच्या इंग्रजीतील नावामागे मिस लावले होते. याला विवाहित महिला सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावर सभापती मधुकरराव चौधरी यांनी ती चूक दुरुस्त करण्याचा आदेश दिला आणि गंमतीने महिला सदस्यांकडे पाहून म्हणाले, ' मला खात्री आहे. सन्माननीय सदस्या आता 'मिसप्रिंट' वर आक्षेप घेणार नाहीत.

 खासदार पिलू मोदी हे मिश्किल गृहस्थ होते. लोकसभेत त्यांच्या विधानांनी खसखस पिकत असे. ते काही वेळा बिनधास्त बोलत असत. एकदा भाषणात टीका करताना ते म्हणाले, 'काही दुय्यम नेते आता स्वतःला सरकार समजू लागले आहेत. यांची पात्रता ती काय? हे नुसते आपल्या विद्यमान पंतप्रधानांचा पेटिकोट पकडून चालत चालत आलेत.' त्यावर सत्तारुढ सदस्यांनी 'पेटिकोट' शब्दाला आक्षेप घेतला आणि तो शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. अध्यक्षांनी त्यावर मोंदीकडे पाहिले. तर मोदी म्हणाले, 'महोदय, पण पेटिकोट काढून टाकला तर मग उरलं काय?' यावर तत्कालीन पंतप्रधानांनाही हसू आवरले नाही.

 दादाराजे खर्डेकर सातार्‍यात एक निवडणूक सभा घेत होते.

भाषण संपल्या नंतर लोकानी घोषणा दिल्या

शरद पवार झिंदाबाद.

त्यानंतर कोणीतरी जोरात ओरडले "दादा राजे......"

लोकाना जय म्हणावे /झिंदाबाद म्हणावे हे कळाले नाही एकदम शांतता पसरली.

कोणीतरी त्या घोषणेला उत्तर दिले ".खर्डेकर........"

सभेत एकदम हशा पिकला

 आचार्य कृपलानी हे प्रजा समाजवादी पक्षाचे तर त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी Congress पक्षाच्या खासदार होत्या. आचार्य कृपलानींनी त्यांच्या भाषणात Congress पक्षावर टिका करायला सुरवात केली. अर्थात त्यांच्या पत्नी त्याच पक्षाच्या खासदार म्हणून त्याच सभागृहात उपस्थित होत्या. आचार्य कृपलानी पुढे म्हणाले: "I knew that congressmen are crooks. Still I never expected them to run away with the wives of members of opposition parties". यावर सभागृहात हशा पिकला हे वेगळे सांगायला नको.

 एकदा महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री पार्वतीबाई परीहार ह्या त्या वर्षातील साहीत्यसंमेलनाध्यक्ष शंकरराव खरात यांच्या समवेत एकाच स्टेजवर कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्या बोलायला उठल्या पण एकदम शंकररावांचे नाव डोक्यातून गेल्याने (आपले हे, असे काहीसे म्हणत) अडखळल्या. म्हणून कोणी तरी पटकन सांगितले. कार्यक्रम सुरळीत पार पडला. पण दुसर्‍या दिवशी एका वृत्तपत्रात मथळा होता: "पार्वतीबाई, शंकररावांना विसरल्या!" 

 एका बिल ला त्यांचा पक्ष समर्थन करणार का असे विचारले असता तो नेता म्हणाला...


आय विल... (समर्थक खूश)


नॉट... (विरोधक खूश)


टेल यु... (हशा नि टाळ्या)

 बाळासाहेब भारद्यांनी केलेली भारतीय राजकारणाची व्याख्या: "काँग्रेसवाल्यांच्या खुर्च्या, जनसंघाच्या पुजाअर्चा, समाजवाद्यांच्या चर्चा आणि कम्युनिस्टांचा मोर्चा"

रंग

 थेंबउणें ऊन 

माळावर जळे, 

कांचेवर तडे 

श्रावणाच्या. 


स्तनांवर माझ्या 

जांभळाची झाक;

ओली आणभाक 

आठवते.


दि - 18/01/1958 

नागपुर

 भांजा – भतीजांना चिकटवून वशिलेबाजी करणे, लिंकनला अगदी नापसंत असे. तरी त्याचे नातेवाईक, गाववाले अनेकदा त्याला गराडा घालीत आणि आपली वर्णी लावण्यासाठी तगादे लावीत. त्या सर्वांना थोडा वेळ बसायला सांगून एकदा लिंकन म्हणाला, ‘मी तुम्हांला आधी एक गोष्ट सांगतो. कोणे एके काळी सगळे प्राणी आळीपाळीने एकेकाला आपला राजा करीत. होता होता गाढवाची पाळी आली. गाढवाचे भाईबंद आपल्याला अधिकार मिळावा म्हणून एकच हाकाटी करू लागले. तेव्हापासून जगात तीच पद्धत पडली. आजही त्याचेच भाईबंद हक्कानं वशिला लावायला येतात.’

 एकदा लिंकन आपल्या बुटांना पॉलिश करीत बसला असता, एक घमेंडखोर ब्रिटिश वकील तिथे आला आणि त्याने तुच्छतेने लिंकनला विचारलं – ‘काय प्रेसिडेंटसाहेब, तुम्ही तुमच्या बुटांना पॉलिश करता?’ त्याची टवाळखोरी आपल्या लक्षात न आल्याचा बहाणा करून लिंकन म्हणाला, ‘होय महाराज, मी माझ्या बुटांना पॉलिश करतो. आपण कुणाच्या बुटांना पॉलिश करता?’

अनर्थ - अच्युत गोडबोले

1. शेतीचा पाया भक्कम झाल्यावर उद्योगधंद्यांत वाढ होणं आणि उद्योगधंद्यांचा पाया भक्कम झाल्यानंतर सेवाक्षेत्र वाढीला लागणं ही नैसर्गिकरीत्या सुदृढ आणि टिकाऊ प्रक्रिया असते.


2. शेतीतल्या 1% वाढीमुळे जे दारिद्र्यनिर्मूलन होतं, तेवढं दारिद्र्यनिर्मूलन व्हायला इतर क्षेत्रांमध्ये 2-3% वाढ व्हावी लागते.

3. जेव्हा जीडीपी ओळीनं 6 महिने कमी होतो, तेव्हा त्याला ‘मंदी’ असं म्हणतात.

4. अमेरिकेत बीफला खूप मागणी आहे. तिथे हॅम्बर्गर सर्वात प्रिय आहे. त्यासाठी लाखो जनावरांना कमीतकमी 18 महिने खाऊ-पिऊ घालावं लागतं. त्यांना चरण्यासाठी आणि त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी जमीन मिळावी म्हणून अ‍ॅमेझोनमध्ये प्रचंड प्रमाणात जंगलतोड झाली; आणि त्याचा पर्यावरणावर खूपच वाईट परिणाम होतो. म्हणूनच अमेरिकेत बीफ तयार न करता ते ब्राझील आणि इतर देशांमधून आयात केलं जातं. पण या प्रकारामुळे अ‍ॅमेझोनमधली लाखो हेक्टर सदारहित जंगलं नष्ट झाली आहेत. म्हणूनच याला ‘हॅम्बर्गर इफेक्ट’ म्हणतात.

5. प्रत्येक गोष्ट देवाच्या कृपेनं होत नसून त्यासाठी वैज्ञानिक कारण असतं आणि आपण ते शोधून काढलं पाहिजे, ही संशोधक वृत्ती आणि आपलं कुतूहलच तरुणपणापासूनच मारलं जात असेल तर काय करणार?

6. आर्थिक सल्लागार अरविंद पानिग्रहिया यांनी लिहिलेल्या लेखाप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 16 कोटी रु. (22 लाख डॉलर्स) गुंतवले तर त्यामुळे फक्त 1 रोजगार निर्माण होतो. याउलट बंगलोरमधल्या श्लोक इंडस्ट्रीजमध्ये 16 कोटी रु. गुंतवले तर 266 लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे चक्क 266 पट!! थोडक्यात आपण यांत्रिकीकरण किती वापरतो, त्यावर रोजगार कसा अवलंबून असतो याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे.

7. प्रत्यक्ष किंवा थेट (डायरेक्ट) करांचे दर वाढवणं, वेल्थ आणि वारसाहक्काची संपत्ती यावर कर लावणं, कॉर्पोरेटस्ना करमाफी/करसवलती न देणं, टॅक्स हेवन्सवर नियंत्रण ठेवणं आणि काळा पैसा बाहेर काढणं या पाचही गोष्टींचा विचार केला, तर सरकारला जीडीपीच्या साधारणपणे कमीतकमी 20% जास्तीचं उत्पन्न दरवर्षी मिळू शकेल. तसं झालं; तर पुढची अनेक वर्षं शिक्षण, आरोग्य, पेन्शन, स्वस्त घरं, रोजगार, सार्वजनिक वाहतूक, पाणी, वीज, टॉयलेटस् अशा अनेक कल्याणकारी गोष्टींवर डेफिसिट न वाढवता भरपूर खर्च करता येईल.

8. जीडीपीच्या मोजमापात कित्येक गोष्टी झाकल्या जातात. उदाहरणार्थ, समाजातली विषमता जीडीपीच्या आकड्यात दिसून येत नाही. प्रचंड विषमता असली, तरी गरीब आणि श्रीमंत या दोघांच्या उत्पन्नांची जीडीपीमध्ये बेरीज केलेली असल्यामुळे राष्ट्रातली बहुतांशी जनता गरीब असली, तरी राष्ट्राचा जीडीपी मोठा असू शकतो. तसंच जीडीपीवरून राष्ट्रातलं शिक्षण, आरोग्य आणि एकूणच लोकांसाठीच्या सोयी, सुविधा, त्यांचं संगोपन, त्यांचं समाधान आणि त्यांचा आनंद यांच्याविषयी काहीच कल्पना येत नाही.

व पु काळे

 1. भावनाधीन होऊन चालत नाही. माणसानं विवेक धरावा, व्यवहारी बनावं. भावना फार काळ उपयोगी पडत नाहीत ह्या जगात.’


2. भावनेला विवेकाची पराणी हवीच. स्वप्नाला जाग हवी.

3. समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दु:खी होत नाही आणि पुष्कळदा स्वत:ला सुखी समजणारी माणसं ही केवळ सवयीनं सुखी झालेली असतात. काही ठराविक गोष्टींचा लाभ होणारी, जशी शेकडा नव्वद टक्के माणसे असतात, त्यांचे संसार चालतात, त्यांच्यात व आपल्यात फरक नाही, ही जाणीव असणं, ह्यानंच कैक लोक स्वत: सुखी आहोत असं मानतात.

4. मानसिक अस्वास्थ्य हे प्रत्यक्ष भोगत असताना जाणवत नाही; तर त्याचा लोप झाल्यावरच, त्या औदासीन्याचा आपल्यावर केवढा पगडा बसला होता हे जाणवतं!

5. मुलं मोठी झाली की दुरावली. जोपर्यंत ती परावलंबी असतात तोवर ती आईवडिलांची असतात.

6. जी जागा आपल्याला खूप सुरक्षित वाटते तीच गोत्यात आणते.

7. उत्तरं मिळवायची असली की पाठ फिरवल्यानं ती मिळत नाहीत, परिस्थितीला तोंड देऊन ती मिळवायची असतात

8. असामान्य समस्या, असामान्य उपायांनी सुटतात.

9. एखाद्या गोष्टीचा काही विशिष्ट अर्थ आपल्या मनात असला की इतर सगळीजणं त्याच अर्थानं त्या गोष्टीकडे पाहात आहेत की काय असली शंका यायला लागते.

10. उत्तम स्मरणशक्ती असणं हा केव्हा केव्हा शापच! सगळं कसं वैशाखातल्या उन्हासारखं लख्ख आठवतं.

11. तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणजे बिघडला

12. पुरुष ही परमेश्वराची शक्ती, तर स्त्री ही त्याची प्रत्यक्ष मूर्ती

13. स्वास्थ्यापेक्षा आपत्तीच माणसाला अंतर्मुख बनवते, क्रियाशील करते.

तू भ्रमत आहासी वाया - वपू काळे

1. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.


2. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही

3. एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत. आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.

4. सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे, असं एखादं दुःख.

5. प्रियकर परिपूर्ण असतो. नवऱ्याला मार्यादा असतात. कारण संसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं. ‘मी’ उरत नाही म्हणून संघर्ष नसतो. संसारात तसं होत नाही.’ ‘मी’ हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही.

6. प्रचिती आली की ती तुमची तत्त्वं होतात आणि तुमची तत्त्वं इतरांची थेअरी होतात.

7. कबुतराला गरुडाचे पंख लावता येत नाहीत. कदाचित् लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही.

8. रडताना कुणी फोटो काढत नाहीत. रडणं भोगायचं असतं. हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं.

9. एखाद्या गोष्टीच्या अज्ञानाचं जितकं शल्य नसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्या अज्ञानावर कुणी बोट ठेवलं तर होतं. हे बोट जर अधिकारी व्यक्तीनं ठेवलं तर जळजळ जरा कमी. निदान मग ती व्यक्ती किमान देखणी हवी.

10. ज्या गोष्टींवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं तर ते प्रेमच नाही. त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं. तिथं समर्पणाचा प्रश्न उद्‌भवत नाही

11. स्वतःजवळ जे असतं तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो

12. ज्ञानी माणूस हयात असतो, तोपर्यंत तो धोकादायकच असतो. तो ढोंगांवर प्रहार करत राहतो. तो गेल्यावर त्याच्यापासून कसलाच वैचारिक उपद्रव नाही. मग त्याच्या आरत्या गायच्या, अभंग म्हणायचे, शेवटी पुतळे उभे करायचे. ज्ञानी माणसांना त्यांच्या हयातीत आणि मेल्यावरही कावळ्यांच्याच सहवासात राहावं लागतं. जिवंतपणी चोचा मारणारी माणसं आणि पुतळ्यांच्या नशिबी...

13. अगदी क्षुल्लक कारणासाठी, वेळ निभावून नेण्यासाठी माणसं इतकं खोटं बोलतात की तो त्यांचा स्वभावधर्म बनतो. अशी माणसं सतत मग तणावाखाली वावरतात.

14. पागल झाल्याशिवाय प्रेम संभवतच नाही. जिथं हिशोब नसतो, विचार नसतो, संयम नसतो, तिथंच प्रेमाचा उगम होतो. प्रेम महापुरासारखं असतं. तिथं किनारे हरवतात. जिथं तर्क आहे, तिथं स्वतःचा बचाव आला.

15. वस्तुत्त्वानं असणं आणि अस्तित्त्वानं असणं ह्यात फरक आहे.

16. ऑफिस म्हणा, घर म्हणा, तिथं वास्तुपेक्षा आपण मोठे असतो. मालकीचा अहंकार तिथं बोलतो. आपण क्षुद्र आहोत ह्याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठीच समुद्राजवळ बसायचं असतं. निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते.

17. कोणत्याही माणसाला फसवणारा दुसरा माणूस नसतो. कुणाची हिंमतच नसते. आपण गुलाम व्हायला तयार असतो, तिथं फसतो. कोणत्याही क्षणी आपण आपलं मालक असलो पाह्यजे.

18. वस्तू वापरण्यापेक्षा, ती आपल्यापाशी आहे, ह्याचाच आनंद.

19. सर्वात मोठा धर्म कोणता ? -तर ‘प्राण आहे तोपर्यंत जगणं’ हाच धर्म मोठा.

20. निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाचीच एक निर्मिती असूनही माणसाला उबग येतो, ह्याचं कारण काय ? -तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो. भूतकाळावर अलोट प्रेम. पार केलेलं दु:खही आठवत बसायचं

21. जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म.

 नातरीं येथिचा दिवा । नेलिया सेजिया गांवा ।

 तो तेथें तरी पाडवा । दीपचि कीं ।।

या गावात तेवत असलेला दिवा जरी दुसऱ्या गावाकडे नेला तरी तो दिवाच असतो. प्रकाश हा त्याचा धर्म आहे. चहुकडे केवळ प्रकाशच देणारा जसा दिवा असतो

गुलमोहर - व पु काळे

1. आपत्ती पण अशी यावी की, त्याचाही हेवा वाटावा इतरांना – आणि व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये – चांगलं दोनशे फुटांवरून पडावं. माणूस किती उंचीवर पोहचला होता ते तरी जगाला कळेल


2. प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो.

3. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ एकदाच येते. तो क्षण निसटू द्यायचा नसतो.

4. पहिलं दु:ख येतं ते डोळ्यांवाटे. पहिला मोह नजरेचा. ही नजर एकदा बिघडली की माणूस बिघडला

5. बाह्य जगावर, सजावटीवर भुललेला माणूस स्वत:त डोकावून पाहूच शकत नाही. पापमार्गाकडे वेगाने नेते ती दृष्टी.

6. आपली सतत कीव केली जाते यासारखी दु:खदायक गोष्ट नाही.

7. पोट भरण्यासाठी जेव्हा पुण्य धावून येत नाही तेव्हा पापच करावं लागतं.

8. चोरांना, दरोडेखोरांना किंवा खुन्यांना, एवढं माहीत असतं की देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही. तो काही बोलतच नाही. तेव्हा देवाची भीती काही नाही. जी काय भीती आहे ती माणसाची माणसाला. माणूसच माणसाला केव्हातरी पकडतो. माणसाला चुकवलं म्हणजे झालं.

9. अनोळखी माणसंच ओळखीची होतात आणि ओळख नसतानाच्या काळातले प्रश्न विचारून केव्हा केव्हा बेजार करतात.

10. देवाला दु:ख म्हणजे काय हे कळलं असतं तर त्यानं ते निर्माणच होऊ दिलं नसतं.

11. आपण वाहतो म्हणून ढग हालचाल करतात, समुद्रावर लाटा येतात, वणवा भडकतो, पाचोळा उडतो, त्याची जाणीव वाऱ्याला नसेल का? तो वाहतोच.

12. पळून जाणं एकदम सोपं. तेव्हा ते केव्हाही करता येतं. पळण्याची वाट केव्हाही हाताशी आहे हे गृहीत धर आणि परत आपल्या घरी जा. आधी जे अवघड आहे ते सोडवायचा प्रयत्न कर. कारण सोपी गोष्ट आपल्या मालकीची आहे

13. खरं प्रेम कमी पडतं; पण खोट्या प्रेमाला तूट पडायचं कारणच नव्हतं. अभिनयच करायचा हेच जिथं ठरवलेलं तेव्हा कमी पडायचं कारणच नव्हतं.

14. आजारी माणसाच्या बुद्धीवर ताबा असतो तो त्रासलेल्या शरीराचा. आजारपणातले माणसाचे निर्णय कधीच व्यवहार्य नसतात.

15. प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण फक्त स्टेशनपर्यंतच पोचवतो. पुढचा प्रवास त्यालाच करावा लागतो.

16. स्वत:च्या रूपाचा अहंकार जळाला तेव्हा इतर सौंदर्य दिसायला लागलं.

17. माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात.

18. जोडीदाराची निवड कानांनी करावी, डोळ्यांनी करू नये.

19. प्रेमाच्या राज्यात माणूस कधीच मोठा-वयस्कर होत नाही.

20. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण जर स्वत:ला पाहू शकलो, तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील.

21. अति ऊ-तिला खाज नाही आणि अति ऋण त्याला लाज नाही.

22. मासळी आणि पाहुणा कितीही चांगला असला तरी तीन दिवसांनंतर वास मारू लागतात.

 चोखाळपण रत्नांचे । रत्नावरी किरणांचे ।

 तैसे पुढा मन जयाचें । करणें पाठी ।।

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रत्नाचे शुद्धपण जे असते तेच फार वेधक असते. त्यावर किरण पडल्यावर त्या शुद्धपणाला झळाळी प्राप्त होते. ती रत्नाची आभा अधिक चोखळ होते. अगदी तसेच काहींचे मन असते. शुद्ध, स्फटिकासारखे स्वच्छ आणि पारदर्शक, ते मन सतत प्रकाशत रहाते त्या रत्नासारखे. त्याची स्वयंप्रकाशी झळाळणारी कृती मग मागोमाग उमटतेच. पण प्रकाशाचा मार्ग ते रत्न पहिल्यांदा दाखवते.

 जैसा दीपे दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । 

तैसा सर्वस्वे जो मज भजें । तो मी होऊनि ठाकी ।।

दिव्याने दिवा लावला की सर्वच दिवे उजळू लागतात आणि मग ह्या प्रकाशाच्या वाटेवरचा पहिला कोणता तेच लक्षात येईनासे होते. तसे कृष्णभक्तीत सर्वस्वाने बुडून गेलेला अर्जुन शेवटी श्रीकृष्णरूप होऊनच उरतो.

 सुखी संतोषा न यावें । दुःखी विषादां न भजावे ।

 आणि लाभालाभ न धरावें । मनामाजीं ।

सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान होऊन नाचू नये की दुःखाचा झंझावात अवघं आयुष्य समूळ नष्ट करायला लागला म्हणून विषादाचा विलाप करू नये. मनातल्या अंतर्मनातसुद्धा लाभ आणि हानी यांची चित्रे उमटू देऊ नयेत,

वपू 85

1. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

2. जिथं आव्हान असतं, तिथंच ताजेपणा असतो.

3. भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते. नव्यानं होणाऱ्या अपमानांची शल्यं बोथट होतात.

4. स्वप्नं आपली काळजी घेतात. आपणही त्यांची देखभाल करायची असते.

5. आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात, तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्यानं एकदा स्वतःची गती घेतली, की उरलेला प्रवास आपोआप होतो. तसंच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात, की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

6. जी माणसं जाणिवेनं जगतात, ती नुसतीच दुःखाची कारणमीमांसा शोधून थांबत नाहीत, तर एखाद्या सौख्याचेही आपण भागीदार का झालो, याचाही ते वेध घेतात. अशी माणसं, ज्या सुखाला आपण पात्र नाही, त्याकडे पाठ फिरवतात. कधी-कधी.

7. सिंहगड पाहायचा असेल, तर तो पायी चढत चढतच बघायला हवा. मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलात, की विज्ञानाचा चमत्कार समजतो, इतिहास समजत नाही.

8. व्यक्तींच्या वृत्ती वास्तूंना व्यापून उरतात. काही काही वास्तू ‘याच’ म्हणतात. काही काही ‘यायचं असेल, तर या’ इथपासून ‘नाही आलात, तरी चालेल’ इथपर्यंत सगळं सांगतात.

9. प्रारंभासाठी सगुण-साकाराची ओढ ही महत्त्वाची बाब आहे; पण कितीही देखणेपणा-देखणेपणा म्हटलं, तरी त्याला सगुण-साकाराच्याच मर्यादा छळतात. नावीन्य आणि परिचय या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिणी! मोर अधूनमधूनच, केव्हातरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणे वाटतात, म्हणून; वृत्ती जुळतात, म्हणून! मैत्रीची वीण जास्त पक्की होते, ती वेदना आणि संवेदना एकच होतात; म्हणून! नावीन्याची ओढ ही एक सहजावस्था आहे.

10. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते, हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत.

11. अर्थात परमेश्वराचं देणं असंच असतं. मोजमाप नाही, हिशेब नाही.

12. किंमत मोजल्यावरच एखाद्या गोष्टीचा लाभ होतो, असा दृष्टिकोन ठेवला, तर सौख्याला कडकडून भिडता येतं.7

13. फुप्फुसं तुडुंब होईतो प्राणवायू घेता येणं हे जगातलं सर्वश्रेष्ठ असं, इंद्रपदापेक्षा श्रेष्ठ सौख्य आहे

14. जे अमूर्त आहे, त्याला मूर्त करू नये. जे अमूर्त आहे, ते निराकार आहे. जे निराकार असतं, ते अनंत असतं. विश्व व्यापून उरतं. स्वप्नं तशीच असतात. ती तशीच ठेवा. तुम्ही स्वप्नांची छायाचित्रं बनवलीत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत. छायाचित्रं सप्तरंगात कोंडता येतात. रंगांनी ओथंबलेली छायाचित्रं थोड्याच वेळात जुनी का वाटतात? आणि स्वप्नं कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो. त्याचं नाव अंतरंग. तुम्ही तुमची स्वप्नदृष्टी चौकटीत बांधायला निघालात, मग कोंडमारा का होणार नाही

15. प्रत्येकानं काही ना काही वेड घेतलेलं असतं. केवळ शरीरानं जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात. मन नावाची ठिणगी आहे, ती सातत्यानं प्राणवायूच्या शोधात असते. पण तरीही, आपण घेतलेल्या वेडाला, कुणीतरी ते वेड नसून शहाणपण आहे, असं म्हणावं, ही इच्छा असते. अशा दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेनं चालू असतो.

16. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, याचं उत्तर पण नियतीजवळच असतं.

17. कोर्टात न्याय मिळत नसून, कोर्टात जे मिळतं, त्याला न्याय म्हणावा लागतो.

18. वेगवेगळ्या मुखवट्यांचा आधार फक्त दुःखाला शोधावा लागतो. सुख, शांती, समाधान या स्वयंप्रकाशित गोष्टी असतात. तृप्त माणसाला नैराश्याचा आव आणताच येत नाही.

19. गणित येत नसलं की त्याची भीती वाटते. मग घड्याळाचीही दहशत वाटते. कारण काळवेळाचं भान म्हणजेच गणित! पण आकडेमोडीतली गंमत कळायला लागली की गणित हा खेळ होतो. माझ्या मुलांना मी आयुष्य खेळायचं कसं हे पटवलं.

20. कारण सांगूच नका, सगळी गंमत निघून जाईल. पृथक्करणाच्या पलीकडे काही आनंद असावेत.

21. जाब न विचारणारी एक जागा प्रत्येक कर्तबगार व्यक्तीला हवी असते.

22. रंगलेल्या गप्पा संपल्या, की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरू करण्यात आणखी एक आनंद असतो. गप्पा चालू असताना शब्दाधीन असलेला आनंद मिळवायचा असतो, तर नंतरच्या स्वगत मैफलीत शब्दातीत आनंद शोधायचा असतो. पहिल्या मैफलीत नाद असतो तर दुसऱ्यात गंध!

23. आपलं आयुष्य, आपणच त्याचे साक्षी होऊन बघायचं असतं

24. पूजेला काहीही चालतं, याचा अर्थच हा, की धर्म सांगतो, साधनांसाठी थांबून राहू नकोस. कार्य करीत राहा. तो वरचा, आकाशातला बाप तर तुमच्याकडे काहीच मागत नाही. बाजारातून एकूणएक वस्तू जरी गायब झाल्या, तरी आपल्या धर्मात पूजाअर्चा होऊ शकते. दोन हात आणि एक मस्तक तर नाहीसं होत नाही ना?

25. जे आहे, ते लपत नाही. जे मुळातच नसतं, ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. शब्द तिथं कमी पडतात.

26. प्रेमाची भावना ही इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे की, नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.

27. माणूस तसा हा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत. जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्त्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते.

28. सांत्वनाच्या भाबड्या शब्दांच्या आधारापेक्षा एक नवी विचारांची दिशा जास्त धीर देते

29. रडण्याचं नातं दुबळेपणाशी जोडण्यात काही अर्थ नाही. रडण्यात कृतज्ञता असते.

30. कोणतीही संस्था प्रामाणिक व स्वाभिमानी सेवकांच्या जिवावरच चालते. पदाधिकाऱ्यांना मात्र तोंडपुजे लोक हवे असतात.

31. आपलं सामान काही काळच दुसरा माणूस उचलतो, हेच खरं! ओझं त्याच्या हातात, पण दडपण आपल्यावर!

32. ज्याच्यामागे चिकार कामं असतात, तोच आणखी काम घेऊ शकतो, कारण त्याला पहिली कामं संपवावी लागतात.

33. जो नवा विचार देतो, तो गुरू!

34. प्रेमाचा उत्स्फूर्त पुकार हा एकेरीच असतो.

35. प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती लागते. स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं. अर्पणभावाचा कोंब त्याशिवाय फुटत नाही. देतं कोण, घेतं कोण, हा उखाणा न सुटण्यातच समागमाची लज्जत असते.

36. वर्तमानकाळ मानणारा माणूस अत्यंत अमानुष होतो, असा मला अनुभव येत होता. कारण या माणसाच्या गरजा क्षणांशी निगडित असतात. कार्यक्षेत्रच संकुचित निवडलं, की यशस्वी ठरायला वेळ लागत नाही. भूतकाळाचं ओझं पेलायलाही सामर्थ्य लागतं. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला भूतकाळ ओझंच टाकतो का? काही रम्य आठवणींचे नजराणे देण्याचं सामर्थ्यही भूतकाळातच असतं. अनेक माणसांचा उपयोग आपण शिडीसारखा केलेला असतो. ज्यांना हे मोठेपण नाकारायचं असतं, तीच माणसं गेलेल्या काळाचं काही देणं लागत नाहीत.

37. हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं.

38. वृत्तीप्रमाणे माणूस समर्थन शोधतो

39. वेळेशी आणि काळाशी फटकून वागणाऱ्या गुणवान माणसांचा आक्रोश म्हणजे इतिहास!

40. वेळेवर न भेटणाऱ्या माणसांपेक्षा, मठ्ठ पण हव्या त्या क्षणी हजर होणाऱ्या माणसांवरच आपली मदार असते.

41. झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात, तेव्हा ती झाडांपेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाडं वाढतात, तेव्हा ती फक्त जगतात. वाढत नाहीत. फक्त दिसतात, पण त्यांची वाढ खुंटलेली असते.

संधी

मी काळाला एक संधी देतो आहे

आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे

तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी…!
पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार
आता हिरवळीवर फुलून आलेल्या
रंगबिरंगी रानफुलांची चित्र राहतील मनावर
का राहील हिरवलीखालचा ओलाकिच्च चिखल
हे मी काळावरच सोपवतो आहे…

प्रयत्न तर खूप केले आणि करतोही आहे मी
की तुझे नाव घेताना तुझ्यावाचूनही
मन गाभार्‍यासारखे गंधित होत राहावे
पण
तळहातीच्या रेषांसारखे चिकटून बसलेले
काही शब्द, काही घटना
हाणून पाडतायत माझा बेत
असो ! ढासळलेल्या बेतांचा एक डोंगर साचलाय इथे
त्यात ही काडी काही जड नव्हे…!

नशिब हातात नसले तरी
प्रार्थना आहे!
आणि माणसाच्या स्मरणशक्तीपेक्षा
विस्मरणशक्तीवर माझा भरवसा आहे…

तो ही तूटणार असेल कदाचित;
पण तोवर
मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे…

-संदीप खरे

तोल का जातो?

सावरावे रोज तरीही तोल का जातो?

कोणत्या तार्‍याकडे हा काफिला जातो?

उतरते रात्रीत अर्ध्या कोण स्वप्नांशी?
गाऊनी अर्धेच गाणे रोज का जातो?

एवढा शकुनांवरी विश्वास हा माझा?
रोज एका मांजराला आडवा जातो!

मोजतो माझे उसासे लावूनी काटे
बस जरासा वेळ माझा चांगला जातो!

कैक प्याले रिचवुनिही जो उभा त्याचा
देवळाच्या पायर्‍यांशी झोक का जातो?

-संदीप खरे
शिष्य म्हणे जी गुरुवर्या !! उदंड नवरे, असंख्य भार्या !!
वर्णन करावे त्यांचिया कार्या !! दुख हलके करावे !!
बायकांनी प्रगती केली जरी !! नवऱ्यांनी बसावे कैसे घरी ?
मार्गदर्शन करावे काही तरी !! उद्धार होईल नवऱ्यांचा !!
आपण विवाहित असल्यामुळे !! नवऱ्यांची व्यथा स्वानुभवे कळे !!
एका चुकीची एवढी फळे !! भोगावी का पुरुषांनी ?
बायको म्हणजे प्रकरण भारी !! नवऱ्याच्या मागे pemanent बिमारी !!
बायकोने झोडपल्याच्या तक्रारी !!वाढो लागल्या गुरुवर्या !!
म्हणौनी म्हणतो गुरुवरा !! अचानक चान्स आला बरा !!
नवी दुकानदारी सुरु करा !! ' फिफ्टी-फिफ्टी' करूया !!
शिष्याने सहजभावे विनंती केली !! ऐकोन गुरूला घेरी आली !!
म्हणे, " माझ्या घरातल्या हालचाली !! तुला कैशा कळल्या रे ?"


..ह.भ. प्रे. प . ज्ञानेश महाराज वाकुडकर
मध्यंतरी सहज वाटले, नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से  गोळा करावेत. त्या ‘नाटय़’मय छटांचा हा गुलदस्ता!
ही नवऱ्यांची षट्कोनी आकृती!
१) एक राजनेता नवरा election मध्ये बिझी असतो.
बायको बाळंतपणासाठी गेलेली असते. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या नवऱ्यास
मतमोजणीच्या निकालाऐवजी घरचा फोन आधी येतो-‘‘आपल्या पत्नीस ‘तिळे’ झाले आहे.’’ नेता काही विचार न करता इलेक्शन मूडच्या धुंदीत उत्तरतो, ``Oh no! I demand a recounting!!''

२) एक अरेरावी नवरा ऑफिसमधून घरी येतो. नेहमी स्वच्छ दिसणारे घर आज अस्ताव्यस्त पसरलेले दिसते. बिछाना तसाच, किचनमध्ये खरकटी भांडी, मुलांचे कपडे, खेळणी इकडेतिकडे and what not.
‘‘तू दिवसभर करतेस तरी काय?’’- तो पत्नीस फटकारतो.
बायको हुशार. ती म्हणते- ‘‘त्या प्रश्नाचेच हे उत्तर आहे! आज मी खरोखर काही काम केले नाही. वाटले, त्यामुळे तरी तुम्हाला कळेल की मी दिवसभर रोज काय करते!’’
३) रंगेल नवरा- संशयी बायको एका पार्टीत एक स्त्री Event Manager ला विचारते-
``Excuse me please! ती beautiful तरुणी drinks serve करत होती ती कोठे गेली? दिसत नाही इथे ती?’’
मॅनेजर- ‘‘आपणास काय हवे आहे, मॅडम? That girl or the drink?''
पत्नी- ‘‘दोन्ही नाही. Neither girl nor drink! I am searching for my husband!! माझा नवरा शोधते आहे मी!’’

४)Hen pecked नवरा- एका जोडप्याचा वादविवाद जोरात चालू असतो. शेवटी ते प्रकरण
संपवावे म्हणून नवरा ‘बरं! राहील!!’ असं म्हणून आपले ‘स्थान’ ग्रहण करतो व पुटपुटतो- ``I am a man of few words!'
पण त्यानेही बायकोचे समाधान होत नाही. ती टोमणा मारतेच- ``Yes! But you keep repeating them! समजलं?’’-

५) नवीन नवरा-
नुकत्याच लग्न झालेल्या नवरदेवाची त्याचे मित्र खूप तारीफ करतात- ‘‘तू खरंच भाग्यवान आहेस! तुझी बायको, आमची वहिनी, हरिणाक्षी आहे, her lips are like rose buds, तिचा आवाज
कोकिळेसारखा आहे, ती गजगामिनी आहे, सिंहकटी आहे!! you're very fortunate!' त्यावर नवरदेव काय म्हणतात- ``I am not so sure! she does not seem to have a single characteristic of a HUMAN BEING! नुसती जनावरे काय कामाची?’’


६) शेवटी.. हा प्रेमळ नवरा- प्रिन्सिपॉलसाहेबांशी झगडा झाल्यामुळे चिडलेली, नव्र्हस झालेली शिक्षिका टेन्शन घेऊन सायंकाळी घरी येते. नवरा तिला गरमागरम कॉफी देतो, इकडल्यातिकडल्या गमतीदार
गोष्टींनी तिला हसवतो, तिचा मूड change करतो व तिला ‘‘असं चालतेच गं! cheer up!' वगैरे म्हणून तिचे सांत्वन करतो. ती स्त्री उत्साहित होते व म्हणते- ``Dear! you are really MY STRENGTH!' नवरा हसतो व तितक्याच प्रेमाने म्हणतो- ``And you are really MY WEAKNESS!''

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर,कट रचले गेले पाहिजेत.

ते दिवस खूप छान होते
जेव्हा घड्याळ एखाद्या जवळच असायचं आणि वेळ सर्वांकडे.


संसार ही अशी गोष्ट आहे ज्यात पगाराला कितीनंही "गुण"लं" तरी "भागत" नाही  "गुणा"नं राहिलं तरच... "भागतं"


दोन विपरीत गोष्टी मुळे देशाची पायमल्ली होत आहे ..
1) शिक्षणात राजकारण जास्त
2) राजकारणात शिक्षण कमी !


"पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत,
 त्यांना वाचावं लागतं."


स्वतःवर विश्वास ठेवा,
कारण तुमच्या एवढं तुम्हाला
कोणीही ओळखत नाही.

प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा *स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही....




"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.
मी छातीठोकपणे सांगतो की, आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल!
एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार. त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.
आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ ? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो. तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळींची मुळीच गरज नाही !''
- स्वामी विवेकानंद

रजनीकांत

रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.

’’दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’


 रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’

 रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात 

 ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना? 
पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही. 

 रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो 

 एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’
पुरुषाचा जन्म कित्ती छान!! महिलांनो, विचार करा पुरुषाचा जन्म किती सुखाचा! तुम्ही पुरुष असलात तर... 
 १. तुमचं आडनाव बदलत नाही. 
२. तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही. 
३. वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता. 
४. वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता. 
५. बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात. 
६. स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही. 
७. बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो. 
८. गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात. 
९. लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात. 
१०. तुमचा एक मूड बराच काळ टिकतो. 
११..तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही. 
१२..पाच दिवसांच्या सुटीसाठी बाहेर जाताना फक्त एका सुटकेसमध्ये सामान मावतं. 
१३ .तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता. 
१४ .कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता. 
१५..पादत्राणांचे तीन जोड पुरतात. 
१६ .बिनधास्त शॉर्ट वापरू शकता. 
१७ .तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची संपूर्ण कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता. 
१८ . तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही. 
 मित्रानो, प्रत्येक गोष्टीत स्त्रियांना आपण कमी लेखतो, प्रत्येक गोष्टीत त्यांचाशी पुढे असण्याच भ्रमिक सुख आपल्याला खूपच प्रिय असते, त्यांची टिंगल उडवायला मुळीच काही वाटत नाही! आपल्या मते दोष म्हंटला तर नेहमी त्यांचाच असतो, होना ??? पण खरतर चुकतो आपण.. स्त्री च्या रुपात आई असो, बहिण, बायको, पुत्री किवा प्रेयसी त्यांचा आदर केलाच पाहिजे, त्यांचा भावनांची कदर समजून घ्यायला पाहिजेच... खरच हो, त्यांचा इतपत धैर्य, सहनशक्ती आणि त्याग करण्याची शक्ती आपल्यात नाहीये हे नेहमी लक्षात ठेवून हे विचार केल पाहिजे कि आपण खूप खूप खूपच नशीबवान आहोत, पुरुष म्हणून जन्माला आलोय!

 सारे डोंगरांचे उतार, पर्वत उदास झाले आहेत

 बहरणाऱ्या वसंतऋतूने जणू आत्महत्त्या केली आहे

 बारुद पेरलेल्या सीमेवरच पाऊल ठेवले होते त्याने...

आळसावलेले ऊन खाली उतरले नाही अजून

 थंडीने गारठलेले ते छपरावर झोपून राहिले आहे

 आणि उत्साहाच्या पांघरुणाच्या तर कधीच फाटून चिंध्या झाल्या आहेत!




 

हा अर्धा चंद्र गडद काळ्या आभाळावरचा

जणू काळ्या हबशिणीची काळोख चाटणारी जीभ

 सकाळपर्यंत कढई चाटून साफ करुन निघून जाईल!

 वस्तीला आग लावून पुरेसा आनंद झाला नाही... 

तो आता आभाळावर हल्ला करायला निघाला आहे!

 धुराच्या अंगरख्यावर रक्ताच्या वासाचे डागही पडले आहेत!

  झोपडीतले चिमुकले बाळ रडता रडता

 आईवर रुसून आपले आपणच झोपी गेले आहे

 तात्पुरता ‘युद्धविराम’ झालेला दिसतो आहे!

  मी राहातो दोस्तांच्या घरभिंतीच्या अलीकडे, पण

 माझी सावली मात्र भिंतीच्या पलीकडे पडते

 किती भंगूर आहे ही देहाची आणि प्राणांची सीमा?

  लहानपणीच्या जखमेचा डाग दिसतो आहे चंद्राच्या कपाळावर

 दिवसभर दगड, धोंडे, गलोल घेऊन खेळत होता 

कितीदा सांगितले, बरी नाही संगत त्या उनाड उल्कांची!

 कसला विचित्र कपडा दिला आहे मला शिवायला!

 एकीकडून खेचून घ्यावा तर दुसरीकडून सुटून जातो...

 उसवण्या शिवण्यातच सारे आयुष्य निघून गेले!

  मोजून मापून कालगणना होते वाळूच्या घड्याळात

 एक बाजू रिती होते तेव्हा घड्याळ पुन्हा उलटे करतात

 हे आयुष्य संपेल त्यावेळी तो नाही असाच मला उलटे करणार?

जरा पॅलेट सांभाळ हा रंगांचा, सुगंधांचा

 आकाशाचा कॅनव्हास उघडतो आहे मी...

 माणसाचे चित्र पुन्हा एकदा रेखाटून पहा!







 ‘मीर’ नेही पाहिले आहेत तुझे ओठ,

 म्हणून म्हणतो, ‘ही जणू गुलाबाची पाकळीच आहे!’

 बोलणे ऐकले असते तर गालिब झाला असता!

  कुंपणाच्या काटेरी तारांमुळे हवा जखमी होते

 तुझ्या सरहद्दीजवळून जाताना नदी मस्तक टेकते...

 माझा एक दोस्त रावी नदीच्या पल्याड राहतो आहे!

कुणालाही ठावठिकाणा विचारला त्याचा

 तर दरवेळी नवाच पत्ता सांगितला जातो आहे!

 तो बेघर आहे की दिसेल त्या घरात शिरणारा?

ता तर सभ्यता, संस्कृती, कला सारेच वाटून टाकले आपसात

 कुठून कुणी साद घालणार नाही की प्रतिसाद देणार नाही 

सारा अवकाश जणू कात्रीने कापून टाकला आहे आम्ही!

 शेतकऱ्याने चालवला नांगर, जमीनदाराचे झाले शेत

 वाण्याने दुकानातला गल्ला भरला, ती तर ईश्वराची कृपा

 मातीची गादी तर पुन्हा रिती, जिने शेत रुजवले होते!

  चला, आपले बोलणे एकमेकात वाटून घेऊ या

 तुम्ही काही ऐकायचे नाही, मी समजून घ्यायचे नाही!

 दोन अडाण्यांमधला किती हा सुसंस्कृत संवाद!

 सर्कशीचा तंबू उभारलेला आहे

 कसरत करणारे झोक्यावर आंदोळत आहेत

 बुद्धीचे हे खेळ संपतच नाहीत कधी!

एक एक आठवण उचलून, पापण्यांनी पुसून ठेवून दे पुन्हा

 हे अश्रू नाहीत, डोळ्यांत जपून ठेवलेले मूल्यवान आरसे आहेत

 खाली पडल्या तर किंमती चिजा फुटून जायच्या कदाचित!



 समुद्र जेव्हा खळबळून घुसळून निघतो वादळात

 जेवढे काही मिळालेले असते ते ठेवतो किनाऱ्यावर

माणसांनी पाण्यात फेकलेले कर्म मात्र घेऊन जातो बरोबर!

  शोधतो आहे या देहाच्या खोलीत आणखी कुणाला

 एक जो मी आहे, एक जो आणखी कुणी चमकतो आहे

 एका म्यानात दोन तलवारी राहातात कशा?

एक शेत आहे, एक नदी आहे

 दोघे जोडीजोडीने राहतात... वाहतात...

 शेतकरी आहेत, नावाडी आहेत, सारे नोकर चाकर आहेत!




 तिथे दिसतो आहे तसा नाहीच मुळी

 आरशावर उमटला आहे तो चेहरा!

 एकूण काय, आरशातले प्रतिबिंब खरे नाही!

  बसमध्ये बसल्याबरोबर शोधू लागलो मान वळवून

 का कोण जाणे, वाटले, तू आहेस जवळच कुठेतरी

 तुझ्या आवडीचा सेंट फवारला होता कुणी अंगभर!

  देह आणि प्राण धुंडाळून पाहू या

 हे गाठोडेही नीट उघडून पाहू या जरा

 तुटका फुटका ईश्वर त्यातून बाहेर येईल कदाचित!

  काटेरी तारेवर वाळत टाकले आहेत कुणी ओले कपडे

 ठिबकते आहे थेंब थेंब रक्त, वाहून जाते आहे मोरीतून

 काय त्या जवानाची विधवा रोज धुते त्याचा सैनिकी वेष इथे?

 साऱ्या प्रवासात माझी जाणीव असते माझ्याबरोबर

 परत फिरावेसे वाटते, पण प्रवृत्ती होते पुढे पुढेच जाण्याची!

 रस्ते पावलात रस्सीसारखे गुरफटत राहतात...


 दगडी भिंत, लाकडी फ्रेम, काचेच्या आड ठेवलेली फुले जपून

 एक सुगंधी कल्पना किती आच्छादनात बंद!

 प्रेमाला तर हृदयाचे एक आवरण पुरेसे, आणखी किती वेष चढवायचे?

  जिंदगी काय आहे ते जाणण्यासाठी

 जिवंत राहाणे आवश्यक आहे

 पण आजवर जगलाच नाही ना कुणी!

  माझ्या काचेच्या दरवाजाबाहेर चिमण्या उडताहेत

 उन्हाच्या नाचणाऱ्या ठिणग्या सजीव झाल्या आहेत

 मी मात्र चिंतांचे एक गाठोडे बनून पडलो आहे घरात!

  तुझे ओठ हल्ली किती कोरडे भावशून्य वाटतात!

 एकेकाळी या ओठांवर सुंदर कविता उमटायच्या!

 आता त्याच ओठांनी कोरडे वर्तमान लिहायला कधी सुरुवात केली? 

 दिवस ढळला आणि डोळ्यातल्या पाण्यात एक चेहरा झळझळत उठला

 ताज्या ओल्या जखमेसारखा प्रकाश सर्वत्र पसरला

 जळणाऱ्या ज्योतीमधून किती ठिणग्या विरघळून खाली पडल्या!

 अशा रणरणत्या उन्हातही एकटा नव्हतो मी

 एक सावली माझ्या आगेमागे धावत होती सारखी

 तुझ्या आठवणीने एकटे राहूच दिले नाही मला!

 एक घर सगळ्यांचे, सारे एकाच ठिकाणचे रहिवासी

 या परक्या शहरात कुणीच नाही परके वाटत

 साऱ्यांची एक व्यथा, सारे एकाच नात्याने बांधलेले!

  कोपऱ्यातल्या सीटवर आणखी दोघे बसले आहेत

 गेले काही महिने तेही आपापसात झगडा करताहेत!

 वाटते आहे, आता कारकून सुद्धा बहुधा लग्न करणार!

  दिवस रात्र असे विखुरले आहेत

 जसा तुटला आहे मोत्यांचा हार

 जो घातला होतास तूच एकदा माझ्या गळ्यात

  काय सांगू? कशी आठवण मरुन गेली?

 पाण्यात बुडून प्रतिबिंबेही मृत झाली...

 स्थिर पाणी सुद्धा किती खोल असते?

  चला ना, बसू या गोंगाटातच, जिथे काही ऐकायला येत नाही,

 या शांततेत तर विचारही कानात सारखे आवाज करतात

 हे कंटाळवाणे पुरातन एकाकीपण सतत बडबडत असते!

 तुझ्या गावात कधीच येऊन पोहोचलो असतो –

 पण वाटेत किती नद्या आडव्या पडल्या आहेत!

 मधले पूल तूच जाळून टाकले आहेत!



 झाडे तोडल्यामुळे नाराज झाली आहेत पाखर 

आता तर दाणे टिपण्यासाठीही येत नाहीत घरात 

कोणी बुलबुलसुद्धा वळचणीला बसत नाहीत येऊन!

  मी आपले सारे सामान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे

 माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच –

 माझ्यापासून अलग होणे रुचले नसावे तिला कदाचित!

  खिडक्या बंद आहेत, दारांनाही कुलपे लागली आहेत

 तर मग ही स्वप्ने पुन्हा पुन्हा घरात कुठून येतात?

 झोपेतही एखादा झरोका खुलाच असतो वाटते?

 झुंबराला हलकेच स्पर्श करीत हवा वावरते घरात

 तेव्हा तुझ्या आवाजाचेच जणू ती शिंपण करत राहाते

 गुदगुल्या केल्या की तू अशीच खुदखुद हसायचीस ना!

 जे लिहाल त्याची साक्ष देईन मी बिनचूक

 माझी किंमत तर चेहऱ्यावरच लिहिलेली आहे

साधे पोस्टकार्डच आहे ना मी?

 अशी काही तुझी आठवण पेटून उठली की बस!

 जशी आगकाडी पेटवावी कुणी गडद काळोखात

 फुंकून टाक ती! नाही तर चटका बसेल बोटाला!

 डोळ्यांचे आरसे असे जागजागी तडकले आहेत

 की कुठलाच चेहरा आता पूर्णपणे दिसत नाही

 लोक तुकड्यातुकड्यातूनच भेटत आहेत तेव्हापासून!

 पूर्वी जंगलातून जायचो तर क्वचित माणसांची वस्तीही भेटायची

 आता वसतीत एखादे झाड दिसले तर भरुन येते हृदय...

 भिंतीवरचे सब्जांचे रोप बघताना आठवते, इथे पूर्वी जंगल होते!

 बांगड्यांचे तुकडे रुतले, पावले रक्ताळली

 अनवाणी पायांनी खेळत होते पोरगे अंगणात 

काल बापाने दारु पिऊन आईचा हात पिरगाळला होता! 

 इतका प्रदीर्घ आळस दिला तिने, की, हात

 निखाऱ्यासारख्या सूर्यापर्यंत थेट जाऊन पोहोचला! 

बघा ना, चंद्रासारखा फोड आला आहे बोटावर!

 रात्र चंद्राच्या नौकेत आणते आहे चांदण्या भरुन 

सकाळ होता होता विकल्या जाताहेत त्या आधीच 

हल्ली रात्रीचा व्यापार फारच भरभराटला आहे!

 ही जमीन त्याची, इथले हे ऐश्वर्य, सारे सारे त्याचे

 हे सारे त्याचेच, हे घर आणि इथली ही माणसेही

 सांगा ईश्वराला, कधीही यावे त्याने आपल्या या घरात!

 कोणी कदाचित येईल, ऐकेल या कवीचे गीत 

तर तो कवितेच्या दु:खानेच मरुन जाईल! 

चांदणे रात्रभर झगमगत राहिले! 

 रात्रीने माझ्या घरावर डाका घालण्यापूर्वीच 

मी माझे एकाकीपण आत कुलुपबंद करुन येतो

 आणि सैरावैरा धावणाऱ्या रस्त्यांवर ‘गरबा’ नाचत राहातो!

 जिच्याबरोबर श्वासाचे नाते जोडले होते मी

 ते नातेच, दातांनी धागा तोडावा तसे, तोडले तिने! आणि...

 आता कटलेल्या पतंगाचा तुटका मांजा लुटला जातो आहे मोहल्ल्यात!

 किती तरी आणखी सूर्य उडाले आसमंतात... 

मी आकाशाचे गूढ उकलत होतो 

ती टॉवेलने ओले केस झटकत होती!

 तांबडे फुटले, कोवळ्या किरणात काचेची तावदाने झगमगली

 घरी जाण्याची वेळ झाली, पाहा ना, सकाळचे पाच वाजले

 घड्याळाने इमानेइतबारे रात्रभर चौकीवर पहारा केला!

 असे डोळ्यात भरुन राहिले आहे तुझे रुप

 की अनोळखी लोकही ओळखीचेच वाटत आहेत

 तुझ्याशी नाते जोडले आणि साऱ्या जगाशी जवळीक झाली!

 जाता जाता तुझ्या गाडीचे दिवे लाल झाले अचानक

 वाटले असेल तुला, थांबावे की परत मागे यावे?

 पण तू ‘सिग्नल’ तोडून भलत्याच रस्त्याला वळलीस!

 या बडबडणाऱ्या शब्दांना पकडा चिमटीत

 फेकून द्या, चिरडून टाका पावलांखाली बेलाशक

अफवांना रक्त पिण्याची सवय असते!

  किती दूरपर्यंत होता तो माझ्याबरोबर, आणि एके दिवशी 

मागे वळून बघतो तर तो आता सोबत नव्हता!

 खिसाच फाटका असेल तर काही नाणी हरवूनही जातात!


 

 तसे आम्ही कुठे वळलो नाही, कधी आमचा रस्ताही वळला नाही

 एक झाले मात्र, कुठे उतार लागला, कुठे होता चढ,

 मी खाली खालीच जात राहिलो, तू जाऊन बसलीस उंचावर!

 अशा बेलगाम उसळत आहेत हृदयातल्या आकांक्षा

 जसे ‘मेक्सिकन’ चित्रपटात घोडे बेफाम दौडणारे!

 या साऱ्या आकांक्षा तबेल्यात करताच येत नाहीत ठाणबंद!

 इतक्या सावधगिरीने चंद्र उगवला आहे आभाळात

 जशी रात्रीच्या काळोखात खिडकीशी येतेस तू

 काय! चंद्र आणि जमीन यांच्यातही आहे काही आकर्षण?

 आयुष्याच्या खेळात रस्सीखेच चालली आहे एकाच बाजूने

 रस्सीचे दुसरे टोक माझ्या हाती दिले असते तर गोष्ट वेगळी!

 प्रतिस्पर्धी तगडा तर आहेच, शिवाय तो समोरही येत नाही! 

 लोकांची तर मेळ्यामध्ये सुद्धा चुकामूक होते 

पण भेटतातच ना कहाणीच्या एका सुंदर वळणावर?

 तसे कायमचे थोडेच कुणी दुरावते परस्परांना?

 रात्री थकल्या भागल्या रस्त्यावर एक सावली

 हलत डुलत आली, खांबावर धडकली, गतप्राण झाली

 खचित, काळोखाचीच कुणी बेवारस अवलाद असणार ती!

 मारून टाका हे विषारी डास, उठणाऱ्या आवाजांचे –

 त्यांच्या चाव्याने सूज येत राहाते 

मच्छरदाणी लावूनही जगणे अवघड झाले आहे! 

 पृथ्वी घालते आहे सूर्याभोवती प्रदक्षिणा

 आणि चंद्र फिरतो आहे पृथ्वीभोवती रात्रंदिवस

 आम्ही आहोत तिघेजण, आमचे कुटुंब आहे तिघांचे!

 गल्लीत सगळीकडे पत्रके वाटली जाताहेत

 आपली कत्तल करणारांनाच निवडून द्या!

 जवळ येऊन ठेपली आहे निवडणुकीची अवघड घटका!

  कुणी दोस्त होते माझे, असायचे सतत माझ्याबरोबर 

आले कुणी, घेऊन गेले त्यांना, पुन्हा आलेच नाहीत ते 

फळीवरुन काढलेल्या पुस्तकांची जागा पडली आहे रिती!

 कधी कधी असेही घडते बाजारात... 

किंमत रास्त होती, पण खिशात पुरेसे पैसे नव्हते

 असाच एकदा तुझ्याकडून आलो होतो तुला हरवून!

 रांगेत ठेवलेल्या पुस्तकाची पाने फडफडू लागली अचानक

 हवा दार ढकलून थेट घरात घुसली

 हवेसारखीच तूही कधीतरी इथे येजा कर ना!

 तुझ्यासाठी मी हे आकाशही लुटले तरी

 थोडेसे चमकदार आरसे फोडून काय मिळणार?

 चंद्र बोटात रुतला तर भळभळत राहील!

 ती रागावून बसलेली असते नेहमी तर काही होत नाही

 जेव्हा केव्हा भेटते तेव्हा मात्र डोळे घळघळ वाहतात!

 सांगा ना, कुणाच्या वाट्याला बहरत्या ऋतूतच दु:ख यावे?

एखाद्या घासासारखी झोप गिळून टाकते मला

 रेशमी पायमोजे पायातून अलगद निघावेत तशी...

आणि सकाळी वाटते, थडग्यातून बाहेर पडतो आहे मी! 

 कुणी होते प्रतीक्षेत, कुणी विरहात, कुणी मीलनातही 

किती लोक कालच्या रात्री चंद्राच्या नौकेत होते

 सकाळ होण्याची मात्र कुणीच बघत नव्हते वाट!

 केवळ पाण्याचा आवाज येतो आहे झुळझुळता, मंद 

घाट सोडून सारे नावाडी कधीच निघून गेले आहेत 

चला ना! आपण या चंद्राच्या नौकेतूनच तलाव पार करु!

 कुठे उधळते आहे धूळ, कुठे टोचताहेत खडे 

ठेचकाळत चालली आहे पोरवयाची हवेची झुळूक 

किती सुंदर वाटतात हे कौमार्यातले बालिश आविर्भाव! 

 रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात 

रोज दिवसाच्या उजेडात रात्र होईतो वाट बघायची 

हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागते! 

 दुसरे महायुद्ध संपूनही किती वर्षे उलटली, तरी 

अजूनही कामावर येणारे काही जपानी ऑफिसर लपतछपत भेटले – 

आपण आता कधी भेटणार? आताही तू नाराज आहेस का?

 बिछान्यावरुन ओढावी चादर ओहटणारी नदी 

तळाशी झोपलेल्या कुणाला शोधते आहे ती? 

पाण्यात बुडलेल्यांना झोपूही देत नाही सुखाने! 

 भडकलेल्या वणव्यासारखी माझ्याजवळून जातेस

 कुठल्या ज्योतीपासून उजळले आहे देवाने तुला? 

माझे घर तर काड्यामोड्यांचे, आलीस तरी काय बिघडले?

 आली समोरुन, पाहिले, बोलली दोन शब्द 

हसली सुद्धा! सारे लाघव जुन्या ओळखीखातर 

कालचा पेपर होता, उघडून पाहिला, ठेवून दिला

 रोजचा नाही तो सकाळचा झगडा, नाही रात्रीची ती बेचैनी 

नाही पेटत चूल तसे धगधगत नाहीत डोळे सुद्धा! 

ही भयाण शांतता आणि मी घरात असा उदास! 

 सांजवेळ मला अगदी लगटून निघून गेली, पण 

भोवती दाटू लागलेल्या रात्रीने जीव घाबरतो आहे 

आणि माथ्यावर चढणाऱ्या दिवसाचेही त्यामुळेच भय वाटते आहे

 हातात हात मिळवला, जरा विचार करुन नावही घेतले माझे,

 जणू एखाद्या कादंबरीचे अंतरंग वरवर चाळूनच प्रथम पाहिले...

 काही नाती पुस्तकात बंदिस्त असतानाच चांगली वाटतात! 

 या, सारेजण आरसेच वेढून घेऊ अंगभर 

साऱ्यांना आपलाच चेहरा दिसत राहील त्यात 

आणि साऱ्यांना सारेच सुंदर वाटतील इथे! 

 विचार भिरकावला मी बेफिकीरपणे अवकाशात 

तो आता ईश्वरापाशी जाऊन पोहोचणार की त्याच्याही पार जाणार?

 की पलीकडे जाऊनही पुन्हा माझ्यापाशीच येणार?

 सारा दिवस बसलो होतो हातात भिकेचा कटोरा घेऊन

 रात्र आली, चंद्राची कवडी आत टाकून निघून गेली

आणि आता हा कंजूस दिवस ही सुद्धा हिरावून घेईल!

 आईचा आशीर्वाद : चंद्रासारखी देखणी वधू मिळेल! 

आज संध्याकाळी ती ‘चंद्र’मुखी पाहिली फुटपाथवरुन 

चंद्र भाकरीसारखा जळत राहिला रात्रभर!

 आम्हाला गालिबने दिली होती दुवा 

मागितले होते आमच्यासाठी हजार वर्षांचे आयुष्य 

पण वर्षे तर दिवसातच संपून चालली आहेत!

 केवळ हवाच भरलेली असावी या बॉम्बगोळ्यांमधून, बघा ना, 

नुसती सुई टोचली तरी चुटकीसरसे जातील लोळागोळा होऊन! 

मला वाटते, लोक पुरेशा त्वेषाने बॉम्ब बनतच नाहीत आजकाल!

 फ्रॉकची कड उचलून डोळ्यातले काजळ पुसणारी छोटी 

छोट्याने अचानक टॉर्च उजळला, बिचारी किती 

गोंधळली पाहिली मी कोवळी पहाट उगवत्या सूर्याला लाजताना! 

 डोळ्यांना सांग तुझ्या, इतक्या लोकात 

मोठ्या आवाजात एवढ्या, बोलू नका ना माझ्याशी? 

लोकांना माझे नाव ओळखू यायचे कदाचित!

 काळ्यासावळ्या नदीतीरावर गुलमोहोराचे झाड 

जसा लैलेने भांगात भरलेला सिंदूर 

बघा ना! धर्मच बदलून गेला बिचारीचा

 सांजेला जळणारी मेणबत्ती बघत होती वाट 

अजून कसा कुणी पतंग आला नाही इथे? 

असेल कुणी सवत माझी जवळच कुठे जळत!

केसात पाण्याचा थेंब असा चमकत आहे 

जसा बंदीत पडलेला एक एकाकी काजवा! 

काय बिघडले छत जरा गळू लागले तर?

रात्रीच्या झाडावर कालच पाहिला होता त्याला

आकाशातून चंद्र पिकून गळायला आला होता 

सूर्य येऊन गेला ना? झडती घ्या बरे त्याची!

 दारुगोळा, स्फोट, भडका, बॉम्ब, घोषणा 

शहरात ठिकठिकाणी आगी पेटल्या आहेत 

तोडून टाका सारे निर्बन्ध – आज ‘बंद’ पुकारला आहे!

 चतुर्दशीच्या चंद्राला पुन्हा आग लागली आहे बघा 

आज खूप उशीरापर्यंत उजेड पडत राहील 

अमावास्या येईपर्यंत त्याची राख होऊन जाईल!

आजचा पेपर इतका भिजलेला कसा? 

उद्यापासून हा पेपरवाला बदलून टाका 

‘या वर्षी पाचशे गावे पुरात वाहून गेली!’

 कोण खाणार? कुणाचा हा वाटा? 

दाण्यादाण्यावर लिहिले आहे नाव 

शेठ सूदचंद मूलचंद जेठा!

 साऱ्यांनाच येणार आहे मरण प्रत्येकाच्या वेळेनुसार 

मृत्यू हाच न्यायाधीश, चालत नाही तिथे कमीअधिक 

असे आयुष्य का नाही साऱ्यांना नेमके लाभत?

 काय ठाऊक कसा कुठून घाव घालील अचानक 

मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त! 

मरणाचे काय? ते तर एकदाच मारून टाकते!

 उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले 

किती तरी वेळ फांदी हात हालवत होती 

निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?

 १६व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी आणि नंतर युरोपमधल्या इतर ‘सुसंस्कृत’ देशांनी गुलामांचा व्यापार सुरू केला. आफ्रिकेमधून निग्रो माणसांना बेसावधपणे प्राण्यांप्रमाणे पकडून जबरदस्तीनं ‘न्यू वर्ल्ड’मध्ये नेऊन प्लँटेशन्समध्ये मरेपर्यंत गुरासारखं राबवून घेतलं; तर खूपच पैसा मिळेल, अशी कल्पना प्रथमत: जॉन हॉकिन्स या इंग्रजी माणसाला सुचली. या खुनशी माणसानं गुलामांवर एवढे अत्याचार केले, की मळ्यांवर राबराब राबून ते लौकरच मरत. तो आपण पकडून आणलेल्या निग्रो गुलामांबद्दल बढाया मारत अत्यंत प्रौढीनं बोले. अशा झकास कामगिरीबद्दल खूष होऊन त्यानं गुलामांना पकडून आणण्याच्या दोन सफरी केल्याबरोबरच त्याला एलिझाबेथ राणीनं ‘सर’ की बहाल केली. एवढंच काय; पण त्याच्या पुढच्या सफरीसाठी राणीनंच हॉकिन्सला एक बोट देऊ केली होती. आणि गंमत बघा! त्या बोटीचं नाव होतं ‘जीझस’! अशाच तऱ्हेनं लूटमार, दडपशाही, पिळवणूक यांच्याच जोरावर उद्योगांसाठीचं ‘भांडवल’ उभं राहत होतं!

या वेळी गुलामांना कसं पकडत, त्यांचा व्यापार कसा होई, मग त्यांना जंगलातून शेकडो मैल चालत-चालत किनाऱ्यापर्यंत मारत मारत कसं नेण्यात येई, त्यांना मग बोटीनं जखडून कसं नेण्यात येई, त्यात अनेक जण (३०-४०%) कसे मरत, कित्येक आत्महत्या कसे करत, ती बोट रक्‍त, उलट्या, मलमूत्र, पू वगैरेंनी कशी भरलेली असे, किनाऱ्यावरही त्यांचे सौदे कसे होत, जे कामासाठी अपात्र ठरत त्यांना परत समुद्रात कसं फेकलं जाई वगैरे वर्णनं वाचून अंगावर अक्षरश: काटाच उभा राहतो! १७व्या शतकात आफ्रिकेतून २५ डॉलर्सना घेतलेला गुलाम अमेरिकेत १५० डॉलर्सला विकला जात होता. १५४० ते १८५१०च्या दरम्यान १.५ कोटी गुलाम विकले गेले! या व्यापारात व्यापाऱ्यांना भरपूर पैसा आणि भांडवलशाहीसाठी स्वस्तात कष्टकरीही मिळाले! सुदान, आना घाना, माली, सोंधाई वगैरे ठिकाणी लोकसंख्येच्या एक तृतीयांश तर कित्येक ठिकाणी लोकसंख्येच्या निम्मे गुलाम केले गेले होते! एरिक विल्यम्सनं आणि इतरांनी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश अर्थव्यवस्थेचा ५% भाग हा गुलामांच्या व्यापाऱ्यातल्या नफ्यामुळे आला होता आणि त्यामुळे औद्योगिक क्रांतीला मोठाच हातभार लागला.

गोष्ट तीन आण्यांची - गिरिजा कीर

 आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती. म्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. शेवकांडाच्या लाडवांची पुरचुंडी आणि प्लास्टिकच्या पिशवीतल खाजं तिन आवदारपणे चुंबळीच्या पदराखाली सरकवलं. तेवढ्या गडबडीतसुद्धा खाज्याच्या गुळात घातलेल्या आल्याचा दरवळ तिच्या नाकापर्यंत पोहोचला. बाय एस्‌.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्‌.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुल्लांन तिला हटकलंच, `म्हातारे, आज उशीरसा?' माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं बारक्यासाठी शेवंतूसाठि खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. पण दाढीचे केस पांढरे फेक झालेला मुल्ला तिला `म्हातारे' म्हणाला होता. बायला भारीच राग आला. कुणी `म्हातारे' म्हटलेलं तिच्या मुळीच कामी यायचं नाही. म्हातारी काय म्हणून? अजून डोक्यावर पाटी घेऊन ४-४ मैल चालत होत अन्‌ डोळ्याला दिसत होतं. ती स्वभावाप्रमानं काहीतरी फटकून बोलणार होती, पण समोरुन मोटार येताना दिसली. बायनं चकटनं विचार केला, एस्‌.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू! बायनं आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदारगडी वाटला. तो बायकडं बघून हसला. `काय पायजे आजी?' त्यानं विचारलं. बायला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, `माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? यष्टी चुकली बग!' ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकलि आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. बाय हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली,`ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात?' `आजे' `बाय म्हणतत माका' ती टेचात उत्तरली. ड्रॉयव्हर हसत म्हणाला,`बाय, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी~' बायचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली. बांगडीवाला मुल्ला तोंडवासून आश्चर्यानं पाहत होत. गाडी हलली तसा तो ओरडलाच, `अगे म्हातारे -' पण बायला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती? मऊ गादीवर बायला फार सुख वाटलं, एस्‌.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. बायनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले. दिवसभराच्या उन्हान, धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. `बाय, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना? `बाय खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली. म्हाताऱ्या बायला काय वाटलं कोण जाणे. तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, `खा माझ्या पुता! ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोखं भरुन पाहिलं गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, `कुणाच्या गाडीतून इलंय?' `टुरिंग गाडीतनं.' बायच बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला. तशी बाय खणखणीत आवाजात म्हणाली `तीन आणे मोजून दिलंय त्येका,' `त्यांनी ते घेतलं? अग म्हातारेम तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. याआपल्या सावंतवाडिच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू!' दुसऱ्यानं माहिती पुरवली. `अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा' म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय' म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या, त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं.
राजू बाबांबरोबर सर्कस बघायला गेला. तिकिटांच्या रांगेत असतांना त्याची नजर साखळीने बांधलेल्या हत्तीच्या पिल्लाकडे गेली. ते हत्तीच पिल्लू जोरजोरात धडक देत तर कधी सर्व शक्ती लावून साखळी तोडण्याचा प्रयन्त करत होते, पण त्याला यश येत नव्हते.शेजारी त्याच्या आईलाही तसेच बांधून ठेवले होते पण ती स्वस्थपणे उभी होती. राजूची उत्सुकता वाढली. “बाबा त्या हत्तीच्या पिल्लाला ती साखळी तोडणे कठीण आहे. पण त्याची आई ती सहज तोडू शकते ना? मग ती स्वतःची अन् तिच्या पिल्लाची सुटका का करून घेत नाही?” राजू च्या प्रश्नावर बाबा निरुत्तर झाले, पण सर्कसच्या मनेजरने तो प्रश्न ऐकला. “त्याच अस आहे बाळा, ह्या हत्तीच्या आईलाही ती लहान असतांना इथे आणलं गेलं. तिलाही याच साखळी ला आम्ही बांधत असू , सुरवातीला दोन महिने तिनेही सुटकेचा असंच प्रयत्न केला. तेव्हा ती साखळी तोडणे आपल्या शक्तीबाहेर आहे, अशी तिला जाणीव झाली.अन् आता मोठी झाल्यावरही तिच्या मनात तेच बिंबून गेलंय. अशा दहा साखाल्याही ती तोडू शकेल एवढी ताकद तिच्या अंगात आहे, पण पुन्हा प्रयत्न करण्याचा विचारही तिच्या मनात येत नाही. उलट तिच्या पिल्लाचे तिला हसू येत असेल.” आपलही असंच होतं. एखाद्या गोष्टीत अपयश आल्यावर ‘ते आपल्याला जमणार नाही’ असं मनात ठरवून चालतो.कालांतराने गोष्टी बदलतात. अन् आता आपल्याला शक्य असूनही आपण प्रयत्न करीत नाही. म्हणूनच कुणी म्हटलंय..” तुम्ही तो पर्यन्त हरत नाही, जो पर्यन्त तुम्ही प्रयत्न करायचे सोडत नाही !”

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : "स्वामी विवेकानंद"

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्‍या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. म्हणूनच विवेकानंद पुण्यतिथीच्या निमित्ताने शक्तीदायी विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’ सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते. स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते.स्वामी विवेकानंदांचे जीवन पाहा. गुरुदेव रामकृष्णांच्या प्रयाणानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आहे. भारत म्हणजे काही केवळ कागदावरचा नकाशा नाही. भारत म्हणजे भारतातले लोक. इथली गावं, इथल्या नद्या, पर्वत, इथे होऊन गेलेले ऋषीमुनी, इथले तत्त्वज्ञान आणि खूप काही... जोवर आपण खरा भारत समजून घेत नाही, तोवर तिच्याप्रती मनात भक्तीभाव निर्माण होणे कसे शक्य आहे? एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम किंवा तिरस्कार तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपल्याला तिच्या गुण-दोषांची ओळख होते. देशाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. आपण इतिहास वाचलेला असतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हा अनुभव आपल्या सार्‍यांचाच आहे. म्हणूनच केवळ प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला.शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला- कन्याकुमारी येथे आले. तिथल्या श्रीपाद शिलेवर की, जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्‍चर्या केली होती, तिथे २५, २६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं. हा पहिला सन्यासी होता की, ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही. भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते. पाश्‍चात्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती. तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते, परंतु आज मात्र भारत गुलामीत होता. भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता. जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता. अज्ञानाचा अंध:कार गडद झालेला होता. अशा स्थितीतून पुन्हा भारताचे उत्थान घडवून आणायचे तर काय करावे लागेल हा त्यांच्या ध्यानाचा विषय होता. अखेर एक शक्तिशाली विचार घेऊन स्वामीजी त्या शिलेवरून उठले. आपण आत्मविश्‍वास गमावलेला आहे, त्यामुळेच आजची अधोगती झाली. या देशाला पुन्हा आत्मविश्‍वास मिळवून देणे हे विवेकानंदांच्या जीवनाचे ध्येय बनले. जगावर राज्य करणार्‍या लोकांच्या देशात जाऊन आमच्या देशाचा तरुण विजय मिळवतो, ही घटना समस्त भारतीयांना आत्मविश्‍वास देणारी ठरली. यातूनच खर्‍या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला बळ मिळाल्याचा इतिहास आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली. स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्‍वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्‍वास होता. देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही. संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते. म्हणूनच तर सार्‍या जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता, तेही समजून घेतले पाहिजे. अन्यथा मोठा गोंधळ होईल. दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले की, जपान भारताचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन म्हणतात की, जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्‍या धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्‍वराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्‍वराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो, परंतु यासाठी हा विचार सांगणारा देश दुर्बल असून, चालणार नाही. भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. कारण दुसर्‍यांना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही, परंतु जगाला शांतीचा आणि शाश्‍वत मार्ग दाखवायचा असेल, तर भारताने बलशाली झालेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते. तुम्ही विद्यार्थी असा की, शिक्षक, शिपाई असा की, अधिकारी, शेतकरी असा की, सौनिक तुम्ही कोणीही असा, आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या. एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.

ट्यूलिपमॅनिया

 ‘सिलसिला’तलं अमिताभ-रेखा यांचं ‘देखा एक ख्वाब तो…’ हे गाणं नेदरलँडमधल्या कुकेनहॉफच्या प्रसिद्ध ट्यूलिप गार्डनमध्ये शूट केलं होतं. पण त्या गाण्यात बहरलेल्या बागा तिथे प्रत्यक्षात बघताना मला नेहमी एके काळी इतिहासात याच ‘ट्यूलिप्सनी’ घातलेला प्रचंड गोंधळ आठवून अंगावर ‘काटा’ यायचा! १६३६-३७च्या काळात ‘ट्यूलिपमॅनिया’नं नेदरलँडमधे अक्षरश: धुमाकूळ घातला. १८४३ साली चार्लस्‌ मॅकेनं त्याच्या ‘एक्स्ट्रॉऑर्डिनरी पॉप्युलर डिल्युजन्स अँड द मॅडनेस ऑफ क्राऊड्ज’ या पुस्तकात याविषयी बरंच लिहिलंय. १५९३ साली कार्लोस क्लासियस या वनस्पतिशास्त्रज्ञानं ट्यूलिप्स प्रथम हॉलंडला संशोधनासाठी आणले. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची फुलं बघितली. त्यांना ती आवडल्यानं त्यांनी ती चोरून विकायला सुरुवात केली. यातूनच हे खूळ चालू झालं. १६०० सालापासून कॉन्स्टॅन्टिनोपोलहूनच व्हिएन्नामार्गे युरोपमधे या फुलांचे कंद यायला सुरुवात झाली आणि मग भराभर ते वादळासारखे पसरले. याच काळात नेदरलँडमध्ये व्यापाराच्या जोरावर श्रीमंत झालेल्या मंडळींना ट्यूलिपची फुलं बाळगणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण वाटू लागलं. ट्यूलिपची फुलं वेगवेगळ्या रंगांची असत. ज्याच्याकडे ही फुलं नसत, त्याला अरसिक समजलं जायचं. यामुळे आणि मागणीच्या मानानं ट्यूलिपच्या फुलांचा पुरवठा कमी असल्यानंही त्यांच्या किमती भरमसाठ वाढायला लागल्या. आणि मग स्वस्त भावानं ट्यूलिप्सचे कंद विकत घेऊन जास्त भावानं ती विकण्याची सट्टेबाजी सुरू झाली! याच काळात या फुलांना कसल्यातरी व्हायरसनं ग्रासलं. पण त्यामुळे त्यांच्यावर रंगांचे जे पट्टे उमटले ते आणखीनच छान दिसत. त्यामुळे ती फुलं आणखीनच दुर्मिळ झाली आणि त्यांचे भाव जास्तच कडाडले! या किमती इतक्या वाढल्या को सामान्य डच लोकांचं वार्षिक सरासरी उत्पन्न दरडोई १५० डच गिल्डर्स किंवा १५० फ्लोरिन्स असताना ट्यूलिपच्या ‘सेम्पर ऑगस्टस’ या प्रसिद्ध जातीच्या एका कंदाची किंमत त्याच्या ४० पट किंवा ६००० फ्लोरिन्स झाली होती! त्या वेळच्या किमती लक्षात घेता त्या वेळचा १ फ्लॉरिन म्हणजे २००२ सालचे १०.२८ युरोज किंवा साधारणपणे ५०० रु. होतात. म्हणजे त्या वेळच्या एका कंदाची किंमत आजच्या रुपयात ६००० x ५०० म्हणजे ३० लाख रु. होत होती! १६३६ सालच्या सुरुवातीला हॉलंडमधे सेम्पर ऑगस्टसचे फक्त दोनच कंद उपलब्ध होते. त्यातल्या हार्लेममधल्या एका कंदासाठी १२ एकर जमीन; तर अॅमस्टरडॅममध्ये त्याचसाठी ४६०० फ्लोरिन्स, २ घोडे आणि नवीन घोडागाडी एका सट्टेबाजानं दिली!! ही कित्येकांची आयुष्याची कमाई होती! कित्येक व्यापारी या व्यापारातून दरमहा ६००० फ्लॉरिन्स कमावत. १६३६ साली ट्यूलिप्सचे कंद चक्क स्टॉक एक्स्चेंजवर जाऊन थडकले. समाजातले तथाकथित प्रतिष्ठित, सर्वसामान्य लोक, मोलकरणी, कामगार, छोटे व्यापारी आणि अगदी सफाई कामगारसुद्धा या ट्यूलिपच्या व्यापाराकडे आपलाही काही फायदा होईल म्हणून आपले उद्योग सोडून वळत होते! यातल्या सट्टेबाजीमुळे काही अतिश्रीमंत झाले तर काही कंगाल! १६३६-३७च्या हिवाळ्यात तर एका दिवसात किमान दहावेळा एकाच कंदाची खरेदी-विक्री प्रत्येक वेळी आधीच्यापेक्षा जास्त दरानं होत होती! स्टॉक एक्स्चेंजेस नसलेल्या गावात चक्क दारूच्या गुत्त्यात नाचगाणी आणि जेवणासमवेत ट्यूलिपचे लिलाव होत. तिथे फुलदाण्यांमधून या फुलांचं प्रदर्शन करत.

नंतर मग कंदाचे भाव एवढे वाढले की ते कंद नगाऐवजी वजनावर विकले जाऊ लागले. पूर्वी खूप कमी वजनाच्या वस्तूंना ग्रेन हे माप असे. ४८० ग्रेन्स म्हणजे १ औंस होई. पण आता पेरिट्स हे ग्रेन्सपेक्षाही कमी वजनाचं माप वापरलं जाऊ लागलं. कारण प्रचंड किमतीमुळे वजनातल्या अगदी थोड्या फरकानंही किंमत खूपच बदलणार होती. ट्यूलिपच्या वेगवेगळ्या जातींप्रमाणे ही किंमत बदलत होती. ४०० पेरिट्स वजनाचे अॅडमिरल लिफकेन या जातीचे कंद प्रत्येकी ४४०० फ्लोरिन्सला तर व्हिसरी जातीचे तितकेच कंद प्रत्येकी ३००० फ्लोरिन्सला मिळत होते!

या सट्टेबाजीचा कहर झाला तो म्हणजे एका गंमतशीर व्यवहारात. सात अनाथ मुलांच्या नावावर त्यांच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी ठेवलेली संपत्ती होती मौल्यवान ट्यूलिपचे ७० कंद! या कंदांच्या लिलावात एका कंदाची बोली ५२०० फ्लॉरिन्स तर एकूण कंदांचा व्यवहार ५३००० फ्लॉरिन्स इतका झाला होता! हार्लेमच्या एका व्यापाऱ्यानं तर त्याच्या अर्ध्या आयुष्याची कमाई नफा न मिळवता केवळ मित्रमंडळींकडून कौतुक करून घेण्यासाठी या ट्यूलिपच्या कंदांसाठी खर्च केली! आणखी एकदा अशीच धमाल झाली. एका श्रीमंत व्यापाऱ्यानं ३००० फ्लोरिन्सला (त्या काळातले २८० पौंड स्टर्लिंग!) सेम्पर ऑगस्टसचे कंद विकत घेतले होते. दुसऱ्या दिवशी ते जागेवर न दिसल्यानं अस्वस्थपणे तो ते शोधत असताना ते घेऊन येणारा नावाडी ट्यूलिपलाच कांदा समजून खाताना त्याला दिसला. भयंकर संतापून त्या व्यापाऱ्यानं त्या नावाड्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि या गुन्ह्याकरता त्या नावाड्याला मग अनेक महिने तुरुंगाची हवा खावी लागली! असंच एकदा एक वनस्पतिशास्त्रज्ही एका डच व्यापाऱ्याकडे पाहुणा म्हणून आलेला असताना पूर्वी न बघितलेला ट्यूलिपचा कंद एक दुर्मिळ कांदा समजून तो त्याचं विच्छेदन करायला लागला. चिडून त्या डच व्यापाऱ्यानं त्या वनस्पतिशास्त्रज्ञाला रस्त्यातून अक्षरश: फरफटत नेऊन मॅजिस्ट्रेटसमोर नेलं, तेव्हा त्याला त्या ‘कांद्या’ची किंमत ४००० फ्लोरिन्स आहे हे कळलं! त्यालाही बराच दंड आणि तुरुंगवास भोगावा लागला होता! असे बरेच किस्से त्या काळात घडत!

ट्यूलिपला मिळणारी प्रचंड मोठी बाजारपेठ बघून अनेकांनी मग भविष्यातल्या भावांच्या अंदाजाप्रमाणे ‘फ्युचर काँन्ट्रॅक्ट्स’ करून कोवळ्या रोपांची सट्टेबाजी सुरू केली. याला ‘विंड ट्रेड’ असं म्हणायला लागले. १६१० साली अशा व्यापाराला कायद्यानं बंदी घालूनही सगळ्यांनीच ट्यूलिपच्या बाबतीत कायद्याचं बेधडकपणे उल्लंघन करायला सुरुवात केली! पण हा वेडेपणा कुठेतरी थांबणारच होता. आणि झालं तसंच! १६२७च्या फेब्रुवारी महिन्यात ३ तारखेला हार्लेमच्या बाजारात एक दिवस अचानकपणे या कंदांसाठी ग्राहक कमी झाले. आणि मग ते कमी होतच गेले. मागणी घटतीय, त्यामुळे आता भाव घटतच राहणार आणि आपला तोटा होणार, त्यापेक्षा आत्ताच ते कंद विकलेले बरे असं समजून सगळ्यांनी ते विकण्यासाठी ही गर्दी केली. मग काय विचारता? मागणीच्या मानानं पुरवठा वाढल्यानं ट्यूलिपच्या किमती आणखीनच धडाधड कोसळायला लागल्या. कालांतरानं मग जे कंद पूर्वी ५००० फ्लॉरिन्सला विकले जात होते ते ४००० फ्लॉरिन्स, ३००० फ्लॉरिन्स असं करत-करत शेवटी जेमतेम १०० फ्लॉरिन्सला विकले जायला लागले! त्याचा परिणाम अर्थातच भयानक झाला. असंख्य व्यापाऱ्यांचं आणि ग्राहकांचंही त्यात अतोनात नुकसान झालं. शेकडो मंडळी कंगाल होऊन भिकेला लागली. पूर्वी वाढीव भावानं खरीदण्याचे जे करार (फ्यूचर काँट्रॅक्ट्स) कित्येकांनी केले होते ती मंडळी आता ते करार पाळेनात. यावर मग भांडणं सुरू झाली. अनेक वादविवाद, चर्चा यांच्यानंतर १६३६च्या नोव्हेंबरपूर्वीचे करार रद्द ठरवले गेले आणि त्यानंतर करार केलेल्या ग्राहकांना एकूण व्यवहाराच्या १०% रक्‍कम विक्रेत्यानं द्यावी, असं सांगितलं गेलं. या निर्णयानं अर्थातच कोणाचंच समाधान झालं नाही. मग मंडळी कोर्टात गेली. फ्यूचर काँन्ट्रॅक्टस्‌ केलेल्यांना कोर्टाकडूनही काही मदत मिळाली नाही. कारण असे व्यवहार अगोदरच बेकायदेशीर ठरवले असल्यानं या काँन्ट्रॅक्ट्समधले लोक अक्षरश: देशोधडीला लागले आणि अनेक रावांचे रंक झाले! ट्यूलिपचा हा बुडबुडा असा फुटल्यानं नेदरलँडस्‌मध्ये नंतर बराच काळ मंदीचं वातावरण निर्माण झालं.

व्हिलन (खलनायक)

 सरंजामशाही पद्धतीतून युरोपमध्ये भांडवलशाही उभी राहत होती. तो काळ होता १५व्या शतकापासून १८व्या शतकापर्यंतचा. सरंजामशाहीमधे जमीनदार आपल्या आलिशान घरात राहत आणि गावातली आजूबाजूची जमीनही त्यांच्याच मालकीची असे. भांडवलशाहीसाठी कामगार, भांडवल आणि भांडवली नीतिमूल्यं/कायदे या सगळ्यांची गरज होती. पण सरंजामशाहीमध्ये भूदास हे जमिनीला बांधलेले होते. जमीनदार स्वत:साठी मोठी जमीन ठेवून उरलेल्यातले लहान-लहान तुकडे भूदासांना भाड्यानं देत. या भूदासांमध्येही फ्रीमेन, व्हिलेन्स, कॉटेजर्स आणि गुलाम असे बरेच प्रकार आणि पातळ्या होत्या. यातले ‘फ्रीमेन’ हे जमीनदाराला भाडं दिल्यावर इतर काहीही करू शकत. ‘व्हिलेस’ या मंडळींना जमीनदाराची जमीन कसून आणि त्याची इतरही बरीच कामं करून उरलेल्या वेळातच स्वत:ची जमीन कसता येई. त्यांना गाव सोडून कायद्यानं कुठे जाताही येत नसे. कॉटेजर्सना तर दिवसभर जमीनदारांकडे काम करून राहायला फक्त झोपडी आणि खाण्यापुरतं अन्न मिळे. गुलामांना सगळ्यात कमी हक्क असत. थोडक्यात, जमीनदाराची मोठी जमीन, भूदासांना ‘भाड्यानं’ कसायला दिलेले जमिनीचे लहान-लहान तुकडे आणि गुरांना चरण्यासाठी एक सामायिक जमीन असं जमिनीचं वाटप त्या काळी असे. त्याच वेळी इंग्लंडमधल्या लोकरीला भाव चांगला यायला लागला. मग स्वत:च्या मेंढ्यांना चरायला जास्त जमीन मिळावी म्हणून जमीनदारांनी सामायिक चरण्याची जमीन कुंपण लावून (एन्क्लोज करून) इतरांच्या गुरांना वापरायला परवानगी नाकारायला सुरुवात केली. यातूनच पुढे ‘एन्क्लोजर’ चळवळ चालू झाली. शेवटी त्या वेळचं सरकार हे जमीनदारांच्याच बाजूनं असल्यानं त्याविषयीचे ‘ॲक्ट्स ऑफ एन्क्लोजर्स’ असे त्याविषयी कायदेही करण्यात आले. यामुळे मग अनेक भूदासांना शेती करणंच अशक्य होऊन बसलं. मग शेतीतल्या लोकांचा लोंढा शहरांकडे यायला लागला. ही मंडळी शहरांत येऊन लहानसहान कामं करणं, भीक मागणं याबरोबरच चोऱ्या-माऱ्याही करायला लागली. तेव्हापासून या ‘व्हिलेन’वरूनच ‘व्हिलन (खलनायक)’ हा शब्द निघाला. पण पुढे-पुढे त्यातली हुशार, तरुण मुलं यंत्रांवर कामं करायला लागली आणि अशा तऱ्हेनं जगातले पहिले औद्योगिक कामगार तयार झाले.

 अशी आली तुझी आठवण अचानक

 जशी झाडांच्या गर्दीतून निघावी पाऊलवाट

 उभा आहे मी घनदाट भूतकाळाच्या जंगलात

 एकदा एक संकटात सापडलेली स्त्री आपल्या मदतकर्त्याला विचारते, “मी तुमच्या मदतीची परतफेड कशी करू?” त्यावर तो म्हणतो, “बाईसाहेब, जेव्हापासून पैशाचा शोध लागलाय तेव्हापासून या प्रश्‍नाला एकच उत्तर आहे.”