*जेव्हा एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्याने पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते; वाचा पुर्ण किस्सा*



ही गोष्ट आहे साल १९७९ ची. संध्याकाळचे सहा वाजले होते. एक शेतकरी ईटावा जिल्ह्याच्या उसराहार पोलीस स्टेशनमध्ये मळलेला कुर्ता आणि चुरगळलेले धोतर घालून आला होता. त्याला त्याच्या हरवलेल्या बैलाची तक्रार नोंदवायची होती.

त्याने इन्स्पेक्टरला हरवलेल्या बैलाची तक्रार लिहून घेण्यासाठी विनंती केली. इन्स्पेक्टरने शेतकऱ्याला तीन-चार इकडचे तिकडचे प्रश्न विचारले आणि रिपोर्ट न लिहिताच जायला सांगितले. शेतकरी काहीच बोलला नाही तो खुर्चीवरून उठला आणि स्टेशनच्या बाहेर निघाला.

इतक्यात त्यातील एक हवालदार शेतकऱ्याला म्हणाला, बाबा रिपोर्ट लिहून घेतो पण काही पैसे द्यावे लागतील. शेवटी ३५ रुपयांमध्ये इन्स्पेक्टर तक्रार नोंदवायला तयार झाला. त्याकाळी ३५ रुपयांची किंमतही खूप होती. लेखापालने तक्रार लिहून घेतली आणि शेतकऱ्याला विचारले की, बाबा सही करणार की अंगठा लावणार?

शेतकरी म्हणाला सही करणार. मग लेखापालने शेतकऱ्याला रिपोर्टचा कागद दिला. रिपोर्टचा कागद घेतल्यानंतर शेतकऱ्याने पेनसोबत स्टॅम्प पॅडपण उचलले. हे पाहिल्यानंतर लेखापाल विचारात पडला की, ह्याला जर सही करायची आहे मग स्टॅम्प पॅडची याला काय गरज आहे?

शेतकऱ्याने सही करताना नाव लिहिले ‘चौधरी चरण सिंह’ आणि मळलेल्या कुर्त्याच्या खिशातून एक स्टॅम्प काढला आणि त्या निकालाच्या कागदावर मारला. स्टॅम्पवर लिहिले होते की, ‘प्रधानमंत्री भारत सरकार’. हा सगळा प्रकार पाहून पूर्ण पोलीस स्टेशन हादरले होते.

कारण जो माणूस मळलेला कुर्ता घालून पोलीस स्टेशनमध्ये बैल हरवल्याची तक्रार नोंदवायला आला होता ते दुसरे तिसरे कोणी नसून शेतकरी नेते आणि त्याकाळचे भारताचे प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह होते. त्यावेळी ते पोलीस स्टेशनमध्ये पाहणी करायला आले होते. आपल्या गाड्यांचा ताफा त्यांनी पोलीस स्टेशनपासून लांब उभा केला होता.

त्यांनी येताना आपल्या कुर्त्यावर माती लावली होती. जेणेकरून त्यांना कोणी ओळखू शकले नाही. त्यांनी त्या वेळेस उसराहारचे पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते. 

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिह यांच्या जन्मदिवस 23 डिसेंम्बर हा *राष्टीय किसान दिन* म्हणुन साजरा केला जातो.

 ✈ *विमान* ✈ 

****************


आकाशात विमानाची घरघर ऐकली की, सभोवतालच्या सर्वांच्या नजरा अगदी सहजच वर जातात. आवाजाचा कानोसा घेत विमान कुठे दिसते आहे, त्याचा शोध घेतला जातो. विमानांचा वापर सुरू होऊन इतकी वर्षे झाली तरी औत्सुक्य अजून टिकायचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाला पक्षाप्रमाणे भुर्रकन उडता उडणे शक्य नाही, हेच आहे. विमान प्रवास आता इतकी अपूर्वाईची गोष्ट राहिलेली नाही. पण हे आकर्षण टिकणार आहे.


 प्रत्येक विमानाची घडण सध्या ड्युरॅलियम धातूची असते. गोलाकार मुख्य भागाला फ्युसिलेज म्हणतात. मध्यावरती दोन्ही बाजूंना लांबलचक पंख पसरलेले असतात. काही विमानांचे पंख मागच्या बाजूला शेपटाकडे वळतात, त्यांना डेल्टा प्रकारचे पंख म्हणतात. या विमानांना शेपटीला पंख नसतात, तर फक्त त्रिकोणी उंचवटा मुख्य धडापासून शेपटापर्यंत जातो. (tail fin) इतर विमानांना शेपटालाही पंख असतात. आकार लहान एवढेच. पंखांचा उपयोग मुख्यत: हवेचा झोत मागे फेकतानाची झेप घेणे व तरंगणे यांसाठी केला जातो.


 विमानाची बांधणी हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. ड्युरॅलियमच्या सांगाड्यावरती पातळ पण कठीण पत्र्याचा सलग थर देत मध्ये पोकळी ठेवून एखाद्या ट्यूबसारखी ही बांधणी केली जाते. अतिशय पक्के पण हलके असे विमान त्यामुळे तयार होते. या पद्धतीला 'मोनोकॉक' पद्धत म्हणतात. विमानाची इंजिने पूर्वी मोटार इंजिनाप्रमाणेच पण अत्यंत वेगाने चालणारी असत. पण यासाठी मागेपुढे होणारा पिस्टन वापरावा लागे. त्याची झीज फार झपाट्याने होई व वेगावरही मर्यादा पडत. आजकाल तप्त वायूंचा फवारा अत्यंत दाबाने व वेगाने मागे फेकणारी इंजिने वापरतात. यामुळे विमान प्रतिक्रियेने पुढे फेकले जाते. या पद्धतीने पाहिजे तेवढा वेग वाढवणे शक्य होते.


 विमानांची प्रगती खऱया अर्थाने दुसऱया महायुद्धानंतरच्या दशकात सुरू झाली. जेट इंजिनांचा लांब पल्ल्यासाठी वापर सुरू झाला. प्रवाशांची संख्या, विमानाचा आकार व विमानाचा पल्ला या सर्वच गोष्टींत कल्पनातीत फरक पडत गेला. स्वनातीत (सुपरसॉनिक) प्रवासी विमान म्हणजे काँकॉर्डचा जन्म याच काळातला. तीन तासांमध्ये अटलांटिक समुद्र ओलांडून हे विमान (ध्वनीच्या दुप्पट वेगाने प्रवास करत) युरोपातून अमेरिकेत पोहोचू शके. पण याच दरम्यान वेगाचे वेड कमी होऊन सुरक्षितता व पैशांची बचत यांवर सगळ्या विमान कंपन्यांचे लक्ष केंद्रित होऊ लागले. त्यामुळे मोठ्या आकाराची बोइंग विमाने किंवा एअरबस यावर जास्त लक्ष देऊ लागले.


पूर्वापार पद्धतीप्रमाणे वैमानिकाने कंट्रोल्स वापरले की लगेच विमानाच्या हालचालींवर परिणाम अत्याधुनिक विमानात होत नाही. वैमानिकाच्या आज्ञा काँम्प्युटरकडे पोहोचतात व त्यानुसार कॉम्प्युटर स्वतःची 'बुद्धी' वापरतो. विमान उतरवणे, हवेत उडवणे वा सलग चालवणे याबाबतीत पायलटच्या हातून झालेल्या चुका 'सुधारून' घेऊन सर्वात उत्तम पद्धतीने तो सूचना देतो व त्यानुसार विमानाची हालचाल होते. याला 'फ्लाय बाय वायर पद्धती' म्हणतात.


 माणूस चुका करतो व करणारच. विमानाचे खूपसे अपघात वैमानिकांच्या चुकांमुळे होतात, या निष्कर्षावरून ही पद्धत शोधली गेली आहे. पण या पद्धतीने काम करणारी विमानेही अपघातात सापडून कोसळली आहेत. विमान प्रवास धोक्याचा अजिबात नाही. संख्याशास्त्रानुसार मोटारप्रवासापेक्षा कितीतरी पटीने तो कमी धोक्याचा आहे. फरक एकच, अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता जवळपास नाहीच.


गेल्या काही वर्षांत नागरी वापरासाठी हेलिकॉप्टर्सचाही उपयोग परदेशात मोठ्या प्रमाणावर होत आहे. विमानतळ शहरापासून खूप लांब. तेथे जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ वाचावा म्हणून एअर टॅक्सीसारखे हेलिकॉप्टर हल्ली वापरले जाते.


 अगदी नवीन मोठे बोइंग विमान जवळपास पाच मजल्यांएवढे उंच असते, तर वजनाने एकशेसव्वीस ते एकशेतीस टन असते. बत्तीस चाके असलेल्या या विमानात सहाशेपर्यंत माणसे बसू शकतात. सध्याची विमानविद्येतली प्रगती पाहता येत्या दशकात सुपरसाॅनिकच काय पण हायपरसाॅनिक म्हणजे आवाजाच्या तिप्पट वा चौपट वेगाने प्रवास करणारी विमाने वापरात आली तर नवल वाटायला नको.


 सुरुवातीच्या काळात विमानप्रवासाचा वेग जेमतेम ताशी १४० ते १६० नाॅट एवढाच होता. आजच्या जेट विमानांना त्यापेक्षा जास्त वेग घेतल्याशिवाय हवेत उड्डाणच करता येत नाही. हल्लीची जेट विमाने साधारण ६५० नॉट वेगाने व किमान पाच ते आठ किलोमीटर उंचीवरून प्रवास करतात. मुंबई ते दिल्ली बोईंग विमानाचा प्रवास असेल तर प्रवासाचा निम्मा वेळ उंची गाठणे व खाली उतरणे यातच जातो. ठराविक उंचीवरचा प्रवास जेमतेम निम्मा वेळच राहतो. सर्व जेट विमाने हवाबंद असून सर्वसाधारण हवेचा पुरेशा दाबाने पुरवठा त्यात केला जातो. जम्बोजेट विमान न थांबता पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास सहजपणे करू शकते. या विमानांमध्ये चार वैमानिक, एक नेव्हिगेटर व रेडिओऑफिसर असतो. फ्लाय बाय वायर पद्धतीत ही संख्या फक्त दोनवर येते. कुशल वैमानिकांची गरज इतकी कमी झाल्याने विमानांची किंमत वाढली, तरी वैमानिकांचा खर्च एकदम कमी होतो.


 प्रगत देशांमध्ये रेल्वेपेक्षा विमानप्रवास स्वस्त पडतो, यावर तुमचा विश्वास बसतोय काय ?


 नागरी विमान सेवेचा इतिहास:

१९०३ साली राईट बंधूंनी पहिले विमान उड्डाण केले.

१९१९ साली लंडन ते पॅरिस पहिली नागरी प्रवासी हवाईसेवा सुरू झाली.

१९२७ साली तब्बल तेहतीस तास प्रवास करून चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने अटलांटिक समुद्र पार करून दाखवला.

१९३९ साली हेंकेल जातीचे पहिले जेट विमान तयार झाले.

‍१९५२ साली डीसी कॉमेट हे नागरी जेट विमान वापरात आले.

१९६९ साली काँकाॅर्ड हे स्वनातीत विमान नागरी विमान सेवेत आले. सध्या त्याचा वापर थांबला आहे.

१९८३ साली फ्लाय बाय वायर पद्धतीची एअर बस वापरात आली.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

 *मोबाईल मूळे तयार झाल्या ह्या नवीन म्हणी*


१) स्वामी तिन्ही जगाचा, चार्जर विना भिकारी😳

२) बुडत्या बँटरीला चार्जरचा आधार😜

३) चेहेऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार ?😛

४) नको ते अँप आणि डोक्याला ताप 😳

५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर 🤔

६) आला मेसेज, केला फॉरवर्ड 😝

७) एक न धड आणि भाराभर ग्रुपमेंबर 😂

८) खाली मुंडी आणि whatsapp धुंडी .

😂😜😝😛😂😜😝😛

 खुप दिवसांपूर्वी मी ही 

राजकीय वात्रटिका लिहिली होती 


आजही परिस्थिती 

जैसे थे आहे


ना ‘शरदा’चे चांदणे

ना ‘सोनिया’चे दिस

‘घडय़ाळा’चे ओझे ‘हाता’ला

म्हणून ‘आय’ कासावीस

 

‘कमळा’च्या पाकळ्यांची

यादवी छळते मनाला

‘धनुष्य’ केव्हाच तुटलय

पण जाणीव नाही ‘बाणा’ला


 

' विळा, हातोडा अन् कंदिलाला'

आजच्या युगात स्थान नाही

डब्यांना ओढू शकेल एवढी

‘रेल्वे इंजिना’त जान नाही

 

मन आहे ‘मुलायम’

पण ‘माया’ कुठं दिसत नाही

‘हत्ती’वरून फिरणारा

‘सायकल’वर बसत नाही

 

कितीही उघडी ठेवा ‘कवाडे’

पण ‘प्रकाश’ आत जाणार नाही

विसरलेले ‘आठवले’ तरीही

‘गवई’ गीत ‘गाणार’ नाही

 

‘बंडखोर’ ‘पक्षां’चा थवा

‘पार्टी’साठी आतूर

कुंपणच खातंय शेताला

अन् बुजगावणही फितूर


काही नव्या ओळी


' स्वाभीमाना 'चे चिन्ह दिसेना

कुणाचे करावे पारायण ?

काय थट्टा चालवली 'नमो ' नमो

' नारायण '! नारायण !!


विनंती केली ईशारे दिले

तरी अवहेलनेची गाथा

कधी पावणार ' मुक्ताई ' ?

हुंदका आवरा ' एकनाथा '


ज्यांनी आणले 'स्वराज '

त्यांची 'मुरली ''मनोहर' वाटेना

संतापाने 'लाल' झाले 'कृष्ण '

ग्रहण सुटता सुटेना


अॅड, अनंत खेळकर

बिर्ला काॅलनी

जठारपेठ 

अकोला


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 रात्री सहजच नवरा बायकोला म्हणाला...


*नवरा*:-

पुन्हा जावे शाळेत 

पुन्हा ती दिसावी🙎‍♀

भले लागू दे शिकाया 📕

लसावि, मसावि 🔢


*बायकोचे उत्स्फूर्त उत्तर*:-

बनून आता गोसावी 👳‍♂

जी आहे ती सोसावी 🧕

विसरून आता लसावि, मसावि 😡

आठवणीने उद्या भांडी घासावी 

जमलंच तर फरशी पण पुसावी !!!


😬😉😬😝

 आई


आई माझा देव। आई माझा गुरू।

आई कल्पतरू। आई माझी॥ १॥


गर्भात तुझिया । वाढले निवांत ।

भासली ना भ्रांत । कशाचीच॥ २॥



थोर उपकार। आई जन्म दिले।

सोने माझ्या झाले। जीवनाचे॥ ३॥


आईचे वात्सल्य । जगाहून मोठे।

जीवनाच्या वाटे। अडले ना॥ ४॥


अमृताची धार। पाजलेस आई।

होऊ उत्तराई । सांग कशी॥ ५॥


प्राणाहूनी प्रिय। धन्य माझी आई।

नांव हो विजाई। आई माझी॥ ६॥


माझ्यासाठी देव। असे माझी आई।

आईची पुण्याई। लाभतसे॥ ७॥


स्वामी तिन्ही जगी। आईविना दीन।

सुवचन छान। सांगतसे॥ ८॥


कसं फेडू सांग। तुझे उपकार।

जीवना आकार। तुच दिले॥ ९॥


धन्य पुंडलिक। केली सेवा खरी।

पांडुरंग हरी। पाहतसे॥ १०॥


आईचे रे छत्र। सोन्याचे झालर।

मायेचा पदर। लाभलासे॥ ११॥


धन्य तोच जगी। आई ज्यास आहे।

डोळा भरू पाहे । माऊलीस॥ १२॥


आई माझी राही। थंडगार छाया।

अविरत माया । अखंडीत। १३॥


आईचे काळीज । तुटते लेकरा।

गाय रे वासरा। हंबरते॥ १४॥


संस्काराची खाण।आई रे महान

देगा देवा दान। जन्मभर॥ १५॥


वृद्धाश्रमी नका । पाठवू आईस।

आईच परीस। जीवनाची॥ 16

 🔔  *मंदिर /शाळा* 📖🖋


मंदीराचे कळस 

गगनाला भिडले

शाळेचे बांधकाम 

देणगीवाचुन अडले


दुधाचा अभिषेक 

दगडाच्या देवाला

शालेय पोषण आहार 

नुसताच नावाला


देवाचा दरवाजा 

चांदीने मढला

शाळेचा दरवाजा 

पाण्याने सडला


मंदीरातील झुबंराला 

हि-या मोत्यांचे खडे

शाळेच्या भिंतीना 

पडु लागलेत तडे


मंदीरात जाऊन 

लोक पोथी पुराण वाचतात

शाळेच्या ग्रथांलयात 

उंदीर मामा नाचतात


मंदीराच्या दानपेटीत 

गुप्तदान करतात

शाळेच्या देणगीची 

पावतीच मागतात


दरवर्षाला देवाची 

भरवतात यात्रा

पालक मेळाव्यात 

फक्त पालक सतरा


पुज्या-यांच्या गळ्यात 

सोन्या चांदीचे हार

कंत्राटी शिक्षकांची 

होऊ लागली उपासमार


न खाणाऱ्या देवाला 

पंचपक्वान्नाचा घास

शाळेत खीचडी भाताचा 

अहो येईना वास


आता तुम्हीच सांगा 

कधी संपेल इथला अंधविश्वास

शिकले - सवरलेले तरुण- तरुणीच

करु लागले आता उपवास


🙏🏻 *नवीन पिढीला समर्पित* 🙏🏻