नरक.

मॄत्युनंतर एका इंजिनीयरची नरकात रवानगी झाली. तिथे त्याने मेहनत करुन रस्ते, शौचालये, गटारं आदिंची नेटकी व्यवस्था निर्माण केली. अशिच व्यवस्था करण्यासाठी स्वर्गाच्या मॅनेजरने फोन लावला.

स्वर्गाचा मॅनेजर : त्या इंजिनीयरला स्वर्गात पाठवा.

नर्काचा मॅनेजर : अजिबात नाही.

स्वर्गाचा मॅनेजर : मी सांगतोय ते ऎक ! नाहीतर तुला भगवंताच्या न्यायालयात खेचेन.

नरकाचा मॅनेजर : काही हरकत नाही ! मी देखील पाहून घेईन. सगळे टॉपचे वकिल तर माझ्या इथेच आहेत.

भलेही तुम्ही आपल्या पत्नीला दोन सिमकार्ड
असलेला फोन घेउन दिला असला तरी चुकुनहि तीचा नंबर
wife 1 अणि wife2 असा सेव्ह करु नका ...

अति भयंकर पीजे

एकदा एक बदक आणि त्याची सतरा पिल्ले पिझ्झा हट मध्ये जाऊन पिझ्झा आर्डर करतात, आर्डर घेणारा विचारतो, इकडेच खाणार की घरी नेणार?
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडतात..
..
.
.
.
.
.
.
..

.
.
...
..
.....
pack pack!!
गंपु : सुरक्षित राहायचं असेल तर..,एक सल्ला लक्षात ठेव-...

कितीही कटु असलं,तरी नेहमी सत्य बोल आणी.........

झंपु: आणी काय?
.
.
.
.
.
.
.
.
.
.

गंपु: आणी पळुन जा!!

"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो "

चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो
काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो
चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो  ।।१।।

कोरडा डोळा , कोरडी विहीर
कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।२।।

वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।३।।

या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।४।।

बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी
पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी
दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।५।।

असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो
चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो ।।६।।

योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस
देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस
माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।७।।

Unpossible....!!!

एकदा एक मुलगी आपला रिझल्ट बघून म्हणते....

काय??? मी नापास झाले????
आणि ते पण इंग्रजी सारख्या विषयात???
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
Unpossible....!!!

धवळे

आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला ।
पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥

- समर्थ रामदास

मंगलाष्टक

स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् । मोरेश्वरम् सिद्धीदम् ।
बल्लाळम् मुरुडम् विनायक महम् । चिंतामणिम् थेउरम् ।
लेण्याद्रीम् गिरिजात्मजम् सुवरदम् । विघ्नेश्वरम् ओझरम् ।
ग्रामे रांजणनामके गणपतीम् । कुर्यात सदा मंगलम् ।।

…….अंन पुढारी मेला

ऐकदा एका गावातला पुढारी अचानक मेला.गावात पोलिस येतात आणी पुढारी कसा मेला याची चौकशी करु लागतात.यावेळी लोक सांगतात पुढारी पाय घसरुण खड्यात पडलेले होता आणी मदतीसाठी गावातील लोकांना हाका मारत होता .त्यानंतर लोक येतात.आलेल्या लोकांपैकी काही लोक बोलतात पुढारी मेला. हे एकताच पुढारी जोरात म्हणतो नाही मी जिवंत आहे. पण लोक त्याच्या अंगावर माती टाकतात आणी त्याला गाडतात.याबर पोलीस विचारतात अहो तो सांगत होता ना तो जिवंत आहे तरी माती का टाकली? लोक सांगतात अहो तो पूढारी आहे. त्याच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल.

संताची इंग्लीश

संता एका संध्याकाळी बायको, छोटा 3 वर्षाचा मुलगा आणि छोटी 4 वर्षाची मुलगी असा आपल्या पुर्ण कुटुंबाला घेवून एका पार्टीला गेला. संताने हल्लीच इंग्लीश स्पिपींगचा कोर्स लावला होता त्यामुळे त्याने आपली आणि आपल्या कुटूंबाची ओळख सगळ्यांना इंग्रजीत करुन दिली -

आय ऍम सरदार ऍन्ड शी इज माय सरदारनी - सरदारजीने स्वत:ची आणि आपल्या बायकोची ओळख करुन दिली.

हि इज माय किड ऍन्ड शी इज माय किडनी - सरदारजीने आपल्या छोट्या मुलाची आणि मुलीची ओळख करुन दिली.
रिक्षा चालवणारे लोक कधीही Football खेळू शकत नाहीत...

का??
...
.
.
कारण
.
१. ते हातानी "किक" मारतात..

२."कॉर्नर" मिळाला कि ते गप्पा टाकत उभे राहतात..

३. शिट्टी ऐकली की थांबायचे सोडून हे लोक RTO वाला समजून पळून जातात..

एक दिन का प्यार

मुंगी आणि हत्तीचे लव मॅरेज झाले.

मात्र लगेचच दुस-या दिवशी हत्तीचे दुःखद निधन झाले.

मुंगी दुःखी झाली व म्हणाली, "वाह रे मोहब्बत... एक दिन का प्यार हुआ, अब सारी उम्र कबर खोदने में बितेगी..."

संताचा व्हॅक्युम क्लिनर

व्हॅक्युम क्लिनर सेल्समनचा जॉब लागल्यापासून संता उत्साहात होता, भिमाकाकुंच्या घरात शिरला आणि ती काही बोलण्याच्या आतच खिशातुन एक पिशवी काढुन त्यातले शेण जमिनीवर टाकल आणि

म्हणाला : "मॅडम ह्या व्हॅक्युम क्लिनरने हे जमिनीवरचे शेण ५ मिनीटात साफ होईल नाही तर मी स्वत: ते खाऊन टाकेन."

भिमाकाकुं (उत्साहात) : तु ते शेण पावाबरोबर खाणार की चपातीबरोबर?

संता (दचकून) : का ?

भिमाकाकुं : कारण आता लाईट गेले आहेत..

आदीवाशी शाळा

एकदा एका शिक्षकाची आदिवासी शाळेत बदली होते.

तिथल्या मुलांना शिक्षक पहिला प्रश्न विचारतो : 
मुलांनो, तुमचे जुने शिक्षक कसे होते?

सगळी मुले एका स्वरात उत्तर देतात : 


"स्वादिष्ट!!"

देवा, स्त्रीहृदयीं

देवा, स्त्रीहृदयीं मनोरमपणा केव्हा कुणीं ओतिला ?
गङगौघापरि भूवरी वरुनि ये ओढाळ ओढा कसा !
भूमीतें पहिल्या रसें सजवितां हा सार्थ होऊ रसा;
हा दिव्याभिमुखी करी ऊजळुनी चेतोभवज्योतिला.
नेत्रें तीं वळतां ऊठे प्रथम त्या वृष्टींतलें वादळ,
गालींचीं अरुण स्मितें झळकतां प्रीति त्वरें अङकुरे,
ऐकाकी फुलतांच वाक्सुमन तें वेडा पतङग स्फुरे,
त्या आलिङगनचुम्बनांत पहिली ऐकी पटे मङ्गल.
कैशी घेत अनेक रम्य वळणें जाऊ वरी हा पथ,
भासे मन्दिर न्हाणिलें गिरिशिरीं की सोनियाच्या रसें !
प्रीतीची अधिदेवताच वसशी तू त्या स्थळीं राजसे,
देवी, अन्तर तोडुनी तव पदीं आलोंच मी धावत.
म्हतारीं म्हणुं, देत की भवपथीं काटेकुटे मातले -
काटयांची क्षिति कां गुलाब फुलतां हे ध्येयलोकांतले ?


कवी - माधव ज्युलियन
१ फेब्रुवारी १९१२

कशी तुज समजावू सांग

कशी तुज समजावू सांग
का भामिनी उगिच राग ?

हास्याहुन मधु रुसवा
हेमंती उष्ण हवा
संध्येचा साज नवा
हा का प्रणयानुराग ?

चाफेकळी केवी फुले
ओष्ठ-कमल जेवी उले
भोवती मधुगंध पळे
का प्रसन्न वदन राग ?

वृत्तींचा होम अमुप
त्यात जाळू गे विकल्प
होवुनिया निर्विकल्प
अक्षय करु यज्ञ-याग

ओठांचे फेड बंध
गा इकडे मुक्तछंद
श्वासांचे करू प्रबंध
हृदयांचे मधु प्रयाग


 - बा.भ.बोरकर

दीपका ! मांडिले तुला

दीपका ! मांडिले तुला, सोनियाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्यांची करू सोपी पायवाट

घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी
घाशिली समई मीही केली तेलवात
दह्यात कालविला हा जिरेसाळ भात

गा रे राघू, गा ग मैने बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
कुतु काऊ चिऊ माऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रे

गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याते थोर करी माये ! कुलदेवी !


  - बा.भ.बोरकर

दिव्यत्वाची जेथ प्रचिती

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती


 - बा.भ.बोरकर

नाही पुण्याची मोजणी

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग

आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप

पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा

  - बा.भ.बोरकर

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुगुटमणी देखा ।
पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥


  - संत चोखामेळा

ऊंस डोंगा परी

  ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
  काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥

  कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
  काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

  नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें ।
  काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥

  चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।
  काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥

  -  संत चोखामेळा

विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी

विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥

निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥

हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥


 - संत चोखामेळा

झिणि झिणी वाजे बीन

झिणि झिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदीन चीज नवीन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अति लीन

कधी खटका, कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका, घेते फिरत कठीण

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण

  - बा.भ.बोरकर

जोहार मायबाप जोहार

जोहार मायबाप जोहार ।
तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला झालो ।
तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥

बहु केली आस ।
तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी ।
आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥


 - संत चोखामेळा

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद ।
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥


 -  संत चोखामेळा

 आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
 विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
 उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
 भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
 चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

  - संत सेनान्हावी
माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ,
चुलातीले काकी म्हणता अंतर किती पडे,
जीजीले जीजी म्हणता मिळे जीभाले निवारा,
सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा,

- बहिणाबाई चौधरी

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही,
हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही,
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही,
नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही,
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही,
धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही,
जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही,
एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही,
जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही,
जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही,
ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही


 - बहिणाबाई चौधरी

"टणक ऊस"

स्थळ : पुणे,  वेळ दु. 1 ते 4 मधली..

एक पुण्याबाहेरील माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहिहि अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच. "टणक ऊस" ???

हे नाव का ठेवले असेल?

उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने बेल मारलीच.
एका म्हातार्याने पुणेरी चेहर्‍याने दरवाजा उघडला.

"काय्ये ?" म्हातारा खेकसला

"अहो ते... या बंगल्याचे नाव "टणक ऊस" का ठेवलय ?"

म्हातारा विस्कटलाच... "हे विचारायला दुपारची झोप जाळलीत माझी ? भामटेगिरी आहे ही"

" साॅरी... पण आता झालीच आहे झोपमोड तर सांगा  ना "टणक ऊस" काय प्रकार आहे?"  चाचरत त्या  माणसाने विचारलं...

"निलाजरे आहात तुम्ही"

"ते झालंच पण "टणक ऊस"....

"अहोssss..." म्हातारा फिस्करला
"अक्षर जुनी झाली की तुटून पडतात..... सगळ्यांना माहिती आहे हे 'पाटणकर हाऊस' आहे....

🔶 दगड 🔶

शब्द एक तो 'दगड' रांगडा
परंतू त्याची रूपे पहा
वृत्ती, दृष्टी जैसी असते
अर्थ लाभतो त्यास महा

अ, आ, इ, ई लिहीण्यासाठी
'दगडा'ची ती पाटी असते
सरस्वती नाखूष ज्यावरी
त्याला जग हे 'दगड'च म्हणते

बालपणी जी केली चोरी
कैर्‍या पाडून दगडांनी
संसाराचा आरंभ होतो
तीन 'दगडां'च्या चुलीतूनी

ऐतिहासिक शिल्पे म्हणजे
दगडावरती कोरीव काम
सेतू बांधिला वानरांनी त्या
'दगड' घेऊनी मुखात राम

'दगडा'ची ती शिला होते
वास्तू बांधण्या आरंभ होतो
अशुभ वार्ता ऐकण्याआधी
हृदयावरती 'दगड ठेवतो

मैलाचा तो 'दगड'च असतो
आयुष्याचे वळण सांगण्या
'दगडा'ची ती भिंत बांधती
नात्यामधले वैर दावण्या

'दगड' घालूनी डोक्यामध्ये
कुणी कुणाचा जीवच घेतो
या 'दगडा'तूनी शिल्पकार तो
सुंदर, मोहक मूर्ती घडवतो

निर्धाराचा शब्द म्हणजे
काळ्या 'दगडा'वरची रेघ
संप, बंद आंदोलन म्हणजे
क्रूर, अमानुष 'दगड'फेक

'दगडा'तूनच जन्मां आले
पाटा-वरवंटा अन् जाते
पाथरवट निर्माते  परंतू
आज त्यांस ना कुणी पुसे

मूर्ख माणसां अर्थ सांगणे
'दगडा'वरती डोके फुटणे
विनाश घेता  ओढवून कधी
पायावरती 'दगड' पाडणे

ज्याचा त्याने विचार करणे
'दगड'घ्यावा हाती कशास
नावच अपुले राहील मागे
'दगडा'वरती कोरून खास.


- सौ.शुभांगी श्री. नाखे (अलिबाग)
कृपा उपजली जयराम स्वामीसी । आले पाहायासी भाव माझा ॥ १ ॥
देखोनी तयासी आनंद वाटला । कंठ कोंदटला आनंदाने ॥ २ ॥
मनेंचि आरती केला नमस्कार । पूजिला साचार मनामाजीं ॥ ३ ॥
बहिणी म्हणे त्याचे मनांतील हेत । ओळखे निश्चित पांडुरंगा ॥ ४ ॥

- संत बहिणाबाई 

गांव

खरं खरं सांगतो राव् ,
उगीच न्हायी ठेवत नाव....

या मोबाईलनं बिघडवलं
आता सारं माझ गांव....

वडाचा मोठा पार होता,
वारा थंडगार होता.....

गप्पा ,निरोप,खुशाली,
कहाण्यांचा बाजार होता....

काय चाललय?कस चाललय?
एकमेकांत संवाद हाेता....

कबड्डी होती,कुस्ती होती,
आट्या - पाट्या,लपा-छपी,

सुर-पारंब्यावरचे झाेके हाेते,
आेढ्याच्या डाेहात पाेहणे हाेत.

आंब्याच्या झाडावरच बसुन,
कच्चे-पीकलेले आंबे खायची मजा हाेती...

विटी-दांडु,खेळाच मैदान होतं,
इतर अनेक मैंदानी खेळ होते...

उनाडक्या होत्या,मस्ती होती,
आप-आपसात मेळ होता...

चिंचा होत्या,बोरं होती,
आंबे हाेते,ऊस हाेता...

गोठाभर ढोरं होती...
ढाेरां बराेबर पाेर हाेती....

जिवाला जीव देनारे,
दिलदार मित्र होते......

किर्तन होतं,भजन होतं,
जात्यावरचं गानं होतं.…

शाळेतल्या कवितेले,
आनंदाचं उधान होतं...

पण..............

जसं गावात हा काेठुन,
मोबाईल आला,नेट आलं....

चँनलच कनिक्शन,
घरा घरात थेटआलं...

गजबजलेलं गाव माझ,
आता निर्जन बेट झाले....

सकाळ संध्याकाळ सारी माणस,
टीव्हीलाच चिटकुन राहीली..

रस्तावर वर्दळ करणारी माणसे,
टी वी पुढंच सेट झालीत.....

मैंदानावरील मुल सारी,
देवळामागच्या अंधारात...

माेबाईल मध्येच,गुंतली सारी......

सुनेसुने झाले वडाचे पार,
मुके झाले देवळाचे ओटे....

दिवस-रात्र मोबाईल वर,
नुसती फिरवत राहतात बोटे.....

खर-खर सांगताे राव.....
या माेबईलनच बीघडवल माझ सार गाव !


कवी - सतिश आहेर
मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी । तैसीच आवडी तुकोबाची ॥ १ ॥
अंतरींचा साक्षी असेल जो प्राणी । अनुभवें मनीं जाणेल तो ॥ २ ॥
तृषितांसी जैसें आवडे जीवन । तैसा पिंड प्राणावीण तया ॥ ३ ॥
बहिणी म्हणे हेत तुकोबांचे पायीं । ऐकोनिया देहीं पदें त्यांचीं ॥ ४ ॥

- संत बहिणाबाई

मित्रा , हा भारत आहे

एक म्हैस जंगलात घाबरून पळत होती .

एका उंदराने,विचारले " अगं, इतकी का पळतेस ?"

म्हैस: जंगलात पोलिस आलेत हत्ती पकडायला.

उंदीर : पण , तू तर म्हैस आहेस . तू का पळतेस ?

म्हैस :  मित्रा , हा भारत आहे .
एकदा त्यांनी पकडले की पुढची वीस वर्ष कोर्टात सिद्ध करावं लागेल की मी हत्ती नाही , म्हैस आहे .
ऐकून उंदीरही पळू लागला .

** आम्ही असे शिकलो **

"आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ..
             त्यावर करतो
             तांब्यानी प्रेस,
             तयार आमचा
             शाळेचा ड्रेस..
       
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग..
       
            धोतराचं फडकं
            आमचं टिफीन,
            खिशात ठेवुन 
            करतो इन..
करगोटा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
            मिरचीचा ठेचा
            लोणच्याचा खार,
            हाच आमचा
            पोषण आहार..
            
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज..
             काट्यांच रूतणं
             दगडांची ठेच,
             कसा सोडवायचा
             हा सारा पेच..
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट..
             जुन्या पुस्तकांची
             अर्धी किंमत,
             शिवलेल्या वह्यांची
             वेगळीच गंमत..
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची..
             केस कापण्याची
             एकच शक्कल,
             गप्प बसायचे
             होईपर्यंत टक्कल..
गेले ते दिवस,राहिल्या त्या फक्त आठवणी....

पाषाण विठ्ठल

पाषाण विठ्ठल स्वप्नांतील तुका । प्रत्यक्ष कां सुखा अंतरावें ॥ १ ॥

घेईन उदंड सेवासुख देहीं । साक्ष या विदेही आहे मज ॥ २ ॥

भ्रताराची सेवा पतिव्रता करी । तरी ती उद्धरी उभय कुळें ॥ ३ ॥

बहिणी म्हणे माझ्या जीवाची विश्रांति । भ्रतारें समाप्ती जन्ममृत्यु ॥ ४ ॥


- संत बहिणाबाई

न बोलवे शब्द अंतरींचा


न बोलवे शब्द अंतरींचा धावा । नायके तुकोबा काय कीजे ॥ १ ॥

अदृष्ट करंटें साह्य न हो देव । अंतरींची हांव काय करूं ॥ २ ॥

तेरा दिवस ज्यानें वह्या उदकांत । घालोनियां सत्य वाचविल्या ॥ ३ ॥

महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ । बोलिला लोकांत सर्वद्रष्टा ॥ ४ ॥

अंतर साक्ष आहे निरोपणीं हेत । जडे परी चित्त वोळखेना ॥ ५ ॥

बहिणी म्हणे मीच असेन अपराधी । अध्याय त्रिशुद्धी काय त्यांचा ॥ ६ ॥


- संत बहिणाबाई

एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो....
..
..
..
..
..
..
कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत.
झंप्याच्या डाईनिंग रूम मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप
३ तास झाले संपेना तेंव्हा...

" नेमाडपंथ "


ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या "कोसला" या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच…! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. '..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले."

तर हिंदू कादंबरी बाबत बोलायचे झाले तर कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृती' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापू  टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ'. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता, मिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. 'कोसला' आणि नंतरच्या 'चांगदेव चतुष्टय' मधल्या 'बिढार', 'हूल', 'जरीला' प्रमाणेच ही कादंबरीदेखील ही अपेक्षा पूर्ण करते. आणि 'हिंदू चतुष्टया' तील पुढच्या प्रत्येक कादंबरीविषयची उत्सुकता निर्माण करते. वाचनाचे समाधान देतानाच वाचकाला जीवनाच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे.

प्राध्यापक ते सडेतोड समीक्षक या त्यांच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप...

* प्रा. डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे
* जळगाव जिल्ह्यात सांगवीत १९३८ मध्ये जन्म
* पुणे विद्यापीठातून बी.ए. (१९६१)
* मुंबई विद्यापीठातून एम.ए. (१९६४)
* १९६५ ते १९७१ या काळात नगर, धुळे, औरंगाबादमध्ये इंग्रजीचं अध्यापन
* गोवा विद्यापीठात इंग्रजीचे विभागप्रमुख
* तौलनिक साहित्याभ्यास विषयाच्या प्रमुखपदावरून मुंबई विद्यापीठातून निवृत्त

साहित्यसंपदा-

* छंद, रहस्यरंजन, प्रतिष्ठान, अथर्व या नियतकालिकांमधून भालचंद्र नेमाडेंनी कविता लिहिल्या.
* १९६३ मध्ये, उमेदवारीच्या काळात 'कोसला' कादंबरी प्रकाशित... या कादंबरीनं कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडले...
* 'कोसला'नंतर तब्बल एका तपानं, समकालीन मराठी समाजावर भाष्य करणाऱ्या 'बिढार', 'जरीला', 'झूल', 'हूल' या कादंबऱ्यांनी मराठी रसिक वाचकांना वेगळी अनुभूती दिली.
* 'मेलडी' आणि 'देखणी' हे काव्यसंग्रह प्रकाशित... विंदा करंदीकरांच्या शैलीशी साधर्म्य साधणाऱ्या कविता... व्यवहारी, अमानुष जगातल्या वास्तवावर उपरोधिक भाष्य...
* मराठी समीक्षेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं श्रेय नेमाडेंना जातं... 'साहित्याची भाषा' हे भाषाविज्ञानपर पुस्तक आणि 'टीकास्वयंवर' हा समीक्षा लेखसंग्रह प्रकाशित. 
* २०१० मध्ये 'हिंदू' या महाकादंबरीचे प्रकाशन.  

पुरस्कार- 

* "साहित्य अकादमी पुरस्कार - १९९०"
* "पद्मश्री पुरस्कार"' - २०११"
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा "जनस्थान पुरस्कार" व नुकताच जाहीर झालेला "ज्ञानपीठ पुरस्कर"… 


आपल्याला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कराने अवघे मराठी जन आनंदून गेले आहे, आज पुन्हा एकदा मराठी साहित्यक्षेत्रात एक मनाचा तुरा खोवला आहे.  आपले मनपुर्वक अभिनंदन व पुढील आयुष्यास अनेक शुभेच्छा…!!

-
अभिनय महाडिक 
रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास?

सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.

रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली कायती माहेराहून?

सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्याअंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.
एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले:- अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने??

पहिली मुंगी म्हणाली:- अगं हॉस्पिटलला चाललेय......

दुसरी मुंगी:- का काय झालंय??

पहिली मुंगी:- अगं हत्तीदादा आजारी आहेत ना. त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते,

आलों, थांबव शिंग !

आलों, थांबव शिंग दूता, आलों ! थांबव शिंग !

किति निकडीनें फुंकिशि वरिवरि ! कळला मला प्रसंग ध्रु०

जरि सखे जन हाटा निघती,

आर्जवुनी मजला बोलविती,

परोपरी येती काकुळती,

पहा सोडिला संग. दूता० १

जरि नाटकगृह हें गजबजलें,

जरि नानाविध जन हे सजले,

मजविण त्यांचें कितीहि अडलें,

पहा सोडिला रंग. दूता० २

जरी खवळलें तुफान सागरिं,

मार्ग भरे हा जरि घन तिमिरीं,

पहा टाकिली होडी मीं तरि

नमुनि तिला साष्टांग. दूता० ३

अतां पुकारो फेरीवाला,

गवळी नेवो गाइ वनाला,

कारकून जावो हपिसाला,

झालों मी निस्संग. दूता० ४

विसर्जिली मीं स्वप्नें सारीं,

आशा लावियल्या माघारी,

दुनियेच्या आतां बाजारीं

माझा न घडे संग दूता० ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - अंजनी
राग - हिंदोल
ठिकाण - अजमेर
दिनांक - १४ ऑगस्ट १९२१

तृणाचें पातें

तृणांचे पातें हालतें डोलतें वातें. ध्रु०

झगा मख्मली हिरवा गार,

मुकुटहि रत्‍नजडित छान्दार,

तुरा तयावर झुपकेदार,

हलवि ह्रदयातें १

यावरि तेज कसें रसरसतें;

जीवन नसांतुनी थबथबतें,

चिमणें इंद्रचाप थयथयतें.

दंवीं जइं न्हातें. २

तुम्हापरि सूर्य किरणिं या न्हाणि !

तुम्हापरि वरुण पाजि या पाणि,

तुम्हापरि पवन गाइ या गाणिं,

बघा हें नातें. ३

मग या पायिं कसें तुडवीतां ?

खड्‌ग यांतलें उद्यत बघतां

भरे कांपरें स्मरतां सत्ता

झुलवि जा यातें. ४

यांतुनि कृष्ण मुरलि वाजवितो,

वामन बलीस यांत दडवितो,

यांतुनि नारसिंह गुरगुरतो,

भ्या रे यातें. ५


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२७

कोण रोधील ?

या भविष्याचिया दिव्य कारागिरा
कोण रोधील ? दे कोण कर सागरा ? ध्रु०

शूल राजा, तुझा रक्त त्यांचे पिओ,
गृध्रगण भक्षण्या पुण्य गात्रां शिवो,
दुर्गिं त्यांचिं शिरें अधम कुणि लोंबवो,
अंत त्याचा नको समजुं हा नृपवरा ! १

ज्योति मृत्युंजय प्रबळ पिंडाहुनी
समज दावाग्निशा चहुंकडे पेटुनी
देशकालांसि रे टाकितिल व्यापुनी,
अंतिं फडकेल रे ध्वज तयांचा खरा. २

ज्यावरी भार तव, ज्यावरी गर्व तव,
विफल तोफा तुझ्या, पलटणी सर्व तव,
विफल बलदर्प तव, यांत का शर्व तव ?
उघड लोचन, पहा दूर राजा, जरा. ३

भव्य ते स्तंभ बघ तुंग अट्टालिका,
त्या कमानी पहा, त्या गवाक्षादिकां,
सौध ते, कळस तो सोनियाचा निका,
ध्वज तरी प्रीतिचा मोहवी भास्करा. ४

तेथ त्या रत्‍नमय दिव्य सिंहासनीं
लखलखे भरतभूजननि बघ विजयिनी !
प्रणय, नय, सत्य हे सज्ज गण रक्षणीं,
बघ भविष्याचिया दिव्य त्या मंदिरा. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - वरमंगला
राग - भूप
ठिकाण - अजमेर
दिनांक - १८ ऑगस्ट १९२२

मिळे ग नयनां नयन जरी

मिळे गे नयनां नयन जरी-

नयनमोहिनी, मनीं उसळती लहरींवर लहरी. ध्रु०

काय घुसळिला यापरि सागर मंथनकालिं सुरीं ?

विजेपरी लखलखतां अवचित दिपविशि नेत्र खरी.

पिटाळुनी स्मृति, धृति, मति ह्रदया व्यापिशि तूंच पुरी.

निलाजरे हे नयन पाहतिच, हासति लोक तरी.

नयनगवाक्षीं सकलेंद्रियगण एकवटे सुंदरी.

पापदृष्टि ही म्हणति, त्यांहिं मज ओळखिलें नच परी.


कवी - भा. रा. तांबे
जाति - पतितपावन
राग - भीमपलासी
ठिकाण - आग्रा रेल्वेस्टेशन
दिनांक - २२ जुलै १९२२

अवमानिता

कां मज आज तुम्हीं बोलविलें ?
बहु दिवसांनीं स्मरण जाहलें,
आज कसें हें घडलें ? ध्रु०

बालपणांतिल बालिश वर्तन,
तरुणपणांतिल तें भ्रूनर्तन,
स्वप्निं आज कां दिसलें ? १

चित्रगुप्त लिहि वह्या आपुल्या,
वरी धुळीच्या राशि सांचल्या,
त्यांस कुणीं हालविलें ? २

ह्रदयपटावरि सुंदर चित्रें
आपण रचिलीं पूर्वि पवित्रें,
बघुनि आजवर जगलें. ३

स्मराल कधिं तरि या आशेवरि
उदासवाणे दिवस कसे तरि
आजवरी घालविले. ४

परि समजूं का हा भाग्योदय,
भाग्यास्तचि कींपूर्ण तमोमय ?
ह्रदय तरल खळबळलें ! ५

सोक्षमोक्ष घेइन करुनी मी,
जगेन कीं जाइन मरुनी मी,
कांपत येण्या सजलें ! ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - भूपदंड
राग - तोडी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर,
दिनांक - १५ मे १९३४

दुर्गा

छेड सखे, दुर्गा मधु रागिणि;
बीनलयीं घर टाक थरारुनि. ध्रु०

लालन लालडि, लोचनमोहिनि
अमृत झरूं दे निजकंठातुनि. १

उन्मादक सुर-मोत्यांच्या सरि
उधळ, थरारीं मैफल भारुनि. २

धवल चांदणें स्रवे अमृतरस,
कशी पसरली शांत यामिनी ! ३

धीरोदात्त गभीरा दुर्गा,
ओत ओत सुर गभीर साजणि ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - दुर्गा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

चरणाखालिल हाय मीच रज !

सांगुं कुणा गुज साजणि, मनिंचे ?

बोलहि वदण्या चोरि समज मज;

मी पतिविरहित, शंकित नयनें

बघुति लोक मज, अशुभ गणुनिया टाळतात मज. ध्रु०

कुणाजवळ करुं ह्रदय मोकळें ?

कोंडमार किति ! दिवस कंठितें गिळुनि दुःख निज १

मी न मनुज का ? काय न मज मन ?

नच विकार का? लहरि उठति मनिं, काय सांगुं तुज ! २

पुरुष वरिति नव नवरि कितितरी,

सकल शुभच तें ! असहायच मी मुकेंच सावज ! ३

कशास जाई तो या मार्गी ?

बघुनि दुरुनिया पाणी पाणी होतें काळीज. ४

दुसर्‍या मिरविति युवति पतिशिरीं,

तुडविति पाउलिं चरणाखालिल हाय मीच रज ! ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - श्रीमती
राग - तिलककामोद
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

कवनकमळें

सखिलोचनकसारीं सारीं माझीं कवनें फुलति बहारीं ध्रु०

मूळ धरुनि तळिं गहन, जळावरि नाचति ठुमकुनि सारीं !

अथांग तुळ तुज न कळे रसिका, सुषमा वरिल निहारीं. १

सुरांगनांचें क्रीडास्थळ हें ह्या कमळांमाझारी,

इंद्रासह त्या उतरुनि या जळिं केलि करिति शृंगारीं. २

सुरासुरांची झुंज कमळिं या, रमति इथे नरनारी;

उषा-निशा नाचती, न उठती काळाच्या ललकारी ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - लवंगलता
राग - काफी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १९ सप्टेंबर १९३५

मेनकावतरण

आलि आलि दीप्तिशाली
कोटि चंद्र नेत्रिं भालिं
स्वर्गाहुनि खालिं खालिं
मेनका वसंतीं १

अवतरली जैं छुमछुम
जिरुनि तपाची खुमखुम
थरथरूनि रोम रोम
टकमक मुनि पाही ! २

लटपटला गाधिजमुनि
जोडी जी सिद्धि तपुनि
चरणिं तिच्या ती ओतुनि
श्वानासम लोळे ! ३

जय जय जय जय मदना !
ब्रह्मा-शिव-विष्णु-गणां,
न चुके तव शर कवणा,
ध्वज तुझा त्रिलोकीं ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - मंदहसित
राग - खमाज
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २४ सप्टेंबर १९३५

जय रतिपतिवर !

सुरासुरांचा चुरा करी स्मर,
मंत्रि शीतकर, सेनाधिपवर
मधुऋतु मृदुतर, युवतिनयन शर ! ध्रु०

वैरि भयंकर योगीश्वर हर,
सोडि तयावर मृदुल नयनशर;
जळफळला क्षोभला मुनीश्वर
झोडुनि परि त्या स्मर करि जर्जर ! १

डळमळलें अढळहि योगासन,
तृतीय नयनीं क्षोभ हुताशन,
धगधगला जणुं जाळी त्रिभुवन !
भस्म जाहला जळुनि कुसुमशर ! २

आटोपेना अशरीरहि परि
शरावरी शर सोडी हरावरि,
जेरिस ये हर, अस्त्रें आवरि,
आला शरणागत चरणांवर. ३

स्मरमीनध्वज फडके त्रिभुवनिं,
सुर-नर-खग-मृग लोळति चरणीं,
वृथा वल्गना प्रीतीच्या जनिं !
जय कविकुलगुरु ! जय रतिपतिवर ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - मारवा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १ ऑक्टोबर १९३५

शरणागत

दारिं उभा शरणागत तव मी,
क्षुद्र जंतु अति भवसंभव मी. ध्रु०

दिशि दिशि वणवण करुनि खपुनि अति
धरुनि देहली करितों स्तव मी. १

गहन तिमिरिं चांचपत येइं वर
त्रिविध ताप सोसुनि नव नव मी. २

ताड ढकल ! हें सोडिं दार नच;
उभा अढळ तें उघडशि तंव मी ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - केदार
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १ ऑक्टोबर १९३५

घर राहिलें दूर !

उरला दिवस अल्प, घोडें थकुनि चूर,

पथ रानिं चधणींत, घर राहिलें दूर. ध्रु०

असशील घरिं आज तूं गे बघत वाट,

प्राण स्वनयनांत, पोटांत काहूर. १

मुद्रा तुझी म्लान डोळ्यापुढे येइ,

नाहीं मला पंख, ह्रदयांत हुरहूर. २

या निर्जनीं रानिं दे कोण मज साथ ?

माम् त्राहि जगदीश ! होई न निष्ठूर ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - भीमपलासी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ३ ऑक्टोअर १९३५

चुकला बाण

आलिस काय खिडकींतून गेलिस काय पळ ढुंकून

एक कटाक्षशर टाकून कासावीस जीव करून ? ध्रु०

आंबराईत झुळुक शिरून मोहर जाय जशी उधळून

शांत तळ्यांत पवन घुसून जाई शीघ्र जळ ढवळून !

आलिस काय, गेलिस काय ? १

मी पांथस्थ मार्गी जाइं, तुझिये दारिं ठरलों नाहिं,

धरिला नेम अन्यासाठिं चुकला बाण कां मज गांठि ?

आलिस काय, गेलिस काय ? २


कवी - भा. रा. तांबे
जाति - गंधलहरी
राग - हमीर
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २ ऑक्टोबर १९३५

पाणपोईवाली

झाली ती ओणवी, तों पदर उरिं सरे सैल झाला, झुले तो

पाणी दे पाणपोईजवळ उभि, पितां ऊर्ध्वदृष्टी फुले तो !

बोटें तीं ओंजळीचीं विरळ, मग तिची धार बारीक झाली;

मद्येच्छू काय पीतो अविचल ? मदिराक्षी तरी काय घाली !


कवी - भा. रा. तांबे
वृत्त - स्रग्धरा
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

वारुणीस्तोत्र

जयतु जय भगवती ! जयतु जय वारुणी !
मूलमायाभगिनि जय जगन्मोहिनी ! ध्रु०

मूलशक्त्यंतरी
उठति लहरि न जरी
सृजन कवणेपरी
करिल मायाविनी ? १

केवि जगदंड हें,
सोममार्तंड हे,
रचिल नव पिंड हे
मोह नसतां मनीं ? २

कल्पनागार तूं !
मोहभांडार तूं !
पुरविशी सार तूं
शक्तिसहचारिणी. ३

देवदानव मिळुनि
धर्म निज सांडुनी
सागरा मंथुनी
काढिलें तुज गणीं ! ४

श्रीसहोदरिणि तूं !
अप्सरा-भगिनि तूं !
रतिसुखस्त्रविणि तूं !
जयतु जय भास्विनी ! ५

दुःखदलमर्दिनी,
विभवसुखवर्धिनी !
मोहिले ऋषिमुनी
जयतु उन्मादिनी ! ६

जय कराल-प्रिये !
मोहनिद्रामये !
मूर्त हास्य स्वयें
हटविकटहासिनी ! ७

देवि उदयोऽस्तु तव!
देवि विजयोऽस्तु तव !
जय उदे ! जय उदे !
जय उदे ! स्वामिनी ८


कवी - भा. रा. तांबे
जाति - सुरमंदिर

जमादार

'काय जमादार तुझा शेवटील पाहरा ?
जागशि निमकास खरा, पाहर्‍यांत मोहरा !
क्षितिइं अर्धमग्न चंद्र वाट पाहि का सखिची ?
मदनापरि हा प्रवालवर्ण उधळी किरणशरां ! १

जागुनिया अंवशीचा दाट पालवीमधून
पक्षि, हांक दे प्रियेस, 'जाइन बाहेर जरा,'
'परवल बतलाव जाव ! रोकटोक फिर किसकी ?'
'परवली बात मजशि करिशि काय चाकरा ?' २

'मालिक तुम मैं नोकर कवराणिसाब, सही;
पर बंदा हुक्म का हुं, पहरेका काम बुरा !'
'सरली रे रात्र परी, परवलचें काम काय ?
हटकशील दिवसा का ? तूं आखडसासरा ! ३

'नहि तंबुर, बगुल नही, वर्दि नही, बजि अबतक;
अमल तिन बजनेका, हिरना नहि अभि उतरा !'
'सारि रात्र झोप नाहिं, ये हुशारि पवनिं गार,'
'नींद लेव बाइसाब !' नेक एक तुंच खरा !' ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - दासी
राग - कलिंगडा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ६ ऑक्टोबर १९३५

ग्रीष्म

स्वारि बाइ केवि आलि !
घर्मि अंग अंग न्हालि !
आलि गालिं बाइ लालि,
उतरिन जलकुंभ मी ! ध्रु०

तापे शिरिं अंशुमालि,
आग आग भोवतालि,
रखरखीत ह्या अकालिं
अग्निच्या जिभा झळा ! १

तरुतळिं बसुनी विवशी
रवंथ करिति गाइम्हशी,
गुपचुप हे पशुपक्षी
दडति गुहाकोटरीं. २

पक्षि एकटा सुतार
ठकठक करि बेसुमार,
सारखा करी प्रहार,
ध्वनि गभीर खोल हा ! ३

पोपट पिंजर्‍यांत शांत
चित्रसा बसे निवांत,
श्वान हलुनि नखशिखांत
धापा हें टाकितें ! ४

वाटेवर तप्त धूळ,
फिरके ना मुळिं पाउल,
गांव जणूं निद्राकुल,
सामसूम चहुंकडे ५

आगीची उठे लाट,
तप्त भिंति, तप्त वाट,
तप्त वाट, तप्त खाट,
लाहि लाहि काहिली ! ६

ओढ दासिची नितांत,
आलां या वेळिं कांत !
पाय धुतें, बसा शांत,
वारा मी घालितें ! ७


कवी - भा. रा. तांबे
जाति - अरुण
राग - सारंग
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ ऑक्टोबर १९३५

विरहांतील जीवन

केवि सरे रजनी ! मज नीज न,

सरे कसा तरि कामकाजिं दिन. ध्रु०

विरहिं विकल तळमळतां, साजणि पळपळ निघतें युगसें जाण. १

मिणमिण करि असुदीप अंतरीं जळे कसातरि सजणाकारण. २

विरहपवनिं जरि ज्योत थरथरे, तगे आसपट, आड येइ घन. ३

तिळभरि परि नच उरलें तैलहि, जळे अतां तर वातहि त्याविण. ४

किति दिन बघशिल अंत साजणी, झरझर सरतें चंचल यौवन. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग -बागेसरी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २५ ऑक्टोबर १९३५

आज पारणें कां फिटलें ?

किति फुगशि फुलशि तूं छबिले !

लाजुनि मुरडुनि मुरकुंडि वळे छुम् छुम् चळती चरण खुळे ! ध्रु०

कोटि चंद्र नयनीं लखलखती, गालिं गुलाबहि किति फुलले ! १

अशि कशि बघशी दारुड्यापरी, भूत काय कुणि संचरलें ! २

तळमळ करिशी दिवस कितीतरी, आज पारणें कां फिटलें ? ३

स्मित गालीं, मधु ओठिं कांपरें, हसतिल तुजला गे सगळे ! ४

काजळ, कुंकूं, वेणिफणी कर, चढव साज सगळे अपुले ! ५

अशी उताविळ काय होशि गे ? सांज न होइल का चपले ? ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - हरिभगिनी
राग - वसंत
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

चौकीदार

अस्ताचलीं सूर्य, हें किर्र घन रान,
घाटींतली वाट, पायीं नसे त्राण. ध्रु०

ती गर्जना ऐक, हें हादरे रान !
ती मृत्युची हांक भयसूचना जाण. १

ये सांजचा पांथ, त्या थांबावायास
लावी इथे चौकि राजा दयावान ! २

हें झोपडें क्षुद्र, ती पाहिं परि खाट,
फळमूळकंदांस नाहीं इथें वाण. ३

त्या बोरजाळींत खुळखूळ वाहून
बोलावि ओढाहि करण्यास जलपान. ४

मी पेटवीं आग काटेरि झगर्‍यांत,
पाणी करीं ऊन, येईं करीं स्नान. ५

रे कोसचे कोस नाहीं कुठे गांव,
टेकावया अंग नाहीं कुठे ठाण. ६

घरची तुला ओढ, बघती तिथे वाट,
धोक्यामधें ऐक झोकूं नको प्राण. ७

निघतां उद्यां सूर्य, तूं लाग मार्गास,
दावीन मी वाट हातीं धनुर्बाण. ८


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - दुर्गा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २६ ऑक्टोबर १९३५

तें कोण या ठायिं ?

मी चालतां वाट, या येइं दारास,
घोटाळुनी पाय लागें स्वमार्गास. ध्रु०

पुरला निधी काय माझा कुठे येथ ?
हरपे इथे रत्‍न आधार जीवास ? १

ज्या जन्मजन्मांत शोधीं कुठे येथ
चिंतामणी काय लोपे जवळपास ? २

संदिग्ध मनिं लीन पूर्वस्मृती काय
जागूनि या ठायिं पिळतात ह्रदयास ? ३

जळल्या इथे काय आशा कधीं काळिं
ज्यांच्या मुळांतून नव पालवे आस ? ४

कां संचितीं गूढ सळसळ इथे होइ ?
किंवा फुटे वाट माझ्या भविष्यास ? ५

कां पापण्या येथ भिजती न कळतांहि ?
पोटांतुनी खोल कां येइ निश्वास ? ६

कां हें असें होइ ? कां कालवे जीव ?
तें कोण या ठायिं ज्याची धरूं कास ? ७


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - खंबावती
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ६ जानेवारी १९३६

संगीत कलेप्रत

अतां राहु देइं नाम
भजनिं कळाहीन राम ! ध्रु०

रागरागिणीमधून
ऐश्वर्ये नटुन सजुन
येइ ह्रदयपट उघडुन
राम परमसौख्यधाम ! १

नृत्य करिति तुझे सूर,
भरुनि भरुनि येइ ऊर,
तान-लय-निकुंजिं चूर
राम इंद्रनील शाम ! २

नलगे मज पुजापाठ,
दंभाचा थाटमाट,
गायनि तव ह्या विराट
राम मुनिमनोभिराम ! ३

ऐकतांच तुझी टीप
उजळति जणुं रत्‍नदीप
स्वर्ग येइ का समीप ?
राम दिसे पूर्णकाम ! ४

ऐकतांच तुझी तान
घेई मन हें विमान.
तमःपटावरि उडाण !
विमल तेजिं घे विराम ५

मनचक्षुच्या भवती
थय थय थय नृत्य करिति
स्वर्ललना ज्योतिष्मति
ही पुजा खरी अकाम ! ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - जीवनलहरी
राग - तोडी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १४ फेब्रुवारी १९३६

तरुणांस संदेश !

हातास ये जें, स्वनेत्रांपुढे जें, तया वर्तमाना करा साजिरें,

हेटाळुनी त्या अदृश्या भविष्यामधें बांधितां कां वृथा मंदिरें ?

जी 'आज' आली घरा माउली ती 'उद्यां'ची, स्वकर्मी झटा रंगुनी,

प्रासाद निर्मा स्वताच्या उद्यांचा इथे कर्मभूमीवरी जन्मुनी.

जो पाडि धोंडा अशक्ता, बली त्यावरी पाय रोवी, चढे तो वरी.

निःसत्त्व गाई करंटाच गाणीं स्वताच्या स्थितीचीं, बहाणे करी.

हातीं विटा त्या, चुना तोच, भव्य स्वयें ताज त्यांचा कुणी तो करी;

कोणा न साधे कुटीही; भविष्या रचाया हवें सत्त्व, कारागिरी.


कवी - भा. रा. तांबे
वृत्त - मंदारमाला
राग - भूप

कोठें मुली जासि ?

उगवे निशाकांत झाल्या दिशा शांत
न्हालें जगत्‌ काय क्षीराब्धि फेनांत ? ||ध्रु०||

या काळवेळेस निघतात वेताळ
नाचोन खिदळोन बेताल गातात ! ||१||

बाई, शरीरास उन्मादकर वास
तो आवडे यांस येतील अंगांत ! ||२||

गुंडाळुनी काम- धंदे मुली लोक
मातींत राबोन स्वगृहा परततात. ||३||

तरुवेलिच्या खालिं हे अंगणीं अंग
टाकूनिया स्वैर रमतात निभ्रांत ! ||४||

घालोनि चटयांस हे अल्पसंतुष्ट
स्वच्छंद तंबाखु पीतात खातात. ||५||

हीं पांखरें पाहिं येतात घरट्यांस
चंचूपुटीं भक्ष्य पिल्लांस नेतात. ||६||

तूं एकली मात्र कोठें मुली जासि ?
या राक्षसी वेळिं छाया विचरतात. ||७||


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ११ नोव्हेंबर १९४१

पुनः पुनः यावें

धन्य झालों देवा केलें आगमन

जाहलें पावन घर माझें

भजनपूजन नामाचा गजर

लाजले निर्जर देखोनिया

दाही दिशां भरे आनंदीआनंद

आनंदाचा कंद घरीं आला

आणखी याहून स्वर्ग दुजा काय ?

जेथें तुझे पाय तोची स्वर्ग !

भाबड्या भावाची अज्ञानाची सेवा

गोड केली देवा दयावंता

आतां गमनाची वेळ ये जवळ

जीवा तळमळ लागलीसे

पुनः पुनः यावें घ्यावा समाचार

हेंच वारंवार विनवीं देवा !


कवी - भा. रा. तांबे

तुझे चरण पाहिले

भाग्य उजळलें तुझे चरण पाहिले, ध्रु०

लागुनिया तुझे चरण
घर झालें हें पावन
इडापिडा जाति पळुन
ह्रदय विकसलें. १

नामाचा तुझ्या गजर
लाजति मुनिवर निर्जर
आनंदें भरलें घर
नयन-फळ मिळे. २

घडलें करिं तव पूजन
मुखें नामसंकीर्तन
दर्शनसुख घेति नयन
अंग हर्षलें. ३

करुणेचा तूं ठेवा
केली कशितरि सेवा
गोड करुनि परि देवा
सकळ घेतलें. ४

आतां परि करिसि गमन
पुनः पुनः दे दर्शन
हेंचि विनविं शिर नमवुन
हात जोडिले. ५


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ११ नोव्हेंबर १९४१

राजद्रोह कीं देशद्रोह ?

या पाप्याच्या पायांसाठी
अपराध्याच्या पायांसाठी
अपराध्याच्या कार्यासाठी
जोगि होइन !
झोळी घेइन
वरवासी वनिं रानीं राहिन !॥ध्रु०॥

तुम्ही शाहाणे थोर, यां म्हणतां राजद्रोहि;
यासाठिच मी बावळी पडलें याच्या मोहिं !
या कलिजाच्या देवासाठी
या जीवाच्या जीवासाठी - जोगिण इ. १

शिरार्थ याच्या लाविलें बक्षिस तुम्हिं हजार;
खडा पहारा करिन मी ! होइन आधीं ठार !
राज्यशासना मुकल्यासाठी
पतित, वध्य ह्या चुकल्यासाठी - जोगिण इ. २

राजद्रोहा कापतां दुखविन जननीद्रोह;
पोट जाळण्या टीचभर तुम्हा पडे व्यामोह !
या जननीच्या भक्तासाठी
मातृपदीं अनुरक्तासाठी -जोगिण इ. ३

व्यवहारीं डोळस तुम्ही, स्वप्न सुखीं व्हा अंध;
स्वप्न सुखास्तव याचिया झालें मी मतिमंद
जनांमधुनि या उठल्यासाठी
भविष्यामधे रतल्यासाठी-जोगिण इ. ४

लालुच लावुनिया मला करुं नका मतिभेद
खटाटोप तुमचा वृथा ! वज्रिंपडे कां छेद ?
या पृथ्वीच्या मोलासाठी
याच्या एकच बोलासाठी -जोगिण इ. ५

मातेच्या अश्रुंमधे शिजवुनि सेवा अन्न !
कंदमुळें बरवीं वनीं, जननी जरी प्रसन्न.
या माझ्या उपवाशासाठी-जोगिण इ. ६

जननीरक्तें रंगले तुमचे लाल महाल !
प्रीतिजळें धुतल्या बर्‍या यासह दर्‍या विशाल !
गृहविहीन या पांथासाठी
भणंग माझ्या कांतासाठी-जोगिण इ. ७

तुमच्या त्या देवालयीं वृत्तींचा बाजार,
दर्‍या, झरे, रायांतुनी राम करी संचार !
या माझ्या श्रीरामासाठी
तुम्ही टाकिल्या नामासाठी-जोगिण इ. ८

'हां जी, जी हां' करुनिया मिळवा स्वर्ग तुम्हीच !
जननि हितास्तव भांडतो देवाशीं हा नीच !
या पाप्याच्या पायांसाठी
अपराध्याच्या कार्यासाठी
जोगिण होइन झोळी घेइन - वनवासी वनिं रानीं राहिन ! ९


कवी - भा.रा.तांबे

झरा

घन पिता मम जो नटवी धरा,
मम असे जननी गिरि-कन्दरा;

जननिचे शरिरीं बहु नाचतीं,
खदखदा हसतों अणि खेळतों.

जलनिधी मम थोर पितामह;
सतत त्या सरिता-भगिनींसह

त्वरित भेटुं म्हणोनिच धावतों,
तरि वनस्पतिला तटिं पोसतों.

गगनचुंबित हे तरु लागती,
मम सुतावलि तीरिं मदीय ती;

पुजुनिया निज कोमल पल्लवें
मजवरी तरुराजि शिरें लवे.

हरित घालुनि वस्त्र तटीं, स्वतां
प्रणयरूपवती युवती लता

हरितपल्लवशालुस लेउनी
नटुनिया दंवमौक्तिक-भूषणीं-

विविध वर्णि अलंकृत होउनी
तरुपतीस अती कवटाळुनी

सुतनु त्या हसती सुमनें किती !
मम तटीं रमती पतिशीं अती.

प्रणय त्यांवरिही मम निश्चित;
मम जलांतरिं होउनि बिंबित

जरि विलोल तरी ह्रदयीं पहा
वसति त्या मम संततहि अहा !

कनकगोल रवी उदयाचलीं
सहज नाशित येइ तमावली;

तरुंतुनी कर घालुनि तो बळी
बहु सुवर्णसुमें उधळी जळीं.

पवन वंशनिकुंजिं शिरोनिया
श्रुतिमनोहर गान करोनिया

उठवितो द्विजवृक्षलतादिकां,
म्हणतसे, "प्रभुगान करा न कां ?"

खळखळाट तईं तम ऐकुनी
जळहि निर्मल हें मम पाहुनी

पिक करी मधुर प्रभुगायन;
करि मयूरहि तन्मय नर्तन.

सरसरा तरती बदकें जिथे
अचळ हो जळ दर्पणतुल्य तें;

उसळती जळिं चंचळ मासळ्या,
टपति त्या बक धीवर पंकिं या.

तरुंतुनी नृपतीसम वाहुनी
चमकतोंहि कुठें कुरणांतुनी,

कृषक लावित या तटिं शेत तो,
मधुनि मी विभवें स्थिर वाहतों.

जिथेजिथे वसतों, मज पाहतां
प्रमुदिता दिसते वनदेवता;

सुमफलांसह सज्ज सदैव ती
सुखविण्यास समा सकलां सती.

थकुनि भागुनि पांथ कधीं जरी
दुरुनि येइ तृषातुर या तिरीं

निवविं ताहन मी अपुल्या जळें.
निववितातहि भूक तरू फळें.

रविकरें गिरि-कानन तापती
परिभयें कर या जळिं कांपती !

रवि कसा मग तापद हो तया
पथिक जो कुणि ये मम आश्रया ?

मम तटीं पसरे घन सावली,
कधिं न वास करि कलि या स्थलीं;

झुळुझुळू स्वन मंजुळ गाउनी
निजवितों पथिकां मन मोहुनी.

मग कसा तरि होय न तुष्ट तो ?
स्वसदनीं सुत-पत्‍निंस सांगतो,

'कितिक रम्य असे तरि निर्झर !
अमित धन्य जगांत खरोखर !'

कधिकधीं रमणी रमणांसह
क्रमिति या तटिं काल सुखावह

नयनिं तें निज जीवित अर्पुनी
प्रणयकूजनिं मग्न इथें वनीं,

कर करांत अशंकचि घालुनी
बसति वंशनिकुंज सुखी मनीं.

पवन दे सुख शीतल वाहुनी,
सुखवितो पिक मंजुळ गाउनी.

विरहिणी विरहानलतापिता
कृशतनू बसते तटिं दुःखिता,

म्हणतसे, "सुख देशि जनां खरा,
मजशि दुःखद कां मग निर्झरा ?

तव तटीं रमती तरुंशीं लता
कधिं रमेन तशी पतिशीं अतां ?

नव सुमें फुलती तव या तिरीं,
मदनसायक तीव्र उरीं तिरी !"

उटज बांधुनिया तटिं तापसी
सुतप आचरिती सुखि मानसीं,

सतत चिंतन ते करिती इथे,
कितिक सेविति ते सुखशांतितें !

जळ मृगेंद्र तसे मृगही पिती,
द्विज तसे अतिशूद्र पिती किती !

लघु व थोर असा मुळिं भाव तो
मम मनांत कधींहि न राहतो.

किति युगें असति तरि लोटलीं,
नृपकुलें किति मीं तरि पाहिलीं,

विकृति जाहलि या जगतीं किती !
पलटली मनुजा, तव ही स्थिती.

दिवस वा रजनी, सुखदुःखहीं,
जननमृत्यु घडो जगिं कांहिंही;

तरिहि वाहतसें स्फटिकासम,
खिदळणें जगिं चालतसे मम.


कवी - भा. रा. तांबे
वृत्त - द्रुतविलंबित
देवास, १८८९-१८९०

कुस्करूं नका हीं सुमने !

जरि वास नसे तिळ यांस तरी तुम्हांस अर्पिलीं सु-मनें.

मधु जरी नसे तिळभरी अंतरीं तरी करीं हीं धरणें.

यां वर्ण नसे सौवर्ण; जों न हीं शीर्ण तोंवरी धरणें.

घ्या करीं, क्षणाभीतरी वाळतिल तरी तयांना जपणें.

ही वन्य फुलें मधुशून्य, मानितिल धन्य तुम्हां करि सजणें.

घरिं मुलें तशीं हीं फुलें, हूड वत्सले लोचनें बघणें.

अंगुली कठिण लागली तरी संपलीं ! हळुच या शिवणें.

ह्रद्वनीं फुलें कोठुनी जशीं उपवनीं उमलतीं नयनें ?

मालती, बकुल, जुइ जाति हीं जरी हातिं, हींहि असुं देणें.

अंजली धरुनि अर्पिलीं, भक्तिनें दिली म्हणुनि तरि घेणें !


कवी - भा. रा. तांबे
जाति - भवानी
रतलाम - उज्जैन, आगगाडींत,१९००

सुन्दरीदर्शन

हें सौन्दर्य तुझें बघून सुभगे ! आनन्द होतो मला,
आलेख्यीं लिहिण्या मला गवसला उत्कृष्ट हा मासला;
प्रीतिप्रेरक जो जगीं रस असे शृंगारनामें, रमे,
त्यानें ही भरली लता तनु तुझी माधुर्ययुक्ता गमे !            १

वर्णाया कवनीं मला गवसला उत्कृष्ट हा मासला,
बुद्धीनें असल्या जरी तुजवरी मीं लाविलें दृष्टिला,
आकांक्षा हृदयांतल्या निकट या आतां पहा धांवती –
त्वन्नामादिक सर्वही समजुनी त्या घ्यावया पाहती !            २


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
- काव्यरत्नावली, ऑगस्ट १९०४

राजा शांतनु

जा स्वस्थळास हरिणा सुखें; पहा बाण घेतला मागें;
तुजमागें आलों; पण तव लिप्सा मन्मनीं न ती वागे.        १

मृगयामिषें त्रिपथगा – तीरीं एकान्त साधुनी रानीं
विचरावें स्वैरपणें, या गोष्टीची असे मज शिराणीं.            २

तातें प्रतीपरायें कथिलें हितगूज जें मला, तेणें
भ्रम जडला हृदयाला, अन्य विषय तो मुळींहि मी नेणें.     ३

भ्रमहेतु तूंच अससी गंगे ! तव दर्शनें अहा भंगे –
ताप जनांचा, मग मम होतीं संतप्त केविं हीं अंगे !           ४

ममजन कदक्षिणांकीं बैसुनि पूर्वी तुवांच ना त्यातें
वचन दिलें ‘तुमच्याशीं सुनेचिया जुळिन साच नात्यातें.’   ५

तें देवि ! स्मरसी कीं? पुसतों सुत मी प्रतीपराजाचा,
भ्रमवुनि मज कोठेवरी दु:सह देसी मदंतरा जाचा ?         ६

मी मानव म्हणुनी तव शंकित जरि चित्त होय सुरसरिते,
तरि नच वचनविलंघन करिं, मर्त्यालाहि हीन जें करितें.   ७

देवेन्द्रतुल्य राजे इन्दुकुलोत्तंस विश्वसन्महित,
तद्वंशज मी असता शंकित व्हावें तुवां न हे विहित          ८

कां मग विलंब करिसी? गुंतवितें कोणतें तुला काम ?
धाम न रुचे मज वनीं फिरवी तव पाणिपीडनीं काम.       ९

ये, हो प्रकट लवकरी! पाहूं दे दिव्य मूर्ति तव मग ती
ज्योतिवरी शलभाची होऊं दे तेविं शीघ्र माम गती!         १०

ये ये ! धीर न धऱवें, करवेना काज मज पहा कांही!
वाहीं तुज औत्सुक्यें, जाई नभ त्या भरुन हाकांही !        ११


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति- आर्या
- 'यथामूल आवृत्ती', १९६७

कचाप्रत देवयानी

लोटून दु:खपंकी हा ! हा! मज दीन धेनुलागून,
प्रियसत्तामा कचा ! मज गेलास कसा सरोष टाकून !              १

भक्त स्वदेवतेचें प्रिय करितो, त्याहुनी विशेष गुणें;
माधें प्रिय तूं पूर्वी आचरिलें, पाडिलें न अल्प उणें;                २

तेणेंच द्विजराजा आसक्त कुमुद्वती स्वयें झालें;
नेणें मग कैचें हें प्राक्तन निर्घुण असें फळा आलें !                 ३

झालासि कसा निष्ठुर एकाएकीं कचेश्वरा आर्या !
प्रेमें बद्ध करुनि मज, भावी मग खंडिली कशी भार्या !            ४

विदित न तुज काय मदनुराग तुझ्यावरि कितीक होता तें !
तुज तीनंदा मदर्थचि विहताते जिवविलें अहा! तातें.              ५

तो तूंच काय शेखीं दु:खद उलटा असा जहालास !
हालहलहि न देइल ज्या दे हा शोक तीव्र हालास !                  ६

आम्ही परस्परां जरि निज जीवांहून अधिक आळविलें,
अन्योन्य़शप्त झालों, हतदैवें विष सुधेंत कालविलें !               ७

अन्योन्यशप्त होतां, सजव निघालसि तूं निजस्थाना,
रुष्टत्वें खिन्न वदन वळवुनि न बघें त्वदीय प्रस्थाना.            ८

कांही अवकाशानें दृष्टी केली समोर, तों नाहीं
तव रम्याकृति कोठें !- गमल्या मज शून्यशा दिशा दाही !       ९

तंव पश्चात्तापभरें नयनांतुनि टपटपां टिपें खवलीं;
तव मूर्तिच्या अहह ! ही, अन्तिमदर्शनसुखास आंचवली       १०

काया कुरंडावी ही ज्या जितमन्मथा तुझ्यावरुनी,
डोळे भरुनी त्या तुज कोठे पाहू अभागिमी फिरुनी !            ११

तुज शेवटी विषादें बहु मी पुरषोत्तरें अहह ! वदल्यें;
आतां ती परतुनि मम हृदयाला टोंचिती जशीं शल्यें !           १२

अश्रुक्लिन्नें नयनें सत्वर जर हीं अशींच मिटतील,
तर तें बरेंचि होइल – तव विरहक्लेश सर्व फिटतील !          १३

घालून निराशेचें अंडें, आशा अहा! उडुनि गेली,
झाडून पंख ज्यांवरि होतीं. तीं ईप्सितें गिरविलेलीं !            १४

जें गुणनिधान दुर्मिळ किंबहुना देवकन्यकांनाही,
तें माझे मीं म्हणतां, विधिनें लाभूं दिलें मला नाहीं !            १५

सुरगुरुच्या सुतरत्न ! तुजलागीं वरुनि धन्य मी व्हावें,
आणि मनीं धरिलें कीं, येथें मीं सुरपुरींहि मिरवावें !            १६

नन्दवनांत कल्प-व्रतती-कुंजी तुझ्यासर्वें गोष्टी
रसभरित आदराव्या, होती ही आस मानसीं मोठी !            १७

मन्दाकिनींत आपण जलकेलि करुनि सुर-द्रुमांखालीं
सेवित सुधा बसावें, हाय! मनीषा निरर्थ ही झाली !             १८

मत्कृत-सारी-दुर्ग-भ्रंश-भयें चालिलासि हळु मागें,
एक नकारें ध्वसिलें मम आशाहर्म्य केंवि तूं सांगे !            १९

येथें सदनीं किंवा पुष्पवनीं बहुत वस्तु आहेती
स्मारक तव, दिसतां त्या धृतिला होतात माझिया हेती !      २०

यजनाचीं उपकरणें जीं ताताकारणें तुवां हातें –
द्यावी, तीं कां मजला मागे तो, होतसे असें मातें !               २१

चढुनी द्रुमीं फुलें तूं खुडिलीं परडी मदीय भरण्यास,
पुष्पित ते बघुनि म्हणें व्यर्थ सुमें येति कां बरें यांस !          २२

लावियला दारीं तू अशोक तो असुनि शोक देतो कीं,
तो रक्त तूं विरक्त द्वैध असें अधिक पाडितें शोकीं !                २३

भिंतीवरि रंगविलीं चित्रें चतुरें तुवां पुरा रुचिरें,
तीं बघतां तुजविषयीं उत्कण्ठा मन्मनांत शीघ्र शिरे !           २४

मग मी होउनी विव्हल, जाउनि एकीकडे कचा ! रडत्यें,
काढत्ये विरहाग्रीनें, अधोमुखी भूवरी विकल पडत्यें !           २५

असुरीं तुज वघितां मीं मागे केला रडून आकांत;
त्या वेळीं हीं नाही झाल्यें इतुकी निमग्र शोकांत.                २६

त्या वेळीं पितयानें निजमंत्रें बाहतांचि आलास,
मन्नेत्र पुसनि मजला प्रेमें आश्वासिता जहालास !              २७

आतां मी भूमीवरि दु:ख करित लोळतां तुझ्याकरितां
येशी न कां? – वद कशी हाय तुझी आटली दयासरिता ?      २८

यावा तुला कळवळा कण्टक खुपतां मदीय चरणास,
मग खेंचिलें उरी मम तूं केंवि नकार या प्रहरणास ?            २९

अणुमात्र खेद होता मजला झटलासि त्याचिया हरणीं,
शोकीं कशी ढकलिली मग ही दावानलीं जशी हरिणीं ?         ३०

शोका ! तुजला वरित्यें, मजला तूं प्रिय कचेंचि दिधलासी,
मायेच्या पोटीं तूं दुर्विधिपासून जो उपजलासी !                  ३१

ज्येष्ठ स्वसा निराशा तव, शोका ! तूं परी तिशीं रमशी !
घेउनि मज पदरीं, दें आलिंगन तिजसर्वेंचि गाढ मशीं !         ३२

शोक, हताशा, दु:खें, आतां मज हींच होत गणगोत;
तूं त्यागितां कचा, मज सुखहेतु मुळीं समोरहि नकोत !        ३३

अथवा मीं लावावे बोल तुला कां म्हणून बहुसाल?
खिन्न मनीं आणावें दीन जने भग्न आपलें भाल !              ३४

मम जनकाच्या उदरीं वास तुला घडुनियां, नवें नातें
भ्रात्याचें जें जडलें तुझें मशीं; तूज मोडवेना तें.                  ३५

धर्मज्ञ द्विज मज तूं बन्धुसम, तुझ्यावरी मनी काम
अजुनि धरुनि मी भकतें हें उचित न खचित सज्जनीं काम.   ३६

परि वेड मला लावी अनुदिन बहुकाल चिन्तिला हेत,
हृदयांत मुळें त्याची गेलेली फार खोल आहेत!                   ३७

करित्यें विवेक बहु, परि ठसली तव मूर्ति आंत जी कांत !
भ्रांत मला ती करिते कांपविते सर्व मन्मन:प्रांत !               ३८

अक्षांची माळ तुझी घेउनियां तेंवि तुव मृगाजिन तें
बसुनि वनीं तप वाटे साधावे, त्यजुनि येथल्या जनते.         ३९

तूं मी बसलों येथें एकत्र म्हणून येथ ठरवेना;
परि तातस्नेहें मज पाउल येथून दूर करवेना !                  ४०

‘तुज कोणीहि न ऋषिसुत वरिल’ असा शाप तूं दिला मातें,
परि ऋषिसुत वा नृपसुत कोणी नलगे मला वरायातें !        ४१

रत्नाला मुकल्यावरि कोण गणिल लाभ कांच सांपडणें?
भग्न हृदय मम झालें, संसारसुखी नको मला पडणें.          ४२

मग आणखी विधानें न कळे लिहिलें असे शिरीं काय!
होऊ होणार तसें पुनरपि न म्हणेन मी मुखें ‘हाय’             ४३

कटु वदल्यें, शाप दिला, जा हें पूर्व स्मरुन, विसरुन;
करुणासिन्धो बन्धो ! विनवितसे हेंचि पदर पसरुन.          ४४

‘बन्धो !’ हे सम्बोधन तुज देतां खेद मन्मना वाटे;
आळळितांही शोका, जल चाले अहह ! लोचनांवाटे !           ४५


कवी - केशवसुत
जाति - आर्या
- मासिक मनोरंजन,नोव्हेंबर १९०२

वियुक्ताचा उद्धार (पाठान्तर)

राहे नित्य वसुंधरेस धरुनी हा भाग्यशाली गिरी;
यालागीं दयितावियोग न कधीं माझ्यापरी जाचितो,
वेलेला लहरीकरीं निरवधी हा अब्धि आलिंगितो,
कान्तेपासुनि मी परी विचारितों या दूरदेशान्तरीं !
चित्रोल्लास चिर प्रकाश सुभगच्छायासखीशीं करी;
त्यांचें संगमसौख्य पाहुनि मनीं मी फार वेडावतों;
पोटाशी धरुनी सदा सुरधुनी आकाश हा नांदतो,
त्याचा मत्सर उग्र दंश करितो वेगें मदभ्यन्तरीं !
तेणें व्याकुल होउनी झडकरी मी झांकितो लोचनें;
माया-ईश्वर, पुरुष-प्रकृतिही, वागर्थ, ऐशीं द्वयें-
सम्यग्युक्त बगून आंत, उघडीं त्रासून मी ईक्षणें,
तों नित्य द्युतिदेवतेसह रमे तो द्दग्पर्थीं सूर्य ये !
त्यायोगें विरहाग्रि फार भडके !- होतें नकोसें जिणें;
आतां हाय! न राहवे तुजविणें, कैसे करुं गे सये !


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
- १६ डिसेंबर १९०१

विद्याप्रशस्ति

(शुद्ध कामदावृत्ताच्या चालीवर)

असुनि जीभही, ज्याचियाविना
मौन लागतें घ्यावया जनां,
काय तें बरें? बोलिजे खरें –
ज्ञान तें बरें ! ज्ञान तें बरें !            १

सम्पदा फिकी जीपुढें पडे,
शक्तिचें जिच्यावांचुनी नडे,
कोण ती बरें ? सांगिजे खरें
शारदा बरें ! शारदा बरें !              २

दु:खहेतु ते दूर घालवी,
वसुमतीस जी स्वर्ग भेटवी,
भगवती असी सांग कोणती
ती सरस्वती ! ती सरस्वती !        ३


कवी - केशवसुत

वातचक्र

पर्जन्याचे दिवस उलगले,
थंडीचेही बरेच गेले;
पिकें निघाली; कारण नुरलें
सोसाट्यानें वहावयाचें; म्हणुनि मरुद्भण खेळांत –
मग्न होउनी, चक्रावतीं
आरोहूनि, सांप्रत हे जाती
गर गर गर गर भर भर एका निमिषांमध्यें गगनांत !     १

धूलीचे कण असंख्य उठती,
पक्ष्यांचे पर तयांत मिळती,
गवताच्या त्या काड्याहि किती,
थंडीनें गळलेली पर्णें जीर्णें उडतीही त्यांत;
सृष्टीचा हा असा भोंवरा
फिरतो आहे पहा भरारा,
गर गर गर गर धरणीपासुनि चढत असे तो गगनांत !    २

वाग्देवी गे ! दे शब्दांतें
भोंवर्‍यांत या फेंकुनि, त्यांतें
जरा जाउं दे निजधामातें,
नरें मळविलें अहह ! तेज तें पूर्वी होतें जें त्यांत
म्हणुनी शाप न आतां मारी,
आशीर्वचहि न आतां तारी,
तर गर गर गर त्यांस चढूं दे ताजे व्हाया स्वर्गांत !       ३

मींहि कशाला येथ रहावें ?
काय असे ज्या मीं चिकटावें ?
वाटे गिरक्या घेत मिळावें –
या पवनाच्या चक्रीं, होउनि लीन सच्चिदानंदांत;

जगदद्रुमाचें पिकलें पर्ण
गलित असें मी अगदी जीर्ण;
तर भर भर भर उडूं द्या मला शब्दांसगें स्वर्गांत!          ४


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति - श्यामाराणी
- मासिक मनोरंजन, जानेवारी-फेब्रुवारी १८९९

बाहुल्यांचा विलाप

दीन बाहुल्या तुम्ही पाहिल्या असतिल जितुक्या आजवरी,
तयांत अमुची हीनावस्था पुरी खरी,
असौख्यसदने अमुचीं वदनें मषी फांसुनी विरुपली,
हाय दुर्दशा कोठुनि आम्हां ही आली !
दिनरजनीभर अति आर्तस्वर काढुनि रडतों दु:खभरें-
“नसतों आलों जन्मा होतें तेंचि बरें !”
पाय बांधुनी वरते करुनी अशा प्रकारें उफराटें,
दारावरतीं लोंबविलेसें आम्हांते;
सरीवर सरी पडतां भारी पर्जन्याच्या जोमानें
अस्वस्थ अशीं असती जेव्हां सर्वजणें.
येता जातां. उचलूनि हाता, त्रस्त माणसें तेव्हां ती
मुखांत अमुच्या अहह चापट्या लगाविती;
हिंदुस्थानी बाया यवनी यापरि आम्हां वागविती;
बरसातीच्या अम्ही बाहुल्या, दीन किती!
मुसळधार तो पाउस पडतो, रविदर्शन होउं नेदी,
मास दोन तिन एकसारखा उच्छादी,
तेव्हां त्याचा अतिशय साचा कंटाळा जो त्यां येई,
तो आम्हाला यापरि भोवतसे पाही!
अहह! अम्हांला पडते, बदला पर्जन्याच्या भोगाया
विपदा, जी आणिती आम्हावरी त्या बाया!
खात चपाट्या, या उपराट्या स्थितींत लोंबत राहुनिया,
त्यांच्या सगळ्या उपमर्दाला साहुनियां
घेणें तोंवर लागे, जोवर हवा स्वच्छ नाही झाली,
शारदीय ती शोभा जों नाही आली !


कवी - केशवसुत
जाति - फटका
- बालबोधमेवा; १ सप्टेंबर १८९८, पृ. १४३

तहान आणि भूक आरंभी नव्हतीं

(अभंग)

तहान आणि भूक आरंभी नव्हतीं,
अन्नमुखें होतीं एक्या ठायीं;
कामाचा विषय नव्हता तो दूरी,
होतीं नरनारी एक्या देहीं;
तेधवां नव्हतें हात आणि पाय,
करायाचें काय त्यांही होतें ?
स्वर्ग आणि पृथ्वी जुळूनियां होतीं,
नव्हतीच खंती तेणेंयोगें.


कवी - केशवसुत
- 'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १२७

कांही स्वकृत वचनें

इहलोकींची कल्पकता
ती तर उद्योगप्रियता                  १

उद्योगांत वेळ ज्याचा नित्य जाई,
त्याला दैव होई अनुकूल            २

उद्योगाची धऱितां कास
होतों आपत्तींचा र्‍हास                ३

हृदयाचा जो निर्धार
सिद्धीचा तो देणार.                  ४

स्वयत्‍नेंच लागतो करुं,
होय तयाचा तो गुरु.                ५

बोल लावितो दैवास,
त्यास म्हणावें कापुरुष ?          ६

आधीं भर बांगड्या करीं,
मग हात कपाळावर मारीं.        ७

स्वमस्तकीं ज्याचा भार
तो नर काहीं करणार.             ८

सिद्धयर्थ सुखें मरणार,
तो नर कांही करणार.             ९

कर्तव्याला देई पाठ,
ती चाले नरकाची वाट.           १०

स्वकीय ज्याला लेखावें,
त्या न कधीं उत्तर द्यावें.           ११

जेथें धर्म जेथें नीति,
तेथें देवांची वसति,                १२

सत्त्वपूर्ण ज्याची वृत्ति,
त्याचीं दैवतें जागती.             १३

पैशासाठीं जीव देई !
त्याचा सौदा सस्ता नाहीं.        १४

पैशासाठीं न्याय टाकी
स्वर्गी शून्य त्याची बाकी.        १५

हृदयांतून न जे बोल
निघती, ते सगळे फोल           १६


कवी - केशवसुत
- 'यथामूल आवृत्ती', १९६७,

तिनें जातां चुंबिले असे यातें!

(ली हंटूच्या “Genny kiss’d me” या चुटक्याच्या आधारें )

“असे कान्ता रोगार्त – या घराला”
असा विद्युत्सन्देश मला आला;
चित्त चिन्ताकुलत होउनी, त्वरेनें
घरीं गेलों मी ग्रस्त संशयानें.            १

मला बघतां, विसरुनी व्यथा गेली,
शेज सोडुनि ती त्वरित पुढे झाली,
मला आलिंगुनि चुम्बिलें तियेंने,
आणि पडली मृत हाय पलार्धानें !       २

मधुर-हरण-व्रत काळ जो तयानें
अहह ! नेली सुन्दरी प्रिया ! तेणें;
शक्ति गेली, मम मति भ्रान्त झाली,
टिके मग का सम्पत्ति ? तीहि गेली !    ३

हीन म्हण तूं मज दीन तसा, काळा !
आणि म्हण कीं त्रासला हा जिवाला;
तरी म्हटलें पाहिजे हेंहि तूतें –
“तिनें जातां चुम्बिलें असे यातें !”       ४


कवी - केशवसुत
जाति - दिंडी
- २५ डिसेंबर १८९६

कांट्यांवाचुनि गुलाब नाहीं

कांट्यांवाचुनि गुलाब नाहीं
हें धर हृदयीं साच
नैराश्याचा मग तुजला
होईल न कधीं जाच !             १

सुखदु:खें हीं मिश्रित ऐशीं
असती नित्य जगांत
सुखाकारणे झटता पडते
दु:ख पहा पदरांत!                २

छायेवाचुनि कधीं प्रभा
कुणी पाहिली काय ?
चित्र होतसे, जेव्हा छाया
प्रभेस मिळुनी जाय !            ३

स्पृहणीय असें काय जगीं
एक असे ? तर प्रीत
हृदयभेदकर फार काय हो ?
तर, तीच हें खचीत !            ४

अविकृत ऐसें नसेचि कांहीं
विकृतिरुप संसार
ओळखुनी हें सोडूनी देई
शोक दु:ख अनिवार !           ५


कवी - केशवसुत
जाति-दोहा
- मासिक मनोरंजन, नोव्हेंबर-डिसेंबर, १८९६,

तत्त्वत: बघतां नामा वेगळा

तत्त्वत: बघतां नामावेगळा । कोण नाही सांगा मजला ।
भिन्न व्यक्तित्व नामाला । नामकरण होतसे ।।
नाम म्हणजे अभिधान । अभिधान म्हणजे जे वरुन ।
धारण केलें, ज्यामधुन अन्त: साक्ष पटतसे ।

भाव शब्दस्पर्शहीन तैसे रुपसगंधावांचुन ।
अतएव ते विषय जाण । इन्द्रियांचे नव्हेत ।।
ही तों वाणी मिथ्या वाटे । कारण पंचविषयांचे थाटें
भाव नटती, खरें खोटें । विचारुनी पाहिजे ।।


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- 'यथामूल आवृत्ती' १९६७, पृ. ४३

गुलाबाची कळी

एका मुलग्यानें
पाहिली कळी,
गुलाबाची कळी बहु गुलजार !
तिला भुलुनियां तो जवळी
गेला, होउनि लंफ्ट फार !
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !            १

मुलगा म्हणे “मी वेंचिन तुला
गुलाबाचे कळी ! सुंदर फार !”
कळी म्हणाली “बोंचिन तुला
नको हात लावूं पहा विचार !”
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !            २

निष्ठुर तो तर वेंचणारच
गुलाबाची कळी ती सुकुमार !
कळीहि त्याला बोंचणारच
असा तिला तो कुठें सोडणार !
हातिं जाणें तिला भाग पडणार !
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !            ३


कवी - केशवसुत
- मासिक मनोरंजन, एप्रिल १८९६

उत्तेजनाचे दोन शब्द

(दोहा)

जोर मणगटांतला पुरा
घाल घाल खर्ची;
हाण टोमणा, चळ न जरा
अचुक मार बर्ची !            १

दे टोले जोंवरी असे
तप्त लाल लोखंड;
येईल आकारास कसें
झाल्यावर ते थंड ?           २

उंच घाट हा चढूनियां
जाणें अवघड फार;
परि धीर मनीं धरुनियां
न हो कधीं बेजार !           ३

यत्न निश्चयें करुनी तूं,
पाउल चढतें ठेव;
मग शिखराला पोंचुनि तूं,
दिसशिल जगासि देव !      ४

ढळूं कधींही देउं नको
हृदयाचा निर्धार;
मग भय तुजला मुळीं नको,
सिद्धि खास येणार !          ५

झटणें हें या जगण्याचें
तत्त्व मनीं तूं जाण;
म्हणून उद्यम सोडूं नको,
जोंवरि देही प्राण !            ६


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- विद्यार्थीमित्र, वर्ष १, अंक ७, मार्च १८९५

चिन्हीकरण अर्थात् भाव आणि मूर्ति यांचे लग्न

भूचक्राची घरघर जिथें ती न ये आयकाया,
आहे ध्यानाभिध रुचिर तो कुंज त्या शांत ठायां,
त्याचे द्वारीं उपवर वधू मूर्तिनाम्नी विराजे
तीचे संगें वर परम तो भावशर्माहि साजे !                १

होती पर्युत्सुक बहुत ती शीघ्र पाणिग्रहाला,
तेथें आत्मा भ्रमत कविचा तो उपाध्याय आला;
स्फूर्तिज्वालेवरि मग तयें होमुनी जीविताला,
लग्नाला त्या शुभकर अशा लाविता तो जहाला !       २

गेलें कुंजीं त्वरित मग तें जोडपें दैवशाली
केली त्यांहीं बहुविध सुखें त्या स्थलीं प्रेम-केली;
झालीं त्यांना बहुत मधुरें बालकें दिव्य फार,
तीं जाणा हीं-सुरस कविच्या क्लृप्ति तैसे विचार !       ३


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
वृत्त - मंदाक्रांता
करमणूक, १६ फेब्रुवारी १८९५

फुलांतले गुण

बांधावरि झुडुप एक,
पुष्प तयावरि सुरेख
पाहुनि, मी निजहृदयीं मुदित जाहलों,
त्याजवळि चाललों !                       १

जाउनियां, त्या सुमनीं
काय असे, हें स्वमनीं
मनन करित, उन्मन मी तेथ ठाकलों,
या पंक्ति बोललों !-                         २

पुष्पीं या सुन्दरता
फार असे, ती चिता
वेधुनि, संसारताप सारिते दुरी,
उल्लसित त्या करी !                      ३

पुष्पीं या प्रीति असे,
ती मीपण हाणितसे,
परविषयीं तन्मयता प्रेरिते उरीं,
ने द्दष्टि अन्तरीं !                           ४

मार्दवही यांत फार
कारण, निज मधुतुषार
ढाळितसे स्वलतेच्या पल्लवीं अहा !
तें द्रवतसे पहा !                           ५

सद्गगुणही यांत वसे,
कारण, कीं, तेज असे
तेथें, स्मित करित सदा आढळे पुढें,
त्या तम न आवडे !                       ६

जादूही यांत भरुनि
दिव्य असे, ती पसरुनि
निज धूपा वार्‍यावरि, दश दिशा भरी,
बेहोष कीं करी !                           ७

यापरि मी उन्मनींत
होतों आलाप घेत;
आणिक या फुलांमधीं काय हो असे ?
तें काय हो असे ?-                        ८

तों जवळुनि मधमाशी
आली गुणगुणत अशी
“गाणें तें फुलामधें आणखी असे !”
ती बोलली असें !                         ९

पेल्यामधिं पुष्पाच्या,
गुंगत ती त्यात वचा,
शिरली; त्या वचनाची सार्थता भली
तों व्यक्त जाहली !                        १०

गुणगुणली मधमाशी
“पुष्पीं गुण जे तुजसी
आढळले, तुजमध्ये कितिक त्यांतुनी ?-
बा, घेई पाहुनी !”                        ११


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति - उन्मती
मुंबई, ३१ मार्च १८९३

(खाणावळीतील) धृतधारा!

सुवर्णाची वल्लि प्रचलित जणूं काय गमते !
नभांतूनी भूमीवरति चपला वा उतरते !
पडे खालीं केव्हां त्वरित, नयनांला न दिसते !
नभीं वा पातालीं लपलि धृतधारा न कळते !                १


कवी - केशवसुत
वृत्त – शिखरिणी
करमणूक, ११ मार्च १८९३,

“माझे चित्त ठेवुनि घे”

( करमणुकीतला हितचिंतकाचा “माझें धाडुनि चित्त दे” हा चुटका वाचल्यावरुन)

“माझें धाडुनि चित्त दे” लिहुनि हें मी धाडिलें कां तुला ? –
पश्चात्ताप असा बळावुनि अतां जातीतसे गे मला !
तूं काहीं मजपासुनी हृदय हें मागूनि नेलें नसे;
गेलें तें तुजमागुनी तर तुझा अन्याय का हा असे ?              १

गेलें तें तुजमागुनी, सहृदये ! येऊं दिलें तूं तया,
हा तुझा उपकार मीं विसरुनी जावें न मानावया;
तें राहूनि दुरी, स्वकीय मजला देसी न तूं चित्त तें,
हा मानूनि विषाद, मी चुकुनियां गेलों भ्रमाच्या पथें !           २

चित्ताचा तव लाभ यास घडुनी येणार नाहीं जरी,
पायापासुनि तूझिया चळुनियां जाणार नाहीं तरी –
माझें चित्त दुरी; - असुनि पुरतें हें ठाउकें गे मला –
“माझें धाडुनि चित्त दे” म्हणुनि मीं कैसें लिहावें तुला ?        ३

झाली चुक खरी, परन्तु सदयें ! मातें क्षमा तूं करी,
मच्चित्तावरतीं यथेष्ट कर गे स्वामित्व तूं सुन्दरीं !
अव्हेरुनि मदीय चित्त परतें देऊं नको लावुन,
माझें ठेवुनि चित्त घे ! – मग जगीं धन्यत्व मी मानिन !      ४


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
मुंबई १ मार्च १८२१

मरणानंतर

If thou survive my well contented day - Shakespeare

मातें निर्दय अंतकें लवकरी नेऊन लोकांतरी
मागें सुंदरि ! राहलीस जर का तूं एकली भूवरी,
या तूं आपुलियि गतप्रियकर श्लोकांस साध्या तरी
वाचायास मला स्मरुन फिरुनी घेशील ना गे करीं ?

त्यातें घेउनियां सखे ! सरस त्या भावी कृतींशीं तुळीं,
ते त्या आणि जरी, तुळेंत ठरले नादान ऐसे मुळीं,
मत्प्रीतीकरितां तयां जप, न त्यां तत्सौष्ठवाकारणें,
जें तत्सौष्ठव पाडितील पुढले मोठे कवी ते उणें.

प्रेमें आण मनांत हें – “जर सखा माझा पुढें वांचता,
काव्यस्फूर्ति तदीत उन्नत अशी होती न का तत्त्वतां ?
या पद्मांहुनि फास सुन्दर : अशी पद्में अहा ! तो गुणी
प्रीतीप्रेरित होउनी विरचिता; वाटे असे मन्मनी.

“हा ! हा ! तो मजपासूनी परि यमें नेला असे कीं वरी !
आतांचे कवि हे वरिष्ठ गमती त्याच्याहुनी अन्तरी;
यांच्या पद्धतिला, म्हणूनि भुलुनी यांच्या कृती वाचितें,
त्याची वाचितसें परी स्मरुनि मी त्याचे अहा ! प्रीतितें!”


कवी - केशवसुत
वृत्त – शार्दूलविक्रीडित
- जानेवारी १८९२

पर्जन्याप्रत

ग्रीष्मानें तपली धऱा करपली ही काय कीं, वाटतें;
चारा व्यर्थ गुरें पहा हुडकती; नेत्रीं धुळी दाटतें;
छायेला जल तें असे जर कुठें, फेंसास त्या गाळित
त्या ठायीं जमती गुरें, पथिकही धापांस ते टाकित.               १

ऐशी होउनियां दशा दिवस ते झाले बहु, पावसा !
ये आतां तर तूं त्वरा करुनियां लंकेवरुनी असा.
तूझ्या आगमनार्थ दर्दूरपती वापीतळापासुनी
रात्रीचे निज कंठशोष करिती हांका तुला मारुनी.                 २

काकांही अपुलीं पहा घरकुलीं झाडावरी डाळिलीं,
दाण्यानें घऱटीं भरुनि चिमण्या यांहीं तशीं टाकिलीं;
तूं येणार म्हणूनियां वळचणींखाली गड्या ! सम्प्रती
पाकोळ्याहि ‘फडक् फडक्’ करित या वस्तीत धुंडाळिती.        ३

रात्रीच्या दिवट्याच ज्या तव अशा खद्योतिका या पुढें
झाल्या दाखल; पावसा ! विसमसी तूं सांग कोणीकडे?
रात्रीं त्या झुडुपांमधीं फिरकती जेव्हां तयांच्या तति,
उत्कण्ठा तुझियाविशीं अमुचिया चित्तामधें प्रेरिती.              ४

भेटायास तुला समुत्सुक अशा मुंग्या उडूं लागती,
पर्जन्या ! तर ये ! कृषीवल तुझ्या मार्गाप्रती ईक्षती;
झंझावातह्यावरी बसुनियां, या पश्चिमाब्धीवरी
लाटा झोडित, गर्जना करित ये, बा मेघराजा, तरी !            ५


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
जून १८९१

कवि (पाठान्तर)

जो संसारपथावरी पसरितो मस्तिष्कपुष्पें निजें,
आहे अद्भुत रम्य का अधिक तें त्याहून कांही दुजें ?
चाले तो धरणीवरी, तर पहा ! येथून तो जातसे
धूली लागुनि त्या सुवर्णमयता तेथील कीं येतसे !            १

तो गंभीर वदे रवा, तर मुक्या पृथ्वीस लक्ष श्रुती
होती प्राप्त नव्या, समुत्सुकतया ती ऐकते मागुती ;
दृष्टी तो फिरवी वरी, तर लवे आकाश तें खालती,
तारांचे गण गावयास वरुन स्तोत्रें अहा ! लागती !           २

एकान्तांत निकुंज जो विलसतो त्याचा, तयाच्यावरी
शाखा उत्तम आपुली सुरतरु विस्तारुनी तो धरी;
आश्चर्यें अमितें सलील निघती तेथून लोकाधिकें,
तीं घ्याया अवलोकुनी कळतसे त्रैलौक्यही कौतुकें !         ३

त्या कुंजीं निजवाद्य घेउनि जधीं तद्वादनीं तो गढे
नृत्यालागुनि ऋद्धिसिद्धि करिती सानन्द त्याचेपुढें !
उत्तान ध्वनि जे नितान्त घुमुती जाती तधीं अंबरीं
ते गन्धर्व अगर्व कीं परिसती आकाशयानीं वरी !            ४


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
मे १९१९

त्वत्प्रीतीस अपात्र हा जन

त्वत्प्रीतीस अपात्र हा जन तुला कालान्तरीं वाटला,
तोडावा तुजला मदीय जर हा संबन्ध गे लागला,
माझी हस्तक जोडुनी तर तुला विज्ञापना ही असे
( ती तूं मान्य करीं म्हणूनि तुज मी हा दास याचीतसें) :-      १

बोटें मोडुं नको, तसे मजवरी डोळे वटारुं नको,
आंठ्या घालुं नको, प्रसन्नमुखता देऊं चळूं ती नको,
मातें ती अवधीरणा, जिवलगे, दावावया लौकरी,
पायानें झिडकारणें न बरवें मातें गमे सुन्दरी     !               २

कां की, तूं प्रणयें बिघाड लटिका जेव्हां मशीं दाविसी,
त्या वेळीं असले प्रकार बहुधा तूं लाडके ! योजिसी;
यालागूनि जंधीं प्रकार तसले पाहीन तूझेवरी,
तेव्हां ते मज भासतील अवघे सव्याज, साचे जरी.              ३

कण्ठीं घालुनि हात, चुम्बन हळू माझें गडे ! तूं करीं,
मेरी जान् ! गुलगार ! सांग निघुनी जायास मातें दुरी !
तेणें त्रास तुला मुळीं न पडणें होईल माझे करें,
कां कीं तें तव सांगणें मज गडे वाटेल तेव्हां खऱें !              ४


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
मुंबई, १५ डिसेंबर १८९०

सुभाषित

(हे एक इंग्रजी पुस्तकात वाचण्यात आले)

मूर्खांचा तर सुळसुळाट जगतीं आहे असा कीं, जर
गद्धयाचें मुक पाहणेंहि नलगे कोणी जनाला, तर
कीजे बंद तयें समस्त खिडक्या दारें तशीं लाविजे,
तैसा सत्वर आरसाहि अपुला फोडूनियां टाकिजे !


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
डिसेंबर १८९०

निद्रामग्न मुलीस !

सुमारे १२-१३ वर्षांच्या एका निजलेल्या मुलीस पाहून सुचलेले विचार

निद्रामग्र मुली! तुझें मुख अहा! हें रम्य आहे किती! –
तें साधेपण, नम्रता, मधुरता, शान्ती, तिथें शोभती !
कौमार्य नवयौवना न अजुनी थारा दिला वाटतें.
स्वर्गातील तरीच मुग्धतरता या त्वन्मुखीं राहतें !              १

कोणी येथ जरी मनुष्य नसतें, किंवा तुझा हा लय
ब्रह्मानंदनिमग्र-यास नसतें नासावयाचें भय,
तुझे कोमल हे कपोल – मधुनी जे भासतें हांसती,
होतों मी तर त्यांस वत्सलपणें चुम्बूनी बाले! कृती.           २

ऐसें मी म्हणतों म्हणूनि ठपका कोणी न ठेवो मला,
कांकी फारच ओढितें तव गडे ! कौमार्य मद्दुष्टिला !
यासाठींच तसें वदूनि चुकलों तूतें स्वसा मानुन,
पापेच्छेस शिवाय चोदक नसे देहीं तुझे यौवन.                 ३

हा जो मी कवितेंत गे द्रवुनियां गेलों तुला पाहतां,
याचें कारण फार भिन्नच असें ते सांगतो मी अतां:-
ताई गे! तव या अनिश्चित जगीं होईल कैशी दशा,
मी शोकाकुल होऊनी गढुनियां गेलों विचारीं अशा.            ४

थोड्याशां दिवसांमधेंच तव हें कौमार्य गे जाइल;
लज्जारोधितलोललोचन असें तारुण्य तें येइल;
त्यांची फुल्ल विलोकुनी विकसनें डोळे दिपूनी तव,
या लोकविषयीं विचार तुजला येतील कैसे नव?-            ५

‘नानाभोगनियुक्त गोड किती हा संसार आहे बरें ?
जन्मापासूनि कां न तो वितसिला आम्हांवरी ईश्वरे ?”
नानाक्लुप्ति अशा कदाचित तुझ्या चित्तांत त्या येतिल;
जातांना परि लौकिकानुभव तो तूं कायसा नेशिल ?         ६

ज्या ह्या आज अजाणतेपण असे गालीं तुझे शोभतें,
ही शोभा अथवा अजाणपण ज्या गालीं भलें दावितें,
त्य गालीं कटु जाणतेपण पुढें ओढील ना नांगर ! –
त्या तासांवर जाणतेपण तसें बैसेल ना भेसूर !              ७

ह्या तुझ्या मुधरे ! मुर्खी मधुरशा, त्या सर्वही भासती   
चेतोवृत्ति समप्रमाण, न दिसे भारी अशी कोणती;
कांहीका दिवशीं तुला जर गडे ! ठेलों पहाया जरा,
सद्ववृत्तींसह  या तुझा फिरुनि मी वाचीन का चेहरा ?          ८

राहो हें सगळें, अशी कुळकथा नाहीं मुळीं संपणें.
तूं माझी भगिनी ! म्हणून तुजला आशी असे अर्पणें :-
हे माझे भगिनी ! दिनानुदिन गे दु:खें अम्हां घेरिती,
त्यांतें हाणुनियां सुखें तुज सदा भेटोत ती राखितीं !        ९


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
डिसेंबर १८८९

आई! आई!

विद्यार्जनार्थ अपुल्या प्रिय जन्मदेला
आलास सोडुनि घरास जिवा ! पुण्याला;
‘आई ! म्हणून तिज साम्प्रत बाहतोसी,
ती उत्तरास तुज देइल येथ कैशी !                 १

ही हांक ती परिसती जननी जरी का,
धांवून येउनि तुला धरिती उरीं गा;
“बा बहिलें मज कशास निजेंत बाळा?
भ्यालासि रे!” म्हणुनि घेतिच चुम्बनाला !      २

“माझा पुता करित काय असेल आतां!
कोठें असेल निजला! हरि तूं पहाता !
तो काय हाय! इतुक्यांतचि दूर जावा !
नाहीं तयास अजुनी परवास ठावा!”               ३

माते! असें म्हणत तूं असशील, धांवा
पुत्रार्थ गे करित तू असशील देवा !
नेत्रांस अश्रुसर तो सुटला असेल !
पान्हा स्तनीं खचित गे फुटला असेल !          ४

आहे तुझा पहुडला सुत येथ माते,
निद्रा परी स्थिर न येत असे तयातें;
स्वप्नांत मारित असे तुज हांक ‘आई!’
कोणी परी अहह ! उत्तर देत नाही!                ५

खोलींत या सकल त्यास नवे पदार्थ,
त्याचेविशीं अलग हें दिसतात मठ्ठ;
बाहेर चन्द्र दुसराच निशेंत आहे,
हा आंत दीपहि उदासिन पेंगताहे !               ६


कवी - केशवसुत
वृत्त - वसंततिलका
६ नोव्हेंबर १८८९

कोठें जातोस?

“कुठें जाशी?” – शर्करा घ्यावयाला;
अमुक पंताला पुत्र असे झाला,
म्हणुनि आतां इष्टांस वांटण्यास
हवी आहे शर्करा बहू त्यास”                  १

“कुठें जाशी तूं?”- “फुलें आणण्यातें;
तमुक रावाच्या असे लग्न येथें,
वधुवरांला त्या गळां घालण्याला
करायाच्या आहेत तेथ माळा,”              २

“आणि कोठे तूं ?” – “नविन पसारा तो
संसृतीचा मांडीत आज आहें;
म्हणुनि बाजारा करायास जातों;-
घरीं जिवलग ती वाट बघत आहे !”        ३

“आणि तूं रे?” – “जातसें आणण्यासी
वैद्यबोवाला, अमुक वृद्ध यासी
वायु झालाहे!” – “जा ! परेतवस्त्रें
विकत घेउनि शोध तूं गोवर्‍या रे !”        ४

पुढुनि दिसतें मग मढें एक येतां.
“कुठें बाबा जातोस सांग आतां?” –
हवेंतुनि हे पडतात शब्द पाहीं
“कुठें जातों हें मला कळत नाही!”         ५


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

जाति - दिंडी
१२ जून १८८९

मुलांस झोडपणार्‍या एका पंतोजीस

कोणें मूर्खपणें गुरुपण तुला क्रूरा ! असे रे दिलें !
कां खाटीक न जाहलास? – तुजला तें शोभतें चांगलें !
या बाळांप्रत फार निर्दयपणें कां तूं असा मारिसी ?
केला रे अपराध काय असला यांनी ? – वदें रे मशीं.                १

पाहोनी प्रतिकार-अक्षम अशीं ही बालकें, यांवर
घ्यावें हातसुखा ! – तुझ्या गुरुपणा हा डाग मोठा तर !
हातांला तुझिया जरी खुमखुमी होती, तरी ते मुके
धोंडे आणिक वृक्ष काय नव्हते ? – तांडी तयांला सुखें !           २

यांचें न्यून असेल ( हें मज कळे) कांही स्वपाठान्तरीं,
काढायास परन्तु ते भरुनियां, ही रीति नोहे बरी.
केव्हां धाकहि, पारितोषिक कधीं, गोडीगुलाबी कधीं,
शिक्षा योग्य कधीं करुनि गुरु ते नांवास येती सुधी                 ३

कोंबायास घशांत मूठभर रे बाळांचिया मृत्तिका,
त्यांचा स्वर्ग समग्रही झडपितां चोपून त्यांला फुंका !
-हें केव्हां शिवतें तरी तुमचिया का रुक्ष रे अन्तरीं ?
कांपा ! मुग्ध मुलें समोर बघुनी, जेव्हां छडी घ्या करीं !          ४


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
- एप्रिल १८८९