“कुठें जाशी?” – शर्करा घ्यावयाला;
अमुक पंताला पुत्र असे झाला,
म्हणुनि आतां इष्टांस वांटण्यास
हवी आहे शर्करा बहू त्यास” १
“कुठें जाशी तूं?”- “फुलें आणण्यातें;
तमुक रावाच्या असे लग्न येथें,
वधुवरांला त्या गळां घालण्याला
करायाच्या आहेत तेथ माळा,” २
“आणि कोठे तूं ?” – “नविन पसारा तो
संसृतीचा मांडीत आज आहें;
म्हणुनि बाजारा करायास जातों;-
घरीं जिवलग ती वाट बघत आहे !” ३
“आणि तूं रे?” – “जातसें आणण्यासी
वैद्यबोवाला, अमुक वृद्ध यासी
वायु झालाहे!” – “जा ! परेतवस्त्रें
विकत घेउनि शोध तूं गोवर्या रे !” ४
पुढुनि दिसतें मग मढें एक येतां.
“कुठें बाबा जातोस सांग आतां?” –
हवेंतुनि हे पडतात शब्द पाहीं
“कुठें जातों हें मला कळत नाही!” ५
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
जाति - दिंडी
१२ जून १८८९
अमुक पंताला पुत्र असे झाला,
म्हणुनि आतां इष्टांस वांटण्यास
हवी आहे शर्करा बहू त्यास” १
“कुठें जाशी तूं?”- “फुलें आणण्यातें;
तमुक रावाच्या असे लग्न येथें,
वधुवरांला त्या गळां घालण्याला
करायाच्या आहेत तेथ माळा,” २
“आणि कोठे तूं ?” – “नविन पसारा तो
संसृतीचा मांडीत आज आहें;
म्हणुनि बाजारा करायास जातों;-
घरीं जिवलग ती वाट बघत आहे !” ३
“आणि तूं रे?” – “जातसें आणण्यासी
वैद्यबोवाला, अमुक वृद्ध यासी
वायु झालाहे!” – “जा ! परेतवस्त्रें
विकत घेउनि शोध तूं गोवर्या रे !” ४
पुढुनि दिसतें मग मढें एक येतां.
“कुठें बाबा जातोस सांग आतां?” –
हवेंतुनि हे पडतात शब्द पाहीं
“कुठें जातों हें मला कळत नाही!” ५
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
जाति - दिंडी
१२ जून १८८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा