विद्यार्जनार्थ अपुल्या प्रिय जन्मदेला
आलास सोडुनि घरास जिवा ! पुण्याला;
‘आई ! म्हणून तिज साम्प्रत बाहतोसी,
ती उत्तरास तुज देइल येथ कैशी ! १
ही हांक ती परिसती जननी जरी का,
धांवून येउनि तुला धरिती उरीं गा;
“बा बहिलें मज कशास निजेंत बाळा?
भ्यालासि रे!” म्हणुनि घेतिच चुम्बनाला ! २
“माझा पुता करित काय असेल आतां!
कोठें असेल निजला! हरि तूं पहाता !
तो काय हाय! इतुक्यांतचि दूर जावा !
नाहीं तयास अजुनी परवास ठावा!” ३
माते! असें म्हणत तूं असशील, धांवा
पुत्रार्थ गे करित तू असशील देवा !
नेत्रांस अश्रुसर तो सुटला असेल !
पान्हा स्तनीं खचित गे फुटला असेल ! ४
आहे तुझा पहुडला सुत येथ माते,
निद्रा परी स्थिर न येत असे तयातें;
स्वप्नांत मारित असे तुज हांक ‘आई!’
कोणी परी अहह ! उत्तर देत नाही! ५
खोलींत या सकल त्यास नवे पदार्थ,
त्याचेविशीं अलग हें दिसतात मठ्ठ;
बाहेर चन्द्र दुसराच निशेंत आहे,
हा आंत दीपहि उदासिन पेंगताहे ! ६
कवी - केशवसुत
वृत्त - वसंततिलका
६ नोव्हेंबर १८८९
आलास सोडुनि घरास जिवा ! पुण्याला;
‘आई ! म्हणून तिज साम्प्रत बाहतोसी,
ती उत्तरास तुज देइल येथ कैशी ! १
ही हांक ती परिसती जननी जरी का,
धांवून येउनि तुला धरिती उरीं गा;
“बा बहिलें मज कशास निजेंत बाळा?
भ्यालासि रे!” म्हणुनि घेतिच चुम्बनाला ! २
“माझा पुता करित काय असेल आतां!
कोठें असेल निजला! हरि तूं पहाता !
तो काय हाय! इतुक्यांतचि दूर जावा !
नाहीं तयास अजुनी परवास ठावा!” ३
माते! असें म्हणत तूं असशील, धांवा
पुत्रार्थ गे करित तू असशील देवा !
नेत्रांस अश्रुसर तो सुटला असेल !
पान्हा स्तनीं खचित गे फुटला असेल ! ४
आहे तुझा पहुडला सुत येथ माते,
निद्रा परी स्थिर न येत असे तयातें;
स्वप्नांत मारित असे तुज हांक ‘आई!’
कोणी परी अहह ! उत्तर देत नाही! ५
खोलींत या सकल त्यास नवे पदार्थ,
त्याचेविशीं अलग हें दिसतात मठ्ठ;
बाहेर चन्द्र दुसराच निशेंत आहे,
हा आंत दीपहि उदासिन पेंगताहे ! ६
कवी - केशवसुत
वृत्त - वसंततिलका
६ नोव्हेंबर १८८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा